सीएम चषक क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना क्रीडाकौशल्य दाखवन्याची संधी निर्माण झाली— आ.सुजितसिंह ठाकुर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सी एम चषक क्रीडा स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखवन्याची संधी उपलब्ध झाली असुन  ग्रामीण खेळाडूंनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ही स्पर्धा प्रचंड यशस्वी केली आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले.
 भाजपाच्यावतीने सीएम चषक जिल्हास्तरीय सामन्यांच्या स्पर्धेचे उदघाटन उस्मानाबाद शहरात दि.18 जानेवारी 2019 रोजी  आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी होते. तर प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितीन काळे,
प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, खंडेराव चौरे, सुधिर पाटील, व्यंकट गुंड, जिल्हा सरचिटनीस संताजीराव चालुक्य पाटील, जालिंधर मोहिते, प्रभाकर मुळे, प्रताप सिंह पाटील,भाजप मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, सोशल मिडियाचे प्रवीण  पाठक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, ओबीसी मोर्चाचे डॉ.गोविंद कोकाटे, जिल्हा
उपाध्यक्ष नितीन भोसले, विजय शिंगाडे
नगरसेवक शिवाजी पंगुडवाले, बालाजी कोरे, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष राहुल काकड़े, शहर अध्यक्ष संदीप कोकाटे, इंद्रजित देवकते, नागेश नाना नाईक, प्रविण कोळगे, दत्ता सोनटक्के, जि.प.सदस्य राजगुरू माऊली, डॉ.अजुर्न साबळे, विनायक कुलकर्णी, जिवन वाठवडे, अविनाश हावळे, श्रीराम मुंबरे, प्रसाद पानपुडे, विपीन शिंदे, किशोर तिवारी, युवा मोर्चा संयोजक गणेश मोरे, अदि उपस्थित होते.
यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर म्हणाले कि, जिल्ह्यात 55 हजार खेळाडूंनी विविध स्पर्धांमधे सहभाग घेतल्याचे सांगुन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या या अभिनव संकल्पनेला राज्यातील 50 लाख स्पर्धकानी नोंदणी करुन प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पांडुरंग पवार यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post