लोहारा/प्रतिनिधी :- जिल्हा माहिती कार्यालय व ज्ञान प्रबोधिनीचे मार्गदर्शन याचबरोबर गावातील युवकांचा चांगल्या गोष्टी करण्याचा ध्यास यामुळे हराळी गावास आज प्रजासत्ताक दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कोलते, पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्या उपस्थितीत लोकराज्यग्राम म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच बलभीम सूर्यवंशी, किसन सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, सुनील रणखांब व सचिन सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला .
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक घरोघरी पोहोचवून त्याचा गावातील युवकांकरिता उपयोग करून आपले गाव लोकराज्यमय करण्याकरिता गावातील युवकांनी मोठया प्रमाणात पुढाकार घेतला.त्यात महेश राजे,रवींद्र सोनवणे,अनिल रणखांब, कल्याण औटे,संतोष मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रदीप बिराजदार,रघुनाथ बिराजदार, अतुल बिराजदार,मल्लिकार्जून गौरकर,संतोष कंटेकर व गावातील जेष्ठ नागरिक सुभाष बिराजदार, विकास सूर्यवंशी व सुरेश पाटील यांचा सहभाग होता.
गावातील युवकांच्या आणि गावाच्या उज्वल भविष्यासाठी आम्हाला लोकराज्य मासिक नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास या गावातील युवकांनी व जेष्ठांनीही व्यक्त केला आहे.
*आज याच सोहळ्यात एका शाळेला लोेकराज्यशाळा, एका कृषी विकास कंपनीला लोकराज्य कृषी विकास कंपनी तर दोघांना लोकराज्यदूत म्हणूनही गोैरविण्यात आले.*
यामध्ये लोकराज्यदूत म्हणून श्री.उमेश सोनवणे व विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंखे, लोकराज्यग्राम म्हणून हराळी ग्रामपंचायत, लोकराज्यशाळा म्हणून लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, भूम यांचे श्री. गुरुदेवदत्त हायस्कूल, लोकराज्य कृषी कंपनी म्हणून भैरवनाथ किसान कृषी प्रोडयूसर कंपनी, गौर ता. कळंब यांना विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.