Showing posts with label ग़ज़ल. Show all posts
Showing posts with label ग़ज़ल. Show all posts
वाचवाल तर वाचाल!

वाचवाल तर वाचाल!



कुठे पूल तुटतो, कुठे इमारत कोसळते...पाणी साचून शहरात नद्या वाहतात...लोकलची गर्दी, वाढतं प्रदूषण...रस्त्यांवरील खड्ड्यांना तर सीमाच नाही...आम्हा मुंबईकरांचं जगणं बेहाल करून टाकलंय. सांगा, आम्ही जगायचं कसं? असा सवाल तरुणाईनं 'युवा कट्टा'वर विचारला आहे. मुंबईनगरीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कुणी याकडे लक्ष देणार आहे का? या सोनेरी शहराला वाचवण्यासाठी आत्ताच ठोस उपाययोजना कराल आणि मुंबापुरीला वाचवाल तरच तुम्ही-आम्ही वाचू, अन्यथा काही खरं नाही. महापालिका, प्रशासन यंत्रणा, नेतेमंडळी आणि मुंबईकरांनाही नागरिकांनाही यासाठी जबाबदारीनं काम करावं लागेल असं तरुणाईनं म्हटलं आहे...
नको शोधुस तु मला चांदण्यारात्री   मी तुला दिसणार नाही

नको शोधुस तु मला चांदण्यारात्री मी तुला दिसणार नाही


नको शोधुस तु मला चांदण्यारात्री 
मी तुला दिसणार नाही 
कारण मी आता अंधारात विसावलोय 

आभाळातून तुला बघतायावं म्हणुन पोर्णिमेला तुझ्या घरावरनं जायला सांगितले पण तिथे अमावस्या आडवी आली 

मि तुझी वाट बघतं असतांना तुझ्या हातावर मेहंदी लागतेय कळले 
तेंव्हा मी तुला भेटायला यायला निघालो 
तरं वाटेत यम आडवा आला 
मग काय देह माझा स्मशानात जळत होता तेंव्हा 
तुझ्या हातावरची मेहंदी रंगत होती 
आणि माझ्या अस्ती विसर्जनाच्या दिवशी 
तु नव्या जोडीदाराच्या गळ्यात हार टाकत होती 

कळल जेंव्हा तुला मी या जगात नाही 
तेंव्हा तु नव्या घरात नव्या जोडीदारा सोबत स्वप्न घेऊन नव्या आयुष्याला सुरवात केली होती 

तेंव्हा नको शोधुस तु मला चांदण्यारात्री 
मी तुला दिसणार नाही 
कारण मी आता अंधारात विसावलोय 

संजय धनगव्हाळ
माणसाने संत होऊ नये  झालाच तर लाजीरवान  अंत करू नये

माणसाने संत होऊ नये झालाच तर लाजीरवान अंत करू नये


लोकांना ज्ञान सांगुन स्वता मोठ व्हायचं 
आणि आपल्या अज्ञानाच वेड जगाला लावायचं
ज्ञान वाटुनच धनीक श्रीमंत व्हायच तरिही
कुटुंबाची जबाबदारी घ्या म्हणून 
जगाला रडुन सांगायचं

अरे ऊघड्यावर पडलीत
शेतकऱ्याचे कुटंब त्यांच काय
याची चिंता कोणी करत नाही
रोज त्यांच मरण असतं
पण आधार कुणाचा ते घेत नाही
दुःख यातना गरिबी याचं संपत्तीत ते जगत असतात
संघर्ष करुन स्वबळावर ते आयुष्याशी लढत असतात

आता संत होणे नाही
संत तर तेव्हाच होऊन गेले
जे भजन किर्तनातच रंगले
स्वताच कुटुंब देशोधडीला लाऊन
जगाचं कल्याण करुन गेले
म्हणून देव स्वता येऊन
त्यांना घेऊन गेले
नाही कोणी त्यांचे पुतळे उभे केले
नाही त्यांचे कुठे फोटो दिसतातं
आजही त्याच्या आठवणीत
फक्त दिंड्याच निघतातं

