Showing posts with label राज्य. Show all posts
Showing posts with label राज्य. Show all posts
अर्थसंकल्प घटनाबाह्य; सुप्रीम कोर्टात याचिका

अर्थसंकल्प घटनाबाह्य; सुप्रीम कोर्टात याचिका


दिल्ली :- केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प असंविधानिक असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मनोहर लाल शर्मा यांनी शुक्रवारी ही याचिका दाखल केली असून संविधानात अंतरिम अर्थसंकल्पाची कोणतीही तरतूद नसल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे.

शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्ग, शेतकरी, असंघटित कामगार आणि सैन्यातील जवानांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

 राज्यघटनेत फक्त पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची तरतूद आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अर्थसंकल्प हा असंविधानिक आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी असा अर्थसंकल्प सादर करण्याची कोणतीच तरतूद नाही. निवडणुकीनंतर निवडून येणारे नवीन सरकारच पूर्ण अर्थसंकल्प सादर करू शकेल असं शर्मा यांनी याचिकेत म्हटलं आहे.

पत्नीची हत्या करून ३ महिने फेसबुक अपडेट ठेवलं!

पत्नीची हत्या करून ३ महिने फेसबुक अपडेट ठेवलं!


गोरखपूर :- गोरखपूरच्या डॉक्टर धर्मेंद्र प्रताप सिंह याने त्याच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून नंतरही हत्या लपवण्यासाठी तिचे फेसबुक प्रोफाइल तीन महिने अपडेट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या डॉक्टरने हत्येची कबुली देईपर्यंत मृत महिलेच्या कुटुंबीयांना ती जीवंत असून आसाममध्ये राहत आहे, असं वाटत होतं.

राखी श्रीवास्तव असं मृत महिलेचं नाव आहे. २००६मध्ये मृत महिला आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंहला भेटली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं. धर्मेंद्र विवाहित आहे हे माहीत असूनही राखी त्याच्या प्रेमात होती. सिंहने तिच्यासाठी शहापूरमध्ये बंगलाही घेतला होता. कुणालाही न सांगता २०११ मध्ये गोंडा येथे ते विवाहबद्ध झाले. पण २०१५मध्ये या प्रकरणाची माहिती धर्मेंद्रची पहिली पत्नी उषा हिच्या कानावर गेली. तिने राखीशी असलेले सगळे संबंध तोडण्याची सक्ती धर्मेंद्रला केली. पण धर्मेंद्रनं न ऐकल्यानं दोघे वेगळे झाले.

२०१६मध्ये राखी मनीष सिंहच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी कायदेशीर पद्धतीनं लग्न केलं. मात्र, त्यानंतरही राखी धर्मेंद्रच्या संपर्कात होती. शहापूरचा बंगला माझ्या नावावर कर नाही तर तुझा खरा चेहरा जगासमोर आणेन अशी धमकी तिने त्याला दिली. राखी आपल्या दुसऱ्या पतीसोबत नेपाळला फिरायला गेली होती. मनीष भारतात लवकर परतला पण राखी मात्र काही कारणांनी नेपाळमध्येच थांबली. तिथे धर्मेंद्र सिंहच्या दोन साथीदारांनी तिची भेट घेतली. तिला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन तिला पोखराच्या दरीत ढकलून दिले. त्यानंतर हे दोन्ही साथीदार मोबाइल घेऊन गुवाहाटीला गेले. तिथूनच ते तीन महिने तिचं फेसबुक अकाउंट अपडेट करत होते.

राखी गोरखपूरला परतली नाही म्हणून तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसंच, तिचा पती मनीष सिंह याच्यावर संशय असल्याचंही स्पष्ट केलं. पण मनीष निर्दोष असल्याचं कळल्यावर पोलिसांनी आपला मोर्चा धर्मेंद्रकडे वळवला. त्याची खूप कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली. यूपी पोलिसांनी नेपाळ पोलिसांच्या मदतीने राखी श्रीवास्तव हिचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या हवाली केला. पोलिसांनी धर्मेंद्र आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून राखीचे आधार कार्ड, पासपोर्ट आणि चार मोबाइल ताब्यात घेतले आहेत.
विकास विसरून सरकारची मंदिरावर चर्चा: चिदंबरम

विकास विसरून सरकारची मंदिरावर चर्चा: चिदंबरम


कोलकाता :- नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार वर टीका केली आहे. 'सरकार आपलं अच्छे दिनचं आश्वासन विसरलंय. आता विकास, नोकऱ्या, गुंतवणूक, उत्पन्नाची चर्चा नाही, केवळ हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि मंदिर भव्य पुतळ्यांवर चर्चा होतेय,' असं चिदंबरम एका पत्रकार परिषदेत म्हणाले.

'नोटाबंदीमुळे बनावट नोटांचा बाजार बंद झालेला नाही. खोट्या नोटा बनवणारे दोन हजार, पाचशेच्या नोटा तयार करताहेत. नोटाबंदीच्या वेळी बाद करण्यात आलेल्या सर्व ९९.३ टक्के नोटा आरबीआयकडे पुन्हा आल्या आहेत. प्रत्यक्षात सर्व अमान्य नोटा बँकेच्या काऊंटरवर एक्स्चेंज केल्या गेल्या. सरकारने ही आर्थिक घोटाळ्याचे योजनाच बनवली होती,' अशा शब्दात चिदंबरम यांनी केंद्र सरकारला फटकारले.

निवडणुकांनंतर पंतप्रधानांनी देशातल्या नागरिकांना आवाहन केलं होतं की सर्व वादग्रस्त मुद्दे विसरून विकासावर लक्ष केंद्रित करा. आज विकास किंवा अच्छे दिनचं आश्वासन लोकांना विसरायला लावलं आहे, असंही चिदंबरम म्हणाले.

