Showing posts with label अकोला. Show all posts
Showing posts with label अकोला. Show all posts
जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य :  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे

जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे

 


अठरा वर्षाखालील मुले आणि मुलींनी दुचाकी वाहने   चालवणे कायद्याने गुन्हा.

मुर्तीजापुर : महिला व बालक यांच्यावर होणारे अत्याचार जनजागृतीच्या माध्यमातून नियंत्रणात आणणे शक्य आहे. महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना करीता सर्वांनी सजग राहावे.अशी घटना कुठे दिसून येत असल्यास त्याबाबत पोलिसांना कर्तव्य समजून माहिती दिल्यास अत्याचारा ग्रस्तांना मदतीचा हात  देता येईल.वाईट हेतूने केलेल्या 

स्पर्शबाबत(बॅड टच) प्रतिकार करण्याची क्षमता ठेवावी. अठरा वर्षाखालील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दुचाकी वाहने चालवणे तसेच ट्रिपल सीट बसविणे कायद्याने गुन्हा आहे.तेव्हा पालकांनी देखील लहान वयापासूनच आपल्या पाल्यांना कायदा मोडण्याची मुभा देऊ नये.पालकांनी याची दखल घ्यावी.असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान देखील कायद्यात आहे.असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.त्यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेचे आयोजन मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. 

याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच अकोला दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक उज्वला देवकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे थानेदार सुरेंद्र राऊत,माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरवसे यांची उपस्थिती होती.



यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली.याप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शहरातील मान्यवर, महिलावर्ग यांची देखील उपस्थिती होती.याप्रकारे तालुका आणि ग्रामीण भागात विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्यात येणार असल्याचे संदीप घुगे यांनी पुढे बोलताना सांगितले.यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे यांनी देखील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याकरिता विविध उपाय योजनांबाबतची माहिती दिली.सूत्रसंचालन गोपाल मुकुंदे यांनी केले.तर आभार पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी केले.

आईने किडनी दिल्याने  मुलाला मिळाले जीवदान

आईने किडनी दिल्याने मुलाला मिळाले जीवदान



 अमरावती सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण

 मुर्तीजापुर : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या गॅस टँकर चालक मुलास आईने  किडनी देऊन आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणून  मातृत्वासोबत दातृत्वाचा परिचय दिला.आई आपल्या पाल्याचे प्राण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करते हे या घटनेवरून दिसून आले आहे .  

        

तालुक्यातील उमरी अरब येथे राहणारे मुस्ताक बिन मुजफ्फर चाऊस (वय-३९) हे गॅस टँकर चालवुन आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मागील एक वर्षापासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त झाले होते त्यांच्या आजारावर किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता.



त्या अनुषंगाने अमरावती येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आई शकीला बी मुजफ्फर चाऊस (वय-५८) यांनी एक किडनी आपल्या मुलास घेऊन जीवदान दिले.प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनास नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.प्रणित काकडे,डॉ. नयन काकडे ,डॉ.हितेश गुल्हाने ,युरोसर्जन डॉ.राहुल पाटोडे,डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बेलवीर ,डॉ. प्रतीक चिरडे ,बधिरीकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ.बालकृष्ण बागवले ,डॉ.दिपाली देशमुख ,डॉ. जफर अली,डॉ.नंदिनी देशपांडे,डॉ.अंजू दामोदर,डॉ.सुनीता हिवसे आर.एम.ओ. , किडणी समन्वयक डॉ.शीतल बोंडे यांच्यासह संपूर्ण पथकाने महत्त्वपूर्ण जबाबदारीची भूमिका बजावली.


सामाजिक सेवा अधीक्षक सोनाली चौधरी यांनी संपूर्ण कागदपत्राचे पूर्तता करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया निशुल्क करण्यात आली. मुस्ताक बिन मुजफ्फर चाऊस यांची १ डिसेंबर रोजी झालेली किडनी प्रत्यारोपणाची ३३ वी शस्त्रक्रिया  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील शस्त्रक्रिया होती. सदर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची ३३ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये देखील मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा मिळत आहे.

बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क केवळ एक रुपया

बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क केवळ एक रुपया



अकोला : बांधकाम कामगारांना  अर्ज  नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रूपया शुल्‍क  आकारण्‍यात येते व  रीतसर पावतीही  देण्‍यात येते.  त्यामुळे कामगार बांधवांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्‍त डॉ. रा.दे.गुल्‍हाने यांनी केले आहे.


महाराष्‍ट्र इमारत  व इतर  बांधकाम कामगार  कल्‍याणकारी  मंडळाच्‍या असंघटित  कामगारांची  नोंदणी, नूतनीकरण  व विविध  योजना  लाभ वाटपाचे  काम करताना एक रुपया वार्षिक शुल्काव्‍यतिरिक्‍त कोणतेही  अतिरिक्‍त शुल्‍क आकारले जात  नाही. नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनेबाबत अडचण असल्यास कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा कार्यालयाचे मोबाईल क्र. 7576625585 वर संपर्क करावा.


या कामकाजासाठी कोणत्‍याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल  यांची नेमणूक करण्‍यात  आलेली नाही.  बांधकाम  कामगारांना  त्‍यांच्‍या योजनेनुसार   कागदपत्राची तपासणी  करण्‍याकरिता कार्यालयात खिडकीवर दिलेल्‍या तारखेस  व्यक्तिशः उपस्थित राहून मूळ कागदपत्राची  पडताळणी करणे आवश्‍यक आहे. बांधकाम कामगारांनी  इतर कोणत्‍याही  खोट्या बोलण्याला बळी न पडता नोंदणी व  नुतनीकरण  करून घ्‍यावे. तसेच अतिरिक्‍त रक्‍कम मागणी  करणा-या व्‍यक्‍तीविरूध्‍द नजिकच्‍या पोलीस ठाण्‍यामध्‍ये परस्‍पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मा. डॉ. गुल्‍हाने यांनी केले  आहे. 


कार्यालयाचे स्थानांतर..