अरे जगं सार नैराश्यातच आहे
कुणाच्याच चेहऱ्यावर 
हाश्य नाही 
तरिही... माणुस जगतो आहे
संकटाशी खेळणारा खरा लढवय्या माणुस
डाव अर्ध्यावर मोडुन या जगातुन पळ काढीत नाही

संजय धनगव्हाळ
पैशासाठी जगणे मला   आवडत नाही  पैशामागे धावणे तर मुळीच नाही

पैशासाठी जगणे मला आवडत नाही पैशामागे धावणे तर मुळीच नाही



माझ्या जवळ काहीच नाही
म्हणून मी चिंतेत कधीच
रहात नाही

वैभव दुसऱ्याचे पाहुन
स्वताला जाळतं बसने मुळीच आवडत नाही

श्रीमंत होण्यासाठी
देवाजवळ मागणे कधीच
मागत नाही

जगणे कठीण असलं तरी
वाट चुकवणे मला आवडत नाही

कष्ट मेहनतीच्या कमाईत
ऐशोआरामात  राहणे आवडत नाही

पुढाऱ्यांच्या मागेपुढे करून
खोटा मोठेपणा घेणे तर मुळीच आवडत नाही

संजय धनगव्हाळ
दगडाला देवपण देणारा माणुस

दगडाला देवपण देणारा माणुस



घाव घालुन दगडाला
 देवपण देणाऱ्या माणसाच्या आयुष्यात
असतात वेदना आणि दुःख
दारिद्र्य आणि गरीबी

पोटाची खळगी भरण्यासाठी
हा उघड्यावर घर मांडत असतो
उन्हातान्हात दगड कोरून
 देव घडवत असतो

घाव घालून धाव त्याची जघण्यासाठीच असते
साऱ्या जगाकडे बघणाऱ्या 
त्या देवाच मात्र त्याच्याकडे
दुर्लक्ष असते

घाम गाळुन भुक विसरून
ते दगडातच देव बघतो
दगडाचा देव विकत घेणारा माणुस
त्या देवाची पैशाने बोली लावत असतो

त्या घडवलेल्या देवाला
माणुस सोण्याचा साज चढवतो
पण देव घडवणाऱ्या माणसाला
त्याच्या कष्टाचा दामही मिळतं नसतो

त्या दगडाच्या देवाला किती मोठे मंदिर असते
दगडातुन देव निर्माण करणाऱ्याला साधी झोपडी सुद्धा नसते
देवापुढे नमणारे देवाच्या क्रूपेने
श्रीमंत होतात
देव त्यांच भलं करतो
दगडाला देवपण देणारा माणुस मात्र दुःख दारिद्र्य गरिबी घेऊन
जगण्यासाठी नविन गाव शोधतं असतो

संजय धनगव्हाळ
तुझ्या सौंदर्यला  चांदण्याचा बहर आहे  देहावर तुझ्या नजरांचा प्रहार आहे

