Showing posts with label उस्मानाबाद. Show all posts
Showing posts with label उस्मानाबाद. Show all posts
विद्यार्थ्यांनी जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन कष्ट करण्याची तयारी ठेवावी — डॉ. दापके देशमुख दिग्गज

विद्यार्थ्यांनी जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन कष्ट करण्याची तयारी ठेवावी — डॉ. दापके देशमुख दिग्गज


इकबाल मुल्ला
लोहरा :- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन  कष्ट करण्याची तयारी केली तर, समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल, असे प्रतिपादन सह्याद्री फाउंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ. दापके देशमुख दिग्गज यांनी केले.
लोहारा हायस्कुल शाळेत डायरेक्टर
चाईल्डलाईन व सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद यांच्यावतीने दि.30 जानेवारी 2019 रोजी गुणवंत शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार व 1098 टोल फ्रि नं.ची जनजागृती कार्यक्रम व तसेच दहाविच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी ते प्रमुख म्हणुन बोलत होते.
यावेळी प्रथम राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ होते तर प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाऊंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज, बाल कल्याण समिती अध्यक्ष ए.डी.कदम, सह्याद्रि समन्वयक गजानन पाटील, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते मजहर पठाण, महादेव धारुळे, अदि उपस्थित होते. यावेळी शिक्षक व गुणवंत विदयार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करण्यात आले. चाईल्डलाईन,  उस्मानाबाद यांच्या '1098' या टोल फ्री नंबर ची जनजागृती करण्यात आली. यानंतर या शाळेतील दहावितील मुला, मलींनी विविध गितावर उत्कृष्ट नृत्य सादर करुन मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डी.एम.पोतदार व गजानन पाटील व सुत्रसंचालन सतिश जट्टे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ यांनी मानले. या कार्यक्रमास सांस्कृतीक विभाग प्रमुख विजय नागणे, विठ्ठल वचने पाटील, वसंत राठोड, छाया शिंदे, बाळासाहेब लांडगे, संजय घोडके, माधव हाणमशेट्टी, जी.एस.पायाळ, सारीका चिकटे, स्वाती माशाळकर, शिल्पा साबणे, निर्मळा कोळी, विद्या मक्तेदार, पी.यु.देवकर, शिवराज शिदोरे, सदाशिव बचाटे, वैजिनाथ होळकुंदे, दिलीप शिंदे, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते हराळी गाव लोकराज्यग्राम ने सन्मानित

पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते हराळी गाव लोकराज्यग्राम ने सन्मानित


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- जिल्हा माहिती कार्यालय व ज्ञान प्रबोधिनीचे मार्गदर्शन याचबरोबर गावातील युवकांचा चांगल्या गोष्टी करण्याचा ध्यास यामुळे हराळी गावास आज प्रजासत्ताक दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कोलते, पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्या उपस्थितीत लोकराज्यग्राम म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच बलभीम सूर्यवंशी, किसन सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, सुनील रणखांब व सचिन सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला  .

    महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक घरोघरी पोहोचवून त्याचा गावातील युवकांकरिता उपयोग करून आपले गाव लोकराज्यमय करण्याकरिता गावातील युवकांनी मोठया प्रमाणात पुढाकार घेतला.त्यात महेश राजे,रवींद्र सोनवणे,अनिल रणखांब, कल्याण औटे,संतोष मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रदीप बिराजदार,रघुनाथ बिराजदार, अतुल बिराजदार,मल्लिकार्जून गौरकर,संतोष कंटेकर व गावातील जेष्ठ नागरिक सुभाष बिराजदार, विकास सूर्यवंशी व सुरेश पाटील यांचा सहभाग होता.
सरपंच बलभीम सूर्यवंशी यांनी जिल्हा माहिती कार्यालय व ज्ञान प्रबोधिनीच्या मार्गदर्शनामुळेच लोकराज्य या मासिकाविषयी  गावातील युवकांमध्ये जागृती आली आहे व याचा उपयोग भविष्यात नक्कीच खूप चांगला होईल,अशी प्रतिक्रिया दिली तर होतकरू युवक सचिन सूर्यवंशी यांनी ज्ञान प्रबोधिनी व जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप साहेबांच्या मार्गदर्शनानुसार गावातील युवकांमध्ये लोकराज्य मासिकाविषयी आवड निर्माण झाली, या मासिकाचे महत्व पटले आणि म्हणूनच आम्ही आमचे गाव लोकराज्यग्राम करण्याचा निश्चय केला,अशी प्रतिक्रिया नोंदविली.

