Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts
Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts
१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनभोरा येथे ग्रामीण पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांचा जप्त करुन आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक केली.



मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अनभोरा येथील.

लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते (२३) याच्या घरी छापा टाकून त्याच्या कडून विक्रीसाठी ठेवण्यात आलेला १ लाख ८० हजार १२० रुपये किमतीचा १८ किलो १२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक करुन त्याच्या विरूद्ध अपराध क्रमांक ४०१ / २३ कलम २० ब एन डी पी एस अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा


पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, विजय मानकर, गोलंदास लांजेवार, अनिल टोपकर, संजय खंडारे, मनिष मालठाणे, शंकर खेडकर, गणेश ठाकरे घनश्याम सलामे, इरफान अली, महिला शिपाई वर्षा धारपवार यांनी केली.

मनसे देणार महाविद्यालयीन तरुणींना पाठबळ

मनसे देणार महाविद्यालयीन तरुणींना पाठबळ



  • महिला सक्षमीकरणासाठी शिबीरे : दिपक दांदळे 


मूर्तिजापूर : (प्रतिनिधी) विदर्भातील९२६ महिला व तरुणी गायब असून जिल्ह्य़ातील ३६ तरुणी बेपत्ता झाल्या आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. कुठल्याही शाळा महाविद्यालयातील तरुणी अडचणीत असलेल्यास अथवा तीची कोणी छळ काढीत असलेल्यास सदर तरुणीने दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यास कार्यकर्ते व टीम घटनास्थळी पोहोचून त्या प्रसंगातून तीची सुटका करेल त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी तालुकास्तरावर महिलासांठी विविध शिबिरे राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष दिलीप पाटील दांदळे यांनी २ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली हा उपक्रम ९ मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापण दिना पासून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                   तालुक्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालये येथे या संदर्भात एक विशिष्ट फलक लावण्यात येणार असून त्या फलकावर काही मोबाईल नंबर असेल या मोबाईल क्रमांकावर संकटात असलेल्या कुठल्याही तरुणीचा कॉल अथवा मेसेज आला तर मनसेची टीम लगेच त्या ठिकाणी धाव घेऊन तीची मदत करणार आहे. यावेळी संबंधित तरुणीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणी गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत या धर्तीवर हा उपक्रम ९ मार्च पासून सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर महिला सक्षमीकरणासाठी विविध मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून यात तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करणार येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिपक दांदळे, संतोष गोलाईत, सुनील शिंदे, गौरव मोरे, डॉ. पंकज बांबल, गजानन बढे, विजय गावंडे, मिलिंद इंगळे, संजय रडके यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्नीची हत्या करून ३ महिने फेसबुक अपडेट ठेवलं!

पत्नीची हत्या करून ३ महिने फेसबुक अपडेट ठेवलं!


गोरखपूर :- गोरखपूरच्या डॉक्टर धर्मेंद्र प्रताप सिंह याने त्याच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून नंतरही हत्या लपवण्यासाठी तिचे फेसबुक प्रोफाइल तीन महिने अपडेट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या डॉक्टरने हत्येची कबुली देईपर्यंत मृत महिलेच्या कुटुंबीयांना ती जीवंत असून आसाममध्ये राहत आहे, असं वाटत होतं.

राखी श्रीवास्तव असं मृत महिलेचं नाव आहे. २००६मध्ये मृत महिला आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंहला भेटली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं. धर्मेंद्र विवाहित आहे हे माहीत असूनही राखी त्याच्या प्रेमात होती. सिंहने तिच्यासाठी शहापूरमध्ये बंगलाही घेतला होता. कुणालाही न सांगता २०११ मध्ये गोंडा येथे ते विवाहबद्ध झाले. पण २०१५मध्ये या प्रकरणाची माहिती धर्मेंद्रची पहिली पत्नी उषा हिच्या कानावर गेली. तिने राखीशी असलेले सगळे संबंध तोडण्याची सक्ती धर्मेंद्रला केली. पण धर्मेंद्रनं न ऐकल्यानं दोघे वेगळे झाले.

२०१६मध्ये राखी मनीष सिंहच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी कायदेशीर पद्धतीनं लग्न केलं. मात्र, त्यानंतरही राखी धर्मेंद्रच्या संपर्कात होती. शहापूरचा बंगला माझ्या नावावर कर नाही तर तुझा खरा चेहरा जगासमोर आणेन अशी धमकी तिने त्याला दिली. राखी आपल्या दुसऱ्या पतीसोबत नेपाळला फिरायला गेली होती. मनीष भारतात लवकर परतला पण राखी मात्र काही कारणांनी नेपाळमध्येच थांबली. तिथे धर्मेंद्र सिंहच्या दोन साथीदारांनी तिची भेट घेतली. तिला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन तिला पोखराच्या दरीत ढकलून दिले. त्यानंतर हे दोन्ही साथीदार मोबाइल घेऊन गुवाहाटीला गेले. तिथूनच ते तीन महिने तिचं फेसबुक अकाउंट अपडेट करत होते.

राखी गोरखपूरला परतली नाही म्हणून तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसंच, तिचा पती मनीष सिंह याच्यावर संशय असल्याचंही स्पष्ट केलं. पण मनीष निर्दोष असल्याचं कळल्यावर पोलिसांनी आपला मोर्चा धर्मेंद्रकडे वळवला. त्याची खूप कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली. यूपी पोलिसांनी नेपाळ पोलिसांच्या मदतीने राखी श्रीवास्तव हिचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या हवाली केला. पोलिसांनी धर्मेंद्र आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून राखीचे आधार कार्ड, पासपोर्ट आणि चार मोबाइल ताब्यात घेतले आहेत.
हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादी टोळी; ATSचे स्फोटक आरोपपत्र

हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादी टोळी; ATSचे स्फोटक आरोपपत्र


मुंबई : - नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकरसह, श्रीकांत पांगरकरसह १२ आरोपींविरोधात तब्बल ६ हजार ८४२ पानांचे आरोपपत्र आज विशेष एनआयए कोर्टात दाखल केले.

आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता, विस्फोटके कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा या कायद्यांबरोबरच दहशतवादी कारवायांच्या विरोधी असलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (युएपीए) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि अशाप्रकारच्या अन्य संस्थांशी संबंधित आहेत. 'क्षात्र धर्म साधना' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी दहशतवादी तरुणांची टोळी बनवली, असेही एटीएसच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
विषारी औषधाचे गोले खाऊ घालून दोनं गाये एक गोरा केले ठार

विषारी औषधाचे गोले खाऊ घालून दोनं गाये एक गोरा केले ठार



  •  स्पॉट वर विषारी औषधाचे गोले सापडले
  •  तपसात पोलिसांचा चाल ढकेल
  •  एका समासह पुलिस विरूद्ध तक्रार

मो, शारिक
बोरगांव मंजू :- गवहाचा कानिमधे विषारी औषध टाकून त्याचे गोले शेतात टाकून तीन जानवर दोन गाय आणि एक गोरा जीवे मारण्याचा प्रकार बोरगांव मंजू परिसरात उघड़कीस आला या प्रकरणी जनवारांचे मालकांनी एका इस्मसह पोलिस विरूद्ध लेखी तक्रार दखल केल्यानने खड़बढ उखड़ली आहे,

           बोरगांव मंजू येथील मुकीमोद्दीन कयमोद्दीन यांनी पोलिस उपविभागीयधिकारी कड़े लेखी तक्रार करुण तीन जानवरिंनी विष घालून मारल्याचा आरोप करुण घटनास्थाडवार विषारी औषधाचे गोले सापडले असल्याचा दावा केला आहे, बोरगांव मंजू येथील एक शेतामधे विषारी औषधाचे गोले खल्ल्यांने तीन कनवारांचा मुत्यु झाल्याची घटना मंगलवार रात्रि उघड़कीस आली आहे,


 मिळालेल्या महितीनुसार मुकीमोद्दीन कयमोद्दीन यांच्या मालकीच्या दोन गाय आणि एक गोरा असे तीन जानवर नेहमी सारखे गवाजवड शेतामधे चारण्यासाठी गेलेहोते पन मंगलवारी रात्रि उशिरा पर्यंता परत घरी ना आल्य्यानने त्यंचा शोध घेतला असता तिन्ही जानवर गवाजवडील एकाशेतातील विषारी औषधाचे गोले खल्ल्याने दगावल्याचे समोर आले या प्रकरणी जनवारांचे मालक मुकीमोद्दीन यांनी उपाविभगिया पोलिस आधिकारी कड़े लेखी तक्रार केली असून नारायण बागड़े यांनी विषारी औषध टाकून जनावारांना जीवे मारल्याचा आरोप केला आहे तसेच या प्रकरणी देउन्ही हेकॉ.कैलाश गवई यांनी या प्रकरणी दखल देण्यास टाडाटाड केले आणि सांगितले की ज़र नारायण बागड़े विरुद्ध रिपोर्ट दिला तर ते तुझ्या नावाची चिट्टी लिहून आत्महत्या करणार असे मनहाले या प्रकरणी चौकशी करुण कार्यवाईची मांगनी मुकीमोद्दीन यांनी केली आहे
अवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का ?

अवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का ?


मूर्तिज़ापुर :-  ठाणेदाराच्या मूकसंमतीने अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. राजरोसपणे अवैध दारू विक्री मटका, जुगार अड्ड्याचे व्यवसाय सुरू आहेत. हे सर्व प्रकार माहीत असूनही पोलिस प्रशासनाकडून निव्वळ बघ्यांची भूमिका घेतली जात आहे.

तालुक्यातील विविध गावांत अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सहजरीत्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खेडेगावात देशी दारू उपलब्ध होते. शिवाय काही गावांमध्ये गावठी दारू काढून त्याची विक्री होते. देशी व गावठी दारूच्या अवैध प्रकारामुळे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला आहे. राज्यात गुटखा बंदी असताना या तालुक्यातील पानटपर्‍या, किराणा दुकानावर गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे.

त्यामुळे राज्यात गुटखा बंदी असली तरी तालुक्यात मात्र कागदोपत्री गुटखा बंदी असल्याचे चित्र आहे. या अवैध प्रकारावर अंकुश बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे. पोलिसांनी गुटखा पकडला तर पुढील कार्यवाही अन्न व भेसळ विभागाकडून केली जाते. परिणामी शाळा परिसरातील छोट्या टपर्‍यावरही गुटखा विक्री होेते. कमी वयातील मुले गुटखा व्यसनाच्या आहारी जात असल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

 शहरात वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार अड्डा, तितली-भवरा अवैध व्यवसाय थाटण्यात आला आहे. येथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. खुलेआम चालणार्‍या अवैध व्यवसायाला ठाणेदाराची मूकसंमती असल्यामुळेच ठोस कार्यवाही होत नाही असा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलिस , स्थानिक पोलिस प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून अवैध व्यवसायाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्षाची भूमिका घेतली जाते. याचा अर्थ काय हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान तालुक्यात अवैध दारू, गुटखा विक्री, मटका, जुगार अड्ड्याचा राजरोसपणे चालू असलेल्या प्रकारावर अंकुश बसणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. स्वहितासाठी पोलिसांकडून या प्रकाराला मूकसंमती असल्याची चर्चा जोरात होऊ लागली आहे.
मुंबईः बेकायदा रुग्णालयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबईः बेकायदा रुग्णालयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


रिज़वान टाईम्स विशेष
मुम्बई :- राज्यात अनेक रुग्णालये व नर्सिंग होम हे बेकायदा व नियमांचे उल्लंघन करून सुरू असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. कारण त्याची झळ मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसते, असे निरीक्षण नोंदवतानाच आजपर्यंत किती बेकायदा रुग्णालये व नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली आणि किती ठिकाणी सील ठोकले, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.

याचबरोबर रुग्णालये व नर्सिंग होमवर योग्य नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट हा कायदा करण्यात येणार असल्याचे मागील दीड-दोन वर्षापासून सांगण्यात येत असताना, अद्याप तो कायदा का करण्यात आला नाही, अशी विचारणाही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केली. या कायद्याविषयीचे विधेयक अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया अधिक जलद केली जाईल, अशी हमी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यावेळी दिली.

पुण्यातील अतुल भोसले यांनी अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करून हा गंभीर प्रश्न न्यायालयासमोर आणला आहे. बेकायदा नर्सिंग होम व रुग्णालयांवर नियंत्रण ठेवणारी योग्य ती यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने अशा ठिकाणी अनेक मृत्यू होत आहेत. शिवाय राज्यभरात किमान ६७४२ रुग्णालये व नर्सिंग होम नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सरकारच्या प्रतिज्ञापत्रांतूनच उघड झाले असल्याचे अॅड. नरवणकर यांनी निदर्शनास आणले. तेव्हा, खंडपीठाने त्याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. 'हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना रास्त किमतीत आरोग्य सेवा मिळण्याची खबरदारी घेतानाच ती सुरक्षित असण्याकडेही बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे', असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

'कायद्यासाठी कोणती पावले उचलली?'
अद्याप राज्याचा कायदा होऊ शकला नसल्याने केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या अनुषंगाने बेकायदा नर्सिंग होम व रुग्णालयांवर कारवाई होण्यासाठी राज्य सरकार नियम कधीपर्यंत करणार, तसेच आजपर्यंत किती बेकायदा नर्सिंग होम व रुग्णालयांवर सील ठोकण्यासह अन्य कठोर कारवाई करण्यात आली, सरकारचे या प्रश्नावर धोरण काय आहे आणि नवा कायदा करण्याबाबत आतापर्यंत नेमकी कोणती पावले उचलली आहेत, हा सर्व तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवली.
'बलात्कार झाला असेल, मी तो केला नाही'

'बलात्कार झाला असेल, मी तो केला नाही'


मुंबई :- 'विन्टा नंदा हिच्यावर बलात्कार झाला असेल पण मी तो केलेला नाही' या शब्दात आलोकनाथ यांनी लेखिका दिग्दर्शिका विन्टा नंदा हिच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. सोमवारी रात्री विन्टा नंदा यांनी फेसबुकच्या माध्यमातून आलोकनाथ यांच्यावर बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

२० वर्षांपूर्वी मुख्य अभिनेत्रीची छेड काढली म्हणून आलोकनाथ यांना 'तारा' या मालिकेतून विन्टा नंदा यांनी हाकललं होतं. त्यानंतर एक दिवशी विन्टा नंदा यांच्यावरती आलोकनाथ यांनी बलात्कार केला व पुढे काही वर्षं मानसिक छळही केल्याचा आरोप नंदा यांनी केला आहे. याबद्दल एका वृत्तवाहिनीने आलोक नाथ यांना विचारलं असता ते म्हणाले,' बलात्कार झाला असेल,मी हे नाकारत नाही. पण तो बलात्कार मी केलेला नाही. हे प्रकरण आता बाहेर आलं असून बरेच दिवस गाजणार आहे. तसंच सध्या फक्त महिलांचीच बाजू ऐकली जाते आहे. पुरूषांची बाजू कोणीच ऐकत नाही. त्यामुळे मी यावर जास्त काहीच बोलणार नाही. '

दरम्यान विन्टा नंदा आणि ताराची मुख्य अभिनेत्री नवनीत निशाण यांच्या विधानांच्या आधारे आलोकनाथ यांना नोटीस पाठवण्याची तयारी सिंटाने केली आहे. सर्वच क्षेत्रातून विन्टा नंदा यांना सहानुभूती आणि पाठिंबा मिळतो आहे 
मुरुम व उमरगा येथील दोन्ही संवेदनशिल खुनाचे गुन्हयाचा उलघडा दोन आरोपींना गजाआड

