Showing posts with label जळगाव. Show all posts
Showing posts with label जळगाव. Show all posts
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा-रावेरात वृत्तपत्र विक्रेता संघाची मागणी

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा-रावेरात वृत्तपत्र विक्रेता संघाची मागणी



रावेर :- असंघटीत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची नोदणी करावी,कल्याणकारी मंडळाची स्थापना करत सरकारने भरीव मदत करावी,महाराष्ट्र राज्य असंघटीत सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लगार मंडळ गठीत करावे,सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा सुविधा देण्यात याव्यात,शासकीय घरकुल योजनेत वृतपत्र विक्रेत्यासाठी राखीव कोटा ठेवावा,मोक्याच्या ठिकाणी स्टॉॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,

अस्तित्वात असलेले स्टॉॉल  अतिक्रमणात धरू नये  आदी मागण्यांसाठी मंगळवारी रावेर तालुका वृत्तपत्र संघटनेकडून राज्य संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

                 यावेळी वृतपत्र संघटनेचे अध्यक्ष डी.एन.वाणी,विनोद पाटील,अजय पिपलोदकर,अशोक खारे,हितेश चौधरी,निलेश सराफ,पद्माकर चौधरी,महेंद्र सोनवणे,सतीश वाणी,दिलीप वाणी,प्रशांत पासे,व पत्रकार,वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.या नंतर गेल्या ४० वर्षापासून अखंडपणे वृतपत्र विक्री चे काम करत असलेले जेष्ठ विक्रेते पद्माकर चौधरी,मोरगाव व रमेश खडायते,यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पाल येथे विषारी पाणी पिल्याने 50 गुराचा मृत्यू

पाल येथे विषारी पाणी पिल्याने 50 गुराचा मृत्यू


पाल येथील वैद्यकीय हजर नसल्याने नागरिकांन मधे नाराजी
रावेर प्रतिनिधी  : रावेर तालुक्याच्या पाल  येथे जंगलातून घरी परत येतांना नदीतील पाणी पिल्याने पन्नास गुरांना विषबाधा झाली. त्यात चार गाईचा उपचार न मिळाल्याने मृत्यूू झाला.

दि 30 रोजी गफुर अनवर तडवी व मुस्तफा जलदार तडवी नेहमी प्रमाणे गुरे चराई करता गुरांना जंगलात नेले. संध्याकाळी घराकडे परत येताना सुकी नदीत पाणी पिण्याकरिता थांबवले. पाणी पित असताना अचानक गुरांना गुंगी येऊ लागल्याने गुरे जमिनीवर पडू लागली. हे गुराख्याचे लक्षात येताच गुराख्याने पशु वैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधला. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शिपाई निजाम तडवी यास सोबत नेत गाईंवर उपचार केले. उपचार दरम्यान चार गाईचा मृत्यू झाला. विषबाधा कशामुळे झाली हे समजू शकले नाही.

उपचाराअभावी गाईंचा मृत्यू
पाल पशुवैद्यकिय दवाखान्यात दोन तिन वर्षापासुन वैद्यकिय अधिकारी नाही. आहे ते पण प्रभारी. तेही पाल दवाखान्याला कधी साधी भेटही देत नाही. वैद्यकीय अधीकारी नसल्याने विष बाधीत गुरांवर वेळेवर उपचार होऊ न शकल्याने चार गाईचा मृत्यूू झाला.
आदीवासी बांधवांच्या रोजगार निर्मितीसाठी पाल येथे वन धन- जन धन विक्री केंद्राचा शुभारंभ

आदीवासी बांधवांच्या रोजगार निर्मितीसाठी पाल येथे वन धन- जन धन विक्री केंद्राचा शुभारंभ


रावेर :- सातपुड्याच्या कुशीतील आदीवासी बांधवांच्या रोजगार निर्मीती आणि व्यवसाय वृद्धीसाठीवन विभागाच्या संकल्पनेतून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून साकारण्यात आलेले वन धन, जन धन किरकोळ विक्री केंद्राचे उद्धाटन करण्यात आले
जंगलातील रानमेव, भाजीपाला, फळे आणि आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, वनौषधी या विक्रीसाठी ठेवण्यात येत असून या केंद्राचे उद्घाटन आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती जीप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प स सभापती सौ माधुरी नेमाडे, उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर, जीप माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तहसीलदार विजय ढगे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विलास चौधरी, जीप सदस्य हर्षल पाटील, पी के महाजन, कृउबा सदस्य गोपाळ नेमाडे, वन कर्मचारी प्रशिक्षण केंद्र संचालक कृष्णा भवर, सहा वन संरक्षक वसंत पवार, रमाकांत भवर, सरपंच हजरा तडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ मिलिंद वायकोळे,अर्जुन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला वृक्ष पूजन करण्यात आली या नंतर केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी विक्री साठी ठेवण्यात आलेल्या वस्तू विकत घेण्याचा मोह मान्यवरांना आवरता आला नाही.
प्रास्ताविकात वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी वन धन खरेदी आणि विक्री धोरण स्पष्ट केले. यानंतर सुरेश धनके यांनी रावेर वन परीक्षेत्र मधील झालेल्या कामांचे कौतुक केले. नंदकिशोर महाजन यांनी म्हटले की लहानपणापासून पाल थंड हवेचे ठिकाण म्हणून मी ऐकत होतो मात्र मागील काही वर्षात या पर्यटन क्षेत्राने रंग बदलला असून खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ विकास होत असल्याचे सांगून अधिकारी यांचे कौतुक केले. श्री मोरणकर यांनी भविष्यात करावयाची विकासकामे बोलून दाखविली यात पाल मार्गदर्शिका, व्हिडीओ सीडी तयार करून पर्यटकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शेवटी आ हरिभाऊ जावळे यांनी मनोगतात म्हटले की, पाल गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करवून देऊ. सातपुडा हरित झाल्यास पाण्याची देखील समस्या आपोआप दूर होतील. अनेक आदिवासी युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होतील. आपल्या जंगलातीलमाल हा गावातच विक्री होऊन आपली उपजीविका भागविली जाईल. पर्यटन वाढीस लागावे म्हणून आवश्यक असलेल्या विकासकामांचा प्रस्ताव तयार करून दिल्यास वन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सूत्र संचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार सहा वन संरक्षक वसंत पवार यांनी मानले. यावेळी समिती अध्यक्ष जुम्मा तडवी, कामील शेख, संजय पवार, सूर्यभान पाटील,
सत्तार शेख, इतबार तडवी, शरीफ तडवी, परिसरातील अधिकारी व्ही एम पाटील, एम बी पाटील, श्री पवार, श्री म्हात्रे, श्री राऊत यांच्या सह मान्यवर उपस्थित होते
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी  आदिवासींचे कॅडर - दिलरुबाब तडवी

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आदिवासींचे कॅडर - दिलरुबाब तडवी


रावेर :- आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील दृष्टीकोन हा अत्यंत सकारात्मक असुन आदिम जमातीपर्यंत काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण व आदिवासींच्या सवलती तळागाळातील उपेक्षित आदिवासी बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य आपल्या अनुसुचित जमाती  विभाग आदिवासी सेलच्या माध्यमातुन आदिवासींचे जळगाव जिल्हाभर कॅडर उभारणार असा आत्मविश्वास जळगांव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी (आय) जळगांव अनुसुचित जमाती विभाग आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आय नवी दिल्ली व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई अनुसूचित जमाती विभाग आदिवासी सेल तर्फे जळगांव जिल्हा भारतीय राष्ट्रीय ग्रामिण काँग्रेस कमिटी आय. जळगांव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  अनुसुचित जमाती चेअरमन यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्हयात राष्ट्रीय कॉग्रेस आय पक्ष बळकटी साठी आदिवासींची प्रेरणा मा. स्वर्गीय  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ,राष्ट्रीय कॉग्रेस नेत्या मा. खा. सोनिया गांधी,माजी  पतप्रधान डॉ. मन मोहनसिंग, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मा. खा. मल्लिका अर्जुन खर्गे, प्रदेशाअध्यक्षा माजी मुख्यमंत्री मा. खा. अशोक चव्हाण, प्रदेशअध्यक्ष अनु.जमाती आदिवासी सेलचे चेअरमन माजी आ. आनंदराव गेडाम,मा.आ.पृथ्वीराज चव्हाण, .मा.सुशिलकुमार शिंदे,विरोधी पक्ष नेते मा.ना. राधाकृष्ण्‍ा विखे पाटील,माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भुरिया ,मा.माणिकराव गावित ,मा. खा. मुकुल वासनिक,मा.मंत्री सुरुपसिंग नाईक ,मा. ॲड पदमाकर वळवी, ॲड शिवाजीराव मोघे,प्रा.वसंतराव पुरके जिल्हाध्यक्ष ॲङ संदिपभैया पाटील मा.खा.डॉ.उल्हास पाटील,माजी.आ.शिरीषदादा चौधरी,माजी.आ.डॉ.सुरेश पाटील,मा.आ.रमेशदादा चौधरी, मा.आ.निळकंठ फालक,प्रदेश सरचिटणीस ङिजी.नाना पाटील,डॉ. अर्जुन भंगाळे,यांच्या अमुल्य मार्गदर्शन व सहकार्यामुळे,तसेच यांचा दूरदृष्टीकोन त्यांच्या समोर असलेले उद्दीष्ट व त्या दृष्टीकोनातून आपण आपल्या विभागाचे महत्व ओळखून व सुयोग्य असे काम करुन काँग्रेस पक्षाची प्रतिमा उज्ज्वल करण्साठी आदिवासींचे कँडर उभारणार आहे.त्याच प्रमाणे जळगांव जिल्हयात तालुकानिहाय, नवीन जिल्हा कार्यकारिणी:- तालुका कार्यकारिणी ,शहर कार्यकारिणी ब्लॉक कार्य कार्यकारिणी,तयार करुन प्रदेश कमिटीच्या मान्यतेसाठी पाठविण्यास येणार आहे.आदिवासी समाजातील जिंदादिल पंजा या निशाणीचे आशिक कॉग्रेस पक्षाचे दिवाने कार्यकर्ते, कॉग्रेस पक्षाशी  निष्ठावंत निस्पृह कट्टर कार्यकर्ते,कॉग्रेस पक्षासाठी वेळ देणारे होतकरु अशा कार्यकर्त्यांची  निवड,  नियुक्ती करण्यसाठी 15 तालुक्यासाठी तालुका निहाय काँग्रेस अनुसुचित जमाती विभाग आदिवासी सेल निरीक्षकांची नेमणुक करण्यात आलेलेली आहे.

