इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांना मासीक पेन्शन अथवा मानधन योजना सुरू करण्याची मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़.अमित शहा यांच्याकडे भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद लोकसभा प्रमुख धनंजय रणदिवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे़.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारी अंतर्गत भाजपाची क्लस्टर बैठक व शक्तीकेंद्र प्रमुखाचे संमेलन लातूर येथे घेण्यात आले़.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, संघटन महामंत्री आ. सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री विजय पुराणिक, मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लोकसभा प्रभारी मनोज पांगारकर, अॅड. मिलींद पाटील, संयोजक नितीन काळे, आदीं उपस्थित होते.
या संमेलनानंतर खा.अमित शहा यांनी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली या 4 जिल्ह्याच्या लोकसभा संयोजन समितीची बैठक घेतली. यावेळी भाजपा मीडियाच्या वतीने जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे यांनी खा. अमित शहा यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना मासीक पेन्शन अथवा मानधन योजना लागु करण्याच्या मागणी केली आहे़. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी कधी अवर्षण, दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, पिकाची नासाडी, रोगराई, दरामधील अनिश्चितता आदी कारणाने संकटात येतो. शेतकरी हा भारत देशाचा मुख्य कणा, अन्नदाता आहे़. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृषी विकास महामंडळ स्थापना करावी. तसेच निराधार योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति महिना किमान 1500 ते 1700 रुपयेपासून पुढे पेन्शन सुरू करावे, शिवाय महामंडळामार्फत शेतकऱ्यांना छोटे-छोटे व्यवसाय, लघु उद्योग, शेतीपुरक कामांसाठी कर्ज योजना राबविण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी प्रदेश सदस्य सुधीर पाटील, लाभार्थी संयोजक साहेबराव घुगे, विधी विभागाचे अॅड़प्रतिक देवळे, अॅड.नितीन भोसले, आशाताई लांडगे, विस्तारक पांडुरंग पवार, सोशल मीडिया संयोजक प्रविण पाठक आदी उपस्थित होते. यावेळी गंभीरता से विचार होंगा खा.शहा यांनी निवेदन घेवून ‘गंभीरता से विचार होगा’ असे अश्वासीत केले.