Showing posts with label वर्धा. Show all posts
Showing posts with label वर्धा. Show all posts
शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती करा

शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती करा



  • अभियोग्यता धारक धडकले उपविभागीय कार्यालयावर 
  •  संस्थाचालकांच्या विरोधाला डि एड , बि एड विद्यार्थांचा विरोध 

उमरखेड : - शासनाने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतला असतांना संस्था चालक याचा विरोध करीत असुन त्यांचा विरोध झुगारून शासनाने सिईटी निर्णयानुसार शिक्षक भरती करण्यात यावी यासह ईतर मागण्यायासंदर्भात आज ता २८ रोजी डी एङ , बी एड अभियोग्यता धारकांनी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले .
    अभियोग्यता धारकांनी गांधी चौकातुन मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर नेला . त्या ठिकानी नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी निवेदन स्विकारले .
शिक्षक भरती प्रक्रियेत सर्व अधिकार शासनाकडे असावे , भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम लवकर जाहीर करावा , जास्त पदांची शिक्षक भरती विनाविलंब घेण्यात यावी , शासकीय अनुदानीत खाजगी अल्पसंख्यांक शाळा वरील भरती शासनामार्फतच घेण्यात यावी व सन २०१२ नंतर सेवेत रुजु झालेल्या टी इ टी अपात्र शिक्षकांची सेवा त्वरीत खंडीत करण्यात यावी या मागण्या निवेदनात नमुद करुन संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी विशाल गिरी , मो. इर्षाद ,रणजीत चव्हाण , नरेश ठमके , पांडूरंग मोरे , सै. अजहर , गणेश शिरडकर , सुरेश काळे , गजानन दामोदर ,फीरोज नवाब सह शेकडो अभियोग्यता धारक उपस्थीत होते .
सत्यनिर्मिति महिला मंडल,भारतीय मानव अधिकार परिषद,अखिल भारतीय उपभोक्ता उत्त्थान  उमरखेड़ द्वारा रक्षाबंधन निमित्त जातीय सलोखा कार्यक्रम सम्पन्न

सत्यनिर्मिति महिला मंडल,भारतीय मानव अधिकार परिषद,अखिल भारतीय उपभोक्ता उत्त्थान उमरखेड़ द्वारा रक्षाबंधन निमित्त जातीय सलोखा कार्यक्रम सम्पन्न



  • मुस्लिम बांधवानी रक्षा बंधन त्यौहार केला साजरा

उमरखेड़ :-  यवतमाळ जिल्ह्यात सतत जातीय सलोखा कायम राखून ठेवण्यासाठी व महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी व आत्म निर्भर बन्विन्यास साथ देणारी तसेच बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मुहीम व जातीयवाद मुक्त भारत प्रमुख उद्दिष्ट घेऊन चलनारी सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा शबाना खान यांच्या मार्गदर्शनात उमरखेड़ तालुक्यात रक्षाबंधन सन कार्यक्रम मगरे निवास तसेच सत्यनिर्मिति उप मुख्य कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातील मुस्लिम बांधवाना हिन्दू बहिनी हस्ते राखी बांधन्यात आली व भावाचे पाहूनचार करण्यात आले व या शुभ प्रसंगी हिन्दू व मुस्लिम बांधवानी एक मेकाना शुभेच्छा दिल्या या कर्यक्रमात सहभागी होण्यासाठी सत्यनिर्मिति मंडळ सह उपध्यक्षा सौ राखी मगरे,सह सचिवा सौ अरुणा राठौड़,सह सरचिटणीस सौ सुजाता ढोले,सह प्रवक्ता सौ भागवत,