तुझ्या सौंदर्यला चांदण्याचा बहर आहे देहावर तुझ्या नजरांचा प्रहार आहे



दे हातात हात माझ्या
तुझाच मला ईंन्तजार आहे

ये अशी जवळ ये माझ्या
अंधाराशी दिर्घ करार केला आहे

नको जाऊस तु दुर आता
ह्रुदयावर माझ्या तझाचं
अधीकार आहे

पाहुन  चंद्रास वेडावली अमावस्याही 

पोर्णिमेची सवत होण्यास 
काजव्यांचा नकार आहे

संजय धनगव्हाळ
रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या गाण्यात

रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या गाण्यात



रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या गाण्यात
मी प्रेमाचे गित गात आसतांना
तु माझ्याकडे बघुन हसत होती
पावसात येण्याच खुणवत होती
तेव्हा....
माझ्या गाण्यातले ढग ही जरा जास्तचं गरजायला लागले
मी पहात होतो तुला
पावसांच्या सरींना कवेत घेता घेता
तु फुलांचा सडा वेचत होती
तेव्हा तुला नसेल वाटतं
पण.....
मला वाटायचं तुला फुले वेचायला
मदत करावी
पण....
तुझ्या कवेत फुले जरा जास्तचं लाडावलीतं
त्या पावसाच चिबं चिबं भिजतांनाही तुझ्या वेणीसाठी
तु गजरा केलास
वाटलं तु मला बोलवशील
वेणीला गजरा लावायला
पण तेव्हाच माझ्या गाण्यात पाऊस खवळला आणि.....
तुझ्यावरचं जास्त मेहरबान झाला
तेव्हा मी पहात होतो
त्या रिमझिम पावसातं तुझं भिजलेलं रूप
खरच तु खुप सुंदर दिसत होती
आणि तेव्हाच माझ्या ह्रुदयात
भावनांची बग फुलतं होती
काय माझ्या गाण्याचा शेवट असेल मला माहीत नाही
पण त्या रिमझिम पावसात भिजतांना
माझ्य ह्रुदयातल्या भावनांच्या
फुलांना
तु  वेचलेल्या फुलांची सोबत
हवी आहे
देशील की नाही मला माहीत नाही
पण....हो....
माझं पावसाच गाण संपल्यावर
मी तुला शोधणार आहे
भेटण्यासाठी........
​संजय धनगव्हाळ​

हिरकणी

हिरकणी


दोन कुळाची मालकी 
लेक जपते सासरी
राजबिंड्या भ्रताराची
बने लाडकी अस्तुरी

लाडाकोडाचे माहेर
हळूहळू विसरते
मग संसार रथाचे 
दुजे चाक ती बनते

हिंदोळते मन ध्यान
पेलताना जड भार
जग रहाटी जपून
नित्य फुलवी संसार

नाही  शिणवटा कधी 
नाही  कसल मागणं
कळा घराची सांगते
तिचे  साजरे अंगण 

जपताना देह कुडी 
शेला  घेई पांघरूण 
सासरच्या नात्या साठी 
मन टाकी  अंथरूण 

नातीगोती सांभाळता
तिची उलघाल होते 
मग पावलो पावली
तिचे  बहरते नातो

वंश वाढता वाढता
मोल जगण्याला येते
उभा पेलता प्रपंच 
बळ रितेरिते होते 

बाई हिरकणी साठी
शोभे सोन्याचे कोंदण
जीवपल्याड जपते 
लाख मोलाच गोंदण

तुकाराम पाटील
चिंचवड पुणे ३३
पायमल्ली​  मंजुघोषा

पायमल्ली​ मंजुघोषा


रोज करतो एक पुंगी गाजराची
वाजली नाही  तरी ती खावयाची

दार आहे  वाजणारे उघडताना
साद नाही  ओळखीच्या पावलांची

लाभलेले भाग्य माझे  थोर आहे 
पाहतो मी रोज लंका रावणाची

दोन वेळा खायचेही आज वांदे
थोरवी  मी काय सांगू गौरवाची

वाजणारे थांबवा रे ढोल ताशे
मानहानी होत आहे दैवतांची

भेटली ती काल होती आज नाही 
रात गेली  बात गेली  गौरवाची

मागताना भीक याना लाज नाही 
कोडगी ही जात आहे  माणसाची

बदललेले सर्व काही ठीक नाही 
पायमल्ली होत आहे  भावनांची

तुकाराम पाटील 
चिंचवड पुणे ३३
पहिला पाऊस

पहिला पाऊस



ढग गरजले
विज चमकली
पहिल्या पावसाची
पहिली सर धावत आली

पाऊस जोरात आला
मी धावत गेलो
चिंब चिंब भीजलो
पावसांच्या सरींना
कवेत घेता घेता
खाली पडलो

मंग ति आली
तीने हात दिला
तिचा हात धरून
मी ऊभा राहीलो
तिने कवेत घेतले
घट्ट मिठी मारली
पावसात भिजतांना
तिने मुकाही घेतला

