इकबाल मुल्ला
लोहरा :- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन कष्ट करण्याची तयारी केली तर, समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल, असे प्रतिपादन सह्याद्री फाउंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ. दापके देशमुख दिग्गज यांनी केले.
लोहारा हायस्कुल शाळेत डायरेक्टर
चाईल्डलाईन व सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद यांच्यावतीने दि.30 जानेवारी 2019 रोजी गुणवंत शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार व 1098 टोल फ्रि नं.ची जनजागृती कार्यक्रम व तसेच दहाविच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी ते प्रमुख म्हणुन बोलत होते.
यावेळी प्रथम राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ होते तर प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाऊंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज, बाल कल्याण समिती अध्यक्ष ए.डी.कदम, सह्याद्रि समन्वयक गजानन पाटील, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते मजहर पठाण, महादेव धारुळे, अदि उपस्थित होते. यावेळी शिक्षक व गुणवंत विदयार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करण्यात आले. चाईल्डलाईन, उस्मानाबाद यांच्या '1098' या टोल फ्री नंबर ची जनजागृती करण्यात आली. यानंतर या शाळेतील दहावितील मुला, मलींनी विविध गितावर उत्कृष्ट नृत्य सादर करुन मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डी.एम.पोतदार व गजानन पाटील व सुत्रसंचालन सतिश जट्टे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ यांनी मानले. या कार्यक्रमास सांस्कृतीक विभाग प्रमुख विजय नागणे, विठ्ठल वचने पाटील, वसंत राठोड, छाया शिंदे, बाळासाहेब लांडगे, संजय घोडके, माधव हाणमशेट्टी, जी.एस.पायाळ, सारीका चिकटे, स्वाती माशाळकर, शिल्पा साबणे, निर्मळा कोळी, विद्या मक्तेदार, पी.यु.देवकर, शिवराज शिदोरे, सदाशिव बचाटे, वैजिनाथ होळकुंदे, दिलीप शिंदे, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