सचिवा रेहाना सिद्दी,सह कार्यध्यक्षा सौ अहमदी बी,कार्यध्यक्षा रेहाना शेख,रुपाली शिंदे,आसिफा पठान,शीतल,सौ सपना रासकर,सौ हुसैना शेख,सौ यास्मीन बी,सौ नजमा बी,युवाहिनी अध्यक्षा सौ तहेमिना काज़ी, उपध्यक्षा सौ तब्बसुम सय्यद, सचिवा कु रफिका कुरैशी,सह सचिवा कु अर्चना बोराडे,कु मुनेश्वर,कु सोनू,कु मुबीना शेख,कु सानवी खंदारे,नगर सेविका सौ रेखा गवळे,स्वराष्ट्र माझा ता प्र कु सविता चन्द्रे,ह्यूमन राईट जिल्हा उपाध्यक्ष अनीस खान पठान सर,तालुका महिला उपध्यक्षा सौ वंदना पाटिल मरसुलकर,सचिवा सौ सीमा सतीश खंदारे,शहर अध्यक्ष गोविन्द सोमानी,युवा अध्यक्ष आतिफ पठान,संकेत बुराड़े, राजेश जोशी,शिलानंद सोंगाड़े,गणेश लोखंडे,उपभोक्ता संघटन शहर अध्यक्ष शाहदत खान,उपद्यक्ष अज़हरुल्लाह खान,सह सचिव स्मरान खान,विदर्भ समिति तालुका अध्यक्ष जमीरउल्लाह खान,माजुल इस्लाम,साबीर कुरैशी,सम्पादक तहसीन शेख,मुस्लिम अस्सोसियाशन संस्थापक रहेमतुल्लाह जागीरदार,लोकराज संस्थापक ज़ाकिर राज,मोहन मगरे,महिला सुरक्षा दल ज़िल्हा अध्यक्ष इरफ़ान पठान,ता अध्यक्ष ताहेर शाह,नदीम खान,नजीब खान,शमीम सय्यद, मुन्ना खान,इरफ़ान सय्यद,सद्दाम बेग,मो.शाहरुख़ खान,शैलेश धाड़ें,फ़िरोज़ खान,सईद,मंगेश रत्नपारखी,मुजीब लाला व तसेच मुस्लिम बान्धव व नागरिक या ऐतेहासिक क्षणाचे आनंद घेण्यासाठी व आपल्या देशात असाच जातीय सलोखा कायम रहावा व सर्व धर्मीय एकता असिच टिकून राहावी या साठी प्रयत्न करणाऱ्या निर्भिड अध्यक्षा शबाना खान यांनी केलेल्या कौतुकास्पद कार्यास शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते
आंतर जातीय विवाह करणा-या जोडप्यांवर बहिष्कार टाकणा-यांना दंड व शिक्षेची तरतूद करणार -सी एल थुल

आंतर जातीय विवाह करणा-या जोडप्यांवर बहिष्कार टाकणा-यांना दंड व शिक्षेची तरतूद करणार -सी एल थुल


 वर्धा :-  आपल्या देशात व राज्यात अजूनही जातींमधील उच- निचता पाळली जाते. त्याचा मोठा त्रास आंतरजातीय विवाह करणा-यांना बसतो. अनेकदा ऑनर किलिंग सारख्या घटना समोर येतात. या सर्व बाबींचा विचार करून नवीन आंतरजातीय विवाह कायद्यात आंतरजातीय विवाहास विरोध करणा-यांवर दंड किंवा शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष  सी एल थुल यांनी दिली.

  आंतरजातीय विवाह करणारी जोडपी आणि या विषयावर काम करणार-या संस्था, संघटना यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करताना श्री थुल बोलत होते.

       आपल्या समाजात अजूनही जातीभेद पाळला जातो. खास करून मुलामुलींची लग्न जमवताना आई- वडील,कुटुंब, समाज  स्व: जातीत विवाह करण्याला जास्त प्राधान्य देतात. मात्र या परंपरेला फाटा देत आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्याना अनेक  अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक आई वडील आपल्या मुलीला किंवा मुलाला मारून टाकण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

त्यामुळे अशा गोष्टीं थांबविण्यासाठी अनेक विचारवंतांकडून आंतरजातीय विवाह कायदा बनविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव, निवेदने आलीत. त्याचा सकारात्मक विचार करून शासनाने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा करण्यासाठी 21 मार्च ला 7 सदस्यांची प्रारूप समिती स्थापन केली आहे.  त्या समितीचा अध्यक्ष म्हणून याबाबत प्रत्यक्षात विवाह केलेल्या जोडप्यांचे अनुभव आणि यावर काम करणा-या संस्था संघटना यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी अशा  बैठका लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि आज वर्धेत घेतली असल्याचे श्री थुल यांनी यावेळी सांगितले.

     आंतरजातीय विवाह करणा-या व्यक्तींना लग्नापूर्वी, लग्नाच्यावेळी आणि लग्नानंतर पोलीस सरंक्षण देणे, त्यांना राहण्यासाठी संरक्षण गुहामध्ये व्यवस्था करणे आणि त्यांच्या रोजगार व नोकरी साठी नियोजन करणे तसेच  लग्नाची नोंदणी ही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात करता येईल, या बाबी कायद्याच्या प्रारूपात अंतर्भूत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चांगल्या सूचना दिल्यात.  यामध्ये प्रामुख्याने लग्न करण्यासाठी 30 दिवसाची नोटीस दिली जाते, हा कालावधी एक आठवडा किंवा एक दिवसांवर आणण्यात यावा. आंतर जातीय विवाह संदर्भात मुलगा व मुलगी यांचे कुटुंब, नातेवाईक आणि समाज यांचे समुपदेशन करण्याची व्यवस्था त्यात करावी. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी पोलीस ठाण्यात एक सेल तयार करावा, विवाहानंतर पतीचे निधन झाल्यास एकट्या पडलेल्या महिलेच्या पुनर्वसनाची तरतूद करावी, विवाह करणार-या जोडप्याना शासनाकडून दिले जाणारे अनुदान रकमेत वाढ करावी, अशा अनेक सूचना उपस्थितांनी केल्यात.