मुरुम व उमरगा येथील दोन्ही संवेदनशिल खुनाचे गुन्हयाचा उलघडा दोन आरोपींना गजाआड



  • उस्मानाबाद पोलीस दलाची कामगिरी

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- पोलीस ठाणे मुरुम व उमरगा येथे दाखल खुनाचे दोन्ही गुन्हयांचा उलघडा झाला असुन सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवुन गुन्हयातील आरोपींना उस्मानाबाद पोलीस दलाने गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,दि.11/9/018 रोजी मौजे कवठा येथे अज्ञात मुलगी वय अंदाचे तीन ते चार वर्ष हीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी अज्ञात कारणासाठी तीचा गळा कशाने तरी आवळुन तीस जिवे ठार मारुन तीचा खुन करुन तीचे प्रेत हे पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने मौजे कवठा शिवारातील शंकर नागप्पा झांबरे यांच्या शेतालगत उमरगा ते लातुर जाणारे राज्य मार्ग क्रं.164 चे पश्चिमेस रोडचे दगडाचे पिंचीगच्या पायथ्याखाली आणुन टाकलेले मिळुन आलेने पो.नि.गुंडीले यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे उमरगा येथे गु.र.नं.303/2018 कलम 302,
201,भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याच प्रमाणे दि.12/9/018 रोजी पोलीस ठाणे मुरुम हद्दीत एक अज्ञात मयत स्त्री वय अंदाजे 30 ते 35 वर्ष हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अज्ञात ठीकाणी तिचे डोक्यात कशाने तरी मारुन तीचे छातीवर,पाठीवर व गुप्तअंगाजवळ मारहाण करुन तसेच तीस चटके देवुन तीला ठार मारुन तीचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीचे प्रेत हे आष्टामोड ते येणेगुर एन एच 65 हायवे रोडचे उत्तर बाजुस आणुन टाकलेले मिळुन आलेने पो.उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्या फिर्यादीवरुन मुरुम पोलीस ठाण्यात गु.र.नं.173/
2018 कलम 302,201भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 सदर दोन्ही गुन्हे घडलेपासुन गुन्हयातील मयताची व आरोपीचा शोध पोलीस घेत होते.परंतु त्यांना यश येत नव्हते.गुन्हयातील अनोळखी मयताची ओळख पटत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या.परंतु पोलीस ठाणे मुरुमचे सहाय्यक पो.नि.मुस्तफा शेख व स्थागुशाचे पो.नि.डी.एम.शेख व त्यांच्या पथकानी अहोरात्र परिश्रम घेवुन सदर गुन्हयातील मयताजवळ सापडलेल्या प्लाँस्टीकच्या बँगवरील नावावरुन दि.18/9/018 रोजी रात्री बार्शी तसेच मौजे आळसुंदा येथे जावुन मयत महिलेच्या घराचा व नातेवाईकांचा शोध घेतला.तेथे सदर गुन्हयातील मयताचे छायाचित्र नातेवाईक व शेजारच्या लोकांना दाखवताच त्यांना ओळखुन मयत स्त्रीचे नाव सीमा रवि ओहळ (वय 33) व मयत मुलीचे नाव आरोही पिता रवि ओहळ (वय 3 ते 4) असे असल्याचे निष्पन्न झाले.मयतांची ओळख पटली परंतु गुन्हयातील आरोपीचा शोध लागत नव्हता.सदरील गुन्हा गणेश नगर येथील एक इसम व एक महिला यांनी केला असल्याची माहीती मिळाल्याने दि.20/9/018 रोजी मौजे उमरगा येथुन आरोपी सपना ऊर्फ शंकुतला शिवाजी साळुंके (वय58) व अमर ऊर्फ बच्चन ऊर्फ बच्चु शिवाजी साळुंके (वय 28) दोघे रा.गणेश नगर आय टी आय कॉलेजच्या बाजुला लातुर रोड उमरगा ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांना अटक केली असुन त्यांनी सदर दोन्ही गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे.
सदर अंती संवेदनशिल खुनाचे गुन्हयाचा तपास हा पोलीस अधिक्षक आर.राजा(उस्मानाबाद),अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (उमरगा),यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि.डी.एम.शेख,पो.
उपनिरीक्षक पांडुरंग माने,सहाय्यक पो.नि.मुस्तफा शेख (मुरुम),पो.उपनिरीक्षक श्रीमती ढाकणे,पो.ना.
खलील शेख,पो.ना.सुर्यवंशी,पो.कॉ.घारगे व अवसर स्थागुशाचे अश्विनकुमार जाधव,शेख फरीद सय्यद,
किशोर रोकडे,भागवत झोंबाडे,हुसेन सय्यद,विजय घुगे,कावरे सायबर सेलचे मोरे व कदम यांनी केला.
ऑनर किलींग: जावयाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी

ऑनर किलींग: जावयाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी


हैदराबाद :- 'सैराट' या चित्रपटात आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. 'सैराट' चित्रपटालाही लाजवेल अशी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. आपल्या मुलीने दलित मुलासोबत आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या एका पित्याने गँगस्टरला १ कोटींची सुपारी देऊन जावयाची हत्या केली आहे. तेलंगणाच्या नालगोंडामध्ये ही घटना उघडकीस आली आहे. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथे दिवसाढवळया ही हत्या करण्यात आली.

मिरयालगुडा येथील मारोतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मित्र प्रणयने आठ महिन्यापूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलाकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही. अमृत वार्षीणी, तिचा पती प्रणय आणि सासू हे हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते.

त्यावेळी दबा धरून बसलेल्या गँगस्टरने प्रणयवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रणयचा मृत्यू झाला. अमृत वार्षीणी ही गर्भवती आहे. हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने मुलीच्या तक्रारीवरुन वडील टी. मूर्ती राव आणि काका टी. श्रवण या दोघांना या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा आरोपी बनवले आहे. जावई प्रणयची हत्या करण्यासाठी मुलीचे वडील टी. मूर्ती राव यांनी गँगस्टरला १ कोटींची सुपारी दिली होती.

तसेच ५० लाख रुपयांची रक्कम आधीच दिली होती. प्रणयवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अब्दुल बारीला पोलिसांनी अटक केली असून बारी हा गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणात आरोपी होता. व त्याला सीबीआयने अटक केली होती. तसेच त्याची कोर्टाने मुक्तता केली होती. 
फेसबुकवर भारतीयांची माहिती चोरीला? CBIने विचारला जाब

फेसबुकवर भारतीयांची माहिती चोरीला? CBIने विचारला जाब


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :- फेसबुक, केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च या कंपन्यांना सोशल नेटवर्किंग साइट्सवरून भारतीयांची वैयक्तिक माहिती अवैधरीत्या चोरली जात असल्याबद्दल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) जाब विचारला आहे, असे सूत्रांकडून समजले.