मंडळाचे कार्यालय सहाय्यक कामगार  आयुक्‍त, अकोला कार्यालयाचे जागेत  होते. आता त्याचे स्‍थानांतर झाले असून कार्यालयाचा नवीन  पत्‍ता  मराठा सेवा  संघ कार्यालय, छत्रपती संभाजी मार्ग, मुर्तिजापूर रोड,  आर.टी.ओ. च्या जुन्या कार्यालयाजवळ, अकोला असा आहे. 


महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज - प्रा. अंजली आंबेडकर

महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज - प्रा. अंजली आंबेडकर



 अकोला : समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाब‌ळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.

 याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेचे स्व. गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुष्प ‘स्त्रियांची सामाजिक वाटचाल’ या विषयावर गुंफतांना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, तर व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, विजया भिरड, सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मान्यवरांचे सत्कार संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा, डॉ. अशोक सोनोने, विजय शिंदे, ॲड. संतोष भाेरे, प्रशांत चाळीसगावकर, किरण चौक, मिलिंद देव, अनिता पळसपगार, अनुश्री उखळकर, सविता राठोड आदींनी केले.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांच्या अधिकाराच्या वाटवाचाल प्रा.अंजली आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण उलगडली. ‘चूल आणि मूल’ पुरते मर्यादित असलेल्या देशातील महिला स्वातंत्र्य चळ‌वळीच्या निमित्ताने प्रथम घराबाहेर पडल्या. 

नोकरी, राजकारणात आल्या. हा क्रांतिकारी आमूलाग्र बदल भारताच्या संविधानाने महिलांना दिला. त्याचे श्रेय घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समितीला आहे. जाती व्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. 

आजच्या काळात महिलांना संपत्तीत मिळालेला समानता, मनाने नको ते लग्न मोडण्याचा आणि एका विशिष्ट प्रौढ वयात लग्न करण्याचा अधिकार त्याकाळी संविधान निर्मितीनंतर घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीपुढे हिंदू कोड बिलामध्ये मांडलेला होता. त्यामुळेच ते फेटाळले गेले होते, हे सर्व स्त्रियांनी समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रा.आंबेडकर म्हणाल्या.

१९७५ नंतर देशात खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चळवळीला गती मिळाली. हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झाले होते. त्याचवर्षी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती. महिलांच्या कार्यक्रमावर महिला पंतप्रधानाने बंदी लावली तर चहूबाजूने टिकेची झोड उठणार, हे लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमावरीस बंदी उठवली. विरोधी पक्षांनीही महिलांच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन त्याचा फायदा घेतला. 


त्यामुळे स्त्री मुक्ती चळवळीला नवी दिशा मिळाली, असे देखील त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. स्वाती दामोदरे यांनी केले. आभार ॲड. धनश्री दामोदरे यांनी मानले.

१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनभोरा येथे ग्रामीण पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांचा जप्त करुन आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक केली.



मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अनभोरा येथील.

लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते (२३) याच्या घरी छापा टाकून त्याच्या कडून विक्रीसाठी ठेवण्यात आलेला १ लाख ८० हजार १२० रुपये किमतीचा १८ किलो १२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक करुन त्याच्या विरूद्ध अपराध क्रमांक ४०१ / २३ कलम २० ब एन डी पी एस अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा


पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, विजय मानकर, गोलंदास लांजेवार, अनिल टोपकर, संजय खंडारे, मनिष मालठाणे, शंकर खेडकर, गणेश ठाकरे घनश्याम सलामे, इरफान अली, महिला शिपाई वर्षा धारपवार यांनी केली.

कमी जोखमीच्या लोकांवरही लक्ष द्या-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

कमी जोखमीच्या लोकांवरही लक्ष द्या-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला : शहरी भागात आरोग्य तपासणी मोहिम राबविल्यानंतर व पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील  अति जोखमीच्या व दूरस्थ संपर्कातील कमी जोखमीच्या व्यक्तींची विगतवारी करा. अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत असतांनाच जे कमी जोखमीचे व्यक्ती आहेत त्यांचेवरही आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  आज येथे दिले.

आज जिल्हा नियोजन भवनात विविध आढावा बैठका घेतल्या. त्यात कोवीड १९ संदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी  विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख,  जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. सुरेश आसोले,  निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, मनपाने शहरात राबविलेल्या आरोग्य  तपासणी मोहिमेत  अद्याप ६८ हजार जणांची तपासणी केली आहे.  तसेच आधीच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या  तपासणीनंतर  निकट संपर्कातील व्यक्ती सोडल्यास  ७९६ लोक हे कमी जोखमीचे व दूरस्थ संपर्कातील आहेत. अशा लोकांच्यातही अन्य आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिक असलेल्या लोकांचे वेगळी विगतवारी करुन  त्यांचेवर विशेष लक्ष आरोग्य यंत्रणांनी द्यावे, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.  तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करा.

डॉक्टर व रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणताही व्यक्ती  आत जाता कामा नये.  तसेच जेवण चांगले नसल्याच्या तक्रारी अद्याप येत आहेत, हा दर्जा सुधारण्यात यावा असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील मृत्यू दर हा चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.

क्षेत्रस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात काही आणखी उपाययोजना असल्यास त्या सुचवाव्या, त्यातील योग्य व चांगल्या उपाययोजनांचा अवश्य विचार केला जाईल, असेही ना. कडू यांनी आश्वस्त केले.  तसेच  येत्या पावसाळ्यात हवामान बदलामुळे होणारे विविध आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणांनी अधिक दक्ष रहावे, असेही ना. कडू यांनी निर्देश दिले.

 यावेळी आ. मिटकरी यांनी सुचना केली की, एकीकडे शहरी भागात  आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळाची आवश्यकता असतांना  ग्रामिण भागात डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून येते. अशा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सुचना त्यांनी केली.
महाकाल सेना संघटना तर्फे रक्तदान शिबीर

महाकाल सेना संघटना तर्फे रक्तदान शिबीर


मूर्तिजापुर : कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे अनेक गोष्टींवर जसा परिणाम झाला आहे तसाच रक्तदानावरी खूपच परिणाम झाला आहे.एकत्रितपणे मोठी रक्तदान-शिबिरे घेण्यात अडचणी येत आहेत आणि लोक विविध गैरसमजामुळे  घाबरून घरी बसत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांतून रोज होणारी ऑपरेशन्स आणि गंभीर आजारांसाठी रुग्णांना रक्त तर लागणारच.

