Showing posts with label बीड. Show all posts
Showing posts with label बीड. Show all posts
मराठा आरक्षण: ७ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र

मराठा आरक्षण: ७ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र



बीड : - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. ठिय्या देऊन तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात यावे. कुणीही हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

परळी येथे आज मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.

शेतकऱ्यांना ' साले' म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात मी लोकसभा लढवणार- आमदार बच्चू कडू

शेतकऱ्यांना ' साले' म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात मी लोकसभा लढवणार- आमदार बच्चू कडू


औरंगाबाद   : एव्हढी तूर खरेदी करूनही रडतात साले ' असे  म्हणत राज्यातील समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना मतदारसंघातून मी  निवडणूक लढविणार आहे असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले . जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना दानवे यांनी दिलेली शिवी शेतकरी विसरलेला नाहीत. त्यांच्याविषयी शेतकऱ्यांत अजूनही प्रचंड रोष आहे.त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत दानवेंचा पराभव करा आणि शेतकऱ्यांच्या अपमानाचा बदला घ्या असा आग्रह शेतकरी व कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यावर मी नक्कीच विचार करत असे   आमदार बच्चू कडू यांनी सांगितले . 19 फेब्रुवारी रोजी सेलू येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमदार बच्चू कडू आले होते. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता.बच्चू कडू हे विदर्भातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांचे काम संपुर्ण राज्यात सूरू आहे. शेतीमालाला हमीभाव, बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कापूस खरेदी, तूर खेरदीसह शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील प्रश्‍नावर बच्चू कडू नेहमीच सभागृहात आक्रमपणे बाजू मांडतात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे प्रश्‍न देखील त्यांनी धसास लावल्याची कार्यकर्ते व शेतकऱ्यांची भावना आहे.साले विषयाशिवाय   पैठण जवळ हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलीसांकडून झालेल्या गोळीबारावर देखील दानवे यांनी "गोळ्या छातीवर नाही तर पायवर घालायला हव्या''असे वादग्रस्त विधान केले होते. याची आठवण शेतकरी व कार्यकर्त्यांनी सेलूच्या बैठकीत बच्चू कडू यांना करून दिली. या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तसेच दानवे यांची मतदारसंघातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी गळ त्यांना कार्यकर्त्यांनी घातली आहे.
पत्रकार संघामुळे ती चिमुकली झाली अखेर कायदेशीर दत्तक

पत्रकार संघामुळे ती चिमुकली झाली अखेर कायदेशीर दत्तक


बीड (प्रतिनिधी)  नेकनूर येथील स्त्री कुटीर रुग्णालयात प्रस्तुतीवेळी मातेचा मृत्यू झाला. मातृछत्र हरपलेल्या त्या चिमुकलीचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरलेल्या त्या पित्याने जड अंतःकरणाने तिला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पत्रकार संघाने पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला मायबाप मिळवून दिले.शनिवारी दुय्यम निबंधक , जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कायदेशीररित्या दत्तकत्व प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली.नेकनूर येथील रामलिंग सांगळे यांची पत्नी मीना हिचा नेकनूर स्त्री रुग्णालयात प्रस्तुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर हतबल झालेल्या पित्याने गुडघे टेकत तिचा सांभाळ करण्यास असमर्थता स्पष्ट केली. त्या निरागस नकोशीला अनाथाश्रम मध्ये सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोषजी मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हासचिव शेख वसीम, संघटक अमजद खान, सहसंघटक शेखअय्युब आदीनी पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला अखेर गरजूवंत मायबाप प्रशांत आणि बरखा पोरवाल हे मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली. यानंतर दत्तकत्व देण्याची कायदेशीर प्रक्रिया दि 20 जानेवारी 2018 रोजी पूर्ण करून बाळ पोरवाल कुटुंबाकडे अधिकृत सुपूर्द करण्यात आले.यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधक एस ए पोकळे तसेच ए जी पठाण, चाटे, शेख फेय्याज, शिंदे आदींनी या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करून दत्तकत्व प्रक्रिया पार पडण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली.निंबधक कार्यालयात माणुसकीचे अनोखे दर्शन त्या नाकोशीला पत्रकार संघाच्या सामाजिक जाणिवेतून हक्काचे मायबाप मिळाल्यानंतर कायदेशीर दत्तकत्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यानंतर तेथील सह दुय्यम निबंधक एस एच गोपवाळ यांनी स्वतःहून निंबधक कार्यालयातील नोंदणी खर्च खिश्यातून करत अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले