Showing posts with label मनोरंजन. Show all posts
Showing posts with label मनोरंजन. Show all posts
सृजन साहित्य संघाची मासिक काव्यमैफल संपन्न

सृजन साहित्य संघाची मासिक काव्यमैफल संपन्न


 मूर्तिजापूर :- सृजन साहित्य संघ मुर्तिजापूर व्दारा मासिक काव्यमैफल उपक्रमांतर्गत प्रा.  प्रशांत पंत गोयनका नगर, मूर्तिजापूर यांचे घरी नुकतेच काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थान  गजानन मोहरील अधीक्षक, रेल्वे स्टेशन, मुर्तिजापूर यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून विनोदी लेखक लक्ष्मण कुऱ्हेकर यांची उपस्थिती होती. अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी सरस्वती पूजन व ग्रंथपूजन केले .वर्‍हाडी साहित्यिक डॉ. अनिल पाटील तथा गझलकार लक्ष्मण जेवने हयांचे दुःखद निधन झाल्याने याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्ष, प्रमुख अतिथी व उपस्थित कविंचे स्वागत करण्यात आले. निखील चव्हाण यांनी वसमत येथे संस्थेची सातवी शाखा स्थापन केल्याबद्दल, विष्णू लोडम यांची मूर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिध्दीप्रमुख म्हणून निवड झाल्याबददल, विलास वानखडे यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पूरस्कार मिळाल्याबदद्ल तर सौ. निलीमा आष्टीकर यांना विविध काव्यस्पर्धांमध्ये पारितोषीके मिळाल्याबद्दल,अध्यक्षांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक रवींद्र जवादे यांनी केले. वसमत जिल्हा हिंगोली येथे सृजन साहित्य संघाची सातवी शाखा स्थापना झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कवी रामकृष्ण आसरे , नामदेव भड , शैलेष गिरी, रवींद्र जवादे, लक्ष्मण कुऱ्हेकर, प्रशांत पंत, प्रमोद पंत, सौ. मीना जवादे, विष्णू लोडम, विनोद महल्ले,निखील चव्हाण,सुरज राठोड, विलास वानखडे,किशोर आष्टीकर, सौ. निलीमा आष्टीकर, सौ.योगिता चिंचे,निलेश उंबरकर,कु. आसावरी पंत हयांनी विविध रचना सादर केल्या. गजानन मोहरील अधीक्षक, रेल्वे स्टेशन, मूर्तिजापूर यांनी बहारदार कराओके फिल्मी गीत तर सौ.तृप्ती उंबरकर यांनी भजन सादर केले.कु. स्वाती राजुरकर हिने आपले मनोगत व्यक्त केले. 

 बहारदार संचलन प्रा.प्रशांत पंत यांनी तर आभार प्रदर्शन  प्रमोद पंत यांनी केले.मैफलीचे यशस्वीतेसाठी सौ. सोनाली पंत,कु. संस्कृती पंत,निशिकांत पंत तथा पंत परिवाराचे योगदान लाभले.परिसरातील रसिकमंडळी मैफलीसाठी उपस्थित होती,असे प्रसिध्दीप्रमुख विनोद महल्ले यांनी कळविले.
राधे माँ आता वेबसीरिजमध्ये चमकणार

राधे माँ आता वेबसीरिजमध्ये चमकणार


मुंबई :- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ हिनं अध्यात्माच्या मार्गावर चालता चालता अभिनयाकडं मोर्चा वळवला आहे. 'राह दे माँ' या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिनं स्वत:च मालिकेची निर्मिती केली असून नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच झाला आहे.

ही वेबसीरिज अध्यात्मिक असेल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, राधे माँनं हा अंदाज खोटा ठरवला आहे. या वेबसीरिजमधून समलैंगिकतेच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ट्रेलरची सुरुवातच एका बोल्ड दृष्यानं होते. राधे माँच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचं चित्रण या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राधे माँचे मॉर्डन लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचिग कार्यक्रमातील असल्याचं आता उघड झालंय. राधे माँचा हा नवा अवतार लोकांना किती भावतो, हे पाहावं लागणार आहे.
सज्जन सिंह रंगरूट' का ट्रेलर रिलीज, फौजी के रोल में दिखेंगे दिलजीत दोसांझ

सज्जन सिंह रंगरूट' का ट्रेलर रिलीज, फौजी के रोल में दिखेंगे दिलजीत दोसांझ



नई दिल्ली,:- पंजाबी फिल्मों के जाने माने एक्टर और सिंगर दिलजीत दोसांझ की अगली फिल्म सज्जन सिंह रंगरूट का नया ट्रेलर जारी हुआ है. फिल्म वर्ल्ड वॉर 1 पर आधारित है. फिल्म में दिलजीत ने एक फौजी का किरदार प्ले किया है फिल्म सज्जन सिंह रंगरूट की कहानी लाहौर रेजिमेंट के इंडियन ब्रिटिश आर्मी के संघर्षों पर आधारित है. सज्जन सिंह रंगरूट वर्ल्ड वॉर 1 के दौरान जर्मनी जाते हैं, जहां उन्हें अपनी बटालियन के साथ जंग में भाग लेना पड़ता है. उनकी पूरी बटालियन फिल्म के दौरान जर्मन सेना से जमकर मुकाबला करती नजर आएगी. फिल्म में दिलजीत दोसांझ ने फौजी का रोल प्ले किया है. फिल्म के ट्रेलर के दौरान एक जगह दिलजीत अपने हेड से पूछते हैं कि उनकी बटालियन ने जो खून बहाया है वो जाया तो नहीं होगा ना. ये सीन सभी को देशभक्ति की भावना में सराबोर करने के लिए काफी है. साथ ही ट्रेलर से ये साफ हो जाता है कि फिल्म देश के प्रति बलिदान की सच्ची भावना को दर्शाती है संदीप सिंह की बायोपिक 'सूरमा' का POSTER जारी, लीड रोल में दिलजीत दोसां इसके अलावा दिलजीत की फिल्म 'वेलकम टू न्यूयॉर्क' भी रिलीज होने वाली है. इस फिल्म में दिलजीत के साथ सोनाक्षी सिन्हा, लारा दत्ता, करण जौहर, रितेश देशमुख और सुशांत सिंह राजपूत भी काम करेंगे.  फिल्म 23 फरवरी को रिलीज होगी.एक्टर नहीं सोल्जर बनना चाहता था: दिलजीत दोसांझ वहीं फिल्म सज्जन सिंह रंगरूट 23 मार्च को रिलीज की जाएगी. फिल्म में उनके साथ सुनंदा शर्मा, योगराज सिंह, जगजीत संधू, धीरज कुमार और जरनेल सिंह ने भी काम किया है.