लोहारा/प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोग यांच्यावतीने दि.21 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत उस्मानाबाद जिल्हयात ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन बाबत विविध ठीकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लोहारा शहरातील तहसील कार्यालयातील सभागृहात दि.18 जानेवारी 2019 रोजी तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांनी या जनजागृती मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेवुन शहरातील पत्रकार व सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन बाबत सविस्तर माहीती सांगीतली.
यावेळी पत्रकारांना व राजकीय पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. यावेळी सर्वांनी प्रात्याक्षिक स्वरुपात मतदान केले. यावेळी पथक प्रमुख मंडळ अधिकारी बी.एस. जगताप, तलाठी एस.एन.खरात, मास्टर ट्रेनर आर.टी.गायकवाड, राहुल माशाळकर, अव्वल कारकुन बालाजी चामे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, पत्रकार बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले, महेबुब फकीर, माजी भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, प्रशांत काळे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, नितीन सितापुरे, सविता प्रकाष चौधरी, शंशीकांत कुलकर्णी, अक्षय माटे, मधुकर वाघमारे, शहाजी गर्जे, शामराव माने, यांच्यासह पत्रकार व विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.