हा विचार करता महाकाल सेना संघटना मुर्तिजापूर व दुर्घवाडा तर्फे दिनांक २७/०३/२०२० रोजी बाबन मल्टीस्पेशालिटी व बाल रुग्णालय येथे रक्त दान शिबीर घेण्यात आले. युवकांच्या उत्साहाने आणि ग्राम. पंचा.दुर्घवाडा गावकऱ्यांच्या सहकार्याने  ४८ ब्याग रक्त दान झाले. कोरोना विषाणूंचे वाढते प्रमाण बघता छोट्या छोट्या तुकड्यांन मध्ये रक्त दान करण्यात आले व रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी घेता व कोरोना मुळे सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून रक्त दान करण्यात आले.

 महाकाल सेना संथापक अध्यक्ष लखनदादा मिलांदे यांच्या नेतृत्वाने  व डॉ.राठोड सर डॉ. नवाब सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले.डॉ. मुरळ सर यांनी रक्तदान करून युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत केले. महाकाल सेना तालुकाध्यक्ष प्रतीक जाधव,शहरप्रमुख आशिष साबळे,शहरसंघटक संदीप संगीले, संघटना उपाध्यक्ष पराग भगत,सचिव महेश सायगन विध्यार्थी महाकाल सेनाचे राजदीप कुकडे,सचिन खडसे,अक्षय बोरे,यश भोरे,अमित सोनोने,भारत अछळा,

आकाश सायगन,कुणाल सुतोने,गौरव गडेकर,हर्षल ठोकळ, उमेश तिवारी,गोलू होटे,शैलेंद्र श्रीवास,रुपेश गुप्ता,मनोज गुप्ता, मुन्ना गुप्ता, गोलू गुप्ता व दुर्घवाडातील शाखा अध्यक्ष महेश खोकले,अक्षय उज्जेनकर, शाम अवघाते,सुधीर गवई,शाम वाघ, आकाश खांडेकर,किशोर बुळडे,मनोज फाटे,कुणाल चंदन,आशिष पंडित,मंगेश दहीहंडेकर,पांडुरंग मालोकर,नारायण अवघते व गावकरी व महाकाल सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून रक्त दान केले. साईजिवन रक्त पेटी यांच्या मार्फत शिबीर घेण्यात आले.
कुरुम के मुस्लिम भाईयो घर मे पढ़ी जुमा की नमाज

कुरुम के मुस्लिम भाईयो घर मे पढ़ी जुमा की नमाज

फोटो - कुरुम की जामा मस्जिद और छोटी मस्जिद के गेट को ताला लगा हुवा। छाया - शफी खान कुरुम.

  • मस्जि में लगे रहे जुमा के दिन ताले.
  • पहली बार अदा की घरों में जुमा की नमाज.
  • जामा मस्जिद के इमाम का ऐतिहासिक निर्णय

कुरुम : मूर्तिज़ापुर तहसील अंतर्गत आनेवाले कुरुम परिसर में आज सभी मुस्लिम भाइयोने जुमा की दो रकाअत विशेष सुन्नत नमाज अपने घरों में ही पढ़ी। कुरुम परिसर के दोनों मस्जिदों में आज ताले लगे नजर आए । जामा मस्जिद और छोटी मस्जिद के इमाम, मुअज्जन तथा दो जिम्मेदार ऎसे केवल चार लोगों ने जमात बनाकर मस्जिदो में जुमा की नमाज अदा की और साथ ही अपने ख़ुदा से दुनिया एवं सभी इंसानो के सलामती के लिए जामा मस्जिद के इमाम अंसरुल हक ने दुआ मांगी।

              बता दे कि कुरुम परिसर में मुस्लिम आबादी अच्छि खासी है। जिसमे दो मस्जिदों का समावेश है। मुस्लिम बहुबली इलाखे में जामा मस्जिद है। और इतवारा चौक में छोटी मस्जिद है। कोरोना वायरस के खतरे को देखते हुवे सभी धर्मों के प्रार्थना स्थलों पर भीड़ भाड़ रोकने हेतु सरकार व प्रशासन द्वारा कड़े निर्देश दिए है। जिसके चलते कुरुम जामा मस्जिद के इमाम अंसारुल हक ने कुछ समय तक यहां के मुस्लिम भाईओ को मस्जिद में न आते हुवे घर मे ही सभी नमाज अदा करे ऎसा ऐतिहासिक निर्णय कुरुम के मुस्लिम भाइयो को दिया है। इस कारण शुक्रवार 27 मार्च को जुमा की विशेष नमाज भी अपने अपने घरो मे पढ़ने की लोगो से अपील की थी।

अपने धर्म गुरु के आदेश का सन्मान करते हुवे यहां के सभी मुस्लिम भाईओ ने भी जुमा की नमाज अपने घर मे ही पढ़ी। इस कारण जुमा के भीड़ भाड़ दिखने वाली जामा मस्जिद के सामने आज सन्नाटा आया।  आजादी के 75 साल उलटने के बाद इतिहास में पहली बार कुरुम के जामा मस्जिद को ताला जखड़ा हुवा दिखाई दिया। साथ हि साथ यहां के छोटे मस्जिद के इमाम नौशाद अहमद ने भी छोटी मस्जिद में चार लोगों की जमात खड़ी करके जुमा की विशेष नमाज पढ़ाई। और कोरोना वायरस जैसी जानलेवा बीमारी से बचने के लिए परवरदिगार से खास दुआं मांगी।
21 दिवसांच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील

21 दिवसांच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील



  • घाबरू नका, काळजी घ्या - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला :  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा कर्फ्यू जाहीर केला आहे. _या काळात सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील. घाबरू नये, दक्षता घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे .
राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. 21 दिवसाच्या कर्फ्यूमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यावर , जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.याबाबत सर्व जनतेला आश्‍वस्त करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे कृपया कोणीही पॅनिक होऊ नये. सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी .घरातच  राहावे .घराबाहेर कृपया पडू नये . _कोरोनाबरोबर आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे,_ असे आवाहन  सर्वांना करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या सिमा, धार्मिक स्थळे बंद