ती घरात घेऊन गेली
दार बंद केले
साडीच्या पदराने डोकं पुसले
ओले कपडेही तिनेच काढले
तेव्हढ्यात......
विज कडाडली
मी तिच्या कुशीत शिरलो

पावसाच्या ढगाळ वातावरणात
तिच्या सोबतचं जेवलो
मगं तिच्या मांडीवर
डोक ठेऊन झोपलो
ती डोक्यावरून हात फिरवीत
गाण म्हणु लागली
मंग मी खुप ऊशीरा
झोपेतुन उठल्यावर
 तिला विचारले

आई पाऊस गेला का गं !

संजय धनगव्हाळ
आयुष्य तिचं आणि त्याचं (पती पत्नी याच्यासाढी)

आयुष्य तिचं आणि त्याचं (पती पत्नी याच्यासाढी)



रोज रोज भांडण तिचं
खुप प्रेमळ असतं
तिच्या रागावण्यातही
खर प्रेम दिसतं

दिवसभर काम करुनही
ति कधीच थकतं नाही
त्याची काळजी घेतल्या शिवाय
घास पोटातं जात नाही

सुखं म्हणजे काय
तिला माहीतच नसते
तो घरी आल्याशिवाय
ती दिवा लावत नसते

आजारपण तिचं ती
आनंदातचं घालवते
दारात ऊभी राहुन ती
वाट त्याची पहात असते

कसलीच अपेक्षा ती
कधी करतच नाही
घर परिवाराशिवाय तिला
दुसर काही माहीतच नाही

नको म्हटलं तरी ती
राग त्याच्यावरचं काढते
प्रदक्षिणा तिची पोर्णिमेला
त्याच्यासाठीचं असते

त्याला विचारल्या शिवाय ती
काहीच करत नाही
राग रुसवा असला तरी
एकमेंशिवाय रहात नाही

तिच जगण म्हणजे
त्याच आयुष्य असते
त्याच्या साठीचं तर
तिचे जगणे असते

खर तरं आयुष्य तिच
आणि त्याचचं असतं
नटखट असल भाडंण तरी
घर दोघांच्या आधाराने ऊभ असतं

संजय धनगव्हाळ
"नातं तुझ माझं"

"नातं तुझ माझं"

जाहिरात


मला माहीत आहे
सुर्य तुझ्यावर जास्तच
 रागावलाय
तुझ्या नकाराने तो
जरा जास्तच तापलायं

खर सांगु....
त्या सुर्याला काय माहीत
पोर्णिमा फक्त चंद्रालाच 
शोभूनं दिसते
काळोखातही तु माझ्या सोबतं खुप सुदंर दिसते
आणि त्या चांदण्याच्या 
गर्दीतही तु खुपं गोडं लाजते

नात तुझं माझ त्या चंद्राला
कळालं असते तर.....
नादं त्याने तुझा कधीचं 
केला नसता
अमावश्ये सोबत तो 
सुखातं राहीला असता

पण.... 
तुला माझ्या सोबत बघुनचं
तो जास्त क्रोधीत होतो
तु कुशीत माझ असतांना
खुपचं लाल होतो

चल जाऊ दे....
मी तुझ्यासाठी फुलांचा सडा टाकलायं
आणि केलाय लाजाळुंच्या
वेलींचा शामीयाना
जा तु या चंद्राची मधु होऊन
निवांत बैस त्या कळ्यांच्या
गालीच्यावर
आणि पांघरुन घे परिजातकांच्या
फुलांची शाँल
आणि हो....
तुझ्यासाठी त्या मिण मिणत्या
काजव्यांचा गजराही आणलाय

ईतक्यात पाऊस येईलचं
त्या पावसात तु आणि मी
चिबं चिबं होऊ
पावसांच्या सरींना कवेत घेऊ
पावसात भिजतांना
तुझ्या माझ्या मिलनाचे गित गाऊ