सीबीआयने या कंपन्यांना पत्र लिहिले असून, माहिती जमविण्यासंबंधीचे तपशील मागविले आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर सीबीआयने गेल्या महिन्यापासून केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च या कंपन्यांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने आपल्याला ग्लोबल सायन्स रिसर्च कंपनीकडून माहिती मिळाली होती, असा दावा केला. ग्लोबल सायन्सने ही माहिती फेसबुककडून मिळवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतात फेसबुकचे २० कोटींपेक्षाही अधिक वापरकर्ते आहेत.
दरम्यान, फेसबुककडून माहिती मिळविल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे तपासण्यासाठी प्राथमिक चौकशी हे पहिले पाऊल ठरू शकते. त्यानंतर या प्रकरणाची एफआयआर दाखल करून चौकशी करावी की न करावी, याचा निर्णय घेतला जाईल.

अमेरिकेच्या २०१६मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी फेसबुकवरील सुमारे आठ कोटी ७० लाख वापरकर्त्यांच्या माहितीचा उपयोग केल्याचा आरोप केम्ब्रिज अॅनालिटिकावर यापूर्वी करण्यात आला होता. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग याने माहितीचा गैरवापर झाल्याचे संकेत दिले होते
चोरीचा लोखंडी गज घेवून जाणारा ट्रक यवतमाळ पोलीसांच्या ताब्यात..

चोरीचा लोखंडी गज घेवून जाणारा ट्रक यवतमाळ पोलीसांच्या ताब्यात..


यवतमाळ :-  येथून अदिलाबादकडे जाणार्या ट्रकमध्ये  चोरीचा गज नेत असतांना पोलीसांनी ट्रकचालकासह चोरीचा गज ट्रकसह ताब्यात घेतला. ही कारवाई दिनांक ३० ऑगस्ट रोजी पांढरकवडा रोडवरील बॉम्बेवाला पेट्रोलपंप ते पारवा गावा दरम्यान करण्यात आली.
सलीमखान महेबुबखान (३३) रा.सव्वालाखे लेआऊट यवतमाळ असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे.    दिनांक ३० ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक हे यवतमाळ शहरात पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन ट्रक क्र.एम.एच.२९- टी-१३८६ मध्ये चोरीचे लोखंडी गज भरुन यवतमाळ वरुन अदिलाबादकडे जाणार असल्याची माहती मिळाली. लगेच पोलीसांचे विशेष पथक, कर्मचारी यांनी पांढरकवडा रोड वरील बॉम्बेवाला पेट्रोलपंप ते पारवा गावा दरम्यान सापळा रचला असता यवतमाळ कडून पांढरकवडा रोडने येणारा ट्रक क्र. एम.एच.-२९ टी-१३८६ याला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात बांधकामा करीता उपयोगी येणारे लोखंडी गज (सळई) वजन १९ टन किंमत ७ लाख ६० हजार रुपयाचा विनाकागदपत्राचे संशईत रित्त्या मिळून आला. पोलीसांनी ट्रक चालक सलीमखान महेबुबखान (३३) रा.सव्वालाखे लेआऊट यवतमाळ याला ताब्यात घेवून मुद्देमाल व मालकी हक्काबाबत विचारपुस केली असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही व कोणतेही मालकी हक्काबाबत विचारपुस केली असाता कोणतेही वैध कागदपत्रे सादर केली नाहीत. वरुन सदर लोखंडी गज हे त्याने कोठुन तरी चोरुन आणले असावे असा त्याचेवर वाजवी संशय निर्माण झाल्याने  ट्रक क्र.एम.एच.-२९ टी.-१३८६ किंमत १७ लाख रुपये व लोखंडी गज किंमत २४ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी ट्रक चालकाविरुध्द यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला म.पो.कायद्यान्वये कार्यवाही नोंद करुन मुद्देमाल व आरोपीस पुढील कार्यवाही करीता यवतमाळ शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
    सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांचे मार्गदर्शनात नापोकॉ सैय्यद साजीद, अजय डोळे, वासु साठवणे, योगेश डगवार, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, अजय ढोले सर्व पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने पार पाडली.
अनैतिक सबंधात अडसर ठरत असणाऱ्या एका युवकाचा खुन केलेल्या आरोपींना लोहारा न्यायासमोर हजर केले असता आरोपी मयताच्या पत्नीसह तिघांना न्यायालयाने दि.5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली

अनैतिक सबंधात अडसर ठरत असणाऱ्या एका युवकाचा खुन केलेल्या आरोपींना लोहारा न्यायासमोर हजर केले असता आरोपी मयताच्या पत्नीसह तिघांना न्यायालयाने दि.5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील युवक नेताजी आरगडे (वय35) याचा खुन झाला असल्याची घटना दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली होती. याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीसह तिघा आरोपींना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खुनाच्या घटने मधील आरोपी मयताची पत्नी महादेवी नेताजी आरगडे,हणमंत रसाळ,भरत रसाळ,प्रभाकर रसाळ,यां चौघांना लोहारा न्यायालयासमोर हजर केले असता  न्यायालयाने दि.5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी आर.आर.धस यांनी दिली.
'सनबर्न'मध्ये घातपाताचा राऊतचा कट उघड

'सनबर्न'मध्ये घातपाताचा राऊतचा कट उघड


मुंबई :- पुण्यात झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये घातपात घडवण्याचा वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा कट होता, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र एटीएसच्या तपासातून समोर आली असून याचा पूर्ण तपशील आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयासमोर ठेवला. दरम्यान, नालासोपारा स्फोटकसाठा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या चारही आरोपींना न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.

