लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील कास्ती बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन
समितीच्या अध्यक्षपदी पंडीत परसे तर उपाध्यक्षपदी सौ.प्रतिभा परसे यांची निवड करण्यात आली आहे.
कास्ती बु येथील जि.प.प्रा शाळेत शालेय व्यवस्थापन समिती नवनियुक्त सदस्याची बैठक
मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी चंद्रकांत भंडारे, रामेश्वर जगदाळे, योगीता कोळी, अलका भंडारे, उषा रवळे, रेखा पाटील, बळीराम साबळे, यांची निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.