Showing posts with label परभणी. Show all posts
Showing posts with label परभणी. Show all posts
पुर्णा दंगल प्रकरणी शासकीय फिर्यादी वरुन ५४ आरोपीं विरोधात गुन्हें दाखल..

पुर्णा दंगल प्रकरणी शासकीय फिर्यादी वरुन ५४ आरोपीं विरोधात गुन्हें दाखल..


  • नगरसेवक हाजी कुरेशी व विक्रम कदम यांनी परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादी वरुन ७४ आरोपीं विरोधात गुन्हें दाखल

पुर्णा :-  शहरात काल शनिवार दि.२५ अॉगस्ट रोजी दुपारी ०२-३० ते ०४-०० वाजेच्या दरम्यान बसस्थानक परिसरात एका शाळकरी मुलीला लागलेल्या गाडीच्या धक्क्यावरुन शहरात उसळलेल्या दंगलीत शहरातील अशोक रोड,किंग कॉर्नर,नांदेड टी पॉईन्ट,अन्य परिसरांमध्ये गैर कायद्याची मंडळी जमवून दगडफेक करीत अडथळा निर्माण करुन शासकीय कर्मचाऱ्यास दुखापत करुन शासकीय वाहणांचे नुकसान केल्या प्रकरणी शासना तर्फे पोउपनि.गणेश राठौड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आज रविवार दि.२६ अॉगस्ट रोजी शे.नईम शे.सकुर,शे.नासेर शे.हमीद,मो.सादीक कुरेशी,मो.सिध्दीक कुरेशी,तुकाराम कदम,नईम बेग,भारत बुरड,राजु सोळंके,शे.अकरम शे.हबीब,विष्णू कदम,अतुल बाबर,सोमनाथ शिराळे,अक्षय कहाते,कैलास पिडगे,गोविंद सोलव,पडोळे,गणेश सोलव,किशन सोलव,कल्याण कदम,मुंजा कदम,मोसिन कुरेशी,सौरव जोगदंड,अभी कदम,कामेश अंबोरे व इतर २० ते ३० आरोपीं विरोधात गुरनं.१३१/१८ चे कलम ३३३,३३५,१४३,१४७,१४९,३३७,३३६,४२७ भादवी तसेच कलम १३५ मुंबई पोलीस कायदा,कलम ७सा.म.नु.प्र.का.कलम ७ क्रिमीनल लॉ ॲमेन्डमेन्ट ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून उसळलेल्या दंगली नंतर समाजकंठकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचे नांदेड टि पॉईन्ट परिसरातील आर्यन वे ब्रिज काट्या जवळील शिवसेना कार्यालयाची प्रचंड तोडफोड करुन कार्यालयाची नासधूस केल्या प्रकरणी त्यांचे बंधू विक्रम विजयकुमार कदम यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान रा.काँ.नगरसेवक हाजी कुरेशी,अमजद मनीयार,सुमेर ॲटोमोबाईल्सचा मालक,सिध्दीकी कुरेशी,सुमेर कुरेशी,शे.मुजाहीद उर्फ मुज्जू,सना जनरल स्टोअर वाला,फारुख गॕरेजवाला,महाराष्ट्र ॲटो मोबाईल्सवाला,स.मुजाहीत स.डाउन,डायमंड मटन शॉपवरील नौकर,एमआयएम कार्यकर्ता शेख अकरम,म.शफीक म.रफीक,शे.समीर शे.जाफर,करीम खान,इलियास चाऊस,असलम नुरीवाला, व इतर सोबतचे ५० ते ६० आरोपीं विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं.१३०/१८ चे कलम ३२४,१४३,१४८,१४९,४५२,४२७,भादवी सह मपोका कलम १३५ क्रि.लॉ.अ.ॲक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून नगरसेवक हाजी कुरेशी यांना शाळकरी मुलीस गाडीचा धक्का लागलेच्या कारणावरुन झालेल्या मारहान प्रकरणी आरोपी सोमनाथ सोलव,किशन सोलव,पडोळे,गोविंद,कैलास पिडगे,सोमनाथ शिराळे,अतुल बाबर,अक्षय कहाते,कल्याण कदम,मुंजा कदम,विष्णू कदम,पप्पू कदम,विक्की कदम,आदी आरोपीं विरोधात कुरेशी यांनी पुर्णा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं.१२९/१८ चे कलम ३२६,१४३,१४८,१४९,सह मपोका कलम १३५ क्रि.लॉ.ॲक्ट प्रमाणे गुन्हें दाखल करण्यात आले असुन जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी सुधाकर रेड्डी,पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुनील ओव्हळ यांनी व सहकारी अधिकारी प्रविण धुमाळ,चंद्रकांत पवार,गणेश राठौड,तसेच सहकारी कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीने परिस्थिती अत्यंत काटेकोरपणे हाताळल्याने आज शहरातील परिस्थिती पुर्वपदावर आली असून शहरात सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे
राष्ट्रीय महामार्ग क्रं.09 नविन 65 सोलापुर ते कर्नाटक सरहद्द पर्यंत चालु असलेले रस्त्याचे काम संथगतीने व दर्जाहीन होत असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्याचे खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केंद्रिय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटुन चर्चा केली