     गावातील युवकांच्या आणि गावाच्या उज्वल भविष्यासाठी आम्हाला लोकराज्य मासिक नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास या गावातील युवकांनी व जेष्ठांनीही व्यक्त केला आहे.
*आज याच सोहळ्यात एका शाळेला लोेकराज्यशाळा, एका कृषी विकास कंपनीला लोकराज्य कृषी विकास कंपनी तर दोघांना लोकराज्यदूत म्हणूनही गोैरविण्यात आले.*
यामध्ये लोकराज्यदूत म्हणून श्री.उमेश सोनवणे व विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंखे, लोकराज्यग्राम म्हणून  हराळी ग्रामपंचायत, लोकराज्यशाळा म्हणून लोकसेवा  शिक्षण प्रसारक मंडळ, भूम यांचे श्री. गुरुदेवदत्त हायस्कूल, लोकराज्य कृषी कंपनी म्हणून भैरवनाथ किसान कृषी प्रोडयूसर कंपनी, गौर ता. कळंब यांना विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
cm चषक जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

cm चषक जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे बक्षीस वितरण


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उस्मानाबाद cm चषक क्रिडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भाजपा प्रदेश सरचिटणीसय आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते दि.25 जानेवारी 2019 रोजी उस्मानाबाद शहरातील आनंद नगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी राहणार आहेत. तर प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितीन काळे, अँड.मिलिंद पाटील, विधानसभा पालक अँड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, जिल्हा संयोजक प्रदीप शिंदे, अँड खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अँड. व्यंकटराव गुंड, डॉ.प्रतापसिंह पाटील, अदि उपस्थित राहणार आहेत. क्रीडा विश्वात गाजलेल्या cm चषक क्रीडा स्पर्धाना जिल्ह्यात मोठा प्रतिदमि मिळाला आहे. व्हॉलीबॉल, क्रिकेट, रनिंग, कुस्ती, कब्बड्डी, खो-खो, नृत्य, गायन, रांगोळी, कॅरम अशा स्पर्धामध्ये तब्बल पन्नास हजारा पेक्षा अधिक खेळाडुंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धामुळे ग्रामिण भागातील खेळाडुंना, कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी मोठी संधी प्राप्त झाली. या स्पर्धात विजयी झालेल्या खेळाडुंना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, प्रवीण पाठक, धनंजय रणदिवे, इंद्रजित देवकते, गणेश मोरे, विजय शिंगाडे, प्रशांत मोहिते, बालाजी चव्हाण, प्रदीप सांगवे, गणेश देशमुख, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, सरचिटणीस नाना घाटगे यांनी केले आहे.
अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी — विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची मागणी

अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी — विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची मागणी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका विद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन होळी येथील ग्रामस्थ, रिपब्लिकन पार्टी आठवले गट (रोजगार आघाडी), महिला राजसत्ता आंदोलन यांच्यावतीने तहसीलदार लोहारा यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे कि, लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर येथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला आहे. या घचनेचा जाहीर निषेध करुन या आरोपींना फाशीची, शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर रिपाई आठवडे गट रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, पँथर नेते दत्ता गायकवाड, बालाजी माटे, दगडु कांबळे, मंगलताई कांबळे, शांताबाई भालेराव, रमाबाई भालेराव,

अंजनाबाई भालेराव, लक्ष्मन रोडगे, ग्रामसृष्टी जिल्हा समन्वयक मारुती बनसोडे, महिला राजसत्ता आंदोलन बालिका मोरे, शैला मोरे, अनिता साठे, मुकेश सोनकांबळे, संगीता कांबळे, प्रविण बोंदाडे, जयश्री बिराजदार, सरपंच व्यंकट माळी (होळी), संजय बिराजदार, किरण अंहकारे, केशव सरवदे, लिंबराज कदम, धनराज जाधव, जनार्धन जाधव, बालाजी जाधव, किशोर कोकाटे, सदाशिव जमादार, यांच्यासह महिला व नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात सह्या आहेत.
सीएम चषक क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना क्रीडाकौशल्य दाखवन्याची संधी निर्माण झाली— आ.सुजितसिंह ठाकुर

