इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहराती महेबुब फकीर यांची उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे नेते जिल्हाध्यक्ष आ.राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते महेबुब फकीर यांना या निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्या जिल्हाध्यक्ष तारीख भाई मिर्झा, प्रदेश सरचिटणीस मसुदभाई शेख, मराठवाडा उपाध्यक्ष कादरखान पठाण, नगरसेवक खलिफा कुरेशी, नगरसेवक बाबा मुजावर, आसदभाई, इलियास पिरजादे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख (लोहारा), अल्पसंक्याक तालुका अध्यक्ष मुख्तार चाऊस (लोहारा), राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब शेख (लोहारा), यांच्यासह राष्टवादी कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबध्दल महेबुब फकीर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
SHARE THIS