राष्ट्रीय महामार्ग क्रं.09 नविन 65 सोलापुर ते कर्नाटक सरहद्द पर्यंत चालु असलेले रस्त्याचे काम संथगतीने व दर्जाहीन होत असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्याचे खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केंद्रिय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटुन चर्चा केली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रीय महामार्ग क्र.09 नविन 65 सोलापुर ते कर्नाटक सरहद्द पर्यंत चालू असलेल्या रस्त्याचे काम  संथगतीने व दर्जाहीन होत असल्याने उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेटू घेऊन या संदर्भात  चर्चा केली.
राष्ट्रीय महामार्ग क्र.09 नविन 65 या महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण आहे.व झालेले काम हे अत्यंत दर्जाहीन आहे.यामुळे अपघात होऊन अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी पडत आहेत.सातत्याने पाठपुरावा करून सुध्दा या कामास योग्य ती गती मिळत नाही.व त्याचा दर्जाही सुधारला जात नाही.या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.याद्वारे केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.व संबंधित ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीचा डाग पारधी समाजातील युवकांनी पुसून काढावा सह्याद्रि फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज

शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीचा डाग पारधी समाजातील युवकांनी पुसून काढावा सह्याद्रि फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीचा डाग पारधी समाजातील युवकांनी पुसून काढावा असे प्रतिपादन सह्याद्रि फाउंडेशन उस्मानाबादचे संस्थापक अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील जयभवानी नगर मधील समाज मंदीरात *सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद* यांच्या वतीने येथील युवकांचा  प्रतिकूल परिस्थीवर मात करुन उच्च शिक्षणाकडे वाटचाल करीत असल्याबद्द्ल अजय दादासाहेब काळे व महेश दादासाहेब काळे यांचा व यांच्या आईवडीलांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी या समाजातील ढोकीचे सरपंचपदी निवड झाल्याबद्द्ल नानासाहेब चव्हाण तर गोपाळवाडी येथे पोलिस पाटील पिंटु मच्छिंद्र काळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन पं.स.सदस्य संग्राम देशमुख,
माजी उपसरपंच अमर समुद्रे,आप्पा कांबळे,डी.एम. पाटील,पत्रकार अरुण देशमुख,मंगेश तिवारी,तानाजी माळी,पोलिस पाटील राहुल वाकुरे-पाटील,बालाजी सुरवसे,फारुक शेख,जालिंदर पवार,नाना सोनटक्के, मोहन ढवारे,बाळु मोरे,मारुती रोकडे,पिंटु कसबे, सुरज धाबेकर,निखिल जाधव,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह्याद्रीचे कार्यकारी संचालक गजानन पाटील यांनी केले.या कार्यक्रमास महीला,युवक व ग्रामस्थ संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरुम येथील बाबुराव शेळके गुरुजी यांचे दुःखद निधन

मुरुम येथील बाबुराव शेळके गुरुजी यांचे दुःखद निधन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव बाबुराव सिद्धप्पा शेळके(वय 77)यांचे दुःखद निधन झाले.लातूर येथील खाजगी रुग्णालयात गांधी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने उचारादरम्यान दि.9 ऑगस्ट रोजी चार वाजता निधन झाले.ते मुळ मुरुम येथील शेळके गल्लीतील असून ते गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना मराठवाडा शिक्षक संघटना,उमरगा येथील भारत शिक्षण संस्था ते मुरुमच्या नगर शिक्षण विकास संस्थेत 1988 पासून कै.माधवराव (काका)पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,औसाचे आमदार बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,जिल्हा बँकेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या समवेत आजतागायत सचिव या पदावर कार्यरत होते.त्यांच्या वरती त्यांच्या मुळगावी मुरुम येथे दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नारळी मठात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात्य दोन मुले,तीन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
लोहारा शहर व तालुक्यात मराठा,धनगर,मुस्लीम,  लिंगायत आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद

लोहारा शहर व तालुक्यात मराठा,धनगर,मुस्लीम, लिंगायत आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद


इकबाल मुल्ला
लोहारा :-  सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्रबंदला लोहारा शहरात व तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला.मराठा,मुस्लीम,धनगर,लिंगायत,
समाजासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनीमोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.लोहारा शहरासह तालुक्यातील सास्तुर,माकणी,जेवळी,कानेगाव,कास्ती,भातागळी,हिप्परगा रवा,आष्टामोड,आष्टा कासार,धानुरी,नागुर,
सालेगाव,तावशीगड,यासह अनेक गावे कडकडीत बंद ठेवून मराठा,धनगर,मुस्लीम,लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाठींबा दिला.
सकाळी सर्व जातीधर्माच्या नागरिकांना बंदचे आवाहन केले.त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली.लोहारा शहरातील बसस्थानकासमोर टायर जाळुन आंदोलकांनी तिव्र भावना व्यक्त केली.
शिवाजी चौकात आंदेलक एकत्र आले.व शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढुन तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मुख्यंत्री यांच्या नावे आरक्षण मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे कि,मराठा आरक्षणासाठी बलिदान झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी,तसेच कुटुंबातील एकास शासकीय सेवेत सामावून घ्यावे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरबी समुद्रातील पुतळ्याची उंची एक इंच ही कमी करू नये,आरक्षणाच्याया लढ्यात  मराठा व इतर समाजातील व्यक्तीवरील सर्व खोटे गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत,तसेच मराठा,मुस्लीम, धनगर व लिंगायत समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे यासह आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
 या आंदोलनाला सर्व पक्षीयांनी पाठींबा दिला.पोलीस निरिक्षक सर्जेराव भंडारे,पोलीस उपनिरिक्षक गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवाजी चौकात लोहारा ठाण्याच्या वतीने आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.


