जिवा शिवा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते सोमनाथ लोहार यांचा लोहारा भाजपा तालुका यांच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लाेहारा शहरातील सोमनाथ लोहार यांनी अत्यंत गरीबी परिस्थितीवर मात करीत मराठी चित्रपटात काम करीत यांनी जिवा शिवा  चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेता म्हणुन उत्कृष्ट काम केले आहे. यांनी अनेक मालीका मध्येही उत्कृष्ट काम केले आहे. यांचा मराठी चित्रपट जिवा शिवा रिलीज होवुन सिनेमागृहात सुरु आहे. या चित्रपटास प्रेषकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमनाथ लोहार यांनी कमी कालावधीत चांगली प्रगती केल्याने यांचा लोहारा शहरात दि.9 जानेवारी 2019 रोजी  लोहारा तालुका भाजपाच्यानतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमाेद पाेतदार, भाजपा आेबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, भाजपा विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, नागनाथ लाेहार, तुकाराम विराधे, अनुसुचित माेर्चा तालुकाध्यक्ष दयानंद शेवाळे, हकिम देशमुख, मारुती पवार, विजय दरेकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपसथित हाेते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post