Showing posts with label वाशिम. Show all posts
Showing posts with label वाशिम. Show all posts
सलीम तेली यांचा तत्कालीन थानेदार नंदकुमार काळे यांच्या सह इतर तीन विरुद्ध अब्रू नुकसान भरपाई चा दावा

सलीम तेली यांचा तत्कालीन थानेदार नंदकुमार काळे यांच्या सह इतर तीन विरुद्ध अब्रू नुकसान भरपाई चा दावा



कारंजा  : सलीम तेली यांचा तत्कालीन थानेदार नंदकुमार काळे यांच्या सह इतर तीन विरुद्ध अब्रू नुकसान भरपाई चा दावा २०१३ वर्षी कारंजा येथील पोलीस ठाण्यात ठाणेदार पदी कार्यरत असताना  नंदकुमार काळे व ए. एस. आय. सुभाष जाधव यांनी मो. सलीम तेली व मो. रिज़वान यांच्या विरूद्ध कट रचून खोट्या प्रकरणात गुन्हे दाखल केले त्यामुळे त्यांची समाजात बदनामी होवून प्रतिमा मलीन झाली तसेच स्वतः व संपुर्ण कुटुंबाला भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागला व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले
मानसिक व शारीरिक त्रास तसेच झालेल्या बदनामी बद्दल सलीम तेली यांनी विधमान दिवाणी न्यायाधीश  (कनिष्ठ स्तर)  मंगरुळपीर यांच्या न्यायालयात  तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदकुमार काळे , ए. एस. आय. सुभाष जाधव , तत्कालीन पोलीस अधीक्षक व तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध अॅड. टी. ए. खान यांच्या मार्फत पाच लाख रुपये अब्रू नुकसान भरपाई चा दावा केला आहे
दूध आंदोलन: वाशिममध्ये दुधाचा ट्रक पेटवला

दूध आंदोलन: वाशिममध्ये दुधाचा ट्रक पेटवला



वाशिम : - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलानाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे दुधाचा ट्रक पेटवून देण्यात आला. चालक ट्रकमध्ये बसलेला असतानाच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ट्रकला आग लावली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकमधून उडी मारल्याने तो बचावला.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मध्यरात्रीपासूनच 'दूध संकलन बंद' आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत असून मालेगावात तर थेट दूध वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लावण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मजल मारली

हा ट्रक राजहंस मिल्क शॉपचा असून रस्त्यात हा ट्रक अडवून पेटवून देण्यात आला. स्वाभिमानीच्या तीन कार्यकर्त्यांनी ट्रकवर पेट्रोल ओतले व नंतर आग लावल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे.
महाआरोग्य शिबिरात 1100 रुग्णांनी घेतला लाभ

महाआरोग्य शिबिरात 1100 रुग्णांनी घेतला लाभ



मानोरा प्रतिनिधी: तालुकातील वाईगौळ येथील तपस्वी संथ काशिनाथबाबा समाधी सोहळ्याचे औचित्त्या साधून यवतमाळ येथील राठोड यांनी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिरात ११००रुग्णांनी लाभ घेतला शिबिराचे उदघाटन मानोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामकृष्ण मलघने यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड हे होते.विचार व्यक्त करताना मान्यवर म्हणाले की यवतमाळ येथील अनेक डाक्टर खेड्यात येऊन रुग्णाची सेवा करतात हि चांगली गोष्ट असून असे उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्यात यावे .या शिबिरात डाक्टर वीरेंद्र राठोड ,डॉक्टर विजय कारंडे,डॉक्टर अर्चना राठोड,डॉक्टर भारत राठोड,डॉक्टर चैतन्य गुप्ते,डॉक्टर महेश चव्हाण ,डॉक्टर जय राठोड,डॉक्टर प्रशांत तामगाडगे,डॉक्टर रश्मी तामगाडगे,डॉक्टर निकिता चव्हाण ,डॉक्टर निशांत चव्हाण ,डॉक्टर विनय धाकटे,डॉक्टर दिनेश राठोड,डॉक्टर मनीष राठोड,डॉक्टर सुधाकर जिरवनकर,डॉक्टर महेंद्र चव्हाण,यांनी मार्गदर्शन रुग्णांना केले ,शिबिरात गरीब गरजू रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली,तसेच कार्यक्रमाचे संयोजक अभय राठोड वाईगौळ यांनी 165 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशवितेसाठी अभय राठोड,उमेश राठोड,राजू गुल्लाने,श्याम राठोड,नितीन राठोड,महादेव जाधव,मनोज राठोड,अशोक चव्हाण,संजय राठोड,नीलकंठ राठोड,संघटना यवतमाळ व समस्त नागरिक वाईगौळ यांनी विशेष परिश्रम घेतले
शांतता प्रस्थापित करायची असेल त्यासाठी भ्रष्टाचार रोखणे हे खूप गरजेचे : मौलाना एजाज असलम

शांतता प्रस्थापित करायची असेल त्यासाठी भ्रष्टाचार रोखणे हे खूप गरजेचे : मौलाना एजाज असलम