यावेळी वर्धा जिल्ह्यात आंतरजातीय विवाह संबंधात चांगले काम करणारे गजेंद्र सुरकार यांना राज्यस्तरीय समितीवर घ्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

  या बैठकीला  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करूणा जुईकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, गजेंद्र सुरकार, सारिका डेहनकर, नरेंद्र कांबळे, संजय देशमुख,अतुल शर्मा, संतोष भगत, मनोहर पंचाटीया,गुणवंत डकरे, मधुकर वानखेडे, रमेश निमसडकर,सुनील ढाले, संजय भगत आदी उपस्थित होते. 
द पॉवर ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणीची बैठक

द पॉवर ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणीची बैठक

जाहिरात


  • जिल्हाध्यक्ष पदी गौरव देशमुख तर सचिव पदी जितेंद्र गोरडे


वर्धा- द पॉवर ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणी सभासदत्व बैठक आज दिनांक २४ मे रोजी वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.विश्वपाल हजारे यांच्या अनुमतीनुसार ,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आशुभाऊ इंगळे  (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
जाहिरात
यावेळी पत्रकारांच्या अनेक समस्यांवर आशुभाऊ इंगळे  (गुरुजी) यांनी मार्गदर्शन केले द पॉवर ऑफ मीडिया ही संघटना अधिक मजबूत व प्रभावशाली या दृष्टीने वर्धा जिल्ह्यात बलशाली संघटना निर्माण व्हावी,सोबतच सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे  असेही यावेळी राज्य संपर्क प्रमुख आशुभाऊ  इंगळे (गुरुजी) म्हणाले, या कार्यकारणीच्या बैठकीत वर्धा जिल्हा अध्यक्षपदी गौरव देशमुख  (लोकमत ) व जिल्हा सचिव जीतेंद्र गोरडे ( विदर्भ मतदार) यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यातआली .तर उपाध्यक्ष प्रमोद पाणबुडे (हितवाद) कोशाध्यक्ष रविंद्र लाखे (प्रतिदिन),संघटक राहुल खोब्रागडे,संपर्क प्रमुख सचिन म्हात्रे (लोकशाही वार्ता) सह कोशाध्यक्ष धीरज ठावरे (लोकमत)  आदींची निवड यावेळी करण्यात आली.सर्व पदाधिकारीकारी यांची निवड राज्य संपर्क प्रमुख आशुभाऊ इंगळे  (गुरुजी)  यांनी केली .संचालन रवींद्र लाखे व आभार प्रमोद पाणबुडे यांनी मानले ,यावेळी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
शहरभर घुमला स्वच्छतेचा संदेश .

शहरभर घुमला स्वच्छतेचा संदेश .


• शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली स्वच्छतेची शपथ 
• रॅलीने वेधले वर्धेकरांचे लक्ष 
• ‎3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
वर्धा दि 20:- भारत सरकारतर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेत वर्धा नगर परिषद सहभागी झाली असून स्वच्छतेबाबत विद्यार्थी, पालक, आणि नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. वर्धा शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थी आणि शाळांचा सहभाग असलेल्या स्वच्छता रॅलीत शहरातील सुमारे 30 शाळातील 3 हजार विद्यार्थ्यानी सहभागी होऊन पूर्ण शहरभर स्वच्छतेचा जागर केला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना शपथ देऊन कायम स्वच्छता राखण्याविषयी प्रोत्साहित केले.पोलीस मैदानावर समारोप झालेल्या या रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमाला आमदार डॉ पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपाध्यक्ष प्रदीपसिह ठाकूर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमोळे उपस्थित होत्या.
 स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धेत वर्धा नगर परिषद सहभागी झाल्यामुळे या स्पर्धेविषयी आणि स्वच्छतेविषयी नागरिकांना जागृत करणे हा आजच्या रॅलीमागचा मुख्य उद्देश होता. 9 वाजता लोकमहाविद्यालाय येथून खासदार रामदास तडस यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केली. स्वच्छता रॅली शास्त्री चौक, बजाज चौक, काळे चौक, वल्लभभाई पटेल पुतळा, आंबेडकर चौक मार्गे पोलीस मैदानावर दाखल झाली. या रॅलीत स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या 14 झांकी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थी, शिक्षक नगरपरीषदचे पदाधिकारी , कर्मचारी सोबतच झांकी मुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण शहरभर स्वच्छतेचा जागर करून शहर, घर आणि आजूबाजूचा परिसर स्वछ ठेवण्याचा संदेश रॅलीतून देण्यात आला.यावेळी आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्याना स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन केले.