संजय धनगव्हाळ
जाहिरात
बाबा तुम्ही नसतात तेव्हा

बाबा तुम्ही नसतात तेव्हा

जाहिरात

बाबा तुंम्ही नसतात तेंव्हा
आठवण तुमची येत असते
तुम्ही असल्यावर खुप मजा असते

तुम्हीच मला शाळेत
पोहचवण्याचा माझा हट्ट असतो
खाऊसाठी माझा नेहमीचं आग्रह
असतो
रोज रोज नवीन नवीन चाँकलेट
मला तुमच्या कडुन मिळते
चाँकलेट घेतल्यावर
हात तुमचा सोडुन
आईच्या कुशीत माझी घट्ट मिठी असते

बाबा तुम्ही खुप खुप काम करतात
दमलात तरी नेहमीच आनंदात आसतात
असेल अडचण कितीही
तरी ईच्छा मात्र पुर्ण करतातं
सणासुधीला गोडधोड
नवे कपडे न विसरता अणतातं

खरचं बाबा म्हणजेना
हळवा माणुस
प्रत्येक वेळी गरत बाबांचीच लागते
बाबांशिवाय काहीच होत नसते
दुःख लपवून सुःख देणार बाबांच मनं असते
बाबा म्हणजे घरातलं एक
मोठ विश्व असते

बाबा म्हणजे नेमकं काय
कुणाला काही कळतं नाही
बाबांच्या आयुष्यात कुणाचचं
मन वळतं नाही
तरीही बाबा पाठीवर हात ठेऊन
पुढेचं पाठवतात
आयुष्याच्या कशीद्यावरती
स्वप्न सुखाचे रंगवतात

बाबा म्हणजे घरातले घरपण
असते
बाबांशीवाय जगणे कधीचं
नसते

संजय धनगव्हाळ
जाहिरात
देवा तुझा घराला दारचं नाही तुझ्या दर्शनाला कुठलाचं वारचं  नाही

देवा तुझा घराला दारचं नाही तुझ्या दर्शनाला कुठलाचं वारचं नाही

जाहिरात


तु कायम ऊभाच असतो
तुझ्या भक्तानंसाठी
कधी दमला नाहीस रे तु
जाहिरात
तुझ्या भक्तांचा तुला कसला
भारचं नाही
देवा तुझ्या घराला दारचं नाही

जागाच असतो तु तुझ्या भक्तांसाठी
तुझ्या विश्रांतीचा कसलाचं 
करार नाही
देवा तुझ्या घराला दारचं नाही

रडतात सारे तुझ्याजवळ
व्यथा आपली मांडताना
दुःख तुझ्या चरणी ठेवण्यास
किती येता किती जातातं
याचा काहि व्यवहार नाही
देवा तुझ्या घराला दारचं नाही

देवा तुला पाहिल्यावरं.
मनं हलके होते
नाव तुझे घेतांना जगण्याला
नवि ऊमेद मिळते
तुझ्या शिवाय माणसाला कुणाचा आधार नाही
देवा तुझ्या घराला दारच नाही

संजय धनगव्हाळ
जाहिरात
ग़रीबी में भी  ज़ाहिर  अपनी बेज़ारी नहीं करते

ग़रीबी में भी ज़ाहिर अपनी बेज़ारी नहीं करते

जाहिरात

ग़रीबी में भी  ज़ाहिर  अपनी बेज़ारी नहीं करते
मेरे बच्चे  कभी  तौहीन -ए-ख़ुद्दारी नहीं करते

.हम अपने घर की सूखी रोटियों पर रखते हैं रोज़ा
किसी ज़रदार से उम्मीद -ए-इफ़्तारी नहीं करते

जो ग़म की  धूप में चल कर खुशी की छाँव *Mai* आये
किसी के साथ वो हर्गिज़ रियाकारी नहीं करते

हमेशा ही यहां ऐसे मुसाफ़िर  ग़म उठाते हैं
सफर की अपनी पहले से जो तैयारी  नहीं करते

"वसीम" अपने क़बीले  में अभी कुछ  लोग ऐसे हैं
वतन पर जान दे देते हैं ग़द्दारी नहीं करते