राऊत, पांगारकर, कळसकर आणि गोंधळेकर या चौघांना १० दिवसांची कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपत असल्याने आज चारही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता एटीएसच्या वकिलांनी महत्त्वाची माहिती कोर्टात दिली.

शरद कळसकरकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कॉम्प्युटरमधून माहिती डीकोड करण्यात आली आहे. त्यात महत्त्वाची माहिती हाती आली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात तसेच बेळगावात पद्मावत सिनेमाच्या शोदरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा आरोपींचा कट होता. धर्मरक्षणासाठी त्यांना हे करायचे होते. त्यासाठी माजी नगरसवेक श्रीकांत पांगारकर हा आर्थिक मदत करणार होता, असे त्यातून उघड झाल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले.

वैभव राऊतच्या घरातून जो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्यासाठी वापरण्यात येणार होता. हा सगळा शस्त्रपुरवठा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून झालेला आहे. राऊत आणि गोंधळेकर यांनी शस्त्रप्रशिक्षणही घेतलेलं असून जिथे हे प्रशिक्षण घेण्यात आलं तिथे जाऊन तपास करायचा आहे. यातील दोन केंद्रं महाराष्ट्रात आहेत तर बाकीची अन्य राज्यांत आहेत. तिथे जाऊन तपास करावा लागेल, असेही यावेळी न्यायालयात सांगण्यात आले.

आरोपींचा संवाद कोडवर्डमध्ये व्हायचा. राऊत हा अटकेतील अन्य आरोपी व काही व्यक्तींच्या संपर्कात होता. या सर्वांमधील कोडवर्डमधील संवाद नेमका काय होता, याची चौकशी केली जाणार असून त्यातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे लागतील, असेही एटीएसने न्यायालयात नमूद केले. कळसकरकडून जप्त करण्यात आलेल्या नोटाही तपासात महत्त्वाच्या आहेत. त्याने घातपातासाठी काही ठिकाणांची रेकीही केली होती. शिवाय आरोपींकडून मोठ्या प्रमाणात डेटा व सीडी जप्त करण्यात आल्या असून त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.

हात दुखत असल्याने तपासणीस गेलेल्या महिलेचा लोहारा शहरातील एका डॉक्टराने विनयभंग केला.या डॉक्टरवर लोहारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

हात दुखत असल्याने तपासणीस गेलेल्या महिलेचा लोहारा शहरातील एका डॉक्टराने विनयभंग केला.या डॉक्टरवर लोहारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- हात दुखत असल्याने तपासणीस गेलेल्या महीलेचा  एका डॉक्टरांने विनयभंग केल्याचा गुन्हा लोहारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.ही घटना लोहारा शहरात दि.27 ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे.
    याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की,डावा हात दुखत असल्याने लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील एक 27 वर्षीय महीला तपासणीसाठी दि.27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता लोहारा शहरातील कानेगाव रस्त्या लगत असलेल्या डॉ.रामकृष्ण घायाळ यांच्याकडे गेले होती.यावेळी डॉ.घायाळ यांनी फिर्यादीच्या पोटास हात लावला असता यावेळी फिर्यादीने सांगीतले कि, माझ्या पोटात नाही डाव्या हातात दुखत आहे असे म्हणले असता डॉ.घायाळ यांनी त्यांच्या तपासणी रुममध्ये पोटाजवळ हात लावुन साडी ओडुन फिर्यादीस लाज वाटेल असे कृत्य केले.याबाबत महीलेने लोहारा पोलीस ठाण्यात दिलेया फिर्यादीवरुन डॉ.घायाळ याच्याविरुध्द कलम 354 अ.ब.भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास महीला पोलीस नाईक बी.एस.काजळे करीत आहेत.
लंकेश हत्या: पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण शेतात

लंकेश हत्या: पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण शेतात


बेंगळुरू :- पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील डॉक्टरसह जवळपास सहा जणांनी लंकेश यांची हत्या करण्यासाठी बेळगावातील जांबोटी गावामधील एका शेतात पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.

लंकेश हत्या प्रकरणी गेल्या आठवड्यात एसआयटीनं अटक केलेला आरोपी भारत कुर्णे याच्या मालकीच्या शेतात मारेकऱ्यांना पिस्तुल आणि इतर शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यांच्याकडून राजेश बांगेरा हा सराव करून घेत होता, असं चौकशीतून उघड झालं आहे. गेल्या महिन्यात मदिकेरी येथून त्याला अटक केली होती. एका स्थानिक राजकीय व्यक्तीचा तो स्वीय सहायक आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये झाली होती. त्याच्या दोन-तीन महिन्यांआधी म्हणजेच एप्रिल-मे २०१३मध्ये मारेकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. लंकेश यांच्या डोक्यात गोळी घाला, असं मारेकऱ्यांना सरावादरम्यान सांगण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं.