या आंदोलनात राहुल पाटील,किशोर साठे,अशोक भाऊ जवळगे,अमोल पाटील,नितीन पाटील,शिवाजी अप्पा कदम,अँड.दादासाहेब पाटील,बाळासाहेब पाटील,शाम नारायणकर,मोहन पणुरे,शब्बीर गवंडी, आयुब अब्दुल शेख,मुक्तार चाऊस,अविनाश माळी, आरीफ खाणापुरे,दादा मुल्ला,हरी लोखंडे,नेताजी गोरे,प्रकाश भगत,वंदना भगत,शितल राहुल पाटील,
अश्वीनी पाटील, शरीफा सय्यद,नाजमिन शेख,रंजना आसुरे,गिरीश भगत,नेताजी शिंदे,सलीम शेख,महेबुब गवंडी,लक्ष्मण रसाळ,राम मोरे,विजय लोमटे,विठ्ठल साठे,नितीन पाटील,श्रीकांत भरारे,विष्णु नारायणकर,
आस्लम खानापुरे,तानाजी पाटील,आयुब हबीब शेख,
उमेश गोरे,नरदेव कदम,शरद कदम,परमेश्वर सुर्यवंशी, बाबुराव कदम,दत्ता जावळे पाटील,आश्फाक शेख,
ताहेर पठाण,यांच्यासह मराठा,धनगर,मुस्लीम,
लिंगायत,समाजातील नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शहरात व तालुक्यात पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
2018-19 वर्षाचा स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा लोहार हायस्कुल, लोहार येथे होणार- जनार्दन इरले (जिल्हा संघटन आयुक्त)

2018-19 वर्षाचा स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा लोहार हायस्कुल, लोहार येथे होणार- जनार्दन इरले (जिल्हा संघटन आयुक्त)



  • लोहारा हायस्कुल लोहारा येथे तालुकास्तरीय स्काऊट-गाईड उजळणी वर्ग संपन्न

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा हायस्कुल येथे तालुकास्थरिय स्काऊट-गाईड उजळणी वर्ग घेण्यात आला.
यावेळी लोहारा हायस्कुल येथील स्काऊट-गाईड मास्टर वैजनाथ पाटील व सतीश जट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन व ध्वजारोहण करण्यात आले.व तसेच राज्य पुरस्कार मिळवलेले मराठवाड्यातील एकमेव ट्रेनर(कब) दिपक पोतदार यांनी अनमोल मार्गदर्शन केले.कब-बुलबुल,स्काऊट-गाईड,रोव्हर-रेंजर यांच्या अभ्यासक्रमाबद्दल व परिक्षेबद्दल त्यांच्याकडून सखोल मारदर्शन झाले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा संघटन आयुक्त जनार्दन इरले यांनी राष्ट्रीय स्थरावर होणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली.तसेच यावर्षीचा जिल्हा स्काऊट-गाईड मेळावा लोहारा हायस्कुल,लोहारा येथे यावर्षी डिसेंबर मध्ये होणार असल्याचे जाहीर केला. या मेळाव्यास सर्व शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले लोहारा विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव,प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एन.पांचाळ,राष्ट्रपती गाईड पुरस्कार प्राप्त श्रीमती आर.ए.पठाण,अदि उपस्थित होते.यावेळी लोहारा हायस्कुल येथील स्काऊट-गाईड मधील गोल्ड मेडल पुरस्कार प्राप्त 17 विध्यार्थ्याचे व त्यांचे मारदर्शक स्काऊट मास्टर वैजीनाथ पाटील व सतिश जट्टे यांचा सत्कार  करण्यात आला.
2019 मध्ये उत्तरअमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जाम्भोरीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून 3 स्काऊट शिक्षकांची निवड झाल्याने व्ही.एन.क्षीरसागर,बी.के. खामकर,एम.एस.निकम यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास लोहारा तालुक्यातील स्काऊट मास्टर व्ही.बी.राठोड,एम.व्ही.बोकडे,एम.एस.पांढरे,एम.डी. सूर्यवंशी,यांच्यासह स्काऊट मास्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतीश जट्टे यांनी केले.तर आभार आनंद देशेट्टे यांनी मानले.
विविध प्रलंबीत मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी   लोहारा तहसील कार्यालया समोर संप करुन ठीय्या आंदोलन केले

विविध प्रलंबीत मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी लोहारा तहसील कार्यालया समोर संप करुन ठीय्या आंदोलन केले