सीएम चषक क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना क्रीडाकौशल्य दाखवन्याची संधी निर्माण झाली— आ.सुजितसिंह ठाकुर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सी एम चषक क्रीडा स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखवन्याची संधी उपलब्ध झाली असुन  ग्रामीण खेळाडूंनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ही स्पर्धा प्रचंड यशस्वी केली आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले.
 भाजपाच्यावतीने सीएम चषक जिल्हास्तरीय सामन्यांच्या स्पर्धेचे उदघाटन उस्मानाबाद शहरात दि.18 जानेवारी 2019 रोजी  आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी होते. तर प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितीन काळे,
प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, खंडेराव चौरे, सुधिर पाटील, व्यंकट गुंड, जिल्हा सरचिटनीस संताजीराव चालुक्य पाटील, जालिंधर मोहिते, प्रभाकर मुळे, प्रताप सिंह पाटील,भाजप मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, सोशल मिडियाचे प्रवीण  पाठक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, ओबीसी मोर्चाचे डॉ.गोविंद कोकाटे, जिल्हा
उपाध्यक्ष नितीन भोसले, विजय शिंगाडे
नगरसेवक शिवाजी पंगुडवाले, बालाजी कोरे, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष राहुल काकड़े, शहर अध्यक्ष संदीप कोकाटे, इंद्रजित देवकते, नागेश नाना नाईक, प्रविण कोळगे, दत्ता सोनटक्के, जि.प.सदस्य राजगुरू माऊली, डॉ.अजुर्न साबळे, विनायक कुलकर्णी, जिवन वाठवडे, अविनाश हावळे, श्रीराम मुंबरे, प्रसाद पानपुडे, विपीन शिंदे, किशोर तिवारी, युवा मोर्चा संयोजक गणेश मोरे, अदि उपस्थित होते.
यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर म्हणाले कि, जिल्ह्यात 55 हजार खेळाडूंनी विविध स्पर्धांमधे सहभाग घेतल्याचे सांगुन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या या अभिनव संकल्पनेला राज्यातील 50 लाख स्पर्धकानी नोंदणी करुन प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पांडुरंग पवार यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहारा शहरातील महेबुब फकीर यांची राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

लोहारा शहरातील महेबुब फकीर यांची राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहराती महेबुब फकीर यांची उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक  जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे नेते जिल्हाध्यक्ष आ.राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते महेबुब फकीर यांना या निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्या जिल्हाध्यक्ष तारीख भाई मिर्झा, प्रदेश सरचिटणीस मसुदभाई शेख, मराठवाडा उपाध्यक्ष कादरखान पठाण, नगरसेवक खलिफा कुरेशी, नगरसेवक बाबा मुजावर, आसदभाई, इलियास पिरजादे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख (लोहारा), अल्पसंक्याक तालुका अध्यक्ष मुख्तार चाऊस (लोहारा), राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब शेख (लोहारा), यांच्यासह राष्टवादी कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबध्दल महेबुब फकीर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लोहारा शहरातील तहसील कार्यालयाच्यावतीने पत्रकार व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक

लोहारा शहरातील तहसील कार्यालयाच्यावतीने पत्रकार व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोग यांच्यावतीने दि.21  डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत उस्‍मानाबाद जिल्‍हयात ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीन बाबत विविध ठीकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्‍या अनुषंगाने लोहारा शहरातील तहसील कार्यालयातील सभागृहात दि.18 जानेवारी 2019 रोजी तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांनी या जनजागृती मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेवुन शहरातील पत्रकार व सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना  ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीन बाबत सविस्तर माहीती सांगीतली.

 यावेळी पत्रकारांना व राजकीय पदाधिकाऱ्यांना ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. यावेळी सर्वांनी प्रात्याक्षिक स्वरुपात मतदान केले. यावेळी पथक प्रमुख मंडळ अधिकारी बी.एस. जगताप, तलाठी एस.एन.खरात, मास्टर ट्रेनर आर.टी.गायकवाड, राहुल माशाळकर, अव्वल कारकुन बालाजी चामे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, पत्रकार बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले, महेबुब फकीर, माजी भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, प्रशांत काळे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, नितीन  सितापुरे, सविता प्रकाष चौधरी, शंशीकांत कुलकर्णी, अक्षय माटे, मधुकर वाघमारे, शहाजी गर्जे, शामराव माने, यांच्यासह पत्रकार व विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
cm चषक उस्मानाबाद जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांचे आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते  उदघाट्न कार्यक्रमाचे आयोजन

