इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकरी, ग्रामिण भागातील सर्वसामान्य नागरीक, महिला, किशोरवयीन मुली, 16 वर्षाखालील बालकांना आरोग्यविषयक मोफत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन सामाजिक भावना जपत उमरगा,लोहारा,
उमरगा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले, आयएमए व जिल्हा आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले
बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे होते. तर या शिबिराचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे (उमरगा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणुन आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी (लोहारा), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कठारे (लोहारा), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुशील चव्हाण (उमरगा), स्पर्शचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, आय एम ए आय एम ए अध्यक्षा डॉ.सौ.दीपा मोरे (उमरगा), शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे (लोहारा), शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे (उमरगा), बार्शीच्या कँन्सर हॉस्पीटलचे डॉ.विजय दुलंगे, सरपंच यशवंत कासार (सास्तुर), जगन पाटील, नामदेव लोभे, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक अभिमान खराडे, धनराज चौगुले,अदि उपस्थित होते.
या शिबिरात 394 महिलांची गर्भाशय, गर्भाशयाचे आजार तसेच स्तनाचा कॅन्सर या साठी तपासणी करण्यात आली. गरजू महिलांची पॅप स्मिअर, एफ.एन.ए.सी. हि तपासणी करण्यात आली. तर 11 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित रुग्ण महिलांची टप्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. व ज्या रुग्णांमध्ये कँन्सर आढळले. त्यांच्यावर बार्शी येथील नर्गिसदत्त कँन्सर रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.रमाकांत जोशी व सूत्रसंचालन अच्युत आदटराव यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मस्के यांनी मानले. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरास महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.