इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दि.14 नोव्हेंबर रोजी दुपारी लोहारा तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांची संवाद साधुन समाधान केले.
लोहारा तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला आहे.त्यामुळे हंगामी पिकावर याचा परिणाम झाला आहे.मुग सोयाबीन उडीद हे पिके पाण्या वाचुन करपुन गेली आहेत.त्यातच सोयाबीनला उतार कमी पडत असल्यामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे.
लोहारा तालुक्यात पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. माकणी निम्न तेरणा प्रकल्प धरणातील पाणी पातळी कमी होत चालली आहे.जमिनीत ओल नसल्याने रब्बीची पेरणीची शक्यता कमी आहे.
लोहारा शहरातील व तालुक्यातील माकणी,खेड,
कानेगाव,येथील शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी केली. व शेतकऱ्यांशी व नागरीकांशी संवाद साधला.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी व नागरीकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी विधानसभेत आवाज उठवुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगीतले.
यावेळी विधान सभेचे मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील,कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब पाटील,रामकृष्णपंत खरोसेकर,दिलीप भालेराव,समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील,जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी,नगराध्यक्षा सौ.अनिता अंबर(मुरुम),नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे(उमरगा),पं.स.
सभापती राजीव पाटील(उमरगा),पं.स.सभापती दत्तोपंत सुर्यवंशी(औसा),जि.प.सदस्य रामराव चव्हाण(लातुर),जि.प.सदस्य नारायण अप्पा लोखंडे, (लातुर),माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे(औसा),माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे,अँड.विश्वनाथ पत्रिके,
उदय देशमुख,बसवराज धाराशिवे,रफिक शेख,रब्बानी नळेगावकर,प्रा.शोकत पटेल,विकास समिती अध्यक्ष जालींदर कोकणे,ब्रह्मानंद पाटील,शामसुंद तोरकडे, पं.स.सभापती अश्विनीताई पाटील(लोहारा),कॉग्रेस तालुका अध्यक्ष अमोल पाटील,बापु जट्टे,तहसीलदार राहुल पाटील,नायब तहसीलदार रणजित शिराळकर, नायब तहसीलदार पंकज मंदाड,तालुका कृषी अधिकीरी मिंलीद बिडबाग,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता पी.व्ही.पाटील,पो.नि.सर्जेराव भंडारे,कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला,सतिश साळुंके,बालाजी साठे,सरपंच विठ्ठल साठे,इंद्रजित लोमटे,रशिद शेख गुत्तेदार,नगरसेवक आरीफ खानापुरे,आयनोद्दीन सवार,नितीन पाटील,शरणप्पा कबाडे,शिशैल स्वामी,यांच्यासह शेतकरी बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