        कॉग्रेस पक्ष निरीक्षकांनी 55 दिवसात त्यांचा अहवाल अनुसुचित जमाती विभाग आदिवासी सेल काँग्रेस  आय) जळगांव जिल्हाध्यक्ष - दिलरुबाब इकबालखॉ तडवी यांच्याकडे इंदिरा कॉग्रेस भवन रावेर,व काँग्रेस भवन जळगांव येथे सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगांव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी जळगांव अनुसुचित जमाती विभाग  आदिवासी सेल तालुकानिहाय काँग्रेस पक्ष निरीक्षक पुढील प्रमाणे

रावेर- गुलशान दिलरुबाब तडवी,शैजाद कादर तडवी, सिकंदर तडवी,यावल –‍ गफुर सुपडू तडवी, रशिद रसुल तडवी, चोपडा – गुलशान दिलरुबाब तडवी,हसीना इकबाल तडवी,न्याजोद्दीन बाबु तडवी, मुक्ताईनगर-कलिंदर सिकंदर तडवी बोदवड-सत्तार सुभान तडवी,जामनेर- सुरेश समशेर तडवी,ईस्माईल रहिम तडवी, भुसावळ- हसिना गुलाब तडवी, अमळनेर- गुलशेर बु-हान तडवी,धरणगाव-सरवर रशिद तडवी,जळगांव ग्रामीण-शकीना इकबाल तडवी,जळगावं शहर-उस्मान महेबुब तडवी,पारोळा-सुरेंश समशेर तडवी,पाचोरा- राजु अकबर तडवी, नजीर तडवी,भडगांव- भिकारी नथ्थु तडवी,चाळीसगांव- बि-हाम खुदाबक्ष तडवी यांची  निवड करण्यात आलेली आहे.
रावेर येथे बेशिस्त वाहतूक पुन्हा जीव घेणार का.

रावेर येथे बेशिस्त वाहतूक पुन्हा जीव घेणार का.


रावेर :- येथील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते माऊली हॉस्पिटल दरम्यान बेशिस्त प्रवाशी वाहनांच्या वाहतुकी मुळे पुन्हा एखाद्याच्या जीव जाईल असे चित्र बघावयास मिळत आहे

या बाबत अधिक वृत्त असे की, रावेर शहरातील मुख्य वाहतुकीचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा भाग असून याच भागात प्रवाशी वाहतूक करणारे ऍपे रिक्षा आणि इतर वाहने यांची कायम वर्दळ असते याच भागात या पूर्वी तिघांचा बळी गेलेला असून तत्कालीन पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी कठोर पावले उचलून रिक्षा चालकांना कायद्याचा वचक दाखवून दिला होता

 अत्यंत शिस्तीत असणारे रिक्षाचालक मात्र काही काळाने निर्ढावले असून पुन्हा सर्व नियम धाब्यावर बसवून वाट्टेल तिथे आपली वाहने उभी करीत असतात यामुळे पुन्हा लहान सहान अपघात होत असून याकडे पोलिसांनी लक्ष न दिल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी देखील याभागात आपली आदरयुक्त भीती निर्माण करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे
रावेर येथून देखील शिवशाही ची सेवा सुरू

रावेर येथून देखील शिवशाही ची सेवा सुरू


रावेर दि (प्रतिनिधी) रावेर बस आगारात उपलब्ध झालेल्या शिवशाही बसचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाया प्रसंगी बसचे पूजन सपोनि प्रकाश पाटोळे, आगार प्रमुख एस टी. बंदरे, वाहतूक नियंत्रक श्री भालेराव, माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ. संदीप पाटील,

 रामदेव बाबा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे, तुषार मानकर आदी मान्यवरांचे हस्ते पूजन करून प्रवाश्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर बस दररोज सकाळी 5 वाजेला औरंगाबाद जाईल

 तरी आपण सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास श्री चोपडे, एस एफ तडवी, जे एफ भालेराव, पी डी चौधरी, सलीम तडवी, डी एस साळुंके, एम पी कोळी, आर, आर कोळी, व्ही एम माहेश्वरी, स्वप्नील महाजन, श्याम भामरे, वाहक आय टी तडवी, चालक भोला सोनवणे यांच्यासह इंटक, सेना, कामगार, आणि कॉस्ट्राईब संघटना पदाधिकारी उपस्थित होते
ऐनपूर महाविद्यालयात विद्यार्थिनिंसाठी स्वयंसिद्धा अभियानाला प्रारंभ

ऐनपूर महाविद्यालयात विद्यार्थिनिंसाठी स्वयंसिद्धा अभियानाला प्रारंभ


रावेर :- निंभोरा बु ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी स्वयंसिद्धा अभियानाला ज्युडो कराटे शिबीराला सुरूवात झाली

 आहे मुलींना शिक्षणासाठी ,नोकरी,व्यवसायाकरिता घराबाहेर पडावे लागते त्यांना स्वत:चे संरक्षण करता यावे या उद्देशाने सदर प्रशिक्षण दिले जात आहे राजेन्द्र सुरवाडे ब्लॅक बेल्ट, गणेश चौधरी ब्लॅक बेल्ट ,

