Showing posts with label नाशिक. Show all posts
Showing posts with label नाशिक. Show all posts
मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या

मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या


जामखेड :- 'नोकऱ्या संपल्या असल्याने तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. मराठा आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने लढणार आहोत. शासनाने सर्व मराठा समाजास कुणबी मराठा समजून सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे,' असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरात बुधवारी (१० ऑक्टोबर) खेडेकर यांच्या उपस्थितीत मराठा जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी खेडेकर बोलत होते. या वेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, मराठा सेवा संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष राम निकम, डॉ. राजेंद्र पवार, अशोक शेळके, महाडीक, शहाजी वायकर, डॉ. सुहास सूर्यवंशी, आशिष पाटील, वाळेकर, खेंगरे, प्रा. शहाजी डोके, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, बजरंग पवार, अवधूत पवार, संभाजी ढोले, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, दिगंबर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खेडेकर म्हणाले, 'इंग्रज सरकारने केलेल्या नोंदीत मराठ्यांचा मराठवाडा वगळता सर्वत्र कुणबी असाच उल्लेख आहे. कुणबी ही जात ओबीसीमध्ये आहे. याचा फायदा अनेक मराठा नेत्यांनी राजकीय पदांसाठी केला आहे. सध्याच्या काळात शासकीय नोकऱ्या संपल्या आहेत. मराठा तरुणांनी आवडेल ते काम करून मराठा समाजानेच समाजाचा विकास करणे हाच एकमेव उपाय असून प्रत्येकाने आपल्या घरात शिवाजी तयार करून त्याच्या पाठीमागे आई-वडिलांनी खंबीर उभे राहिले पाहिजे. तसेच विज्ञान युगामध्ये जगत असताना विज्ञानवादी झाले पाहिजे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. आई व पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे, समाज्यातील एकमेकमधील तंटे सामोपचाराने मिटवले पाहिजेत. जिजाऊ श्रृष्टी आपले श्रद्धास्थान म्हणून निर्माण केले पाहिजे. १४ जानेवारीला या श्रद्धास्थानाला भेट दिली पाहिजे. इतर समाजाचे उनेधुणे न काढता त्यांच्यतील आदर्श घेतला पाहिजे, असे खेडेकर म्हणाले.
नाशिक: CMच्या कार्यक्रमावर मीडियाचा बहिष्कार

नाशिक: CMच्या कार्यक्रमावर मीडियाचा बहिष्कार


नाशिक :- नाशिकमध्ये आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांसोबतच्या भेटीच्या कार्यक्रमावर स्थानिक पत्रकारांनी बहिष्कार घातला. पोलिसांनी केलेली अडवणूक व काही प्रतिनिधींशी केलेल्या अरेरावीमुळं पत्रकारांनी हा निर्णय घेतला.

नाशिकमधील सह्याद्री फार्म हाउसवर फडणवीस यांच्या शेतकाऱ्यांसोबत भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी पत्रकारांना वार्ताकंन करण्यास मज्जाव केला. तसंच, प्रतिनिधींशी अरेरावी केली.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत पत्रकारांचे व्हिडिओ चित्रीकरणही केलं. त्यामुळं पोलीस आणि पत्रकारांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी पत्रकाराशी प्रवेशद्वारावरच हुज्जत घातली. आमदार आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करूनही पोलीस अधीक्षकांची अरेरावी कायम राहिली. त्यामुळं पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

जीवन लयबध्द करण्यासाठी नृत्य आणि संगीताचा आधार घ्यावा

जीवन लयबध्द करण्यासाठी नृत्य आणि संगीताचा आधार घ्यावा



  • भरतनाट्यमचे राष्ट्रीय नृत्य कलाकार विनोद निकम यांचे मत

अंबाजोगाई :- जीवन लयबद्ध करण्यासाठी नृत्य आणि संगीताचा आधार घ्यावा असे मत भरतनाट्यमचे राष्ट्रीय नृत्य कलाकार शारदापुत्र डॉ. विनोद कमलाकर निकम यांनी अक्षर मानवच्या व्यासपीठावर बोलतांना व्यक्त केले.

     अक्षर मानव अंबाजोगाई समुहाच्या वतीने नगर परीषद मिटींग हाँल च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या "संगीत आणि नृत्याचा समकालीन आशय" या विषयावर प्रा. डॉ. विनोद निकम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षर मानवचे तालुका अध्यक्ष सुदर्शन रापतवार होते.
      आपल्या विस्तारीत हितगुजात डॉ. विनोद निकम पुढे म्हणाले की, प्रत्येक मुल जन्माला आले की, ते सुरात बोलण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या हातपायांच्या हालचालीने नृत्य करण्यास सुरुवात होते.

 याच प्रमाणे वृध्दापकाळात वृध्द माणसांचे चालणे हा ही एक नृत्याचाच प्रकार असून शेवटच्या क्षणी माणसाचे शब्दाविना बोलणे हे सुरातीलच बोलणे असते. याचाच अर्थ प्रत्येक माणसाच्या आयुष्याची सुरुवात आणि त्याचा शेवट हा नृत्य आणि संगीताच्या माध्यमातूनच होत असल्यामुळे नृत्य आणि संगीताचे माणसाचे नाते हे अतिशय अविभाज्य असे आहे, माणसापासून न तुटणारे आहे.

    प्रत्येक माणूस आपल्या आवडीचे गाणे लागले की एक तर तो आपल्या हाताची बोटांच्या हालचालीतून कांही तरी वाजवण्याचा प्रयत्न करतो अथवा पायाची हलचाल करुन ठेका धरणाचा प्रयत्न करतो. त्याच्या बोटाची हलचाल म्हणजे संगीत तर पायाची हालचाल म्हणजे नृत्य असल्याचे ही त्यांनी सांगितले. उत्तम नृत्य कलाकार व्हायला त्यास वाद्दाचा ताल, गाण्याची लय आणि अर्थ आणि त्या शब्दांतून निघणारा भावार्थ समजावून घेता आला पाहिजे. या गोष्टींचा अर्थ त्या नर्तकाला समजला नाही तर त्याचे नृत्य पाहणाऱ्यांच्या मनात घर करणार नाही.

     माणूस जोपर्यंत सुरात बोलतो तो पर्यंत तो कितीही चढ्या आवाजात गायला तरी कांहीही फरक पडत नाही मात्र सुरांच्या ऐवजी स्वरात बोलतांना त्याचा आवाज वाढला की तो आडचणीत येतो. यासाठी माणसाच्या जीवनात सुरांना आणि स्वरांना खुप महत्त्व आहे.