जिल्ह्याच्या सिमा, धार्मिक स्थळे बंद



  • जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे नियोजन


अकोला :  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायांचा भाग जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या असून बाहेरील जिल्ह्याशी कोणत्याही प्रकारचे आवागमन बंद राहील. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी आपापल्या घरातच रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व अन्य विभागप्रमुखांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

  • जिल्ह्यातील उद्योग- कारखाने बंद

 जिल्ह्यातीलविविध उद्योग व कारखानेही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या कारखाने व उद्योगांत विविध कामगार, कर्मचारी, वाहतुकदार,  आदींची एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.  त्यातून  औषधे निर्माण करणारे, वैद्यकीय सेवेचे साहित्य निर्मिती करणारे कारखाने, सॅनिटायझर, साबण, जंतूनाशक,हॅण्डवॉश तयार करणाऱ्या कंपन्या, कारखाने,कृषि उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग दालमिल, ऑईल कंपन्या इ. अत्यावश्यक वस्तू सेवा पुरविणारे उद्योग यांना वगळण्यात आले आहे.


  • जिल्ह्याच्या सिमा बंद

अको जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या असून  कोणत्याही मार्गाने जिल्ह्यात बाहेरुन वा शेजारील जिल्ह्यातील व्यक्तीस येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.  हे आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४   अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले असून  हे आदेश पोलीस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्तव्यावर असलेल्या व्यक्ती किंवा वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच रुग्ण वाहतूक कर्तव्यावरील हॉस्पिटल मधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, औषधी वाहने,  अग्निशमन वाहने, बॅंकांची व एटीएम मध्ये पैसे भरणारी वाहने  व कर्तव्यावरील कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू सेवा, माल यांची वाहतूक करणारे कर्तव्यावरील कर्मचारी अधिकारी, कर्तव्यावरील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने व अधिकारी कर्मचारी यांची वाहने यांना यातून वगळ्यात आले आहे.
मनसे देणार महाविद्यालयीन तरुणींना पाठबळ

मनसे देणार महाविद्यालयीन तरुणींना पाठबळ



  • महिला सक्षमीकरणासाठी शिबीरे : दिपक दांदळे 


मूर्तिजापूर : (प्रतिनिधी) विदर्भातील९२६ महिला व तरुणी गायब असून जिल्ह्य़ातील ३६ तरुणी बेपत्ता झाल्या आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. कुठल्याही शाळा महाविद्यालयातील तरुणी अडचणीत असलेल्यास अथवा तीची कोणी छळ काढीत असलेल्यास सदर तरुणीने दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यास कार्यकर्ते व टीम घटनास्थळी पोहोचून त्या प्रसंगातून तीची सुटका करेल त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी तालुकास्तरावर महिलासांठी विविध शिबिरे राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष दिलीप पाटील दांदळे यांनी २ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली हा उपक्रम ९ मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापण दिना पासून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                   तालुक्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालये येथे या संदर्भात एक विशिष्ट फलक लावण्यात येणार असून त्या फलकावर काही मोबाईल नंबर असेल या मोबाईल क्रमांकावर संकटात असलेल्या कुठल्याही तरुणीचा कॉल अथवा मेसेज आला तर मनसेची टीम लगेच त्या ठिकाणी धाव घेऊन तीची मदत करणार आहे. यावेळी संबंधित तरुणीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणी गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत या धर्तीवर हा उपक्रम ९ मार्च पासून सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर महिला सक्षमीकरणासाठी विविध मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून यात तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करणार येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिपक दांदळे, संतोष गोलाईत, सुनील शिंदे, गौरव मोरे, डॉ. पंकज बांबल, गजानन बढे, विजय गावंडे, मिलिंद इंगळे, संजय रडके यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गजानन महाराज प्रकट दीनानिमित्त मुस्लिम समाजाने दिला माणुसकीचा परिचय

गजानन महाराज प्रकट दीनानिमित्त मुस्लिम समाजाने दिला माणुसकीचा परिचय

जमीयते उलेमा हिंदच्या भक्तकांच्यासाठी पुढाकार

अकोट : ब्रम्हांडनायक संत गजानन महाराज भविकांचे श्रध्दास्थान महाराजांचा आज प्रकट दिन आहे मुखी गण गण गणात बोते... गजानना अवलिया अवतरले जग ताराया ... हे भजन गात पावले आपसुक श्री क्षेत्र शेगावच्या मार्गाने अकोट मोहाळा वरुन चालत होती चिमुकल्या मुलांपासून आबालवृध्द महिला तरुणसुध्दा पायदळ वारकरी व भक्तकांना मोहाळा येथील जमीयते उलेमा हिंदच्या पुढाकाराने एक खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवाने खरच माणुसकीचा परिचय देऊन ३० कैरेट केळा १५०० बिस्किट पहाटे ४ वाजतापासून भक्तकांच्या सेवेसाठी स्वताहुन त्यांना थांबुन वाटप केला अश्यातच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे अकोट ग्रामीण पो स्टेचे ठाणेदार ज्ञानोबा फड़ यांनी सुध्दा सहभाग मुस्लिम समाजाचे भरभरून कौतुक केला याप्रसंगी मौलवी सदरूद्दीन मौलवी आसिफ खा हाफिज शरीफोद्दीन हाफिज कलिमोद्दीन मौलवी शेख असगर हाफिक अब्दुल लतीफ हाफिज अब्दुल मुजीब मौलवी अनसरोदिन मौलवी जियाहुन रहेमान हाफिक अब्दुल रफीक दानिश पटेल साकिब पटेल सलिम खान शाकिर खान साजिद खान पठान डॉ आतिफ पटेल सुफियान अहमद हरिदास आखरे दिनेश नेरकर रामा वानखड़े यांच्यासह जमीयते उलेमा हिंद व गावकरी मंडळीने सहभाग घेतला होता.
समाज कार्यातून प्रेरणा देणाऱ्या समाजसेवकांचा पत्रकार दिनी सत्कार --- वेगळ्या संकल्पनेतून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.

समाज कार्यातून प्रेरणा देणाऱ्या समाजसेवकांचा पत्रकार दिनी सत्कार --- वेगळ्या संकल्पनेतून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.