cm चषक उस्मानाबाद जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांचे आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते उदघाट्न कार्यक्रमाचे आयोजन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हा क्षेत्रातील क्रिडा स्पर्धां राज्यभर सहभागाने होत असलेल्या cm चषक क्रिडा स्पर्धांच्या उस्मानाबाद जिल्हा क्षेत्रातील खेळांचा त्रिस्तरीय असलेल्या या स्पर्धेच्या जिल्हा स्तरीय स्पर्धा दि.17 व 18 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रिडा संकुलात सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, लोकसभा संयोजक नितिन काळे, अँड मिलिंद पाटील, विधानसभा पालक अँड अनिल काळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, जिल्हा संयोजक प्रदीप शिंदे, अँड खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अँड व्यंकटराव गुंड, अदि उपस्थितीत राहणार आहेत. या स्पर्धाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कब्बडी,खो-खो,धावणे,क्रिकेट,कुस्ती,रांगोळी,नृत्य अशा विविध क्रीड़ाप्रकारांसह कलागुणांना प्रोत्साहित करने असा या स्पर्धांचा उद्देश आहे. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, इंद्रजित देवकते, गणेश मोरे, विजय शिंगाडे, प्रशांत मोहिते, बालाजी चव्हाण, प्रदीप सांगवे, गणेश देशमुख,  शहराध्यक्ष संदीप कोकाटे, सरचिटणीस नाना घाटगे यांनी केले आहे.
लोहारा शहरातील महेबुब मोमीन तेंगु सु दो कराटे स्पर्धेत राष्ट्रीय विजेता न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलच्यावतीने सत्कार

लोहारा शहरातील महेबुब मोमीन तेंगु सु दो कराटे स्पर्धेत राष्ट्रीय विजेता न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- 64 वी राष्ट्रीय शालेय स्पर्धा तेंग सु दो कराटे 2018 --2019 हि स्पर्धा दिल्ली सरकार द्वारे क्षत्रसाल स्टेडियम दिल्ली येथे दि. 2 जानेवारी ते 9 जानेवारी रोजी घेण्यात आल्या होत्या.
 या स्पर्धेमधे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा शहरातील महेबुब बिस्मिल्ला मोमिन याने महाराष्ट्राचे प्रतिधित्व करुण या स्पर्धेत सिल्वर मैडल  मिळवुन महाराष्ट्राची शान वाढवुन राष्ट्रीय विजेता झाला. यावेळी पद्म विभूषण महाबली सतपालजी ( चिप प्रेसिडेंट स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया ) पद्मश्री  सुशील कुमार ( प्रेसिडेंट स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया ) रॉकी डी सुजा ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तेंग सु दो ), सुभाष मोहिते ( तेंग सु दो महाराष्ट्र राज्य सचिव ), प्रशिक्षक महमदरफी शेख, यांच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आले.
लोहारा शहरात आगमन होताच शिवाजी चौकात दि.11 जानेवारी 2019 रोजी महेबुब मोमीन चे शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतषबाजी व पेढे वाटुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य शहाजी जाधव, माजी युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे, नगरसेवक आयुब शेख, नगरसेवक श्रीनिवास माळी, शिवा स्वामी, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, सहदेव काडगावे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, बिस्मिल्ला मोमीन, मिस.सविता जाधव, सिध्देश्वर सुरवसे,  प्रकाश तोडकरी, हारुन हेड्डे, विशाल मुनाळे, वर्षा शेवाळे, गणेश सुर्यवंशी, पुजा दाळींबकर, अनुराधा बंडगर, रवि चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिजाऊ, सावित्री जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व व्याख्यान कार्यक्रम

जिजाऊ, सावित्री जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व व्याख्यान कार्यक्रम