वसीम तडवी विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत आहेत युवती सभा सचिव डॉ निता वाणी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा साईनाथ उमरीवाड ,डॉ रेखा पाटील यांनी प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्धा शिबीराचे आयोजन केले आहे .
रावेर येथे एम.पी. जे.तर्फ मतदान मार्गदर्शन व र्फाम भरण्याचे कार्यक्रम सपन्न

रावेर येथे एम.पी. जे.तर्फ मतदान मार्गदर्शन व र्फाम भरण्याचे कार्यक्रम सपन्न


रावेर( प्रतीनिधी) येथे मुव्हमेंट फॉर पीस एंड जस्टीस फॉर वेलफेअर (एमपीजे) रावेर संस्थे तर्फ एक दिवसीय मतदान  कार्ड मार्गदर्शन व र्फाम भरण्याचे कार्यक्रम दि.७I१०|१८ रविवार रोजी सपन्न झाला.सदर शिबीरा मोठा प्रतिसाद मिळाला नागरीकांनी आपले मतदान कार्ड भरले.
      येथील शौकत मैदानात सदर शीबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात नविन मतदान ,तसेच नाव दुरुस्ती,असे एमपीजे कार्यकातर्यानी नागरीकाना र्फाम भरवुन दिले .याप्रसंगी रावेर नगरी चे नगराध्यक्ष दारा मोहमंद जफर मोहमंद, नगर सेवक आसीफ मोहमंद, शेख सादिक,यानीं भेट दिली. सदर शिबिर यशवे तेसाठी एमपीजे तालूकाध्यक्ष फिरोज शेख ,शहरध्यक्ष शेख मोईन सर,सादिक सर, जाकीर खान,आसीफ शेरव,नासीर खान,अमजद रवान,शेख साबीर,ई लियास शेख ,शेख हनिफ सर,शेख साजीद, सोहेल मिरजा, आंदिनी परिश्रम घेतले.
नशा मुळे यूवा पिढी बरबाद -  सुहील अमिर

नशा मुळे यूवा पिढी बरबाद - सुहील अमिर


रावेर प्रतिनिधी .. नशेच्या आहारी गेलो मुळे यूवा  पिढी बरबाद होत आहे.प्रत्येकानी नशे चा नाश केला पाहिजे .असे आव्हाण सुहिल आमिर (जळगाव) यानी रावेर येथे आयोजित जाहिर सभेत केले.जमाअते ईस्लामी हिंद तफे राज्यव्यापी नशा विरोधी अभियान या मोहिम अंतर्गत सदर जाहिर सभे चा आयोजन येथे कुंभार वाडा जवळ करण्यात आला होता. या प्रसंगी श्री.सुहिल अमिर पूढे म्हणाले की धान्य पासून दारू बनविली जात आहे तर दूसरी कडे   भुक मारी व कुपोषणा मुळे दर तीन  मिटांने एका बाल का चा मुत्यु होत आहे.धान्य मुळे शराब न बनविली तर देशात कोणी भुके मुळे  मरणार नाही. नशा मूळे बलात्कार चे प्रमाणात वाढ होत आहे. नशे मूळे समाजात वाईट पारिस्थिती निर्माण झाली असून प्रत्येकानी महिलाचा सम्मान केला पाहिजे असे त्यांनी सांगीतले लहान मुलांना व मुलींना मुबाईल पासून दुर ठेवण्याची गरज आहे. तसेच ते म्हणाले की प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून नशा मूळे होणारे नुकसान चा प्रचार व प्रसार करावा . सदर सभेत शेख सलीम न्याजमोहमंद ,मौलाना  शोएब, छोटी मशीद चे पेश इमाम ,उपस्थित होते.जमाते इस्लामी चे शेख शफीयोदिन सर,यानी प्रस्ताविक केले.सदर जाहीर सभेत मोठया संख्या नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशवेते साढी सफराज खान सर, डॉ. वसीम शे ख,रफिक भाई, अय्यूब खान, जुबेर शेख,शेख हनिफ, शेख शफीक,शेख जाविद, मुजम्मील खान,शेख फरहान, परिश्रम घेतले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन शेख मुस्ताक सर यानी केले.
ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो च्या ठिय्या आंदोलणाचा आज शेवटचा दिवस. प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने यांचे मानले आभार.

ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो च्या ठिय्या आंदोलणाचा आज शेवटचा दिवस. प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने यांचे मानले आभार.


रावेर.प्रतिनिधी --.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात एनमुक्टो संघटनेतर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन दि.२५ सप्टेंबर पासून  महाविद्यालयीन कामकाज संपल्यानंतर सुरू करण्यात आले होते, तरी आज १२ व्या दिवशी ठीय्या आंदोलणचा शेवट करण्यात आला असून या संदर्भात सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने यांना एनमुक्टो संघटनेतर्फे मांडण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्या शासनाकडे पाठवल्याबद्दल ऐनपूर एनमुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.डाँ.एस.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांनी प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने यांना आभारपत्र देऊन आभार मानले. या पुढिल संघटनेचे नियोजन दि.११ आक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या प्रसंगी पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, तसेच विविध पक्षांची नेते मंडळी व समाजसेवकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन स्थानीक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. यात संघटणेचे अध्यक्ष प्रा.डाँ.एस.ए.पाटील यांच्या अध्यक्षते खाली प्रा.डाँ.के.जी.कोल्हे (एम.फुक्टो.कार्यकारणी सदस्य), प्रा.एम.के.सोनवणे, प्रा.डाँ.पी.आर.महाजन(एनमुक्टो जिल्हा कार्यकारणी सदस्य), प्रा.डाँ.सौ.रेखा पाटील, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एस.बी.पाटील, प्रा.डाँ.एस.एन.वैष्णव, प्रा.व्ही.एच.पाटील यांनी आदोलनात सक्रीय सहभाग नोदवला होता. आंदोलनाला तासीका तत्वावरील प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.अर्जून वंजारी, प्रा.कु.रूपाली बऱ्हाटे, प्रा.कु.प्रेरणा बोंडे, प्रा.कु.टिना तळेले, हर्षल पाटील, महेंद्र महाजन, सुनिल पाटील, गोपाल पाटील, गणेश महाजन, यांसह विद्यार्थ्यांनी पाठींबा दर्शविला होता. 

