इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उस्मानाबाद cm चषक क्रिडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भाजपा प्रदेश सरचिटणीसय आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते दि.25 जानेवारी 2019 रोजी उस्मानाबाद शहरातील आनंद नगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी राहणार आहेत. तर प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितीन काळे, अँड.मिलिंद पाटील, विधानसभा पालक अँड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, जिल्हा संयोजक प्रदीप शिंदे, अँड खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अँड. व्यंकटराव गुंड, डॉ.प्रतापसिंह पाटील, अदि उपस्थित राहणार आहेत. क्रीडा विश्वात गाजलेल्या cm चषक क्रीडा स्पर्धाना जिल्ह्यात मोठा प्रतिदमि मिळाला आहे. व्हॉलीबॉल, क्रिकेट, रनिंग, कुस्ती, कब्बड्डी, खो-खो, नृत्य, गायन, रांगोळी, कॅरम अशा स्पर्धामध्ये तब्बल पन्नास हजारा पेक्षा अधिक खेळाडुंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धामुळे ग्रामिण भागातील खेळाडुंना, कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी मोठी संधी प्राप्त झाली. या स्पर्धात विजयी झालेल्या खेळाडुंना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, प्रवीण पाठक, धनंजय रणदिवे, इंद्रजित देवकते, गणेश मोरे, विजय शिंगाडे, प्रशांत मोहिते, बालाजी चव्हाण, प्रदीप सांगवे, गणेश देशमुख, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, सरचिटणीस नाना घाटगे यांनी केले आहे.