लोहारा/प्रतिनिधी :- विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे.या संपात मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले आहेत.दरम्यान
लोहारा तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.या संपामुळे तहसील,पंचायत समिती कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.परिणामी नागरिकांची कामे खोळंबली असून अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
        सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा,जुनी पेन्शन योजना चालू करावी,पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा,सेवा निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे,खासगीकरण बंद करावे,रिक्तपदे त्वरीत भरण्यात यावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सलग तीन दिवस संप पुकारला आहे.तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी संपात मोठा सहभाग घेतल्यामुळे तहसील,पंचायत समिती यासह अन्य कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.संपात सहभागी होऊन तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.प्रविण निंबाळकर, पी.एम.चौगुले,श्रीनिवास पाटील,अशोक शिंदे,बालाजी  चामे,महादेव जगताप,किरण निंबाळकर,मदन  सोमवंशी,संभाजी बिराजदार,ए.एस.रांजणकर, एस.डी.पांचाळ यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
      शहरातील ग्रामीण रूग्णालयातील परिचारक व कर्मचारी संपावर गेल्यामुळे रूग्णाची गैरसोय झाली. उमाकांत डिग्गे,उमाकांत,संतोष मस्के,चांदणी मोरे, वनिता कोळी,पूजा घोडके,ज्योती पाटील,आदिनाथ फुलसुंदर,मंगल कोळगे,अनिता टिकांबरे,महादेव सिरसाट आदी संपात सहभागी झाले होते.
मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु शाळेत सह्याद्री फाऊंडेशन्स तर्फे 1098 टोल फ्री नंबरची जनजागृती मोहीम व गुणवंत विद्मार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु शाळेत सह्याद्री फाऊंडेशन्स तर्फे 1098 टोल फ्री नंबरची जनजागृती मोहीम व गुणवंत विद्मार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्यावतीने शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी अँड हायस्कुल येथे *1098* या चाईल्ड लाईन टोल फ्री नंबर जनजागृती मोहीम व गुणवंत विद्मार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन डॉ.दीग्गज दापके देशमुख,डॉ. वसुंधरा दिग्गज दापके,ईफ्तेखार पटेल,बिलाल रजवी, डॉ.अरशद रजवी,बिलाल काझी,पत्रकार सलीम  पठाण,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी


अँड हायस्कुल चेअरमन हाफीझ अलीमोद्दीन,अदि उपस्थित होते.यावेळी अक्सा चौक ते शम्स चौका पर्यंत आपल्या स्व:खर्चाने वृक्षरोपन व अक्सा चौकात नागरीकांसाठी वाचनालय सुरु  केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते व तरुण नेते *असलम मुलाणी* यांचा सत्कार मौलाना अबुल कलाम आझाद संस्थेकडुन *डॉ.दिग्गज दापके व डॉ.वसुंधरा दापके* यांच्या हस्ते करण्यात आला,या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी /शिक्षक/पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
नागुर येथील तलाठी सांलुके शेतीची फेरफार नोंद घेण्यास टाळा टाळ करीत असल्याने दि.15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार

नागुर येथील तलाठी सांलुके शेतीची फेरफार नोंद घेण्यास टाळा टाळ करीत असल्याने दि.15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील नागुर येथील तलाठी डी.पी.सांलुके शेतीबाबतचे फेरफार कायदेशीर वारसांचे नांवे घेण्यासाठी टाटाळ करीत आहेत.तरी वारसांची नोंद घ्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर दि.15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन  साहेबराव दगडु कांबळे यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,मि नागुर येथील रहिवाशी असुन आमची वडीलोपार्जी कब्जेवहीटीतील
जमीन सर्वे 8/1 मध्ये 00 हे 30 आर ज्याचा आकार 0.98 पैसे एवढी जमीन वडील दगडु हरीबा कांबळे यांच्या नावावर आहे.
माझे वडील दगडु हरीबा कांबळे रा.नागुर ता.लोहारा जि.उसमानाबाद हे दि.2/10/2004 रोजी मयत झाले असुन त्यांच्या पाश्चात नागुर येथील वरील सर्वे नं.8/1 मधील शेतीबाबतचे फेरफार कायदेशीर वारसांच्या नावे घेण्यासाठी मि नागुर सज्जाचे तलाठी डी.पी.
सांलुके यांच्याकडे एक वर्षापुर्वी रितसर सर्व  कागदपत्रे व अर्ज दाखल केला आहे.परंतु तलाठी सांलुके हे ऑनलाईन नेट बंद आहे.,मी बाहेर गावी आलो आहे.नंतर तुमचे काम करतो असे म्हणुन वारंवार फेरफार घेण्याबाबत टाळाटाळ करीत आहेत.
त्यामुळे मला नाहक आर्थिक व मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच मला प्रधानमंत्री पिक विमा योजना,नुकसान भरपाई,अनुदान,शेतीजमीनीची मोजणी,हद्द कायम करणे,यासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासुन वंचीत रहावे लागत आहे.
माझ्या पाश्चात वयोवृध्द आई,पत्नी,दोन मुली,असा परिवार आहे.मी अनेकवेळा तलाठी सांलुके यांना फेरफार घेण्याबाबत विनंती करुनही ते चालढकल करीत आहेत.त्यामुळे दि.14 ऑगस्ट पुर्वी माझ्या नावे जमीनीची फेरफार नोंदीची कार्यवाही पुर्ण करावी,
अन्यथा दि.15 ऑगस्ट रोजी मी कोणत्याही क्षणी लोहारा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असुन माझ्या जीवाला कांही बरे वाईट झाल्यास तलाठी सांलुके व महसुल विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाची प्रत लोहारा पोलीस ठाणे यांनाही देण्यात आली आहे.
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी संजय वाघमारे यांची निवड

अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी संजय वाघमारे यांची निवड


पूर्णा -{राजेश वालकर} रविवार दि.05 रोजी  शासकीय विश्रामग्रह पूर्णा येथे अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव बाळासाहेब पांडे यांच्या अधीकार पत्राद्वारे पूर्णा तालुकाध्यक्ष पदी संजय वाघमारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी बाळासाहेब पांडे बोलतांना म्हणाले की,आपली संघटना संपूर्ण भारत देशामध्ये शासन आणि प्रशासन यांना लिखित कळवून कायदेशीर मार्गाने कार्यरत असल्याचे सांगितले सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधितज्ञ यांच्या मार्फत तत्पर कार्यवाही करून जनतेचे हक्क-अधिकार मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत असल्याचे सांगून अनेक तक्रारीची सोडवणूक केल्याचे उदाहरण देत पांडे यांनी संघटनेची भूमिका विशद केली. यावेळी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष नाथा पाटील कुऱ्हे,महाराष्ट्र संघटक अशोक सुरुशे, महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष यशोदा कोळी,सचिव शारदा आबादार,हिंगोली तालुकाध्यक्ष भिकाजी मोहनकर,परभणीचे के जी कीर्तने उपस्थित होते. तर माहेबूब कुरेशी,विनायक देसाई,मधुकर मूळे, गिरीश कदम,हबीब बागवान,बळीराम माटे,उत्तम जोंधळे,अनिल छडीदार,नागेश आहिरे,पंचशीला खंदारे,मधुरा गरड यांनी पुढील कार्यास शुभेच्छा देत वाघमारे यांचे अभिनंदन केले.
आता बंजारा समाज ही आरक्षणासाठी मैदानात उतरुण आंदोलन करणार — महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष किशोर पवार

आता बंजारा समाज ही आरक्षणासाठी मैदानात उतरुण आंदोलन करणार — महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष किशोर पवार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आता बंजारा समाज ही आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याची माहीती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष किशोर पवार यांनी दिली.
यावेळी किशोर पवार म्हणाले कि,भारत सरकारने बंजारा समाजाला वेगवेगळ्या राज्यात वेगळे आरक्षण दिले आहे.या मुळे या समाजाचे फार मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे.
 आंध्रप्रदेश मध्ये एस.टी.कर्नाटक राज्या मध्ये एस.सी.वं महाराष्ट्र राज्यामध्यो मध्ये वी.जे.एन.टी
 असे का?
   बंजारा समाज हा अतिशय गरीब आहे या समाजाला आर्थिक सामाजिक,राजकीय समानता मिळत नाही,महाराष्ट्र शासनाने 70 वर्षे आमचा हक्क हिसकावून घेतले आहे.आज केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे.आपण सर्व जातील भारतात समान आरक्षण दिले आहे.त्या प्रमाणे एस.टी.मध्ये सर्व भारतातील बंजारा समाज ला समाविष्ट करण्यात आले पाहिजे,
   अन्यथा बंजारा आपले आंदोलन उग्र रूप धारण करून भारत बंद करुन,न्याय मागेल व भारतात हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात येईल.
      बंजारा समाज गेली कित्येक वर्ष भटक्या विमुक्तांसाठी,आरक्षणाची मागणी करीत आहे,परंतु सरकारचे या समाजाकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. क्रिमिलिअर मधूम भटके विमुक्त,बलुतेदार यांना काढण्याची मागणी,गेली चार वर्ष सातत्याने आम्ही करीत अजून,प्रत्येक अधिवेशनामध्ये विधानपरिषद मध्ये लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना,मंत्रांनी एका महिन्यात निर्णय घेवू असे वारंवार आश्वासन दिले.
    पण ते पाळले गेले नाही,याचाच अर्थ या संदर्भात मा.सभापती महोदवांनी शासनास फाईल, मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभाग,विधी विभाग, राज्य मागास आयोग,असा खेळ चालू आहे.खरे तर हा  गुन्हा आहे.
   एम.पी.एस.सी मध्ये प्रचंड घोटाळा चालू असून, विशेषता: धनगर,वंजारी,आणि बंजारा समाजातील मुले मुली खेळाडू डावलल्या जात असून,लाखो रुपये घेऊन,कमी मार्कवाल्यांना निवड करून भरती करणे चालू आहे.मागासवर्गीयांना डावलून या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड होत आहे.
   प्रमोशन मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निर्णय होवू नाही,सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे.ओबीसी सह बंजारा भटके विमुक्त,बारा बलुतेदार,मराठा कुणबी या समाजाची जातीवार जनगणना करावी,या मागणीकडे सुद्धा शासन दुर्लक्ष करीत आहे.बंजारा भटके-विमुक्त यांना वेगळा आरक्षण दयावे.
   या मागणीसाठी किशोर (भाऊ) पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदीप (भाऊ) राठोड जय हिंद करिअर अकॅडमी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आंदोलन मुंबई येथे करण्यात येणार आहे.  बंजारा समाज मैदानात उतरणार असून,मुंबई आझाद मैदान येथे दि. 8 ऑगस्ट 2018 रोजी प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत.अशी माहीती किशोर पवार यांनी दिली.
अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पंचनामा करताना भरधाव येणाऱ्या वाहानाने तालाठ्यास धडक देऊन गंभीर जख्मी केले.

अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पंचनामा करताना भरधाव येणाऱ्या वाहानाने तालाठ्यास धडक देऊन गंभीर जख्मी केले.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा ते जेवळी जाणाऱ्या रस्त्यावर भानुदास चव्हाण महाविद्यालय समोर अवैद्य वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनाचा पंचनाना करीत असताना भरधाव येणाऱ्या वाहनाने तलाठ्यास धडक देवुन गंभीर जख्मी केले.हि घटना दि.6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजायच्या सुमारास घडली आहे.
पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहीती अशी कि,
लोहारा ते जेवळी जाणाऱ्या रस्त्यावर भानुदास चव्हाण विद्यालयासमोर अवैध्य वाळुच्या गाडीचा पंचनामा करीत असताना दि.6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजायच्या सुमारास महेंद्र पिक अप गाडी क्र.MH. 25 P. 4689 चा चालक सैफन बहादुर शेख रा.कार्ले ता.तुळजापुर यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवुन फिर्यादीस व तलाठी विद्यादर कोळी यास जोरात धडक दिल्याने यात तलाठी विद्यादर कोळी गंभीर जख्मी झाले.यास दोन्ही हातास,उजव्या पायास,छातीस,डोक्यास जबर मार लागला आहे.तलाठी विद्यादर कोळी यांच्यावर शहरातील ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात लोहारा तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.यावरुन आरोपी पिक अप वाहन चालक सैफन बहादुर शेख याच्याविरुध्द लोहारा पोलीस ठाण्यात कलम 279,337,338,
भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.नि.सर्जेराव भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एस.बोदमवाड हे करीत
आहेत.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय,व रुपामाता माध्यमिक विद्यालय पाडोळी(आ.) येथे पालक सभा संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय,व रुपामाता माध्यमिक विद्यालय पाडोळी(आ.) येथे पालक सभा संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व रुपामाता माध्यमिक विध्यालयात दि.4 ऑगस्ट रोजी   शैक्षणिक वर्ष 2018 —19 करिता माता पालक  व पालक शिक्षक संघाची स्थापना करण्याच्या उदेद्शाने पालक सभा घेण्यात आली.
     या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरवसे सर होते.प्रमुख म्हणुन मनसुळे सर, शिक्षणप्रेमी नागरीक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी धनंजय पाटील,माजी पालक समिती सदस्य चव्हाण गजेंद्र,तसेच यशस्वी उद्योजक व गावचे प्रतिष्ठित नागरीक राजकुमार झिरमीरे,अदि उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्याना अध्ययनात येणाऱ्या अडचणी,गुणवत्ता विकास आणि शालेय शिस्त या विषयावर पालक  — शिक्षक याच्यात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. पालकातुन ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली कि, यापुढे अशाच प्रकारच्या सभा दर दोन महिन्याला घेण्यात याव्या असे पालकांनी सुचविले.तेव्हा मुख्याध्यापक सुरवसे यांनी म्हटले की,जर अशा प्रकारचा उदंड प्रतिसाद पालकांचा मिळाल्यास यापुढे दर दोन महिन्याला आपण पालक सभा निश्चित घेऊ असे सांगितले.यावेळी राजकुमार झिरमिरे व दिपक पवार,अदिंनी सविस्तर मार्गदर्शन केले


या पालक सभेत शासन निर्णयाप्रमाणे प्रथमत: सर्व पालकांना पद्सिद्ध कायम सदस्य करण्यात आले.व उपस्थित पालक वर्गातून चालू शैक्षणिक वर्षाकरिता पालक व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली.यात संघाचे मुख्याध्यापक हे पद्सिद्ध अध्यक्ष असल्याने बोचरे श्रीहरी आगतराव यांना पालक संघाचे उपाध्यक्ष तर श्रीमती गाते प्रिया कल्याण यांची माता पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते  निवड करण्यात आली.तर दिपक पवार,मंजुळा माने, किसन काळे,गरड मनिषा,अनिता राऊत,रेशमा गुंड, माया पवार,यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.या निवडीनंतर माता पालक व पालक शिक्षक संघातील सर्व नुतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक ए.एन.गुंड, एस.जी.सुर्यवंशी,पी.डी.सुर्यवंशी,पी.व्ही.ईर्लेकर,आर. एन,राख,श्रीमती व्ही.एल.माळी,श्रीमती एम.एस.गुंड, सोनकटले सर,बी.एम शेख,पवार सर,अदिंनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे  मुख्याध्यापक आर.डी.सुरवसे व सुत्रसंचलन शेख सर यांनी केले.तर आभार शाळेचे मुख्याध्यापक एस.एम. मनसुळे यांनी  मानले.या कार्यक्रमास महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोहारा माजी तालुका अध्यक्ष दिनकरराव जावळे पाटील यांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश,रॉष्ट्रवादी कॉग्रेसला मोठा हादरा

राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोहारा माजी तालुका अध्यक्ष दिनकरराव जावळे पाटील यांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश,रॉष्ट्रवादी कॉग्रेसला मोठा हादरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व शंकरराव जावळे पाटील पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकराव जावळे पाटील यांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे दि.5 ऑगस्ट रोजी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रमुख म्हणुन युवा नेते रोहन देशमुख उपस्थित होते.
यांचा लोहारा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे.यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे लोहारा तालुक्यात रॉष्ट्रवादी कॉग्रेसला मोठा फटका बसला आहे.
यावेशी लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक अजित ढोणे,कृषी उत्पन्न बाजार समिती उस्मानाबाद चे तज्ञ संचालक लिंबराज साळुंखे,
गुणवंतराव चव्हाण,अदि उपस्थित होते.
लोहारा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवात खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रथम

लोहारा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवात खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रथम


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- नेहरु तारांगण वरळी मुंबई ब शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा गट  शिक्षणाधिकारी श्रीमती तबसुम सय्यदा यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी डी.एम.जंगम,
विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव यांनी दि.4
 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा लोहारा गटशिक्षण कार्यालयात घेण्यात आल्या.या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धत लोहारा तालुक्यातून खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रथम क्रंमाक मिळविला.या स्पर्धेत तिन शाळेनी सहभाग घेतला होता.