     डॉ. विनोद निकम याने आपल्या हितगुजात नृत्य आणि संगीताचा माणसाच्या आयुष्यात पदोपदी कसा संबंध येतो ते अनेक उदाहरणांचे दाखले देत सिध्द केले. डॉ. विनोद निकम याने यासोबतच आपल्या आयुष्याची जडण-घडण कशी झाली, नृत्य-संगीत परंपरेत गुरुंच्या स्थानाला किती महत्व आहे याची माहिती दिली. तर पुरुष नर्तकाकडे आजही समाज तितक्याशा चांगल्या नजरेने पाहत नाही अशी खंत ही व्यक्त केली. आपल्या हितगुजाच्या शेवटी डॉ. विनोद निकम यांनी जीवन लयबद्ध करण्यासाठी प्रत्येकाने नृत्य आणि संगीताचा आधार घ्यावा असे आवाहन केले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अक्षर मानव समुहाचे तालुका अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी "अक्षर मानव हे माणसामाणसांमध्ये समन्वय साधण्याचं एक भव्य स्वप्न आहे. माणसांमध्ये आपुलकी असावी. माया असावी, माणसांच्या एकमेकांशी ओळखी असाव्यात आणि माणसांची एकमेकांना मदत व्हावी आहे. सर्वांनी एकत्र यावं व मानवी आयुष्याला पुरक अशा सर्व क्षेत्राचं आणि साहजिकच त्यातल्या माणसांचं उत्थान व्हावं, माणसं-क्षेत्र दर्जेदार व्हावीत, मोठी व्हावीत हा अक्षर मानवचा उद्देश आहे.

         नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून मानवी आयुष्याला पुरक अशा सर्व क्षेत्राच आणि आणि साहाजिकच मानवी मनाच उत्थान करण्याची शक्ती असल्यामुळे  "अक्षर मानव अंबाजोगाई" शाखेच्या वतीने काल भरतनाट्यमचे राष्ट्रीय नृत्य कलाकार प्रा. डॉ. विनोद कमलाकर निकम याचे "संगीत आणि नृत्याचा समकालीन आशय" या विषयावर हितगुज आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

       या कार्यक्रमाचे संचालन संयोजक मुजीब काजी यांनी केले तर आभार सचिव राजू वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमास राजेसाहेब किर्दंत, रत्नाकर निकम, शरद लंगे, प्रभावती अवचार, पुष्पा बगाडे, ललित झिरमिरे, विजयराज अंजाण, रवि देशमुख,  प्रा. डॉ. देविदास खोडेवाड, पंकज रापतवार, सुधीर माले, यशवंत चव्हाण, वैजनाथ शेंगुळे, सुवर्णा बुरांडे, शिवकन्या पवार, प्रा. अनंत कांबळे, बालाजी शेरेकर, राजाभाऊ लोखंडे, सदानंद वालेकर, किरण देशमुख, रेखा देशमुख, अमृत महाजन, मुजीब काजी, प्रियदर्शनी मस्के, अनिता कांबळे, राधा मस्के,आशुतोष रापतवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
Sponsorship
मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करू देणार नाही

मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करू देणार नाही


नाशिक :- 'मराठा क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेले लाखोंचे मोर्चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दुर्लक्षित केले असून, दोन दिवसात मराठ्यांच्या मागण्यांबाबत काही लेखी निर्णय न घेतल्यास पंढरपुरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करू दिली जाणार नाही,'

अशी भूमिका सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात आली आहे. अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा काही अधिकार नसून, त्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. पंढरपूरसाठी नाशिकमधून अनेक तरुण रवाना होणार असून, मुख्यमंत्र्यांना महापूजा करू न देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मराठा मोर्चाविषयी विधीमंडळ अधिवेशनात कुणीही आमदार चकार शब्द काढत नाही त्यामुळे सर्व आमदारांचा निषेध करीत असून, यापुढे आमदारांना गावबंदी करणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या महाआरतीचा मान मुख्यमंत्र्यांना देण्यात येतो.

परंतु, यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना ही पूजा करू दिली जाणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चातर्फे घेण्यात आली आहे. मराठा समाजाचे अनेक मुलभूत प्रश्न आहेत ते सुटावेत यासाठी काढण्यात आलेले ५८ मूक मोर्चे सरकारने दुर्लक्षित केले. मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा त्यात होता; मात्र मुख्यमंत्र्यांनी १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. ते आम्हाला नको आहे, अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चाकाळात मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची एकही बैठक बोलावली नाही. त्यांचे प्रश्न जाणून घेतले नाहीत. राज्य सरकारने समिती नेमून त्यावर पाच केबिनेट मंत्र्यांची नियुक्ती केली. ही समिती पूर्णपणे फसवी असून, ती दिशाभूल करीत आहे.

 केवळ आश्वासने देऊन मागण्या पुढे रेटण्याचे काम केले जात आहे. या समितीने आतापर्यंत एकही निर्णय घेतलेला नसून, आता मराठी समाज आक्रमक झाला आहे. यापुढे मराठा क्रांती मोर्चातर्फे ठोकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात काही हिंसा झाली तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, अशी भूमिकाही या मोर्चातर्फे घेण्यात आली.

ठोकमोर्चातून महाराष्ट्र पेटणार आहे, त्यातून होणाऱ्या परिणामांना मुख्यमंत्री व सरकार जबाबदार असेल असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकावर करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, संदीप लभडे, नीलेश पाटील आदींच्या सह्या आहेत.
बीड-लातूर ची निवडणूक संपवून धनंजय मुंडे भंडारा-गोंदिया च्या प्रचाराला रवाना

बीड-लातूर ची निवडणूक संपवून धनंजय मुंडे भंडारा-गोंदिया च्या प्रचाराला रवाना


परळी :- बीड, लातूर,  उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदान संपताच विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ते या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चार सभांना संबोधित करणार आहेत.
जाहिरात

मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या बीड लातूर उस्मानाबाद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बीड जिल्ह्याच्या दौ-यावर होते. सोमवारी या मतदारसंघातील मतदान संपताच ते सायंकाळी भंडारा कडे रवाना झाले.  मंगळवार दिनांक 22 मे रोजी ते भंडारा जिल्ह्यात 2 तर बुधवार दिनांक 23 मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रचारसभांमधून मार्गदर्शन करणार आहेत.
जाहिरात
 चिमणीने केला घात घर भस्मसात

चिमणीने केला घात घर भस्मसात



केज - तालुक्यातील नांदुरघाट शिवारात पारधी वस्तीवर आगीने तांडव केला राञी बारा च्या दरम्यान घरात राॅकेलची चिमणी पडल्याने घरात आग लागली घरात तीन लहान लेकर व नाना अर्जुन शिंदे व त्याची पत्नी झोपले होते अचानक आग जवळ आल्यावर गडबडीत उठून नाना शिंदे याने लेकर व पत्नी ला आगीत बाहेर काढले या मुळे जिवीतहानी टळली यात नाना चे हात व पायाला ईजा झाली परंतु जिवाची परवा न करता कुटुंब सुरक्षीत काढले .

