इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- 64 वी राष्ट्रीय शालेय स्पर्धा तेंग सु दो कराटे 2018 --2019 हि स्पर्धा दिल्ली सरकार द्वारे क्षत्रसाल स्टेडियम दिल्ली येथे दि. 2 जानेवारी ते 9 जानेवारी रोजी घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमधे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा शहरातील महेबुब बिस्मिल्ला मोमिन याने महाराष्ट्राचे प्रतिधित्व करुण या स्पर्धेत सिल्वर मैडल मिळवुन महाराष्ट्राची शान वाढवुन राष्ट्रीय विजेता झाला. यावेळी पद्म विभूषण महाबली सतपालजी ( चिप प्रेसिडेंट स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया ) पद्मश्री सुशील कुमार ( प्रेसिडेंट स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया ) रॉकी डी सुजा ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तेंग सु दो ), सुभाष मोहिते ( तेंग सु दो महाराष्ट्र राज्य सचिव ), प्रशिक्षक महमदरफी शेख, यांच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आले.
लोहारा शहरात आगमन होताच शिवाजी चौकात दि.11 जानेवारी 2019 रोजी महेबुब मोमीन चे शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतषबाजी व पेढे वाटुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य शहाजी जाधव, माजी युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे, नगरसेवक आयुब शेख, नगरसेवक श्रीनिवास माळी, शिवा स्वामी, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, सहदेव काडगावे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, बिस्मिल्ला मोमीन, मिस.सविता जाधव, सिध्देश्वर सुरवसे, प्रकाश तोडकरी, हारुन हेड्डे, विशाल मुनाळे, वर्षा शेवाळे, गणेश सुर्यवंशी, पुजा दाळींबकर, अनुराधा बंडगर, रवि चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.