अकोला - एक छायाचित्र हे हजारो शब्दांना अर्थपूर्ण करणारे असते छायाचित्र किती बोलकी असतात याचा प्रत्यय गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड केलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाचे टीव्ही कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्या पाण्याच्या प्रवाहाने दुथळी भरून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या बोलक्या छायाचित्रणातून येतो.
अकोल्याची जीवन वाहिनी असणारी मोर्णा नदी जलकुंभीमुळे मृत झाली होती, नदीचे पात्र जलकुंभीने भरल्यामुळे पाण्याचा प्रवाह एकाच ठिकाणी थांबल्याने नदीचे अस्तीत्व संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन व लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान केल्यामुळे एकेकाळी मृतावस्थेत असलेली मोर्णा नदी आज पूर्णतः जलकुंभी मुक्त होऊन पुनर्जीवीत झाली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून विशेष गौरव केलेल्या व देशातील सर्वात मोठी नदी स्वछता लोकचळवळ म्हणून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या मोर्णा नदीला लोकसहभातून पुनर्जीवीत झाल्यानंतर पहिल्या पावसाने दुथळी भरून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे बोलके छायाचित्र काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर वर अपलोड केल्याने चंद्रकांत पाटील यांच्या कार्याला नवी झळाळी मिळाली आहे.
मोर्णा नदी स्वच्छतेच्या पहिल्या टप्यापासून मोर्णामाय प्रति चंद्रकांत पाटील यांची असलेली तळमळ नेहमीच प्रत्येकांना जाणवली मोर्णा स्वच्छतेचा ध्यास घेतलेली अकोलेकरांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या बोलक्या छायाचित्रामधून मोर्णा स्वछता मिशनला जागतिक पातळीपर्यंत पोहचवण्यात छायाचित्राचा खूप मोठा वाटा आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काढलेला पहिल्या पाण्याने खळखळ वाहणाऱ्या मोर्णा मायचे छायाचित्र दूरदर्शन,आकाशवाणी, माहिती व जनसंपर्क नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांचेसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर अपलोड केल्याने चंद्रकांत पाटील यांच्या कर्तृत्वाचा हा गौरव असून त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी नितीनकुमार डोंगरे यांची उपस्थिती होती.