प्रतिनिधी   रिसोड : देशात भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे मजुरांसोबत अन्याय होत आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल भ्रष्टाचार होत असेल त्या ठिकाणी शांती नांदणे शक्य नाही. जर देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल व शांतता प्रस्थापित करायची असेल त्यासाठी भ्रष्टाचार रोखणे हे खूप गरजेचे आहे.यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी देशात विचार करणे गरजेचे आहे.असे जमाते इस्लामी हिंद चे केंद्रीय सदस्य मौलाना एजाज अस्लम यांनी म्हटले.ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. जमात-ए-इस्लामी च्या वतीने 12 ते 21 जानेवारी दरम्यान शांती प्रगती व मुक्ती या विषयावर राज्य भर अभियान चालविले जात आहे. त्याअनुषंगाने 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता येथील चांदणी चौकात शिवलाल शर्मा यांचे जागेत जमात-ए-इस्लामी हिंद रिसोड च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार औरंगाबाद येथिल नौशाद उस्मान,नगर अध्यक्षा भारतीताई क्षिरसागर, तहसीलदार राजेंद्र सुरडकर,पत्रकार पी डी पाटील, शिव लाल शर्मा,मोहिम चे समन्वयक अब्दुल मोहसीन, पत्रकार दीपक कुदळे,सचिन देशमुख,राजयोगिनी ब्रम्हाकुमारी ज्योति दीदी,अशोक कुलाळ मंचावर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार राजेंश सुरडकर, सचिन देशमुख, नौशाद उस्मान, ब्रह्मकुमारी जोति दिदी,भारती ताइ,शिरसागर यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाची प्रस्तावना अब्दुल मोहसीन यांनी केली कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद जुनेद यांनी केले तर आभारप्रदर्शन शेख वकार यांनी केले.दरम्यान कार्यक्रमातील मंचावर उपस्थित मान्यवरांचे कुराण ग्रंथाच्या मराठी भाषेतील प्रत देउन स्वागत सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाला अरुण क्षीरसागर,शेख शब्बीर,बब्बू पेंटर,विजय बोरकर,इरफान कुरैशी, प्रदीप खंडारे,शेख जुल्फिकार, नाथूराम मेहता, रवि अंभोरे,राजकुमार गाडे, रियाज पठान, चाफेश्वर गांगवे,गोपाल खडसे पाटिल, दिनकर बोडखे,फैयाज अहमद, मुनव्वर खत्री,संजय पवार, श्यामसुंदर मुदंडा,प्रा भिसडे,नागप्पा चवरे,शेख खाजा,अशोक भाई नीचड, भागवत घुगे,बिलाल खान,अबरार खान,पंकज मुंदडा, अब्दुल तस्लीम, रामकिशन दवंड,संजय पवार अन्य नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जमाते इस्लामी हिंद च्या सदस्यांनी मेहनत केली.
इन्नाणी  महाविद्यालयात राष्ट्र सेवादला मार्फत सविधान जागर एक दिवसीय कार्यशाळ संपन्न

इन्नाणी महाविद्यालयात राष्ट्र सेवादला मार्फत सविधान जागर एक दिवसीय कार्यशाळ संपन्न


 कारंजा (लाड) .मोहंमद बेग
स्थानिय स्वा.से क रा इन्नाणी महाविद्यालयात राष्ट्र सेवादल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सविधान जागर विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य मा पी.आर राजयुत होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रसेवादल महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. अल्लाउदीन शेख यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा.श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी साविधाना बद्दलची संपुर्ण माहीती दिली. समाजजीवना मध्ये समत. स्वातंत्र्य.बंधुता आणि सामाजीक न्यायाची रु जवणुक करण्यासाठी विद्यार्थींनी सविधानाला एक सार्वजनिक ग्रथं मानला पाहीजे असे आवाहन त्यांनी केले. त्या सोबतच सुरुवातीला मा.विनय सावंत महामंत्री राष्ट्रसेवादल पुणे यांनी राज्य घटनेची सविस्तर पर्वपिठीका  विद्यार्थींना समजावुन सांगीतली या कार्यशाळे मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सौ. ज्योतीबाई कोरडे व सौ. मायाताई वाकोडे यांची विषेश उपस्थीती लाभली. प्रस्तुत कार्यशाळेचे आयोजन समाजविज्ञान अभ्यास मंडळाच्या वतीने प्रा.ए.एम वानखडे, प्रा.व्ही.आर.ढेगंळे,प्रा.व्ही.एम.मुधाने यांनी केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.व्ही.एम. मुधाने यांनी तर सुत्र संचालन कु. रोशन शेख आणि आभार प्रदर्शन कु. सानिया शेख हीने केले.या कार्यशाळेला महाविद्यालयाचे उपप्राचार्च डॉ.डी.आर हळवे सरांची उपस्थीती तर प्रा.डॉ.टी.डी राजगुरे, प्रा. डॉ.डी.पी.पराते,प्रा. डॉ. आर.ए.गुल्हाणे,प्रा.कु.वंजाळकर,प्रा.एस.ई. तायडे, प्रा.आर.एच.माथुरकर,प्रा.एन.जी.जाधव,प्रा.डी.एन.राठोड यांची उपस्थीती होती. तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मोलाचे सकार्य केले.