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुका यांच्यावतीने जिजाऊ-सावित्री जन्मोत्सवानिमित्त
 लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात  जागर रणरागिणीचा, सन्मान स्त्री शक्तीचा प्रबोधनात्मक व्याख्यान व कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
  सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ -  सावित्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती आश्विनीताई पाटील (लोहारा) होत्या तर प्रमुख  म्हणून डॉ.संदीप तांबारे सर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे, उपाध्यक्षा ताई बोराडे, संघटक वंदनाताई भगत, मसेसचे गोरे साहेब, भास्कर वैराळे सर, वि बी वी पी  जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अदि उपस्थित होते.
यावेळी "सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांचे स्थान" या विषयांवर मार्गर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. संदीप तांबारे म्हणाले की,  स्त्रिया सक्षम व्हायच्या असतील तर त्यानी त्यांच्या मनातील न्युनगंड काढून टाकला  पाहिजे. स्त्री ही मूळातच खूप ताकदवान, बुद्धिमान, सशक्त, सोशिक असते. निसर्गाने स्त्रीला खूप प्रबळ बनवले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये गुणवत्ता नक्कीच जास्त आहे. परंतु संधीच्या अभावी ती उपेक्षित राहते. तरीही विषमतावादी वातावरणात स्त्री आपले स्थान बळकट करत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री खांबीरपणे उभी असते. हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. स्त्री तिच्या आयुष्यात अनेक भूमिका पार पाडत असते. कधी ती आई असते, कधी बायको, बहिण तर कधी मैत्रीण. परंतु या सर्व भूमिकामध्ये ती पुरुषांच्या मागे एक प्रेरणा बनून उभी असते. स्त्रिया प्रगतीच्या प्रवाहात मागे राहिल्या तर त्याचे अनिष्ठ परिणाम समाजावर दिसून येतील. स्त्रियाना समजून घेण्यात पुरुष कमी पडत आहेत. स्त्रीच्या भावना, विचार निर्मळ मनाने समजून घेतले पाहिजे. अशा व्यक्ती संख्येने फार कमी आहेत हीच शोकांतिका आहे. स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळावे, तिच्याबद्दल सर्वानी आदर बाळगावा अशी स्त्रीची अपेक्षा असते. यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच समतावादी, स्त्रीप्रधान संस्क्रुतीची वाढ होईल. जिजाऊ, सावित्री यांच्या चरित्रातुन प्रेरणा घेत आज अनेक महिला प्रगतीपथावर असुन त्यांची क्रांतिकारी वाटचाल सुरु आहे. जिजाऊ ब्रिगेड याच विद्रोही विरागंणांचा वारसा जपत महिलांचे प्रबोधन करीत आहे,असे सांगीतले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्राचीन काळापासून महिलाना दुय्यम दर्जा मिळाला आहे. समाजात नेहमी जात, धर्म आणि लिंग याआधारे भेदभाव केला जातो. लिंगाधारित भेदभावामूळे महिलांचे समाजातील स्थान खूपच रसातळाला गेले आहे. समाजात पावलोपावली स्त्रीची खूप उपेक्षा होत आहे. पुरुषांचा स्त्रीकडे पाहाण्याचा द्रुष्टीकोन निर्मळ नाही हे आपण अनुभवावरुन सांगू शकतो. पुरुषप्रधान संस्क्रुतीत स्त्रीची होणारी कुचंबना नवीन नाही. तरीही जिजाऊ सावित्रीमाईसह अनेक महिलांनी विषमतावादी परिस्थितीवर मात करुन उज्ज्वल इतिहास निर्माण केला आहे, असे सांंगीतले.
यावेळी कला, क्रिडा, वकील, पोलिस, डॉक्टर, राजकीय, सामाजिक, साहित्यिकसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सर्व रणरागिणींचे जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने  पुष्पगुच्छ व पुस्तके भेट स्वरूपात  देवुन अनोख्या प्रकारे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा शिवमती रंजनाताई हासुरे व सूत्रसंचालन मोहिनी मोरे यांनी केले तर संभाजी ब्रिगेड उमरगा तालुकाध्यक्ष मोहन जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे दीपक जाधव, प्रकाश भगत, श्रीधर इंगळे, दत्ता जाधव, श्रीकांत हासुरे, रवींद्र अंबुरे, व्हीबीव्हीपी च्या जयश्री सुरवसे, मोहीनी मोरे, निकिता कोळगे, महादेवी जाधव, अनुसया माळी, संभाजी ब्रिगेडचे संजयनाना जाधव, दादा पाटील, सहदेव गोरे, शैलेश चंदनशिवे, श्रीधर इंगळे, दत्ता जाधव, राम शिंदे, गोविंद सोबाजी, युवराज मडोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
केशेगाव येथे भाजपा ओबीसी मोर्चाची शाखेची स्थापना

