उंडरगावात वन्य सायाळ प्राणी आढळला.ग्रामस्थांच्या तावडीतुन बचावला.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील वनीकरणातुन  सायाळ नावाचा प्राणी बाहेर वावरत असताना  ग्रामस्थासह कुत्र्याने तानल्याने भितीपोटी तो पडक्या घरात दडुन बसल्याने तो बचावल्याची घटना दि 7 जुन रोजी सकाळी घडली.

लोहारा तालुक्यात मोठयाप्रमाणात वनीकरणाची लागवड असल्याने अनेक वन्यप्राणी राहतात. या उंडरगावा लगत मोठे वनीकरण आहे.त्या वनीकरणात विविध जातीचे प्राणी वावरतात.त्यात सायाळ नावाचा दुरमिळ प्राणी आढळल्याने नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन हा प्राणी अकरा ते बारा किलो वजनाचा आहे.


गावातील नागरीक फेरफटका मारण्याकरीता.गेले असता वनीकरणा लगत ऊस आहे त्या ऊसातुन हा प्राणी बाहेर वावरत असताना नागरीकानी पाहिला व त्याचा पाठलाग करीत असताना कुत्र्याने पाहिल्याने कुत्र्याच्या भेतीपोटी तो गावाकडे वळला व घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना.ग्रामस्थ पाठीमागे लागल्याने तो गावातील जुण्या पडक्या घरात दडुन बसला.हि माहिती लोहारा उमरगा वनपरिक्षेत्र आधिकारी विजयकुमार दौड याना कळविल्यावरुन त्यानी तात्काळ वनरक्षेक एस.एम.पाचाळ,बी.व्ही.सुर्यवंशी, वाचमेन किसन कुलकर्णी.वामण मूळे.गोरोबा क्षिरसागर,आदीने घटनास्थळ तात्काळ जावुन ग्रामस्थांच्या मदतीने दुरमिळ वन्य प्राण्यांना पकडुन लोहारा येथील पशुवैदकिय दवाखाण्यात उपचार  करुन वनीकरणात सोडुन दिले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post