मूर्तिजापूर :- संपूर्ण महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो .यावर्षी देखील मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांनी हा दिवस आगळ्या -वेगळ्या कल्पनेतून साजरा करत  तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या व प्रसिद्धीपासून अलिप्त असलेल्या मान्यवरांचा सत्कार या दिनाच्या माध्यमातून घडवून एक नवा आदर्श निर्माण केला. 
    
               येथील समतानगर पटवारी काँलनीमधील भक्तीधाम मंदिराच्या सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठावर सभारंभाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार विकास सावरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्याध्यक्षा श्रीमती चंदाताई शिरसाट,कोषाध्यक्ष गजानन हरणे,उपाध्यक्ष पि. एन.बोळे,जेष्ठ पत्रकार विलास मुलमुले होते.तसेच सत्कारमूर्ती ह.भ.प.

रतनलाल महाजन,सोनोरी येथील मदरसा चे प्रमुख व जमीयत उलमा-ए-हिंदचे विदर्भ सचिव मुफ्ती रोशन शाह कासमी,दामुसेठ अग्रवाल , सत्यनारायणजी तिवारी,राजेंद्र भीमराव देशमुख, रामकृष्ण गावंडे काका,राजेश मोहनलाल गुप्ता, दिनेश सुंदरलाल श्रीवास,अब्दुल जमीर अब्दुल लतीफ ,बबलु रामप्रसाद यादव या मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या जीवनात कोणतीही अपेक्षा न करता निष्काम लोकांची सेवा करणारे मान्यवर ह.भ.प. रतनलाल महाजन,सोनोरी येथील मदरसा चे प्रमुख व जमीयत उलमा -ए-हिंदचे विदर्भ सचिव मुफ्ती रोशन शाह कासमी,दामुसेठ अग्रवाल , सत्यनारायणजी तिवारी ,राजेंद्र भीमराव देशमुख, रामकृष्ण गावंडे काका,राजेश मोहनलाल गुप्ता, दिनेश सुंदरलाल श्रीवास,अब्दुल जमीर अब्दुल लतीफ ,बबलु रामप्रसाद यादव या मान्यवरांचा उपस्थित पत्रकार बांधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

       यावेळी सर्वस्वी पत्रकार अनिल अग्रवाल, शिवप्रसाद महाजन,विलास नसले,प्रा.अविनाश बेलाडकर,दिलीप देशमुख,प्रा.दिपक जोशी, जयप्रकाश रावत, संजय उमक,अथर हुसेन खान,प्रा.एल.डी.सरोदे,संतोष माने,संजय उमक, गजानन गवई,निलेश सुखसोहळे,मोईज शेख, श्याम काकडे,गौरव अग्रवाल,उमेश साखरे, प्रकाश श्रीवास,सोहेल शेख,नरेंंद्र खवले,अजय प्रभे,रवी शिंदे,अंकुश अग्रवाल,शफीखान पठाण,पंकज सातपुते,अनिल भेंंडकर,प्रविण ढगे, उबेद चाऊस,आकाश जामनीक,गजानन गवई (लाखपूरी),श्रीनाथ तिहीले यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभाला उत्तर प्रा.सत्यनारायण तिवारी व रामकृष्ण गावंडे यांनी आपल्या मनोगता द्वारे व्यक्त केले. पाहुण्यांचा व त्यांच्या कार्याचा परीचय विलास नसले यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अविनाश बेेेलाडकर यांनी केले. तर संंचालन प्रा.एल.डी. सरोदे व आभार प्रदर्शन जयप्रकाश रावत यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला शहरातील व ग्रामीण भागातील विविध वृत्तपत्रासाठी कार्य करणारे व विविध पत्रकार संघटना मध्ये कार्य करणारे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

         पत्रकार दिनाचे औचित्य साधून  स्थानिक शाकंबरी प्रतिष्ठान येथे शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.स्टेशन विभागातील श्रीकृष्ण हॉस्पिटल येथे डॉक्टर पंकज राऊत व डॉक्टर सौ. वैशाली राऊत यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. माधवबाग संबंधित सर्व आयुर्वेदा बाबत माहिती देण्यात आली. नंतर सर्व पत्रकारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.जमियत उलमा-ए-हिंद मुर्तीजापूर तालुुक्याच्या वतीने मूर्तिजापुर शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष मौलाना सद्रोद्दीन, मौलाना हाफिज कलीम, मौलाना हारून,तसवर खान,सद्दाम पटेल उपस्थित होते.
ओबीसी कार्यकर्त्यांनो जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवण्यासाठी पुढाकार घ्या - ईश्वर बाळबुधे

ओबीसी कार्यकर्त्यांनो जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवण्यासाठी पुढाकार घ्या - ईश्वर बाळबुधे


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे OBC सेल प्रदेश अध्यक्ष मा.श्री ईशवरजी बाळबुदे साहेब यांनी मुर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय तेथे भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले ,या कार्यक्रमामधे काही नियुक्ती करण्यात आल्या OBC सेल जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बोळे सर शहर अध्यक्ष विशाल शिरभाते, तालुका अध्यक्ष विष्णु पाटील, लोडम ,शहर अध्यक्ष रामभाऊ कोरडे, विधानसभा अध्यक्ष सागर भाऊ कोरडे, प्रकाश पाटील मुळे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीविद्यार्थी कोंग्रेस ,अतुल पाटील गावंडे ,रवी मारगड ,आनंद पवार ,महेद बोळे समस्त पद अधीकारी उपस्तीत होते
यल्लमा उर्फ रेणुका देवी पादुका पालखीची भव्य मिरवणुक - हजारो भाविकांचा सहभाग.

यल्लमा उर्फ रेणुका देवी पादुका पालखीची भव्य मिरवणुक - हजारो भाविकांचा सहभाग.