या आगीत नानाचा संसाराची पुर्ण राख झाली रोख रक्कम ३० हाजार एक मोटारसायकल वर्ष भरा साठी ठेवलेले अन्न धान्य कपडे भांडे हे जळाली जवळपास पाण्याची सोय नसल्याने आग आटोक्यात आनता आली नाही. सकाळी तलाठी गावंडे यांच्या राईटरने पंचनामा केला असून शासन स्तरातून मदतीची अपेक्षा या कुटुंबाला आहे व रोजीरोजगार करनारे कुटुंब असून मदतीची अपेक्षा आहे आज या कुटुंबाला खाण्याची पंचायत आहे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आधाराची प्रतिक्षा आहे
जाहिरात
   माळी तथा ओ.बी.सी समाजाला भा.ज.पा सरकारने न्याय दिला नाही तर लवकरच भाजपा पक्षाच्या बाहेर पडणार- अनिल महाजन ओ.बी.सी बहुजन नेते यांचे वक्तव्य

माळी तथा ओ.बी.सी समाजाला भा.ज.पा सरकारने न्याय दिला नाही तर लवकरच भाजपा पक्षाच्या बाहेर पडणार- अनिल महाजन ओ.बी.सी बहुजन नेते यांचे वक्तव्य




  • अनिल महाजन ओ.बी.सी नेते यांचा भाजपाला घरचा आहेर.

  • माळी तथा ओ.बी.सी समाजावर भाजपा सरकार अन्याय करत आहे माळी समाजाने सरकारचे काय घोडे मारले का 


आज महाराष्ट्रामध्ये माळी समाजाची प्रचंड मोठी शक्ती आहे. ओ.बी.सी समाजातील मोठा भाऊ समजला जाणारा माळी समाज आज दिशा हीन झाला आहे,मोठ्या भावाचे हे हाल आहेत तर लहान भावाचे काय परिस्थिती असेल तेली, तांबोळी वंजारी,धनगर,लोहार व इतर सर्व ओ.बी.सी मध्ये येणारे छोटे समाज सर्वात जास्त अन्याय आमच्यावर चं का   सरकारचे आम्ही कोणते घोडे मारले आहेत कळत नाही जेव्हा पासून भाजपा सरकार सत्तेवर आले तेव्हा पासून फक्त घोषणाचा चं पाऊस पडत आहे,आता विचार करतील तेव्हा विचार करतील व्हिजन लेस सरकार. असेल बोलत त्यांनी भा.ज.प ला चिमटाही काढला. आज बोलता बोलता ४ वर्ष झालीत तरी माळी समाजाचा विचार सरकार करायला तयार नाही. कुठेही प्रतिनिधीत्व दिले नाही हे सरकार आहे कोणाचं कळायला मार्ग नाही कोणत्या जन्माची दुष्मनी सरकार काढत आहे. कळत नाही ओ.बी.सी मंत्रालय ची फक्त घोषणा चं काम माञ शून्य ओ.बी.सी महामंडळ डब्ब्यात महात्मा फुलेंचे स्मारका साठी मुबंई मध्ये जागा नाही महात्मा जोतिबा फुले व सावित्री  बाई फुले  यांना भारतत्न नाही. विद्यार्थ्यांना पुरेशी शिष्यव्रुत्ती नाही दिली तरी त्यातही घोटाळे. समाजाचे हॉस्टेल नाही. मंडल आयोग ची पूर्ण पणे अंमलबजावणी नाही. महात्मा फुले जयंती ११ एप्रिल रोजी सुट्टी मंजूर नाही झालेली ओ.बी.सी जनगणना जाहीर होत नाही. अनेक संघटनांनी वेळोवेळी अनेक मागण्या करून एकही मागणी सरकारने पूर्ण केली नाही हा देश ओबीसी बहुजनांचा आहे त्याच्यावरचं अन्याय होत आहे हे सरकार ओ.बी.सी चं भलं करेल माळी समाजाचं भलं करेल म्हणून आम्ही सर्व तरुणांनी भा.ज.पा मध्ये प्रवेश केला परंतु परिस्थिती प्रत्यक्ष बघितली तर वेगळीचं आहे. मला व्यक्तिगत काही नको पण माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे शोषीत पीडित वंचीताना न्याय मिळेल म्हणून आम्ही भा.ज.पा मध्ये प्रवेश केला होता आज सरकार येऊन चार वर्षे झाली पण आमची सर्व निराशा झाली. हे सरकार माळी समाजाचा द्वेश का करत आहे. हे आज पर्यंत आम्हाला कळले नाही आज माळी समाजाने या देशाला अनेक महापुरुष दिले आहे रक्त दिले आणि आज त्यांची दशा बघा पण आता आम्ही अन्याय सहन करणार नाही राज्यातील सर्व छोट्या मोठ्या संघटना एकत्र करून लढाई लढणार ही लढाई समाजा साठी कुणाव्यक्ति साठी नाही...!! ओ.बी.सी आरक्षण मध्ये इतर जातीचा समावेश करण्याचा सरकार चा कुटील डाव आम्ही हाणून पाडू मागावर्गीय आयोगाचे जे थोतांड सुरू आहे ते आम्ही होऊ देणार नाही...? वेळ आली तर रस्त्यावर उतरू पण गमिनी कावा करणार्यांना धडा शिकवु मला एक कळत नाही हे भा.ज.पा सरकार कोणाच्या जीवावर एवढे उड्या मारत आहे. मराठा समाज विरोधात आहे दलित विरोधात मुस्लिम विरोधात मग ओ.बी.सी शिवाय यांच्या कडे आहे तरी कोण...? आणि आता तो ही ओ.बी.सी विरोधात जायाच्या तयारीत आहे मग २०१९ ला कोणत्या समाजाला हे सोबत घेऊन निवडणूक लढणार कळत नाही मुख्यमंत्री महोदय आता तरी लक्ष द्या भाजपा मधल्या ओ.बी.सी बहुजनांना आमदार खासदार व नेत्यांना न्याय द्या...!! समाजाला न्याय द्या...!! फक्त घोषणाच आपन कधी पर्यत करत राहणार आता पक्षात आमचा जीव घुटायला लागला आहे...!! ४ वर्ष पासून आम्ही माळी ओ.बी.सी बुक्क्यांचा मार सहन करत आहे नाहीतर एकदाच जाहीर करून टाका की हे सरकार व भा.ज.पा पक्ष माळी व ओ.बी.सी समाजाच्या विरोधात आहे माळी ओ.बी.सी समाजाचे लोकांनी भाजपा पक्षात राहू नका असे अहवान तरी करून टाका म्हणजे प्रश्न च मिटला...? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस महोदय माळी व ओ.बी.सी समाज शांतता प्रिय आहे म्हणून त्याचा आपण गैरफायदा घेऊ नका साहेब समाजाला न्याय द्या...!! दाबून मारू नका  भा.ज.पा पक्षअध्यक्ष फक्त रेटून खोट बोलून अनेकांना पक्ष प्रवेश करीत आहेत यांना अधिकार शून्य आहेत...!! अन्यायाला वाचा फोडा...!! शेवटी जे पेराल तेच उगवेल साहेब माळी तथा ओ.बी.सी समाजाला न्याय द्या साहेब न्याय द्या...!! आपल्यावर खुप विश्वास ठेवून आम्ही सर्व तरुण कार्यकर्त्यानि भा.ज.पा पक्षात प्रवेश केला आहे.आपण एक महिन्याच्या  आत माळी समाजाला ओ.बी.सी ला न्याय दिला नाहीतर आम्ही सर्व समाज बांधव व मी स्वतः आपल्या भा.ज.पा पक्षाला सोडचिठ्ठी करून बाहेर पडणार हा आमचा आज आपल्याला शब्द आहे .
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-  भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला पक्षाचा स्थापना दिवस महाभाजपा महामेळावा दि.6 एप्रिल 2018 रोजी मुंबई येथील बांद्रा कुर्ला काँम्पलेक्स भव्य मैदानावर महाभाजपा-महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.तरी या मेळाव्यासाठी उमरगा तालुक्यातील बुथप्रमुख,पक्षाचे कार्यक्रते,पदाधिकारी तसेच निवडुण आलेल्या सर्वच लोकप्रथिनिधीनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आहवान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केले आहे.तरी संपर्कासाठी विस्तारक व तालुकाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा असे सांगीतले. उमरगा शहरातील शासकीय विश्रामग्रह येथे भाजपची बैठक घेण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य,भाजप तालुकाअध्यक्ष माधव पवार,,दिलपसिंह गौतम, उपनगराध्यक्ष राजु गायकवाड,तालुका विस्तारक सिद्धश्वेर माने,नगसेवक गोविंद घोडके,ईराप्पा घोडके, पं.स.सदस्य उल्हास पाटील प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल चिकुंद्रे,रोहित सुर्यवंशी,अमर वरवटे,आदी उपस्थित होते.
सारोळा येथे वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठांचा रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