आहेत संघटनेच्या प्रमुख एकुण आठ मागण्या १)राज्यशासनाने उच्च शिक्षण छेत्रातील सर्व रीक्त पदे त्वरीत भरावीत,  २)७१ दिवसांचे बेकायदेशीर रीत्या थांबविलेले वेतन ताबडतोब अदा करावे, ३) ग्रंथपाल, शारीरीक शिक्षण संचालक आदिंसह सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करून शिक्षकांना देय थकबाकीसाठी केंद्रशासनाने १००% निधी उपलब्ध करून द्यावा. ४) नविन अंशदायी पेंंशन योजना बंद करून सर्व शिक्षकांना जूनी पेंंशन योजना लागुकरावी. ५) विनाअनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांच्या संस्थाचालकांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्ण वेतन द्यावे. ६)मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समानकाम, समानवेतन या तत्वाची अंमलबजावणी करून अर्हताप्राप्त कंत्राटी शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत समावून घ्यावे. ७) मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय तक्रार निवारन समीती त्वरीत स्थापण करण्यात यावी. ८) पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींची दुरूस्ती तात्काळ करावी.
ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो चे ठिय्या आंदोलनाचा आठवा दिवस. एनमुक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा.डाँ.अनिल पाटील यांची भेट.

ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो चे ठिय्या आंदोलनाचा आठवा दिवस. एनमुक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा.डाँ.अनिल पाटील यांची भेट.


रावेर प्रतिनिधी :- रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात एनमुक्टो संघटणे तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन महाविद्यालयीन कामकाज संपल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. जो पर्यत संघटणेच्यामागण्या पुर्ण होणार नाही तो पर्यंत महाविद्यालयीन कामकाज आटोपल्यावर रोज दिड तास बेमुदत आंदोलन ठरविण्यात आले आहे

यात संघटनेच्या एकुण प्रमुख आठ मागण्या आहेत १)राज्यशासनाने उच्च शिक्षण छेत्रातील सर्व रीक्त पदे त्वरीत भरावीत,  २)७१ दिवसांचे बेकायदेशीर रीत्या थांबविलेले वेतन ताबडतोब अदा करावे, ३) ग्रंथपाल, शारीरीक शिक्षण संचालक आदिंसह सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करून शिक्षकांना देय थकबाकीसाठी केंद्रशासनाने १००% निधी उपलब्ध करून द्यावा.

४) नविन अंशदायी पेंंशन योजना बंद करून सर्व शिक्षकांना जूनी पेंंशन योजना लागुकरावी. ५) विनाअनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांच्या संस्थाचालकांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्ण वेतन द्यावे. ६)मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समानकाम, समानवेतन या तत्वाची अंमलबजावणी करून अर्हताप्राप्त कंत्राटी शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत समावून घ्यावे. ७) मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय तक्रार निवारन समीती त्वरीत स्थापण करण्यात यावी.

 ८) पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींची दुरूस्ती तात्काळ करावी. या प्रमुख आठ मागण्यांंसाठी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे. आज 3 आक्टोंबर रोजी आठ दिवस ठीय्या आदोलनाला झाले असून एनमुक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा.डाँ.अनिल पाटील यांनी ठिय्या आंदोलनाला आज भेट देत ते म्हणाले मागन्या पुर्ण होनार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जानार नाही.

यात संघटणेचे अध्यक्ष प्रा.डाँ.एस.ए.पाटील यांच्या अध्यक्षते खाली प्रा.डाँ.के.जी.कोल्हे (एम.फुक्टो.कार्यकारणी सदस्य), प्रा.एम.के.सोनवणे, प्रा.डाँ.पी.आर.महाजन(एनमुक्टो जिल्हा कार्यकारणी सदस्य), प्रा.डाँ.सौ.रेखा पाटील, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एस.बी.पाटील, प्रा.डाँ.एस.एन.वैष्णव, प्रा.व्ही.एच.पाटील यांनी आदोलनात सक्रीय सहभाग नोदवला या आंदोलनाला तासीका तत्वावरील प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.अर्जून वंजारी, प्रा.कु.रूपाली बऱ्हाटे, प्रा.कु.प्रेरणा बोंडे, प्रा.कु.टिना तळेले, हर्षल पाटील, महेंद्र महाजन, सुनिल पाटील, गोपाल पाटील, गणेश महाजन, यांसह विद्यार्थ्यांनी पाठींबा दर्शविला आहे.
स व प  महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