यावेळी स्वच्छता व आरोग्य,पर्यावरण संवर्धन,हरित उर्जा व डीजीटल भारत,या चार विषयावर नाटयोत्सव स्पर्धा घेण्यात आली.खेड येथील प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती एम.एल.चव्हाण यांनी स्वतःपर्यावरण संवर्धन विषयावर नाटिका लिहली.व मार्गदर्शन दिग्दर्शन ही केले.या शाळेतील इयत्ता 6 वी व 7 वी मधील आठ विदयार्थ्यानी ही नाटिका साभिनय उत्कृष्ट रित्या सादर केली.या शाळेने तालुक्यातुन प्रथम क्रंमाक मिळवुन जिल्हा स्तरावर पात्र होण्याचा बहुमान मिळवला.हि नाटिका यशस्वी करण्यासाठी शाळचे मुख्याध्यापक के.एस.इंगळे, शिक्षक कैलास माणिकशेट्टी,व्ही.ए.लोमटे,एम.एस.
गव्हाळे,बी.के.साठे,एस.ए.कांबळे,एस.ए.गवंडी,अदिंनी परिश्रम घेतले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन एम.जी. वाघमोडे,बालाजी मक्तेदार,डी.एम.पांचाळ,यांनी काम
पाहीले.या यशामुळे प्राथमिक शाळा खेड येथील शिक्षीका श्रीमती एम.एल.चव्हाण यांचे तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
सीबीएसई राष्ट्रीय स्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पद नेट परिक्षेत प्रमोद माने यांचे यश

सीबीएसई राष्ट्रीय स्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पद नेट परिक्षेत प्रमोद माने यांचे यश


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील होळी येथील जि.प.प्रा.शाळेचे प्राथमिक पदविधर प्रमोद कमलाकर माने यांनी सीबीएसई मार्फत राष्ट्रीय स्तरावर सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या नेट या पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे.
प्रमोद माने यांनी जुलै 2018 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत मराठी हा विषय घेवून हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल प्रमोद माने यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मुस्लीम समाजाला शिक्षण व नौकरीमध्ये आरक्षण द्यावे,या मागणी साठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मुस्लीम समाजाला शिक्षण व नौकरीमध्ये आरक्षण द्यावे,या मागणी साठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुस्लीम समाजाला शिक्षण व नौकरीमध्ये 5 % आरक्षण द्यावे,या मागणी साठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.4 ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनास उस्मानाबाद सकल मराठा समाजाने जाहीर पाठींबा दिला.या आंदोलनास्थळी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी
हजेरी राहुन मुस्लीम साजाला जाहीर पाठींबा दिला.
यावेळी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश देशमुख,अदि उपस्थित होते.
या आंदोलन कर्त्यांनी मुस्लीम आरक्षण मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.या निवेदनात म्हटले आहे कि,देशामध्ये रहात असलेला मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,परिस्थिती इतर समाजापेक्षा अंत्यत खालावलेली असुन सदर समाजा पैकी 37 % पेक्षा जास्त लोक दारिद्र्य रेषेखालील जिवन जगत आहेत.हे शासनाच्या सच्चर आयोग,रंगनाथ मिश्रा आयोग,महेमुद रहेमान कमेटी यांनी दाखवुन दिला आहे.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वरील समित्यांनी शिक्षण व नौकरीमध्ये आरक्षण देण्याविषयी सुचित केले आहे.
त्यानुसार तात्कालीन सरकारने अध्यादेशद्वारे शिक्षण व नौकरीमध्ये मुस्लीम समाजाला 5 % आरक्षण दिले होते.हे प्रकरण मा.उच्च न्यायालयात गेले असता मा.
उच्च न्यायालयात मुस्लीम समाजाची शैक्षणिक मागासलेपणा पाहता शासनाने दिलेले 5 % आरक्षण मान्य केले होते.हे आरक्षण लागु करण्यासाठी कायदा करणे जरुरी होते.परंतु भाजप सरकारने जाणुन बुजुन हेतु परस्पर मुस्लीम समाजावर अन्याय केला आहे.
तरी राज्य शासनाने मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात केली आहे.
या आंदोलनात मसुद शेख,खादर खान,समयोद्दीन मशायक,खलीफा खुरेशी,वाजीद पठाण,मैनुद्दीन पठाण,तौफिक शेख,इलियास पिरजादे,बिलाल तांबोळी,हाफीज आलीम शेख,आयुब अब्दुल शेख,
हाजी बाबा शेख,महेबुब गवंडी,अस्लम खाणापुरे,
इकबाल मुल्ला,सत्तार शेख,गफार काझी,उस्मान निचलकर,अन्वर शेख,ईस्माइल शेख,असद पठाण,
आय्याज शेख,खलील पठाण,एजाज काझी,युसुफ शेख,अकबर तांबोळी,फेरोज शेख,बाबा मुजावर,
आयुब हबीब शेख,अश्फाक शेख,यांच्यासह जिल्ह्यातील मुस्लीम समाज मोठ्या संख्येने सहभागी होते.
राष्ट्रवादीची श्रेयवादासाठी घाई 15 वर्षा पेक्षा अधिक निधी भाजप सरकारने दिला — भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांचे राष्ट्रवादीला खले चर्चेचे आव्हान

राष्ट्रवादीची श्रेयवादासाठी घाई 15 वर्षा पेक्षा अधिक निधी भाजप सरकारने दिला — भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांचे राष्ट्रवादीला खले चर्चेचे आव्हान