सारोळा येथे वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठांचा रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार




  • हरीनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता
  • देखण्या ग्रंथ दिंडीने वेधले लक्ष हभप योगेश महाराज यांचे कीर्तन रंगले   

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:-  दारोदार काढलेली सुंदर रांगोळी,वारकरी यांच्या हाती भगवे ध्वज,महिलांच्या डोक्यावर तुलशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा गजर अन् विठू नामाच्या जयघोषात निघालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील ग्रंथ दिंडी मिरवणूकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले़.दि.1 एफ्रिल रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने अखंड हरीनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली़.प्रारंभी वारकरी सांप्रदायातील योगदानाबद्दल ज्येष्ठांचा पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सत्काराने गौरव करण्यात आला़. ग्रंथ दिंडीनंतर भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष  धनंजय रणदिवे,सरपंच प्रशांत रणदिवे यांच्या हस्ते ह.भ.प योगेश महाराज पवार यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला़.तसेच वारकरी सांप्रदायात योगदान दिल्याबद्दल वारकरी बांधवांचा फेटा,हार व श्रीफळ देवून पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला़ .यावेळी उपसरपंच भाग्यश्री देवगिरे,बलराज रणदिवे,ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले,ज्योती देवगिरे व ग्रामस्थ उपस्थित होते़.
रणदिवे प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांचा सत्कार
वारकरी सांप्रदायात योगदान दिल्याबद्दल पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानतर्फे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते 20 वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला़.फेटा,हार व श्रीफळ देवून वारकऱ्यांचा गौरव करण्यात आला़. तसेच ह.भ.प योगेश महाराज पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला़.यांचा झाला सत्कार
या सोहळ्यामध्ये ह.भ.प.योगेश पवार महाराज,ह.भ.प नामदेव पवार महाराज,ललत लिंगे,राजाभाऊ महाराज देवगिरे,रघुनाथ महाराज जाधव,सुतार महाराज,बबन मिटकरी,रावसाहेब मसे,अरूण मसे,संदीपान देवगिरे, शंकर जगदाळे,जालिंदर कोळी,पांडूरंग टिंगरे,शिवाजी मसे,रामा मसे,नागनाथ जडे,अंगद कोळगे,मन्मथ स्वामी,चोपदार अंकुश हिडगे,कल्याण रणदिवे,अनंत काकडे,मधुकर मसे,एकनाथ गुरव,विठ्ठल काकडे यांचा सत्कार करण्यात आला़.
शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांनी लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलला सदिच्छा भेट दिली

शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांनी लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलला सदिच्छा भेट दिली