स व प महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी


रावेर प्रतिनिधी :- रावेर येथून जवळच ऐनपूर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे महात्मा गांधी  जयंती साजरी करण्यात आली

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला गांधीजींच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले  प्रमुख वक्ते   डॉ जी आर ढेमरे, श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर यांनी गांधीजी नि सांगितलेले सत्य, अहिंसा, स्वावलंबन या जीवन मूल्यचे महत्त्व  सांगितले, गांधीजींच्या स्वप्नातील भारत उभारणीसाठी रासेयो स्वयंसेवकांनी पुढे यावे असे सांगितले  सदर कार्यक्रमासाठी श्री महेंद्र भोई उपस्थित होते

त्यानी दे दि हमे आझादी हे गीत गायिले श्वेता महाजन या विद्यार्थ्यिांनिने गांधीजींचे विचार सांगितले संजय कोळी ने रघुपती राघव गीत सादर केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सतीश वैष्णव यांनी  केले आभार प्रा डॉ जयंत नेहेते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात 96  विद्यार्थी- विद्यार्थीनी हजर होते.
जळगाव जिल्हा खाजगी शाळा,शिक्षकेतर सघटनेच्या उपाध्यक्ष.पदी - सजीव चौधरी

जळगाव जिल्हा खाजगी शाळा,शिक्षकेतर सघटनेच्या उपाध्यक्ष.पदी - सजीव चौधरी


रावेर,प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या आहिरवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील  श्री सजीव कडू चौधरी,याची जळगाव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर,सघटनेच्या उपाध्यक्ष पदी सर्वानू,मते बिनविरोध निवड करण्यात आली या अगोदर 2014 मधे सजीव चौधरी.,याची बिनविरोध,झाली होते त्याच्या कार्याचा.

आढावा घेत पुन्हा उपाध्यक्ष.पदाची धुरा.त्याच्या कडे देण्यात आली हि निवड,प्रक्रिया ग,गो,बेन्डाळे विद्यालय विवरा येथे सपन्न,झाली या वेळी सघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते नवनिर्वाचीत,कार्य कारणी पदाधीकार्याचे,राज्य अध्यक्ष सतिशजी.नाडगोडा नाशिक मिलीद जोशी सचिव पनवेल.राज्य कार्यकारणी व,जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष विनोद,महेश्री,व जिल्हा कार्यकारणी,यांनी अभिनंदन केले
पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे  रावेर- नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी  चंद्रकांत विचवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे रावेर- नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


रावेर :-  येथिल नविन विश्रामगृहावर मंगळवारी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या संघटनेची बैठक जिल्हाअध्यक्ष उमेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाली. यावेळी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र यासंघटनेचे जिल्हा कार्यकारणीचे उपाध्यक्ष अनिल आसेकर, सदस्य दिपक नगरे, वासुदेव नरवाडे (दिव्यमराठी पत्रकार), सुनिल चौधरी ( संपादक रावेर विकास), निलेश राजपुत ( महाराष्ट्र टाईम्स पत्रकार), समशेर खान( दै.आव्हान), विजय पाटील ( लोकसत्ता), जयंत भागवत (दैनिक भास्कर), राजीव बोरसे ( निभोंरा), संघटनेचे भुसावळ येथिल सचिव सद्दाम खाटीक, यांच्या उपस्थितीत आजची सभा संपन्न झाली. यात अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्यकारणी जाहीर केली, यात उपाध्यक्षपदी देवेंद्र चौधरी ( खिरोदा), विठ्ठल कोळी ( तांदलवाडी), सचिवपदी ज्ञानेश्वर महाजन( ऐनपुर),  खजिनदारपदी  सुभाष पाटील(दै. लोकमत, ऐनपुर), सहसचिवपदी आशिष बोरसे (निंभोरा),सदस्यपदी चंद्रकांत कोळी ( पुरी- गोलवाडे) देवलाल पाटील ( रावेर), काशिनाथ बोरसे (निभोंरा),गणेश सेठी ( खानापुर), उत्तम वाघ (वाघोदा ), रमेश अवसरमल,सरजू होले, यांची निवड केली आहे.
जळगाव येथे महाराष्ट्र स्तरावरील आजी माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत बांबू लागवड कार्यशाळा सपन्न

जळगाव येथे महाराष्ट्र स्तरावरील आजी माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत बांबू लागवड कार्यशाळा सपन्न


रावेर प्रतिनिधी  :- जळगाव येथे महाराष्ट्र स्तरावरील आजी माजी,मत्र्याच्या उपस्थितीत बाबू लागवड कार्य शाळा  आयोजित करण्यात आली होती यात मला सूत्रसंचलन करण्यासाठी वन विभागाने   रावेर चे पत्रकार दिपक नगरे याना पाचारण केले होते.


