इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाची शाखा स्थापन करण्यात आली.
याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थितीत होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गोविंद कोकाटे होते. या कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.गोविंद कोकाटे, भाजप मिडिया सेल जिल्हाध्यक्ष धनजंय रनदिवे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. अनिल काळे, अँड खंडेराव चौरे, सरचिटणीस सतीश देशमुख, लोकसभा विस्तारक पांडुरंग पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर राजगुरू, संतोष क्षिरसागर, सिद्धु गोफने,अदिनी नागरीकांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मुंबरे यांनी केले तर आभार रंगनाथ कोळगे यानी मानले.
या कार्यक्रमास संयोजन पं.स.सदस्य महेश चांदणे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रमेश कोळगे, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष गौतम ठेले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.