  • मारेकरी एकमेकांना टोपण नावाने संबोधत होते 

मारेकरी एकमेकांना मूळ नावानं संबोधत नसत. छोटा मियाँ, बडा भाई, भाई साहब, काका, मामा, दादा, बंधू अशा टोपण नावांनी ते एकमेकांना संबोधत असत. अन्य एका आरोपीला पुण्यातील डॉक्टरचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी लगेच ओळखलं. डॉक्टरनेच प्रशिक्षण दिल्याचं आरोपीनं चौकशीवेळी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

  • आरोपींचा कलबुर्गींच्या हत्येशी संबंध

ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचीही सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा कलबुर्गी हत्येशी संबंध आहे का, हे तपासून पाहण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे संकेत सीआयडीनं दिले आहेत. कलबुर्गी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अमोल काळे याला ओळखले आहे. त्यानेच कलबुर्गींच्या घराचा दरवाजा ठोठावला होता, असं त्यांनी सांगितलं. काळेसह चौघे जण कलबुर्गी यांच्या घरी गेले होते. त्यातील दोघे कारमध्ये थांबले होते. दोघे जण बाईकवरून आले होते. त्यात अमोल काळेही होता, अशी माहिती एसआयटीतील सूत्रांनी दिली.
उमरवर गोळीबार; सीसीटीव्ही फूटेजची तपासणी

उमरवर गोळीबार; सीसीटीव्ही फूटेजची तपासणी


 नवी दिल्ली :- जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी नेमके काय झाले, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. काहींच्या म्हणण्यानुसार त्याने हवेत गोळीबार केला. प्रत्यक्ष गोळीबार झाला, की नाही याबाबत पोलिस तपास करीत असून सीसीटीव्हीचे फूटेज तपासले जात आहे, अशी माहिती नवी दिल्लीच्या परिक्षेत्राचे सहपोलिस आयुक्त अजय चौधरी यांनी दिली.

‘आम्ही चहा घेऊन येत असताना मागून एक जण आला. त्याने मला ढकलून दिले आणि गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी मी पळाल्याने वाचलो. हल्लेखोर तेथून पळून गेला. मी त्याचा चेहरा पाहू शकलो नाही. त्याच्याबरोबर कुणी इतर होते, की नाही ते माहीत नाही,’ अशी माहिती खालिद याने दिली.

संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीला विरोध करताना देशाविरोधात घोषणाबाजी झाल्याचे प्रकरण २०१६मध्ये गाजले होते. ‘जेएनयू’च्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमानंतर खालिद याच्यासह कन्हैयाकुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाने नुकताच त्याचा पीएच. डी.चा प्रबंध नाकारला आहे. त्याविरोधात त्याने न्यायालयात धाव घेतली आहे.
राऊत, गोंधळेकरच्या घरात आणखी शस्त्रसाठा

राऊत, गोंधळेकरच्या घरात आणखी शस्त्रसाठा


मुंबई  :- स्फोटकं आणि बॉम्ब बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) आणखी शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याशिवाय त्याचा साथीदार सुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातील घरातून सहा हार्डडिस्क जप्त करण्यात आल्या आहेत.

स्फोटकं प्रकरणी एटीएसने कसून चौकशी सुरू केली आहे. आज एटीएसने वैभव राऊतच्या घरी पुन्हा छापा मारला. यावेळी एटीएसने आठ पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि शस्रांचे अनेक सुटे भाग जप्त केले आहे. त्याशिवाय दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुधन्वाच्या घरातून एटीएसने सहा हार्ड डिस्क, लॅपटाॅप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड जप्त केले असून एक कार आणि मोटारसायकलही जप्त केली आहे. याआधी एटीएसने सुधन्वाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त केला होता.

  • पार्सल बॉम्ब प्रकरणी चौकशी?

सरहद संस्थेचे संजय नहार यांना काही महिन्यांपूर्वी पार्सलमधून बॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. हा पार्सल बॉ़म्ब कुरियर कंपनीच्या कार्यालयात फुटला होता. याप्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर यांचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी एटीएसकडून करण्यात येत असल्याचे समजते. 
ATSकडून कोल्हापुरात पाच संशयितांची चौकशी

ATSकडून कोल्हापुरात पाच संशयितांची चौकशी


 कोल्हापूर :- नालासोपारा येथील एका घरात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणासह कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करुन राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पाच टीम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रविवारी दाखल झाल्या. या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याने कोल्हापूर कनेक्शन उघड होत असून दिवसभरात पाच संशयितांची कोल्हापुरात चौकशी करण्यात आली. शरद कळसकर नोकरी करीत असलेल्या औद्योगिक वसाहतीसह त्याचे संबध असलेल्या संस्था, संघटना, मित्र, नातेवाईक आणि काही साधकांची चौकशी सुरु केली आहे.

बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके बाळगल्याप्रकरणी एटीएसने दोन दिवसांपूर्वी शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि वैभव राऊत या तिघांना अटक केली. या पैकी शरद कळसकरच्या कोल्हापूर कनेक्शनची माहिती एटीएसकडून घेतली जात आहे. त्यासाठी एटीएसचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. या पथकात एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आहेत. कळसकर राहत असलेले ठिकाण, त्याचे कोल्हापुरातील संस्था, संघटना यांच्याशी असलेल्या संबधांची माहिती पथकाने घेतली. कळसकर हा औद्योगिक वसाहतीत लेथ मशीनवर मोल्डिंगची कामे करत होता. त्याबाबत गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा) कागल हातकणंगले पंचतारांकित असोसिएशन (मॅक), पुलाची शिरोली, उद्यमनगर आणि वाय. पी. पोवारनगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत पथकाने माहिती घेतली. या प्रकरणी एटीएसने स्थानिक पोलिसांची मदत घेतली. कळसकरचे कोल्हापुरात चार वर्षे वास्तव्य होते. तो एका औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात लेथ मशीनवर कामाला होता. या ठिकाणाहून हत्येसाठी साहित्य तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचे मित्रही कोल्हापुरातील त्याच्या खोलीवर राहून गेल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तपास पथकाने तो राहत असलेली खोली आणि कारखान्याची माहिती घेतली.