संपुर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वन विभाग , आणि शेतकरी, उद्योजक उपस्थित होते.  एक नवीन आणि माझ्या अनुभवाच्या साठ्यात एक नवीन अनुभव मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली  आहे......... धन्यवाद वन विभाग
ऐनपूर महाविद्यालयात रासेयो तर्फे राष्ट्रीय रक्तदान दिन साजरा

ऐनपूर महाविद्यालयात रासेयो तर्फे राष्ट्रीय रक्तदान दिन साजरा


रावेर :-  येथून जवळच ऐनपूर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे राष्ट्रीय रक्तदान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने होते  प्रमुख वक्ते   डॉ सतिश पाटील यांनी रक्तदान हा समाजपयोगी उपक्रम आहे तसेच गरजू रुग्णांना दान केलेल्या रक्ताचं उपयोग होतो तसेच रक्तदात्या ला सुद्दा उपयोगाचे आहे त्याच बरोबर रक्तदानाचे महत्त्व  सांगितल सदर कार्यक्रमासाठी प्रा नितीन बारी व्यवस्थापन परिषद सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव उपस्थित होते  अध्यक्षीय समारोपात  प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी रक्तदाना विषयीं बोलत असताना अवयवदानाचे सुद्धा महत्व विशद केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सतीश वैष्णव यांनी केले आभार प्रा डॉ जयंत नेहेते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात 114  विद्यार्थी- विद्यार्थीनी हजर होते
माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी  प्रा डॉ जे बी अंजने

माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी प्रा डॉ जे बी अंजने

ऐनपूर महाविद्यालयात सर्जिकल स्राईक डे साजरा

रावेर :- सोशल मीडियाच्या आणि व्यसनाच्या जाळ्यात अडकलेल्या आजच्या युवकांनी माजी सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राइक डे राष्ट्रीय सेवा निमित्त आयोजित कार्यक्रम मधील आत्मकथनातुन प्रेरणा घेऊन देशभक्ती अंगिकारावी असे आवाहन ऐनपूर महाविद्यालयात अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ अंजने यांनी केले.

येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात सर्जिकल डे निमित्त राष्ट्रीय सेवा योजना दल यांच्या कडून माजी सैनिकांच्या यशोगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून रावेर तालुका तायक्वांडो असोसिएशन अध्यक्ष दीपक नगरे, दिलीप सोनवणे हे उपस्थित होते.

सरदार पटेल यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली यात निंभोरा येथील रहिवाशी आणि 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील जखमी असलेले माजी सैनिक सुधाकर गंजी सोनवणे यांनी त्या काळातील युद्धाच्या थरारक आणि रोमांचक अनुभव कथन करतांना त्यांचे डोळे पाणावले.

शत्रूच्या गोळ्या लागून देखील कर्तव्य बाजावतांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेऊन वाचविले असल्याचे अभिमानाने सांगून त्यांनी माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांनी प्रत्येक जखमी सैनिकांची भेट घेऊन केलेली विचारपूस त्यांनी भावुक शब्दात सांगितले.

कठीण प्रशिक्षण दरम्यान खुद को बाचाकर, दुष्मन को खतम करो, या शिकवणीचा उहापोह देखील त्यांनी केला. शेजारील देश आजही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला वठणीवर आणण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राइक सारखे कठोर पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे म्हटले.
दीपक नगरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की आजचा सुखासीन झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या सीमावर्ती भागात जाऊन सैनिकांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्या जीवनात त्यांची शिस्त आणि संयम अंगीकारावेत.

 स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक यांचा आदर करून त्यांच्या उपयोगी आपण यावे. त्यांच्या सारखे आपण लढू शकत नसलो तरी देश हिताचे कोणतेही कार्य जसे सफाई दूत, बेटी बचाव, वृक्ष संवर्धन आदी हिताच्या मिहिमेत सहभागी होऊन देशभक्त बना असेही आवाहन केले.

 शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ जे बी अंजने यांनी नुकताच प्रदर्शित झालेला परमाणु तसेच सैनिक जीवनावर आधारित चित्रपट बघण्याचे आवाहन करून अमेरिका आणि त्यांचे परमाणु धोरण या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश वैष्णव यांनी केले तर आभार जयंत नेहते यांनी मानले
के-हाळ्यातील ग्रा.प च्या सफाई कामगारांची पत्रकाराला अरेरावी

के-हाळ्यातील ग्रा.प च्या सफाई कामगारांची पत्रकाराला अरेरावी


रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या के-हाळा ग्रामपचायत म्हणायला तशी चांगली मात्र सफाई कामगारांच्या दबगगीरी मुळे वेशिला टागली के-हाळा,ग्रामपचायत मधे गेल्या अनेक वर्षा पासून एक सफाई कामगार कार्यरत आहे मात्र हा सफाई कामगार नेहमीच गावात वादग्रस्त ठरला आहे

 काही न काही कारणांमुळे ग्रामपचायत हा बहादूर कर्मचारी चांगला चर्चेत राहिला आहे आपल्या वरीष्ठ अधिकारी तसेच गावातील लोकप्रतिनीधी यांच्या आदेशाना सुध्दा केराची टोपली दाखण्यात हा,कर्मचारी चागलाच पटाईत आहे याच प्रत्यय आता नुकतेच आले आहे

 या बहादूर सफाई कामगारांने गटारीतील घाण बाजूला टाका या वरून पत्रकार भुषण,महाजन सोबत वाद घालत अर्वाच्च भाषेत,अरेरावी करत दबगीरी केली त्या मुळे या  बहादुर कर्मचाऱ्यांचा ग्रा प,प्रशासनाने चांगला सत्कार करावा ग्रा प प्रशासनाने सत्कार न केल्यास पत्रकार महाजन या बहादूर कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहे
ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो चे ठिय्या आंदोलन  महाविद्यालयीन कामकाज आटोपल्यावर रोज दिडतास आंदोलन

ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो चे ठिय्या आंदोलन महाविद्यालयीन कामकाज आटोपल्यावर रोज दिडतास आंदोलन


रावेर प्रतिनिधी .रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात एनमुक्टो संघटणे तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन महाविद्यालयीन कामकाज संपल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. जो पर्यत संघटणेच्यामागण्या पुर्ण होणार नाही तो पर्यंत महाविद्यालयीन कामकाज आटोपल्यावर रोज दिड तास बेमुदत आंदोलन ठरविण्यात आले आहे

यात संघटनेच्या एकुण प्रमुख आठ मागण्या आहेत १)राज्यशासनाने उच्च शिक्षण छेत्रातील सर्व रीक्त पदे त्वरीत भरावीत,  २)७१ दिवसांचे बेकायदेशीर रीत्या थांबविलेले वेतन ताबडतोब अदा करावे, ३) ग्रंथपाल, शारीरीक शिक्षण संचालक आदिंसह सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करून शिक्षकांना देय थकबाकीसाठी केंद्रशासनाने १००% निधी उपलब्ध करून द्यावा. ४) नविन अंशदायी पेंंशन योजना बंद करून सर्व शिक्षकांना जूनी पेंंशन योजना लागुकरावी.

५) विनाअनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांच्या संस्थाचालकांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्ण वेतन द्यावे. ६)मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समानकाम, समानवेतन या तत्वाची अंमलबजावणी करून अर्हताप्राप्त कंत्राटी शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत समावून घ्यावे. ७) मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय तक्रार निवारन समीती त्वरीत स्थापण करण्यात यावी.

८) पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींची दुरूस्ती तात्काळ करावी. या प्रमुख आठ मागण्यांंसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. यात संघटणेचे अध्यक्ष प्रा.डाँ.एस.ए.पाटील यांच्या अध्यक्षते खाली प्रा.डाँ.के.जी.कोल्हे (एम.फुक्टो.कार्यकारणी सदस्य), प्रा.एम.के.सोनवणे, प्रा.डाँ.पी.आर.महाजन(एनमुक्टो जिल्हा कार्यकारणी सदस्य),

 प्रा.डाँ.सौ.रेखा पाटील, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एस.बी.पाटील, प्रा.डाँ.एस.एन.वैष्णव, प्रा.व्ही.एच.पाटील यांनी आदोलनात सक्रीय सहभाग नोदवला या आंदोलनाला तासीक तत्वावरील प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.अर्जून वंजारी, प्रा.कु.रूपाली बऱ्हाटे, प्रा.कु.प्रेरणा बोंडे, प्रा.कु.टिना तळेले, हर्षल पाटील, महेंद्र महाजन, सुनिल पाटील, गोपाल पाटील, गणेश महाजन, नितीन महाजन यांसह विद्यार्थ्यांनी पाठींबा दर्शविला आहे. फोटोत आदोलनात सहभागी झालेले प्राध्यापक.
जमीयत उलमा ए हिंद शाखेच्यावतीने केरळ पुरग्रस्तासाठी ५३ हजाराचा निधी

जमीयत उलमा ए हिंद शाखेच्यावतीने केरळ पुरग्रस्तासाठी ५३ हजाराचा निधी


इकबाल मुल्ला
लोहारा/उमरगा प्रतिनिधी :- उमरगा येथील जमीयत उलमा ए हिंद शाखेच्या वतीने केरळ पुरग्रस्तासाठी ५३ हजाराचा निधी पाठविण्यात आला.शाखेचे अध्यक्ष मोलाना गुलामनबी मलंगसाब बलसूरी,उपाध्यक्ष फेरोज अ.रज्जाक शेख सचिव हाफिज युसुफ मोहियोद्दीन शेख,हाफिज रहमानसाब, तय्यब साब,ताजोद्दीन नजीर मुल्ला,शकील बाबू डांगे, सलाउद्दीन

पीरजादे,अब्दुल रऊफसाब सौदागर,ताहेर कादरी,हाजी जाफर फखरुद्दीन तांबोली, हाजी मुहम्मदसाब तांबोली,मोहम्मद शौकत साब, खालीद भाई पेशमाम,बाबा जाफरी,पाशा काजी,निसारभाई, अब्दुल अजीज बागवान,अज्जम काजी,बबलू काझी, भैय्या शेख,साजीद लदाफ,फय्याज भाई,वजीर शेख, निजाम व्हंताळे आदींनी पुढाकार घेऊन केरळग्रस्ताच्या मदतीसाठी निधी संकलित केले. उमरगा तालुक्यातील आलुर,तुरोरी,बलसुर,चिंचोली,

मुरूम,तलमोड,दाळींब,खजुरी लोहारा तालुक्यातील अचलेर,येथील मुस्लीम बांधवांनी निधीसाठी सहकार्य केले.दरम्यान शनीवारी ५३ हजार ६९२ रुपयाचा निधी धनाकर्षाद्वारे मदतीनिधीसाठी पाठविण्यात आला. यापूर्वी येथील मुस्लीम पंच कमेटीने केरळच्या पूरग्रस्तासाठी ७० हजाराचा निधी दिला होता.मुस्लीम बांधवांचे दातृत्व या निमित्ताने अधिक प्रमाणात दिसून आले.