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते विकासाचे राजकारण करण्या ऐवजी सध्या श्रेयवादाचेच राजकारण करण्यात मशगुल आहेत.भाजपचे केंद्र व राज्यातील शासनाकडुन कामे मंजुर झाली किंवा निधी आला कि,आम्ही आणले म्हणण्याचा सपाटाच लावला आहे.
आता तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी चक्क मंजुर नसलेल्या भुम,परंडा,वाशी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत 10 कोटीचा निधी मंजुर करुन घेतल्याच्या बातम्या दिल्या आहेत.हि कामे मंजुर व शासनाची प्रशासकीय मान्यता नसतानाच,इतकेच काम तर जे केलेले नाही त्याचे स्वत:चे फोटो टाकुन फ्लेकेस/ग्राफ्किस करुन सोशल मिडीयावर टाकले.आता तर श्रेयवादाची हद्दच पार केली यांनी.
राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री ना.
पंकजाताई मुंडे यांच्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हे विभाग आहेत.राष्ट्रवादीच्या आमदारांनी ज्या कामांची मंजुर व निधी आणला म्हणुन प्रसिध्दी दिली आहे.ती कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील नाहीत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत संशोधन व विकास या सदराखाली रस्ते दर्जोत्रतीची कामे घेता येतात.या कामांचा फोटो ठरवुन पदाधिकाऱ्यांच्या नावांसह जिल्ह्यातील संबधीत अधिकाऱ्यांना कळविले जाते.
ना.पंकजाताई मुंडे यांनी आ.सुजितसिंह ठाकुर यांना 25 कि.मि. व आ.मधुकरराव चव्हाण यांना 5 कि.मि.
व आ.ज्ञानराज चौगुले यांना 4.70 कि.मि.या प्रमाणे कोटा दिला असुन त्यातुन आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या शिफारसीने रस्त्याचे कामे प्रस्तावित असुन या कामांना अद्याप मंजुरी व निधी नाही.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गल्ली ते दिल्ली सत्ता असताना कांही केले असते तर, या भागातील जनतेला आज तुमच्या दुष्कर्माची फळे भोगावी लागली नसती.आता किमान फुकटचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचे राजकारण तरी करु नका,आघाडी सरकारच्या एकुण 15 वर्षा पेक्षा अधिक निधी कमी काळात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने या भागाला दिला आहे.विकास कामे व निधी आणण्याचे चर्चेचे खुले आव्हान आ.सुजितसिंह ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकात केले आहे.
उस्मानाबाद शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

उस्मानाबाद शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाऊंडेशन व चाईल्ड लाईन यांच्यावतीने रुपामाता विद्यालय व ईरा इंटर नँशनल स्कुल मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके दिग्गज देशमुख,रुपामाता समुहाचे अध्यक्ष अँड.व्यंकटराव गुंड,अदि उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे औचित्य साधुन निराधार व अनाथ मुलांना मदत करणाऱ्या 1098 या टोल फ्रि नंबरची जनजागृती करण्यात आली.व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सह्याद्रि चे समन्वयक गजानन पाटील,
रुपामाताच्या मुख्याध्यापीका रुपाली यादव,बालाजी घोडके,प्रशासकीय अधिकारी भोसले,ईराचे मुख्याध्यापक आरुण सर्वपल्ली,जी.बी.गुंड,एस.एल.
श्रीखंडे,यांच्यासह नागरीक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाने उघडीप दिल्याने पाण्या अभावी शेकऱ्यांचे पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.

पावसाने उघडीप दिल्याने पाण्या अभावी शेकऱ्यांचे पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मागील पंधरा दिवसापासून पावासाने उघडीप दिली आहे.लोहारा तालुक्यातील हलक्या प्रतीच्या जमिनीतील फुलोऱ्यात व फळधारणेत आलेली मूग, उडीद, सोयाबीन पिके पावसाअभावी माना टाकू लागले आहेत.परिणामी उत्पन्नात घट होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
          मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी उरकून घेतली. पिकांची उगवण चांगली झाली असतानाच पावसाने तब्बल वीस दिवस दडी मारली. त्यामुळे  कोवळी पिके करपण्याच्या मार्गावर होती. परिणामी दुबार पेरणीचे  संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. ज्यांच्याकडे सिंचनांच्या सुविधा आहेत असे शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करत होती. प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर पावसाने तालुक्यात सर्वदूर हजरी लावली. पिकांना जिवदान मिळाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. 11 ते 16 जुलैदरम्यान सलग सहा दिवस तालुक्यात भिज पाऊस झाला. या भिज पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओल झाल्याने पिकांना उभारी मिळाली मात्र वाढ खुुंटली आहे.  पावसाच्या पुनार्गमनामुळे खरिपांच्या पिकांनी शेतीशिवार बहरल्याने उत्पन्नात मोठी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर पाणे कुरतडणाऱ्या आळ्यांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला. अशा वेळी शेतकऱ्यांनी महागामोलांची किटकनाशक औषधी घेऊन पिकांवर फवारणी केली. सलग पडलेल्या भिज पावसामुळे  पिके जोमाने बहरली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद अडीच तीन महिन्यांचे नगदी पिके आहेत. पावनेदोन महिने झाल्याने सोयाबीन फुलोऱ्यात तर मूग, उडिदाला फळधारणा होत आहे. अशा वेळी पावसाची नितांत गरज असताना मात्र पंधरा दिवसापासून पावसाने गुंगारा दिला आहे. दिवसभर कडक ऊन पडत असून जमिनीतील ओल झपाट्याने कमी होत आहे. काळ्याभूईच्या ठिकाणची पिके तग धरून असले तरी हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके मात्र पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शितकरी हवालदिल झाला आहे.