  • कॉल डिटेल्स, सीडीआर मागवला 

कळसकर कोल्हापुरात असताना तो कोणाच्या संपर्कात होता. त्याचे मोबाइलवर झालेले बोलणे, त्याचा कालावधी, संवादात आलेले मुद्दे यांची चौकशी करण्यासाठी कॉल डिटेल्सही तपासले जात आहेत. कोल्हापुरात त्याचे कोण हस्तक आहेत का, तसेच कॉ. पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे का याची पथकाने माहिती घेतली. त्याचा सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) ही मागविला आहे.

  • कोल्हापूर, सांगली, सातारा येथे चौकशी 

संशयित तिघांचेही कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात वास्तव्य होते. या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार, काही संस्था, संघटना संपर्कात होत्या. आठवड्यातून त्यांचा काही लोकांशी संपर्क होत होता. या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके जिल्ह्यात तैनात केली आहेत. त्यातून काही महत्वाचे धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता आहे.

  • काय चौकशी 
  • मोबाइल कॉल डिटेल्स
  • वास्तव्याची माहिती 
  • नातेवाईक, संस्था, संघटनांची चौकशी
  • तीन जिल्ह्यात चौकशी 
  • कोल्हापूर एसआयटीचे पथक पुण्याला 

  • तपास गोपनीय ?
  • या प्रकरणी एटीएस आणि कोल्हापूर एसआयटीकडून गोपनीय तपास सुरु आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापुरातील एसआयटीचे एक पथक पुण्याला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
देहविक्रय करणाऱ्या महिलांना टाळलं ही माझी चूक!

देहविक्रय करणाऱ्या महिलांना टाळलं ही माझी चूक!



  • नायपॉल यांच्या आठवणींना मलिका अमरशेख यांनी दिला उजाळा 


मुंबई :-भारतातील लेखकांच्या मुलाखती घेण्यासाठी व्ही. एस. नायपॉल मुंबईत आले असताना नामदेव ढसाळ यांना भेटण्यासाठी नायपॉलना घेऊन मी कामाठीपुरा येथे गेले होते. तेथे देहविक्रय करणाऱ्या महिलांनी त्यांना गराडा घातला. महिलांच्या या कृत्यामुळे ते वैतागले आणि तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आमच्या घरी आले तेव्हा 'माझे काल चुकले, एक लेखक असून मी ही बदनाम वस्ती टाळली याची मला खंत वाटते,' अशी कबुली दिली. मानवी जीवनाचा हा एक भाग असल्याचे सांगत त्यांनी झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती, नायपॉल यांच्याबद्दलची ही आठवण कवयित्री मलिका अमरशेख यांनी सांगितली.

आंतरराष्ट्रीय लेखक असलेले व्ही. एस. नायपॉल हे भारतीय वंशाचे होते. भारतातील लोकांचे अंतरंग तपासण्यासाठी त्यांनी भारतातील कवी आणि लेखकांच्या मुलाखती घेण्याचे ठरविले. नामदेव ढसाळ यांची मुलाखत घेण्यासाठी ते घरी आले. पण नामदेव घरी नसून संध्याकाळी परततील, असे सांगितल्यावर त्यांनी पहिली माझीच मुलाखत घेतल्याचे अमरशेख म्हणाल्या. नायपॉल आयुष्य, माणूस आणि समाजाला तपासणारा लेखक आहे, हे ऐकले होते. त्या दिवशी या गोष्टीचा अनुभव आला. एवढ्या मोठ्या लेखकाने माझी तीन तास मुलाखत घेतली. त्यांचे इंग्रजी समजत होते पण मी बोललेले त्यांना समजत नसल्याने एका पत्रकाराने मदत केली. एक गृहिणी इतकी चांगली मुलाखत देऊ शकते तर नामदेव नक्कीच ग्रेट माणूस असेल असे म्हणून ते घरी वाट न बघता नामदेव यांना भेटण्यासाठी कामाठीपुऱ्याकडे निघाल्याचे मलिका यांनी सांगितले.

कामाठीपुऱ्यात 'असाह्य तिरस्कृत नारी संघटना' या संस्थेचे काम नामदेव ढसाळ करीत होते. नायपॉल कामाठीपुरात पोहचताच परदेशी व्यक्ती पाहून देहविक्रय करणाऱ्या महिला गोळा झाल्या. देहविक्रय करणाऱ्या या महिलांच्या गराड्यात त्यांना राहवले नाही आणि नाराज होऊन ते निघून गेले. मात्र अल्पावधीतच त्यांना आपण चुकल्याचे उमगले. जगात प्रत्येक ठिकाणी बदनाम वस्ती आहे. या वस्तीतील महिलांना आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या माणसाला आपण टाळू शकत नाही, हे त्यांना जाणवले. त्यांनी फोन करून 'आय एम सॉरी' असे म्हटल्याचे अमरशेख यांनी सांगितले. आपली चूक उमगल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आणि नामदेव यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत त्यांनी 'पॅसेज ऑफ इंडिया' या त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध केली आहे. घराबरोबर घरातील प्रत्येकाच्या मनाचा कप्पा तपासणारा लेखक असे नायपॉल यांच्याबद्दल सांगता येईल. लेखकाने कधीच संकुचित वृत्तीचे नसावे. त्याने समाजाच्या प्रत्येक स्तरांतील माणसांना आपल्या लेखणीत सामावून घेतले पाहिजे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचे त्या म्हणाल्या.