मुर्तीजापुर :- यल्लम्मा उर्फ रेणुका माता  यात्रा महोत्सवानिमित्त आज दिनांक २४ रोजी देवीच्या पादुका पालखीची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. फुले आणि भंडारा उधळत देवाच्या  नावाचा जयघोष करीत भक्तीभावाने हर्षोल्हासात मिरवणूक पार पडली.  या मिरवणुकीला सकाळी अकरा वाजता  चिखली रस्त्यावरील देवीच्या मंदिरापासून प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गावरून देवीची मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान हजारो भाविकांचा सहभाग होता. शहरवासीयांनी चौकाचौकात फटाके फोडून व पुष्पवृष्टी करून  मिरवणुकीचे  स्वागत केले. त्याचप्रमाणे हनुमान मंदिराजवळील युवकांनी भाविकांसाठी नाश्ता तसेच चहा पाण्याची व्यवस्था केली होती.  तर  रेल्वे स्टेशन समोर देखील युवकांद्वारा  देवीच्या यात्रेत सहभागी भाविक-भक्तांना नाश्त्यासाठी  पोहे केले होते.जयस्तंभ चौकातील खंडोबा मंदिराजवळ अहमदाबाद येथील विनायकराव यदवर आणि मुर्तीजापूर येथील रमेश कोळवले  यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी साडेचार वाजता मिरवणूकीची मंदिरावर सांगता झाली. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे  यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. मूर्तिजापूर येथील चिखली रस्त्यावर  असलेल्या यल्लमा उर्फ रेणुका माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे दिनांक २३/१२/२०१९ पासून यात्रा महोत्सव हर्षोउल्हासात साजरा  झाला. यात्रा महोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दोन दिवस चालणारा हा यात्रा महोत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यात्रा महोत्सव याकरिता महाराष्ट्रातील दूरदूरच्या जिल्ह्यातील भाविक तसेच महाराष्ट्राबाहेरील बाहेरील राज्यातून देखील भाविकांनी गर्दी केली होती. दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजता देवीचा अभिषेक त्यानंतर साडेनऊ ते दहा वाजता महाआरती,साडे दहा ते साडे अकरा वाजता बाईक रॅली, दुपारी एक ते चार दरम्यान गंधाचा कार्यक्रम आणि सायंकाळी आठ ते दहा दरम्यान भजन संध्या असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात्रा महोत्सव यशस्वी करण्याकरता यात्रा महोत्सव समिती व युवकांनी परीश्रम घेतले.महाप्रसादाचे आयोजन दि.२७ रोजी देवीच्या मंदिरात ११ ते २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
नागरिकत्व संशोधन कायदा संपूर्ण देशवाशीयांची अवहेलना करणारा - मौलाना नदीम सिद्दिकी

नागरिकत्व संशोधन कायदा संपूर्ण देशवाशीयांची अवहेलना करणारा - मौलाना नदीम सिद्दिकी


मुर्तिजापूर :-  संपूर्ण देशात एन.आर.सी. व सि.ए.ए. बिल संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून सदरचा कायदा हा हिंदुस्थानातील सर्वच नागरिकांची अवहेलना करणारा असल्याचे प्रतिपादन जमियत उलेमा- ए- हिंद चे प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी यांनी केले.


याकरिता आम्हाला शांततेच्या मार्गाने आणि संयमाने सर्व जाती-धर्मातील बांधवांंसह मिळून ही लढाई लढायची आहे. जमियात उलेमा-ए- हिंद शाखा मूर्तिजापूर च्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या संदर्भात समाज प्रबोधन व मार्गदर्शन पर सभेचे आयोजन जुन्या शहरातील घरकुल परिसरात असलेल्या पटांगणात करण्यात आले होते.एन.आर.सी.हा मुद्दा नवीन नाही.


मागील अनेक वर्षापासून या कायद्याचा विरोध होत आलेला आहे.शासनाचे म्हणण्यानुसार भारतात एक कोटी ८० लाख घुसखोर आहे.त्यामध्ये अशा खोट्या तरतुदीच्या म्हणण्यावर विश्वास नसून जमियत देशाच्या संविधानाला वाचविण्यासाठी मागील अनेक वर्षापासून लढा देत आहे.आसामसह देशात सदर कायदा लागू करण्यात येणार असून हा  कायदा फक्त मुसलमानांविरुद्ध नसून सर्वच घटकांच्या विरुद्ध आहे.जमियत उलेमा-ए- हिंद नेहमी देश विभाजन करणाऱ्या कायद्याविषयी लढा देत आलेली आहे आणि लढा देत राहिल. 


जमियत उलेमाद्वारा यापुढे जेलभरो आंदोलन करण्याचे ठरले आहे.याबाबत लवकरच निर्णय घेतल्या जाईल असे त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.यावेळी व्यासपीठावर मौलाना अब्दुल सलाम,मुफ्ती वसिउल्ला, विदर्भ सचिव मुफ्ती रोशन कासमी, दारुल उलूम देवबंद चे मुबल्लीक मौलाना इरफान यासह इतर  मौलाना व मुक्ती यांची उपस्थिती होती.


 या सभेमध्ये मौलाना अब्दुल सलाम,मौलाना वसिउल्ला,मुफ्ती रोशन कासमी, दारुल उलूम देवबंदचे मौलाना मुबल्लीक इरफान यांनी मुस्लीम समाजाचे पवित्र ग्रंथ कुराण मधील विविध आणि आयतींचे विश्लेषण करून सामाजिक न्याय,बंधुता समतेचा संदेश दिला. तसेच कोणत्याही प्रकारचा द्वेष तिरस्कार कटुता निर्माण होणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष राहावे असा सल्ला दिला.हा आमचा देश असून या देशाप्रती आम्हाला प्रेम आहे असे यावेळी सांगीतले.

           या कार्यक्रमाचे संचालन मुफ्ती उमेद यांनी केले.तर आभार प्रदर्शन जमियात उलेमा-ए--हिंदी चे तालुकाध्यक्ष मौलाना सदरोद्दिन यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह ईतर समाज बांधवांची उपस्थिती होती.