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलला शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांनी दि.2 एफ्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी स्कुलतर्फे संस्थेचे सचिव तथा प्राचार्य शहाजी जाधव यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.याप्रसंगी  स्कुलमधील शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांसोबत चर्चा व संवाद साधला.स्कुलच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करून लोहारा तालुक्यातील अनेक खेडेगावातून येथे सर्वसामान्यांची मुले येऊन अतिशय माफक फिसमध्ये उत्तम शिक्षण घेत असून त्यांना चांगल्या भौतिक सुविधाही देण्यासाठी सूचना केल्या.तसेच स्कुलच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघटना लोहारा तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते व पालक श्रीकांत भरारे, विजयकुमार ढगे,राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख,माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी,शिवराज झिंगाडे,सुदर्शन भारती,गणेश सूर्यवंशी,बालाजी बिराजदार,सिद्धेश्वर सुरवसे,हारून हेड्डे,अदि उपस्थित होते.
लोहारा शहरातील नगरसेवक शामनारायणकर यांच्या प्रभाग क्रं.10 मध्ये दलीत वस्ती योजनेतील साडे बारा लाख रुपये निधीतील नाली कामास सुरुवात करण्यात आली.

लोहारा शहरातील नगरसेवक शामनारायणकर यांच्या प्रभाग क्रं.10 मध्ये दलीत वस्ती योजनेतील साडे बारा लाख रुपये निधीतील नाली कामास सुरुवात करण्यात आली.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील नगरसेवक शामनारायणकर यांच्या प्रभाग क्रं.10 मध्ये दलीत वस्ती योजनेतील साडे बारा लाख रुपये निधीतील नाली कामास सुरुवात करण्यात आली. या प्रभाग क्रं.10 मधील नाली कामाचे उदघाटन दि.2 एफ्रिल रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते  करण्यात आले.यावेळी शिवसेना युवा नेतै किरण गायकवाड,नगराघ्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे,
उपमगराध्यक्षा नाजमिन शेख,मुख्याधिकारी सोनम देशमुख,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,या प्रभागाचे नगरसेवक शाम नारायणकर,शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे,शहर प्रमुख सलीम शेख, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी,बलभीम येवते, युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,इन्नुस पटेल,प्राचार्य शहाजी जाधव,रॉष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख,माजी सरपंच अरुण माळवदकर,शिवा स्वामी,रफिक शेख,संजय दरेकर,नजिर शेख,राजेंद्र सुर्यवंशी,रज्जब फकीर,विजय ढगे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,प्रकाश माळवदकर,यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुदखेड मैं तीन तलाक कानून के विरोध मैं

मुदखेड मैं तीन तलाक कानून के विरोध मैं



  • मुस्लिम महिलाओं का आजीमौशान एतिहासिक धरना मोर्चा



मुदखेड  ( मुजीब अहेमद ) आल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्ड की सुचना के अनुसार मुदखेड मुसलमाने की और आयोजित एतिहासिक धरना तथा मोर्चा तहसील कार्यालय पर तीन तलाक कानून के विरोध मैं धरने का आयोजन किया गया . विदित हो कि सरकार कि ओर से तीन तलाक विधायक लोकसभा मे पारित होने के बाद यह विधेयक राज्य सभा मे पारित नहीं हुआ सरकार कि ओर से तीन तलाक विधायक के बहाने मुस्लिम शरीयत मैं हस्तक्षेप के विरोध मैं तहसील कार्यलय पर मुस्लिम महिलाओं का धरना तथा एतिहासिक मोर्चा हुआ जिस के जरिए हमारी शरियत पर बराए रास्त हमला किया गया है बल के हखिकी बात यह हैं के इस के जरिऐ हमारी बहनों और बेटियों को शरियत के खिलाफ उकसाने और जेल मैं मुसलमानो को भरने कि निहायत ही मजमूम साजिश कि जा रही हैं


         मुस्लिम परसनल ला बोर्ड का यह एहसास है के इस मौके पर खामोश रहेना बहुत बडा गुनाह और जुर्म लिहाजा जरूरी मालूम होता है के इस का जवाब पुरी सराहत और खुववत के साथ हमारी बहेनो और बेटियों कि तरफसे दिया जाऐ इस मकसद के हुसुल के लिए शहर ऐ मुदखेड मैं आज बरोज जुमेरात दोपहर 2 बजे-मुखाम मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हाई इसकुल से निकल कर रेलवे गेट से होकर तहसील कार्यालय पर जा कर तलाक पर बयान हुआ और मेमोरेडम देकर रैली इकतेताम होआ


 यह धरना तथा मोर्चा मि कसीर(2500)  खवातीन कि हमराह रैली मैं शिरकत फरमाकर रैली को कामीयाब बनाई। ईस समय निजामत ,फातेमा कुलसुम, ताईद-शाबाना नाजनिन सौदागर, महमाने खुसुसी वह सदर डॉक्टर {नसरिन फातेमा} ( जमाते ईसलामी नांदेड़) खराते कलामे पाक-मुसकान बिंत मोहम्मद मकबुल,नात-राहिन मुकीद खान,आऐशा अबदुल रहिम , तराना मुस्लिम परसनला -निखत अमरिन,फिजा, तखरिर मुसकान मोहम्मद हुसैन -तखरिर मसिरा फिरदोस अबदुल अलीम ,- तखरिर जेनत बेगम अ.रहीम , तखरिर . शाबाना नाजनिन मोईन सौदागर . तखरिर डॉक्टर नसरिन फातेमा ईस समय तहसीलदार को निवेदन देते हुए फातेमा कुलसुम ,शाबाना नाजनिन ,डॉक्टर नसरिन फातेमा ,हाजरा बेगम,
 ईस समय हैप्पी कलब मुदखेड टिम ने वालेनटर और सफाई का काम अनजाम दिए
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत घरच्या परिसरात रचलेल्या चार कडब्याच्या गंजी,दोन गोटे,शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत घरच्या परिसरात रचलेल्या चार कडब्याच्या गंजी,दोन गोटे,शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत घरच्या परिसरात रचलेल्या चार कडब्याच्या गंजी,दोन गोटे,शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.तीन अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अडीच तासा नंतर ही आग अटोक्यात आली.या घटने नंतर नायब तहसीलदार रणजीत शिराळकर व तलाठी जगदिश लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उन्हाचा कडाका वाढत असतानाच ठिक ठिकाणी अगीच्या घटनेतही वाढ होत आहे.जेवळी येथील माळी गल्लीत पुनर्वसित घरांच्या खुल्या क्लस्टरमध्ये (परिसरात) रचण्यात आलेल्या बाबुराव माळी यांच्या कडब्याच्या गंजीला अचानक आग लागली.हि आगीणे बघता बघता भीषण रुप धारण केल्याने या आगीत बाबुराव माळी,सुधाकर माळी, रघुनाथ माळी व काशिनाथ माळी यांचा कडब्याच्या गंजी एकूच जवळपास दहा हजार कडबा तसेच दोन गोटे,एक घरचा शेड जळून खाक झाला.यात दोन बैल गाड्या,टिंबक संच,कपडे,धान्यासह शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.आग लागताच गावातील नागरिक मोठ्या संख्येनी एकत्र येऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला.परंतु वाऱ्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली.आग आटोक्यात येत नसल्याने गाव पुढाऱियांनी या घटनेची माहिती पोलीस व तहसील प्रशासनाला दिली.या नंतर तहसीलदार शोभा पूजारी, पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांनी आपली यंत्रणा तात्काळ पाठविली.व उमरगा,नळदुर्ग व लोहारा येथील लोकमंगलचे अग्निशामक बंबाला पाचारण केले.या सर्वाच्या प्रयत्नाने अडीच तासाने ही आग अटोक्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच ज्वाला बाहेर पडत असल्याने येथे कांही काळ भितीचे वातावरण तयार झाले होते.
उमरगा तालुक्यातील मुरुम- येथील भुसनी वाडी रोडवर स्थित शिव मारुती मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