---वसीम  मलिक  ,  सूरत
---9925191122
जाहिरात
मुलगा जन्माला आल्यावर आई बाबा आनंदीत होतात

मुलगा जन्माला आल्यावर आई बाबा आनंदीत होतात

जाहिरात

मुलगा जन्माला आल्यावर
आई बाबा आनंदीत होतात
त्याचे खुप लाड करतातं
अलवार हळुवार अलगद
फुलासारख जपुन त्याचा
सांभाळ करतात
हसवता खेळवता
लहाणाचं मोठ करता
ईंग्रजी शाळेत पाठवतात
खुप खुप शिकवतात
तो जस सांगेल तसं वागतात
त्याच्या भविष्याचे स्वप्न
रंगवतात
मुलगा मोठा होतो
मोठ्या शहरात शिकायला जातो
डाँक्टर ईंजिनीयरं प्रोफेसर
मोठा साहेब होतो
नकळत कुणाच्यातरी
प्रेमात पडतो तिच्याशीच
लग्न करतो
एकदिवस आई बाबांपासुन
वेगळा होतो
त्यांच्याशिवाय त्याचा नी तिचा
संसार सुरू होतो
कसं चाललय मुलाचं बघायला कधीतरी आई बाबा
त्याच्या बंगल्यात जातात
सासु सासरे येण्याचे  तिला
नको वाटतातं
जाहिरात
तिचे आई वडील आल्यावर
तिचा आनंद फुलत असतो
राबराब राबुन एकवेळ उपाशी
राहुन आई बाबांच्या कष्टाने
साहेब झालेला मुलगा
स्वताच्या आई वडीलांची
अवस्था पाहुन काहीच बोलतं नसतो
स्वप्न तिथेच त्या बंगल्यात सोडुन
आई बाबा गावाकडच्या घरात
परत येतात
त्या अंधारलेल्या खोलीतं
आपल्या मुलाच बालपण
आठवतात
आसाही बदल पाहुन आईचं
काळीज फाटतं
मुलगा असा वागेल अस कधीचं
वाटतं नसतं
आता म्हातारपणाची काठी
हातातुन निसटली होती
मुलाला त्याच्या बंगल्यात
आपल्याच जन्मदात्याची
दाटी वाटतं होती
आई बाबांच दुःख वेदणा
रक्ताच पाणी जिवाच रान करुन
केलेलं कष्ट
तो बायकोला कधीच सांगत नसतो कारण
त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्र असतो
मुलगा परका होतो तेव्हा
आई बाबांना वाटतं
मुलगी असती तर बर झाल असतं
सासरी राहुनही तिने सांभाळल असतं
खरतरं मुल सर्वच काही
सारखे नसतात
आई वडिलांना देव समजणारेही
असतातं
लाखात एकचं अशी निघतातं
म्हातारपणी आई बाबा त्यांना
नको वाटतातं

​संजय धनगव्हाळ​
 ​क्रांती​

​क्रांती​


जाहिरात
झाला फकीर आता
जगणे जगावयाला
सांगून काल आला
त्याच्याच आरशाला
होतो  कलंदराचा
मोठाच बोलबाला
भाकीत छान झाले
होतेच बारशाला
वाळू मुठीत धरली
सगळी गळून गेली
झोळी  आहेच पक्की
खांद्यास बांधलेली
दिवसास शोधणा-या
रात्री ब-याच आल्या
जळती मशाल बघता
सा-या पळून गेल्या
वा-यावरी कसा हा
वेडा  आरूढ झाला
फिरण्यास लाभल्या की
दाही दिशा तयाला
हा चालतो तरी ही
धरणी वरी सुखानी
तक्रार  नोंद केली
त्याच्याच आसवानी
जगण्या वरील श्रद्धा
त्याची अभंग होती
ही वाटली जगाला
मोठी  अमोघ क्रांती

