1
लोहारा/प्रतिनिॆधी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची दि.9 जानेवारी रोजी सोलापूर येथे भव्य सभा आयोजित केली असून या सभेसाठी संपूर्ण उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या संदर्भात सोलापूर येथे सहकार मंत्री नामदार सुभाष बापू देशमुख यांनी बैठक घेतली.
2
या बैठकीला उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, अनिल काळे, रामदास अण्णा कोळगे, प्रभाकर मुळे, सत्यवान सुरवसे, तानाजी पाटील, यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. संसदेचे अधिवेशन दि.8 जानेवारी रोजी संपणार असून लगेच दुसऱ्या दिवशी दि.9 जानेवारी रोजी सोलापूर येथे मोदींच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ व भव्य सभा आयोजित केली आहे.
यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या या सभेस उस्मानाबाद तुळजापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत भारतीय जनता पार्टी जिल्हा उस्मानाबाद च्या वतीने आवाहन केले आहे.