उमरगा तालुक्यातील मुरुम- येथील भुसनी वाडी रोडवर स्थित शिव मारुती मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम- येथील भुसनी वाडी रोडवर स्थित शिव मारुती मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.पहाटे पाच वाजता आरती करण्यात आली.यावेळी मुरुम शहरातील माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना, प्रशांत राजविलास पाटिल,सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे,नितिन टाचले,शिवराज पुराणे,संजय मिनियार,सूर्यकांत बेडजुरगे,अशोक घोडके,सुभाष इकळगे,राजेंद्र घोडके, रतनसिंह राजपूत आदि हनुमान भक्त उपस्थित होते.आ.बस्वराज पाटील यांच्या कटुंबीयाकडुन पुजन करण्यात आले.यावेळी गिताताई बापुराव पाटील यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता पुजन करण्यात आले.
 अनेक वर्षापासून हे मंदिर मुरुम ते भुसनी वाडी रोडवर स्थित आहे.गेल्या 25 वर्षा पासुन मुरुम येथील युवकानी पुढाकार घेवून मंदिरासाठी विकास कार्य करीत आहेत.मुरुम व परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून येथील शिव मारुतीवर लोंकाची श्रद्धा आहे. हनुमान जयंती निमित्य मुरुम व परिसरातील हजारो भावीकानी दर्शन घेतले.जयंती निमित्य महाप्रसाद व कुस्ती चे आयोजन करण्यात आले होते.
भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मी पांचाळ व कदेर चे सरपंच शारदाबाई सुभाष आळंगे यांनी आपल्या कुंटुबा सहित दर्शन घेतले..
मुरुम व परिसरातील भाविकांचे दरवर्षी हनुमान जयंतीला आलोट गर्दी होते त्याचप्रमाणे सर्व भाविकाकडून विविध पदार्थाचा प्रसाद वाटप करण्यात आले.
मंदिर विकासासाठी मुरुम येथील शिवराज पुराणे व सहकारी मित्र परिश्रम घेत आहेत.गेल्या 25 वर्षापासून शिवराज पुराणे शिव मारुतिचे भक्त आहेत.
आपल्या मुलांसाठी पैसा व धन न कमावता त्यांना कमावण्यालायक बनवा असे प्रतिपादन प्राचार्य नागसेन कांबळे यांनी केले.

आपल्या मुलांसाठी पैसा व धन न कमावता त्यांना कमावण्यालायक बनवा असे प्रतिपादन प्राचार्य नागसेन कांबळे यांनी केले.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आपल्या मुलांसाठी पैसा व धन न कमावता त्यांना कमावण्यालायक बनवा असे प्रतिपादन प्राचार्य नागसेन कांबळे यांनी केले. लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमधील पाल्यांच्या पालकांसाठी " पालक मार्गदर्शन शिबीर "  व " शिक्षक कार्यशाळा " दिनांक 29 मार्च रोजी शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात घेण्यात आला.
या प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा येथील केंद्रप्रमुख मनोहर  वाघमोडे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून बीड जिल्यातील फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल आष्टीचे(जि.बिड) संस्थापक,प्राचार्य नागसेन धर्मराज कांबळे,सौ.सीमा कांबळे,स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव,संचालिका सौ. सविता जाधव,पालक प्रतिनिधी डॉ.प्रा.रामेश्वर धप्पाधुळे,डॉ.हेमंत श्रीगिरे,जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,आदी  उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.त्यानंतर स्कुलच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुस्तक व स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आले.  यावेळी प्रा.नागसेन कांबळे पुढे बोलताना म्हणाले कि,पालकांनी आपल्या पाल्याच्या अवगुनापेक्षा त्यांच्यातील गुणाकडे लक्ष दिल्यास यशाची खात्री हमखास देता येते.शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या शारीरीक,बौद्धिक,मानसीक,
भावनिक,अशा सर्वांगीण विकासासाठी आपसात समन्वय साधुन सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे सांगीतले.
यावेळी प्रस्ताविक करताना प्राचार्य शहाजी जाधव म्हणाले कि,या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालकांमध्ये अगोदर जागृती व त्यांचे प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे असे सांगीतले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मनोहर वाघमोडे सर म्हणाले की,शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन,संभाषण कौशल्ये विकसित करून  आत्मसन्मान वृद्धिंगत करावा आणि पालकांनी त्यांच्यात शिस्त,नितीमुल्य,जिव्हाळा,प्रेम,जागृत करून आत्मविश्वास वाढवावा जेणेकरून तो सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित बनेल असे सांगीतले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य शहाजी जाधव व सूत्रसंचालन संचालीका मिस.सविता जाधव यांनी केले तर आभार सिद्धेश्वर सुरवसे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कुलमधील शिक्षक हारुन हेड्डे,सुदर्शन भारती,शिक्षिका मिस. प्रियांका वचने पातील,मिस.बबिता शिंदे,मिस.मुमताज सवार,मिस.अनुराधा बंडगर,मिस.पूजा दाळिंबकर, मिस.सोनाली राठोड,मिस.प्रणाली घोडके,मिस.वर्ष सुरवसे,मिस.चांदबी चाऊस,अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाने जबाबदारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांची सिंहगर्जना — जिल्हा भाजप मिडिया विभागाच्या बैठकीत घोषणा राजकीय धुरीणांच्या  भुवया उंचावल्या