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७
जाहिरात
संजीवन

संजीवन

​​
जाहिरात
मी माझ्यातून झरताना
का उगा उतावीळ होतो
जगण्याच्या अवघड वाटा
बळ बांधून तुडवत जातो
माझ्यात राम असताना
कधी  रावण जागा होतो
संघर्ष उभयता मधला
उलघाल मनाची करतो
बदलाने बदलत जाता
मन उधान वारे बनते
बंधने तोडूनी सगळी
देहाची फरपट होते
हे रिंगण वास्तवतेचे
जादूची असते नगरी
कोण्याही मुलखातून ती
आणते पुन्हा  माघारी
मज मोल शोधणे जमले
माझ्यातील माणूसकीचे
व्देषाच्या विझल्या ज्वाळा
मूळ तुटले दानवतेचे
शब्दांची संगत केली
सत्याला झेलत गेलो
राबून मिळाले ते ते
झोळीत साठवत गेलो
मी गरीब बापुडा नाही
धन कुबेर दौलत वाला संतांच्या वाणी मधला
मी परीस आहे जपलेला
जगलो जे असली नकली
मांडले भल्या बाजारी
निवडून त्यातले घ्याया
भेटेल जुना व्यापारी
मी जगलो आनंदाने
मरणाची नाही  भीती
मज पुन्हा जन्म घेण्याला
संजीवन देईल माती

तुकाराम पाटील

पिंपरी पुणे१७
जाहिरात
​मंजुळ पावा​

​मंजुळ पावा​

​मंजुळ पावा​
रणरणती दुपार
मरगळलेल मन
अजब मनाचे गजब खेळ
टाळायची कशी भयाण वेळ
बापूडपण आलेल
सरता सरत नाही
खदखदणारी खंत
कोप-यात जावून मरत नाही
बे भरवशाच जगण
एकटच स्फुंदून स्फुंदून रडतं
दाखव म्हणत जगून
आवर्जून सांगत
ताजतवान व्हायला
बदलते मग हवा
वाहू लागतो विचार
हवेसोबत विचार नवा
स्वागताला सरसावताना
पेटवून घेतो एक
प्रकाश दिवा
उजेडाचा
काजवा असला तरी तो
माझाच असतो
त्याच्याच उबेवर मी जगतो
दुपार संध्याकाळ
निघून जाते
दमदार  दिवसाची
नवी सकाळ
घुमवते मग
मंजुळ  पावा

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७
जगण्याला कंटाळुन मरतो रोजं शेतकरी

जगण्याला कंटाळुन मरतो रोजं शेतकरी


जगण्याला कंटाळुन
मरतो रोजं शेतकरी
आणि पुसले जातात
कितीतरी कपाळाचे कुंकू
पोरका होतो संसार
अनाथ होतातं मुलं
भविष्याच्या अंधारात
त्यानंतर.....!
असंख्य वेदना मुकं जखमा
आणि कधी न सुटणाऱ्या
र्निदोष प्रश्रांच ओझं ओढतांना
जगायचं असत तिला
विधवा होऊन
एका माणसाच्या मरणाने
कुकंवाच्या भारातुन
कपाळ मोकळे होते
पण शेतीमाती तशीचं भारं
घेऊन पडुन असते
स्वताला दोष देतं
किती सोपं वाटतं मरण
म्हणुनं बांधुन घेतो फास
पण मरताना कधीच
विचार करतं नाही
राहून गेलेल्या त्या जिवीतं
आतम्यांचा
घरात रडण्याचा काहोर असतो
आणि प्रश्र पडतो त्या
सुकलेल्या मातीला ईथे
कोण चुकलं पाऊस की माणुसं
मुडंन करुन माणुस मेल्याचं
सुतकं तर फेडले जाते
पण माती तशीचं पडुन रहाते
सुतकातं वर्षानुवर्षे
माणुस जगण्यातुन मुक्त होतो पण....
अमानुष शिक्षा भोगणाऱ्या
त्या शेतीमातीला कुठल्याचं
कर्जातुन मुक्त होता येतं नाही
​संजय धनगव्हाळ​