भारतीय जैन संघटने यवतमाळ द्वारा संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवसा निमीत्य‘मेधावी विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारोह’ संपन्न


यवतमाळ :- भारतीय जैन संघटना यवतमाळ शाखेच्या वतिने 15 ऑगस्ट संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवसा निमित्याने ‘मेधावी विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारोह’ आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये 50 विद्यार्थ्यांचा गौरव मोमेंटो, प्रमाणपत्र व बक्षिस देवुन केला गेला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनिय कामगिरी मध्ये सीए, मास्टन इन सर्जरी, मास्टर इन ड्रग्स विद्यार्थ्यांचा समावेश होता व एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये परिमल जयकुमार कोठारी 97.2 टक्के व करण सचिन कोठारी ला 12 वी मध्ये 95 टक्के  यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


 या कार्यक्रमामध्ये संघटने चे वरिष्ठ महेंद्रजी सुराना, सुभाष चन्दजी आंचलिया, माजी आमदार किर्ती गांधी ,प्रसन्नजी दप्तरी, डॉ राजेन्द्रजी खींवसरा,विदर्भ  उपाध्यक्ष सरोज भंडारी, विदर्भ कार्यकारणी सदस्य डॉ. शेखर बंड,  जिलाध्यक्ष महेंद्र बोरा, जिनेन्द्र बंगाले, चंदा खाबिया, जिल्हा सचिव जितेन्द्र शेंडेकर, निता बोथरा, प्रकल्प अधिकारी प्रमोद मुथा, शहर अध्यक्ष सुशील कटारीया -पुष्षा तोडरवाल , शहर सचिव धिरज तोडरवाल , मोनिका कोठारी, कार्यकारिणी सदस्य सविता भरुट, किर्ती मुथा, हर्षा पोकरणा, चंदा कोटेचा, प्रकाश बोरुंदीया, तिलक गुगलिया, हितेश रुनवाल आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता बोरा ने केले. यावेळी नवकार मंत्र पठन संगिता बंब , सुचित्रा कर्नावट यांनी गायले तर स्वागत गीत - मिता शाह , इला शाह यांनी प्रस्तूत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना पुष्पा तोडरवाल व आभार  प्रदर्शन मोनिका कोठारी ने केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post