केशेगाव येथे भाजपा ओबीसी मोर्चाची शाखेची स्थापना


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाची शाखा स्थापन करण्यात आली.
याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थितीत होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गोविंद कोकाटे होते. या कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.गोविंद कोकाटे, भाजप मिडिया सेल जिल्हाध्यक्ष धनजंय रनदिवे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. अनिल काळे, अँड खंडेराव चौरे, सरचिटणीस सतीश देशमुख, लोकसभा विस्तारक पांडुरंग पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर राजगुरू, संतोष क्षिरसागर, सिद्धु गोफने,अदिनी नागरीकांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मुंबरे यांनी केले तर  आभार रंगनाथ कोळगे यानी मानले.
या कार्यक्रमास संयोजन पं.स.सदस्य महेश चांदणे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रमेश कोळगे, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष गौतम ठेले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी व ग्रामिण भागातील सर्वसामान्य  नागरीक व महिलांना आरोग्यविषयक मोफत सुविधा — आ.ज्ञानराज चौगुले

शेतकरी व ग्रामिण भागातील सर्वसामान्य नागरीक व महिलांना आरोग्यविषयक मोफत सुविधा — आ.ज्ञानराज चौगुले


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकरी, ग्रामिण भागातील सर्वसामान्य नागरीक, महिला, किशोरवयीन मुली, 16 वर्षाखालील बालकांना आरोग्यविषयक मोफत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन सामाजिक भावना जपत उमरगा,लोहारा,
उमरगा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले, आयएमए व जिल्हा आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले
 बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे होते. तर या शिबिराचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे (उमरगा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणुन आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी (लोहारा), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कठारे (लोहारा), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुशील चव्हाण (उमरगा), स्पर्शचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, आय एम ए आय एम ए अध्यक्षा डॉ.सौ.दीपा मोरे  (उमरगा), शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे (लोहारा), शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे (उमरगा), बार्शीच्या कँन्सर हॉस्पीटलचे डॉ.विजय दुलंगे, सरपंच यशवंत कासार  (सास्तुर), जगन पाटील, नामदेव लोभे, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक अभिमान खराडे, धनराज चौगुले,अदि उपस्थित होते.
या शिबिरात 394 महिलांची गर्भाशय, गर्भाशयाचे आजार तसेच स्तनाचा कॅन्सर या साठी तपासणी करण्यात आली. गरजू महिलांची पॅप स्मिअर, एफ.एन.ए.सी. हि तपासणी करण्यात आली. तर 11 महिलांवर   शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित रुग्ण  महिलांची टप्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. व ज्या रुग्णांमध्ये कँन्सर आढळले. त्यांच्यावर बार्शी येथील नर्गिसदत्त कँन्सर रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.रमाकांत जोशी व सूत्रसंचालन अच्युत आदटराव यांनी केले तर आभार  वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मस्के यांनी मानले. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरास महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिवा शिवा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते सोमनाथ लोहार यांचा लोहारा भाजपा तालुका यांच्यावतीने सत्कार

जिवा शिवा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते सोमनाथ लोहार यांचा लोहारा भाजपा तालुका यांच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लाेहारा शहरातील सोमनाथ लोहार यांनी अत्यंत गरीबी परिस्थितीवर मात करीत मराठी चित्रपटात काम करीत यांनी जिवा शिवा  चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेता म्हणुन उत्कृष्ट काम केले आहे. यांनी अनेक मालीका मध्येही उत्कृष्ट काम केले आहे. यांचा मराठी चित्रपट जिवा शिवा रिलीज होवुन सिनेमागृहात सुरु आहे. या चित्रपटास प्रेषकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमनाथ लोहार यांनी कमी कालावधीत चांगली प्रगती केल्याने यांचा लोहारा शहरात दि.9 जानेवारी 2019 रोजी  लोहारा तालुका भाजपाच्यानतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमाेद पाेतदार, भाजपा आेबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, भाजपा विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, नागनाथ लाेहार, तुकाराम विराधे, अनुसुचित माेर्चा तालुकाध्यक्ष दयानंद शेवाळे, हकिम देशमुख, मारुती पवार, विजय दरेकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपसथित हाेते.
शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्याची मागणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे भाजपा मीडिया  जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी निवेदनाद्वारे केली

शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्याची मागणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे भाजपा मीडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी निवेदनाद्वारे केली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांना मासीक पेन्शन अथवा मानधन योजना सुरू करण्याची मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़.अमित शहा यांच्याकडे भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद लोकसभा प्रमुख धनंजय रणदिवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे़.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारी अंतर्गत भाजपाची क्लस्टर बैठक व शक्तीकेंद्र प्रमुखाचे संमेलन लातूर येथे घेण्यात आले़.
 यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, संघटन महामंत्री आ. सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री विजय पुराणिक, मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लोकसभा प्रभारी मनोज पांगारकर, अ‍ॅड. मिलींद पाटील, संयोजक नितीन काळे, आदीं उपस्थित होते.
या संमेलनानंतर खा.अमित शहा यांनी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली या 4  जिल्ह्याच्या लोकसभा संयोजन समितीची बैठक घेतली. यावेळी भाजपा मीडियाच्या वतीने जिल्हाप्रमुख  धनंजय रणदिवे यांनी खा. अमित शहा यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना मासीक पेन्शन अथवा मानधन योजना लागु करण्याच्या मागणी केली आहे़. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी कधी अवर्षण, दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, पिकाची नासाडी, रोगराई, दरामधील अनिश्चितता आदी कारणाने संकटात येतो. शेतकरी हा भारत देशाचा मुख्य कणा, अन्नदाता आहे़. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृषी विकास महामंडळ स्थापना करावी. तसेच निराधार योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति महिना किमान 1500 ते 1700 रुपयेपासून पुढे  पेन्शन सुरू करावे, शिवाय महामंडळामार्फत शेतकऱ्यांना  छोटे-छोटे व्यवसाय, लघु उद्योग, शेतीपुरक कामांसाठी कर्ज योजना राबविण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी प्रदेश सदस्य सुधीर पाटील, लाभार्थी संयोजक साहेबराव घुगे, विधी विभागाचे अ‍ॅड़प्रतिक देवळे, अ‍ॅड.नितीन भोसले, आशाताई लांडगे, विस्तारक पांडुरंग पवार, सोशल मीडिया संयोजक प्रविण पाठक आदी उपस्थित होते. यावेळी गंभीरता से विचार होंगा खा.शहा यांनी निवेदन घेवून ‘गंभीरता से विचार होगा’ असे अश्वासीत केले.
युवक कॉगेस जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांचा लोहारा नगरपंचायतच्या वतीने सत्कार

युवक कॉगेस जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांचा लोहारा नगरपंचायतच्या वतीने सत्कार



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी लोहारा नगरपंचातला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरपंचायतच्यावतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पं.स.सभापती अश्विनी पाटील, नुतन उपसभापती हेमलता रणखांब,  माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, जि.प. सदस्य रफिक तांबोळी, पं.स.चे माजी सदस्य चंद्रकांत (तात्या) पाटील, युवा सेना माजी तालुका प्रमुख दिपक मुळे, शिवा स्वामी, माजी 
 पं.स.सभापती आसीफ मुल्ला, नगरसेविका जयश्री कांबळे, नगरसेवक तथा कॉग्रेस गटनेते आरीप खानापुरे, कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, कॉंग्रेस सरचिटणीस रब्बानी नळेगावे, जयश्री लोहार, यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहारा पं.स.च्या उप सभापतीपदी कॉंग्रेसच्या  हेमलता रणखांब

लोहारा पं.स.च्या उप सभापतीपदी कॉंग्रेसच्या हेमलता रणखांब


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा पं.स.च्या उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या हेमलता रणखांब यांची बिनविरोध निवड झाली
आहे.
 लोहारा पं.स.च्या सभागृहात दि.7 जानेवारी रोजी प.स.सदस्यांची पिठासीन अधिकारी तहसीलदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक अधिकारी म्हणुन गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी काम पाहीले. या बैठकीत सर्वानुमते उपसभापती हेमलता रणखांब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड झाल्यानंतर उपसभापती यांचा पं.स.च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पं.स. सभापती अश्विनीताई पाटील, माजी सभापती ज्योतीताई पत्रिके, कॉग्रेस तालुका अध्यक्ष अमोल पाटील, नितीन पाटील, अँड. विश्वनाथ पत्रिके, प्रा.दिनकर बिराजदार, ब्रह्मानंद पाटील, बाबासाहेब चव्हाण, शिवाजी दुणगे, सुग्रीव रणखांब, प.स.सदस्य वामन डावरे, पं.स.सदस्य व्यंकट कोरे, शंकर गुरव, तानाजी माटे, तानाजी पाटील, यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी व  बालीकादिन यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वही-पेन्सिल चे वाटप

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी व बालीकादिन यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वही-पेन्सिल चे वाटप


ताहिर मिर्ज़ा.
उमरखेड़ :- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,शाखा-उमरखेड तर्फे आज दि.३/०१/२०१९ रोज गुरुवारला सावित्रीबाई फुले जयंती मारिया इंग्लिश स्कूल ताजपुरा येथे साजरी करण्यात आली, यावेळी दोन बालिका यांनी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची वेशभूषा धारण केली होती. तर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषण केलीत व तसेच यावेळी प्रमोद वाळूककर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बालीकादिन निमित्ताने विद्यार्थांना वही-पेन्सिलचे वाटप करण्यात आली. यावेळी सिद्दीकी राज,शहबोद्दीन कुरेशी,मैलांना याकूबखान,सगीर तंन्हा ,टिपू सिराजुल हक,महाराष्ट्र पूर्व विभाग अध्यक्ष दीपक ठाकरे, तालुकाध्यक्ष विलास चौधरी, उपाध्यक्ष जमीर खतीब, सचिव प्रभाकर दिघेवार, उपसचिव फराहात मिर्झा, प्रमोद वाळूककर, इब्राहिम सौदागर, माधव चौधरी, शेख शफीभाई,आकाश राऊत आदी उपस्थित होते.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पंडीत परसे तर उपाध्यक्षपदी सौ.प्रतिभा परसे

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पंडीत परसे तर उपाध्यक्षपदी सौ.प्रतिभा परसे


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील कास्ती बु  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन
 समितीच्या अध्यक्षपदी पंडीत परसे तर उपाध्यक्षपदी सौ.प्रतिभा परसे यांची निवड करण्यात आली आहे.
 कास्ती बु येथील जि.प.प्रा शाळेत शालेय  व्यवस्थापन समिती नवनियुक्त सदस्याची बैठक
मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांचा शाळेच्या   वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी चंद्रकांत भंडारे, रामेश्वर जगदाळे, योगीता कोळी, अलका भंडारे, उषा रवळे, रेखा पाटील, बळीराम साबळे, यांची निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात गरीब महिलांना साड्या वाटप

आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात गरीब महिलांना साड्या वाटप


1
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा,लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्यावतीने सद्याची दुष्काळ परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेवुन सामाजिक उपक्रम राबवित लोहारा शहरातील हायस्कुल शाळेच्या प्रांगणात दि.5 जानेवारी रोजी गरीब गरजुवंत महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
2

या कार्यक्रमास बबन स्वामी, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, नगरसेवक शाम  नारायणकर, नगरसेवक अभिमान खराडे,जगदिश लांडगे, युवक शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, उपशहर प्रमुख, तलत खुटेपड, प्रमोद बंगले, प्रभारी सरपंच दत्ता पाटील (मार्डी), उमेश गोरे, मोहन गोरे, इन्नुस पटेल, राजेंद्र रवळे, संजय दरेकर, कुलदिप गोरे, नितीन जाधव, कुर्बान खुटेपड, बालाजी माशाळकर, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
3
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी


1
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिॆधी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची दि.9  जानेवारी रोजी सोलापूर येथे भव्य सभा आयोजित केली असून या सभेसाठी संपूर्ण उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या संदर्भात सोलापूर येथे सहकार मंत्री नामदार सुभाष बापू देशमुख यांनी बैठक घेतली.
2

या बैठकीला उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, अनिल काळे, रामदास अण्णा कोळगे, प्रभाकर मुळे, सत्यवान सुरवसे, तानाजी पाटील, यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. संसदेचे अधिवेशन दि.8 जानेवारी रोजी संपणार असून लगेच दुसऱ्या दिवशी दि.9 जानेवारी रोजी सोलापूर येथे मोदींच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ व भव्य सभा आयोजित केली आहे.

यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या या सभेस उस्मानाबाद तुळजापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत भारतीय जनता पार्टी जिल्हा उस्मानाबाद च्या वतीने आवाहन केले आहे.
3