अत्यंत शांततेत हा कार्यक्रम पार पडला. सदर सभा पार पाडण्याकरता समाजातील सर्वच घटकांसोबत युवा वर्ग आणि स्वयंसेवक यांनी आपापली जबाबदारी पार पाडत अतिशय शिस्तीत ही सभा घेतली. यावेळी ठाणेदार आव्हाळे यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.
 नागरिकता संशोधन विधेयक संपूर्ण देशवासियांसाठी घातक -मुफ्ती रोशन कासमी

नागरिकता संशोधन विधेयक संपूर्ण देशवासियांसाठी घातक -मुफ्ती रोशन कासमी

  • जमियात उलमा-ए- हिंद च्या वतीने हजारो मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चा काढून केला विरोध. 
  • उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठवले निवेदन                                              
मुर्तीजापुर :- नागरिकता संशोधन विधेयक पारित झाल्याने हे विधेयक सांप्रदायिक असून असे कायदे संपूर्ण देशासाठी घातक आहे.या विधेयकाला जमियते उलमा-ए-हिंद द्वारा वेळोवेळी विविध आंदोलने लोकशाही मार्गाने करून विरोध करण्यात येईल. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवरून संघटनेद्वारे घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार आंदोलने करून विरोध सुरूच राहील.
 सदर विधेयक धर्माच्या नावाने भेदभाव करणारे आहे. असे प्रतिपादन मूर्तिजापूर येथे जमियते- उलेमा-ए- हिंदचे मुफ्ती रोशन कासमी यांनी केले. मूर्तिजापूर येथे जमियते उलेमा च्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चा नंतर उपविभागीय अधिकारी यांना शिष्टमंडळाचे वतीने निवेदन देऊन ते राष्ट्रपतींना पाठवण्यात व आले.
 सदर मूक मोर्चाला हजरत रोशन जमीर गेट रोशनपुरा येथून शांततेत आणि शिस्तीने सुरुवात झाली.या मूक मोर्चाचा समारोप पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या ईदगाह मैदानावर झाला. यावेळी मोर्चामध्ये सहभागी हजारो मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच विविध घोषवाक्याचे फलक हाती घेऊन सदर विधेयकाचा विरोध करण्यात आला. ईदगाह येथे सदर विधेयकाचा विरोध करणाऱ्या मूक मोर्चा चे समारोपानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.
 या शिष्टमंडळात मुफ्ती रोशन कासमी(विदर्भ सचिव), मौलाना सद्रोद्दिन(तालुका अध्यक्ष),मुन्ना उर्फ अख्तर हुसेन खतीब,सैय्यद अजहरअली नबाब, हाफीज अबूबकर,तसवरखान, हाफीज कौसर, जुनेद खतीब, समिउल्लाखान,निजाम इंजिनियर,हाफिज सलीम,शेख इम्रान,सैय्यद जुनेद,युनूसखान, सद्दाम पटेल, हाफीज शरीफ, नासिरोद्दिन ठेकेदार,मुक्ती सफदर,दिनेश दुबे यासह इतर मान्यवरांचा सहभाग होता. 

स्वीप अंतर्गत मतदार जागृतीसाठी रंगभरण स्पर्धा

स्वीप अंतर्गत मतदार जागृतीसाठी रंगभरण स्पर्धा


अकोला :-  विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदार जनजागृतीसाठी शनिवार दि.19 रोजी  शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा सकाळी 8 वाजता लाल बहाद्दूर शास्त्री स्टेडीयम  येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत इयत्ता 7 वी, 8 वी  व 9 वी या वर्गातील सुमारे 10 हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत या  विद्यार्थ्यांच्या सहभागातुन रंगभरण स्पर्धा  व मतदानाचा लोगो  भव्य स्वरूपात साकारण्यात येणार असल्याची माहिती  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  जबाबदारी पार पाडण्यासाठी  समिती  निर्माण करण्यात आली आहे.  आज दि. 16 रोजी  अपर जिल्हाधिकारी  यांच्या दालनात  समितीची  सभा  आयोजीत करण्यात आली होती  यावेळी  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव,  मनपाचे प्रतिनीधी राजुरकरसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

 मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत  मतदार जागृती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.19 रोजी  सकाळी आठ वाजता लालबहादूर स्टेडीयम  येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  अकोला शहरातील होतील. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून ड्रॉइंग शीट पुरविण्यात  येणार असून  रंगभरणाचे साहित्य विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे. रंगभरणासाठी विद्यार्थी रंगीत पेन्सिल, क्रेऑन पेन्सिल, वॉटर कलर इ. कोणतेही साहित्य वापरू शकतात.  स्केच पेन चा मात्र वापर करता येणार नाही.

याबाबत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुचित करण्यात आले असून  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केले आहे.
३६ हजार  नवतरुण मतदार बजावणार मतदानाचा हक्क

३६ हजार नवतरुण मतदार बजावणार मतदानाचा हक्क


अकोला :- विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये जिल्ह्यात मतदानाचा हक्क तब्बल १५ लाख ७७ हजार २५४ मतदार बजावणार आहेत. या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक यंत्रणेने  तब्बल १७०३ मतदान केंद्र आहेत. या निवडणूकीत तब्बल ३६ हजार २८८ नवतरुण मतदार (१८ ते १९ वर्षे वयोगटातील आपला मतदानाचा हक्क बजावतील. तथापि सर्वाधिक मतदार हे ३० ते ३९ या वयोगटातील म्हणजेच तीन लाख ६७ हजार २८४ इतके आहेत.

अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत.  याच पाचही विधानसभा मतदारसंघ मिळून  जिल्ह्यात एकूण १५ लाख ७७ हजार २५४ इतकी मतदार संख्या आहे. ही मतदार संख्या ही ३१ ऑगस्ट २०१९ अखेर पर्यंतची आहे.  त्यात एकूण आठ लाख १२ हजार १८१ पुरुष तर ७ लाख ६१ हजार ८६४ महिला, ४६ इतर मतदार आहेत. शिवाय ३१६३ सेवा मतदार आहेत. त्यात ३१०० पुरुष तर ६३ महिला सेवा मतदारांचा समावेश आहे. असे एकूण १५ लाख ७७ हजार २५४ मतदार संख्या आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या या प्रमाणे-
२८- अकोट- एकूण दोन लाख ८४ हजार ८४३ , पुरुष एक लाख ५० हजार ६०४ , महिला एक लाख ३४ हजार २३४, इतर पाच, सेवा मतदार ७४६.
२९- बाळापूर- एकूण दोन लाख ९४ हजार ४८६, पुरुष एक लाख ५३ हजार ४२५, महिला एक लाख  ४१ हजार ६१, सेवा मतदार ४११.
३०- अकोला पश्चिम- एकूण तीन लाख ३१ हजार ४५६, पुरुष एक लाख ६८ हजार २९७, महिला एक लाख ६२ हजार ८४८, इतर १६  तर सेवा मतदार २९५.
३१- अकोला पूर्व- एकूण तीन लाख ४४ हजार १५. पुरुष एक लाख ७६ हजार २१८, महिला एक लाख ६७ हजार २०५, इतर १८ , सेवा मतदार  ५७४.
३२- मुर्तिजापूर- एकूण ३ लाख २० हजार ७८३. पुरुष- एक लाख ६३ हजार ६३७, महिला एक लाख ५६ हजार ५१६, इतर ७ व सेवा मतदार ६२३.
मतदान केंद्रः-
या सर्व मतदारांना मतदानासाठी एकूण १७०३ मतदान केंद्र असतील. ती विधानसभा मतदारसंघ निहाय याप्रमाणे-  अकोट-३३१, बाळापूर-३३६, अकोला पश्चिम ३००, अकोला पूर्व ३५०, मुर्तिजापूर ३८६, असे एकूण १७०३ मतदान केंद्र आहेत.
वयोगटानुसार मतदार संख्या- १८ ते १९ वर्षे वयोगटातील  एकूण ३६ हजार २८८ मतदार आहेत. तर २० ते २९ वर्षे या वयोगटातील तीन लाख १६ हजार ३७०, ३० ते ३९ वर्षे वयोगटातील तीन लाख ६७ हजार २८४, ४० ते ४९ वर्षे वयोगटातील तीन लाख २९ हजार ५५९, ५० ते ५९ वर्षे वयोगटातील  दोन लाख ४२ हजार १०३, ६० ते ६९ वयोगटातील  एक लाख ४९ हजार ९०५, ७० ते ७९ वयोगटातील ८१ हजार ७७९ तर ८० व त्याहून अधिक वयाचे ५० हजार ८०३  मतदार आहेत. एकूण मतदार संख्येचे प्रमाण पाहता ३० ते ३९ वर्षे या वयोगटातील  मतदारांची संख़्या सर्वाधिक आहे. हे प्रत्यक्ष नोंदणी होऊन झालेल्या मतदारांची संख्या आहे. यात सेवा मतदारांचा समावेश नाही.
मतदार नोंदणी प्रक्रिया-
मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी नवीन नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा लागतो. अनिवासी भारतीय असल्यास त्यास फॉर्म क्रमांक ६ अ भरुन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येते. या शिवाय एखादा मतदार मयत झाल्यास,  त्याने स्थलांतर केल्यास वा दोन ठिकाणी नाव असल्याचे निदर्शनास आल्यास मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी  फॉर्म क्रमांक ७ भरुन नाव वगळता येते.  नावात बदल वा दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी फॉर्म ८ भरुन दुरुस्ती करता येते. तर पत्ता बदलला असल्यास फॉर्म ८- अ भरुन दुरुस्ती करता येते. विधानसभा निवडणूक २०१९ साठी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले व ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत नाव नोंदणी  केलेल्या मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. तर सध्याच्या जाहीर झालेल्या निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. तथापि मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर सुरु असते.
सेवा मतदार- विविध सैन्य दलात व अर्धसैनिक दलात कर्तव्य बजावणारे जवान आपल्या मुळ रहिवासाच्या ठिकाणी मतदानाचा हक्क सेवा मतदार म्हणून बजावतात. त्यांना सर्व्हिस व्होटर्स असे संबोधले जाते. त्यासाठी मतदार हा आपल्या तुकडीच्या प्रमुखांकडे अर्ज करतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन  त्याची स्विकृती ही जिल्हा निवडणूक कार्यालयात होते. त्यानुसार यादी तयार होते.
हे मतदार टपाली मतदान पद्धतीने मतदान करु शकतात. त्यासाठी ETPBS  (Electronically Transfer Postal Ballate System) प्रणालीचा वापर होतो. त्यासाठी सैन्यदलातील युनिटवर मतपत्रिका प्रिंट दिली जाते. ही प्रक्रिया ऑनलाईन होते. ओळख पडताळणीसाठी बारकोडचा वापर केला जातो. मतदार आपले मतदान नोंदवून पोष्टाद्वारे पाठवतात. या शिवाय जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असतात त्यांनाही आपले मतदान टपाली पद्धतीने करण्याची सुविधा आहे.
मूर्तिजापुर में मोहर्रम का निकला जुलूस..

मूर्तिजापुर में मोहर्रम का निकला जुलूस..


मुर्तिजापुर :- हर साल की तरह इस साल भी मुर्तिजापुर शहर में मोहर्रम पर शांतिपूर्ण तरीके से जुलूस निकाल कर मनाया गया इस्लाम धर्म में मोहर्रम का महीना नए वर्ष के रूप में मनाया जाता है हजरत इमाम हुसैन और कर्बला को याद करते हुए इस दिन मुस्लिम समुदाय के लोग रोजी भी रखते हैं स्थानीय जुनी बस्ती के नालसाहब पूरे से निशान की शुरुआत करते हुए आगे मौला पूरा तथा बाद में मोमिनपुरा होते वकील पुरा  तांगा चौक पहाड़ी पुरा  होते हुए जुलूस कब्रस्तान ले जाया जाता है जहां फातिया खानी और शोहदा ए करबला पढ़कर करबला  का समापन किया गया इस जुलूस में मुस्लिम समुदाय के सैकड़ों लोग शामिल हुए थे

  • शरबत और मिठाई वाटप्प

 इमाम हुसैन की शहादत को याद करते हुए स्थानीय जुनी बस्ती मोमिनपुरा में 2 क्विंटल शक्कर का शरबत बनाकर तथा मिठाई बाटी गई इस अवसर पर मोहम्मद अंसार मोहम्मद अकरम मोहम्मद नासिर मोहम्मद इरफान जुबेर अहमद अब्दुल जावेद मोहम्मद रेहान शेख  घिसु बाबा अब्दुल मतीन बाबा नाजिम पहलवान  सादिक भाई शेख दाऊद मोहम्मद अफसर भाई  साजिद भाई आतिफ मोहम्मद इरशाद रशीद मोहम्मद मतीन मोहम्मद नौशाद मोहम्मद रिजवान आदि के साथ बड़ी संख्या में नौजवानों ने परिश्रम किया..