पक्षाने जबाबदारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांची सिंहगर्जना — जिल्हा भाजप मिडिया विभागाच्या बैठकीत घोषणा राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे़.आजपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी आदेश मानून काम करीत राहिलो़.पक्षाकडे मि कधीच कांही मागितले नाही़ परंतू पक्षाने बोलावून घेवून आमदारकी बहाल केली़.युवा मोर्चा अध्यक्ष,प्रदेश सरचिटणीस केले़ सर्वसामान्य कार्यकत्र्याला मोठं करण्याचे काम भाजप पक्षात होते़.त्यामुळे पक्षोन लोकसभा लढविण्याचे आदेश दिल्यास लोकसभा निवडणुकही लढविणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस,आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली. आ़ ठाकूर यांच्या या घोषणेमुळे मात्र राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे़.
उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाची जिल्हा बैठक दि.30 मार्च रोजी मुंबई येथील महाभाजप-महामेळावा तयारी संदर्भात घेण्यात आली़.या बैठकीस मार्गदर्शन करताना आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी लोकसभा लढविणार असल्याचे वक्तव्य केले़.यावेळी बैठकीत एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील म्हणाले कि,मि राष्ट्रवादी,शिवसेनेसह काँग्रेस पक्षात काम केले़ मात्र इतर पक्षापेक्षा भाजपात काम करणाऱ्या नेत्यालाच नव्हे तर कार्यकत्र्यालाही सन्मानाची आणि आपलुकीची वागणूक मिळते़.व आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्या सारखे नेतृत्व जिल्ह्यास लाभले आहे़ अगदी तळागळातील लोकांच्या अडी-अडचणी सोडविण्याचे काम आ़.ठाकूर करीत आहेत़. जिल्ह्यात भाजपा पक्ष वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे़.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आ़. ठाकूर यांनी लोकसभा निवडणुक लढविल्यास निश्चितच 'कमळ' फुलल्याशिवाय राहणार नाही़ सेनेत नेतेमंडळी एकमेकाचेच पाय ओढताना दिसत आहेत़ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही अवस्था अत्यंत वाईट आहे़.त्यामुळे या जिल्ह्यात आता भाजपा आणि आ़ ठाकूर यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही़.त्यामुळे आ़ ठाकूर यांनी लोकसभा निवडणूक लढवावी,असे आवाहन पाटील यांनी केले़.त्यानंतर बोलताना आ़.सुजितसिंह ठाकूर म्हणाले,माझ्या सारख्या कार्यकत्र्याला,घरात कुठला राजकीय वारसा  नसतानाही पक्षाने आमदार आणि प्रदेश सरचिटणीस केले़ पक्षाने जो आदेश दिला तो अगदी मनापासून पाळून काम करत गेलो़.अनेक राज्यात निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पक्षाने माझ्या खांद्यावर टाकली़ ती यशस्वीपणे पेलली़.जर पक्षाने उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर निवडणूकही लढवू,असे प्रतिपादन आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी केले़.तसेच निवडणूक लढविण्याची क्षमता असणारे अनेक जण पक्षात आहेत़.शिवाय अनेक जण येणार आहेत़ त्यामुळे उमदेवारांची काही कमी नाही़ येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 'कमळ'च फुलणार आहे़ त्यामुळे अजिबात चिंता करायची गरज नाही, जनतेत भाजपाची लोकप्रियता कमी झाली नसून ती वाढल्याचेही आ़.ठाकूर यांनी सांगीतले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील,ॲड़.अनिल काळे, रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड़.व्यंकटराव गुंड,एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील,वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक,ॲड़.नितीन भोसले,
भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे,जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू,मिडिया विभाग सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,जीवन गायकवाड, हेमंत कुलकर्णी,पार्श्वनाथ बाळापुरे,राहुल कोरे,मिडिया विभाग उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी,भगवान बांगर, संजय खुरूद,दत्ता गायके,चिटणीस अनंत तापडीय, नागेश इंगळे,कोषाध्यक्ष हेमंत कुलकर्णी,मिडिया विभाग तालुकाध्यक्ष सुभाष कदम (उस्मानाबाद) , मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इक्बाल मुल्ला (लोहारा),यांच्यासह भाजप मिडिया विभाग जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर आभार प्रसिध्दीप्रमुख पांडूरंग(अण्णा) पवार यांनी मानले़.
भाजपाच्या महामेळाव्यास पत्रकारांनी उपस्थित रहावे — भाजप प्रदेश सरचिटणीस आ़.सुजितसिंह ठाकूर

भाजपाच्या महामेळाव्यास पत्रकारांनी उपस्थित रहावे — भाजप प्रदेश सरचिटणीस आ़.सुजितसिंह ठाकूर




  • उस्मानाबाद भाजप मिडिया विभाग जिल्हा बैठकीस चांगला प्रतिसाद

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त मुंबई येथे दि.6 एप्रिल रोजी ऐतिहासिक महामेळावा होणार आहे़.या मेळाव्यास भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,यांच्यासह अनेक नेते मार्गदर्शन करणार आहेत़.या मेळाव्यास भाजपा मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस,आ़. सुजितसिंह ठाकूर यांनी केले़.
 महाभाजपा-महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा मीडिया विभागाची उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहात दि.30 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ़.सुजितसिंह ठाकूर बोलत होते़.यावेळी  भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील,ॲड़ अनिल काळे, रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड़ व्यंकटराव गुंड, एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक,ॲड़.नितीन भोसले, जि.प सदस्य ज्ञानदेव राजगुरू आदींची प्रमुख उपस्थित होती़.यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर पुढे बोलताना म्हणाले कि,राज्यात मुंबईसारखी मोठी महानगरपालिका असलेली जिल्हे सोडल्यास उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपाचा मीडिया विभाग सर्वात सक्षम आणि कार्यक्षम आहे़.मीडिया विभाग हाच आता भाजपाचा कान,नाक,डोळा आणि आवाज आहे़.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मीडिया विभाग करत आहे़. भाजपाच्या ऐतिहासिक,विराट महामेळाव्यास पत्रकार मोठ्या संख्येने येणार असल्याचे मिडिया विभागाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी सांगितले़.1  पत्रकार 1 लाख लोकांपर्यंत बातमी पोहचविण्याचे काम करतो़.त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी केले़.यावेळी मिडिया विभाग सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,जीवन गायकवाड,पार्श्वनाथ बाळापुरे,राहुल कोरे,उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी,भगवान बांगर,संजय  खुरूद,दत्ता गायके,मिडिया विभाग चिटणीस अनंत तापडीय,नागेश इंगळे,मिडिया विभाग कोषाध्यक्ष हेमंत कुलकर्णी,सहप्रसिध्दीप्रमुख पांडूरंग(अण्णा) पवार,मिडिया विभाग तालुकाध्यक्ष सुभाष कदम (उस्मानाबाद),मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इक्बाल मुल्ला (लोहारा),यांच्यासह भाजप मिडिया विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक भाजप मिडिया विभाग  जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर आभार प्रसिध्दीप्रमुख पांडूरंग(अण्णा) पवार यांनी मानले़.
लोहारा शहरातील बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने दि.29 मार्च रोजी आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोहारा शहरातील बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने दि.29 मार्च रोजी आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:-  लोहारा शहरातील बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने दि.29 मार्च रोजी आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.नाफेडने यशवंतराव चव्हाण कृषी संस्थेला हमीभावाने हरभरा खरेदी करण्याची परवाणगी दिली आहे.त्यानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख म्हणुन बाजार समतिचे उपसभापती प्रा.आनंदराव सूर्यवंशी,बाजार समितीचे संचालक शंकर जट्टे,चव्हाण कृषी संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जावळे-पाटील,बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील,अदि उपस्थीत होते.आतापर्यंत या संस्थेकडे एक हजार दोनशे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.त्यानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी हरभरा घेऊन येण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले आहेत.लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतले आहे.उत्पादनही समाधानकारक झाले आहे. परंतु नाफेडने हेक्टरी दहा क्विंटल हरभरा धान्य खरेदी करण्याची अट घातली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हेक्टरी दहा ऐवजी वीस क्विंटल प्रमाणे हरभरा खरेदी करण्यात यावी,अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या कार्यक्रमास बालाजी साळुंके,प्रभाकर बिराजदार, अजमेर दाळींबकर,भगवान मक्तेदार,चंद्रकांत  वाघमारे,हबीब देशमुख,विनोद जावळे,दत्तात्र्य पाटील, गणेश कस्तुरे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने तालुकास्तरीय खुल्या क्रीडा स्पर्धा

नेहरू युवा केंद्राच्या वतीने तालुकास्तरीय खुल्या क्रीडा स्पर्धा



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील  मुरुम येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या प्रांगणात नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने  तालुकास्तरीय खुल्या क्रीडा स्पर्धा दि.28 मार्च रोजी घेण्यात आल्या.यामध्ये कबड्डी,खो-खो, हॉलीबाल, गोळाफेक, रांगोली अशा विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य अँड.राजासाहेब पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणुन पो.नि.मुस्तफा शेख, मुख्याध्यापक हनुमंत शिंदे,शालेय समितीचे प्रमोद कुलकर्णी,पत्रकार महेश निंबरगे,सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे,क्रीडा शिक्षक भिलसिंग जाधव,सुजित शेळके,बेग सर,तुळशिराम देडे,नेहरू युवा केन्द्राचे गांधीजी गायकवाड़,सुधाकर बनसोडे आदि उपस्थित होते.या स्पर्धेत उमरगा तालुक्यातील अनेक गावातील क्रीडा संघानी सहभाग घेतला आहे.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुळशीराम देडे व सूत्रसंचालन वंदना जाधव यांनी केले तर आभार देशमाने सर यांनी मानले.या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 लोहारा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन साजरा करण्यात आला.

लोहारा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन साजरा करण्यात आला.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन साजरा करण्यात आला.दै.भास्कर उस्मानाबाद जिल्हा कार्यालयात दै.भास्कर चे ब्युरो चिफ राजाभाऊ वैद्य व सह्याद्रि हॉस्पीटल उस्मानाबाद येथे हॉस्पीटचे संचालक डॉ.दिग्गज दापके देशमुख व उस्मानाबाद येथे केशेगावचे भाजपचे युवा नेते विनोद(दादा) क्षीरसागर व लोहारा शहरातील पत्रकार गणेश खबोले यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त इकबाल मुल्ला यांचा यथोचित  सत्कार करण्यात आला.यावेळी दै.भास्करचे ब्युरो चिफ राजाभाऊ वैद्य,माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे(उस्मानाबाद),दै.भास्कर शहर प्रतिनिधी गोविंद पाटील (उस्मानाबाद),सह्याद्रि हॉस्पीटलचे संचालक डॉ.दापके दिग्गज देशमुख,भाजप तुळजापुर तालुका
 विस्तारक शिवाजी गिड्डे,केशेगावचे भाजप युवा नेते विनोद(दादा) क्षीरसागर,पं.स.सदस्य महेश चांदणे, सिध्दुजी गोपणे सर,नगरसेवक बाळासाहेब कोरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरि लोखंडे,पत्रकार सचिन ठेले,पत्रकार गणेश खबोले,शिवसैनिक विजयकुमार ढगे,भिमाशंकर डोकडे सर,भाजपा युवामोर्चा चे बाळु माशाळकर,मनसे शहराध्यक्ष प्रविण संगशेट्टी,भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,पत्रकार बालाजी बिराजदार,पत्रकार इकबाल मुल्ला,पत्रकार निळकंठ कांबळे,शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक प्रताप घोडके,तलाठी जगदिश लांडगे,माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके,विठ्ठल वचने पाटील सर,अँड.दादासाहेब पाटील,नगरसेवक आयुब अब्दुल शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी,नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा कॉग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अविनाश माळी,प्राचार्य शहाजी जाधव,शंकर जाधव,युवा शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,शिवसेना युवा तालुका प्रमुख दिपक मुळे,नागेश फुलसुंदर,किरण चिंचोळे,महादेव कारभारी,प्रशांत काळे,नेताजी शिंदे, अदि उपस्थित होते.