'राहू'च्या भीतीमुळं बस दीड तास उशिरा सोडल्या

'राहू'च्या भीतीमुळं बस दीड तास उशिरा सोडल्या


बंगळुरू :- एका ज्योतिषाने सल्ला दिल्याने बस स्थानाकातून तब्बल सव्वा तास बस बाहेरच न काढल्याची अजब घटना कर्नाटकमध्ये घडलीय. अपवित्र राहू काळ सुरू असल्याने आपण बस थांबवून ठेवल्याचे स्पष्टीकरण बसचालकाने वरिष्ठांना दिलंय.

बंगळुरू परिवहन निगममध्ये बसचालक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश गौडा यांनी ज्योतिषाच्या सल्ल्यामुळे बस उशिरा सोडल्याचं स्पष्ट झालंय. मिनिटांनी मॅजेस्टिक बस स्थानकापर्यंत जाणारी ही बस पहाटे ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणार होती. परंतु, त्या क्षणी बस डेपोतून निघाली तर बसला अपघात होईल आणि किमान १५ जणांचा मृत्यू होईल असं ज्योतिषानं सांगितलं होतं. ३१ ऑगस्टला योगेश एका ज्योतिषाला भेटले होते तेव्हा त्यांनी अपघाताची ही भविष्यवाणी केली होती. त्यावेळी राहू काळ सुरू असून राहूच्या प्रकोपामुळे बस अपघात निश्चित होता आणि १५ मृत्यूही अटळ होते असं ज्योतिषानं सांगितलं. त्यामुळे ऑनड्युटी असलेल्या योगेश यांनी तब्बल सव्वा तासांनी ती बस डेपोतून बाहेर काढली. बसमधील अनेक प्रवाशांनी अधिकाऱ्यांकडे योगेश गौडांची तक्रारही केली परंतु, योगेशनी आपला हट्ट सोडला नाही आणि ६.१५ ला सुटणारी बस ७.२५ ला निघाली.

अधिकाऱ्यांना, प्रवाशांना अजब वाटणाऱ्या या कृतीबद्दल स्पष्टीकरण देताना योगेश म्हणाले, माझ्यासाठी बस वेळेवर डेपोतून बाहेर काढण्यापेक्षा प्रवाशांचे प्राण वाचवणं जास्त गरजेचं होतं. त्यामुळे अशुभ काळात बस डेपोबाहेर काढणं मी टाळलं आणि सव्वा तासांनी शुभ काळ सुरू झाल्यावर सगळ्यांना सुखरुपपणे इच्छित स्थळी पोहोचवले.

राज्यपालांविरोधात लेख, पत्रकारावर राजद्रोह

राज्यपालांविरोधात लेख, पत्रकारावर राजद्रोह


चेन्नई :- तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात लेख छापून त्यांना बदनाम केल्याच्या आरोपावरून तामिळनाडूतील ज्येष्ठ पत्रकार नक्कीरन गोपाल यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. राजभवनातून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर चेन्नई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नक्कीरन गोपाल हे एका तामिळी नियतकालिकाचे संपादक आहेत. गोपाल यांनी निर्मला देवी सेक्स स्कॅंडल प्रकरणाशी संबंधित लेख त्यांच्या नियतकालिकातून प्रसिद्ध केले होते. ते प्रसिद्ध झाल्यानंतर राजभवनने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तात्काळ चक्रे फिरली आणि पोलिसांनी गोपाल यांना ताब्यात घेतले.

गोपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एमडीएमकेचे नेते वायको यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना भेटीची परवानगी नाकारली. वायको यांनी पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करत तामिळनाडू सरकारवर जोरदार टीका केली.

खराब हस्ताक्षरामुळे डॉक्टरांना ५ हजारांचा दंड

खराब हस्ताक्षरामुळे डॉक्टरांना ५ हजारांचा दंड


अलाहाबाद :- अलाहाबाद हायकोर्टाने तीन डॉक्टरांना खराब हस्ताक्षरामुळे पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर कामाचा अधिक ताण आल्याने हस्ताक्षर खराब झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ऑनर किलींग: जावयाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी

ऑनर किलींग: जावयाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी


हैदराबाद :- 'सैराट' या चित्रपटात आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. 'सैराट' चित्रपटालाही लाजवेल अशी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. आपल्या मुलीने दलित मुलासोबत आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या एका पित्याने गँगस्टरला १ कोटींची सुपारी देऊन जावयाची हत्या केली आहे. तेलंगणाच्या नालगोंडामध्ये ही घटना उघडकीस आली आहे. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथे दिवसाढवळया ही हत्या करण्यात आली.

मिरयालगुडा येथील मारोतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मित्र प्रणयने आठ महिन्यापूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलाकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही. अमृत वार्षीणी, तिचा पती प्रणय आणि सासू हे हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते.

त्यावेळी दबा धरून बसलेल्या गँगस्टरने प्रणयवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रणयचा मृत्यू झाला. अमृत वार्षीणी ही गर्भवती आहे. हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने मुलीच्या तक्रारीवरुन वडील टी. मूर्ती राव आणि काका टी. श्रवण या दोघांना या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा आरोपी बनवले आहे. जावई प्रणयची हत्या करण्यासाठी मुलीचे वडील टी. मूर्ती राव यांनी गँगस्टरला १ कोटींची सुपारी दिली होती.

तसेच ५० लाख रुपयांची रक्कम आधीच दिली होती. प्रणयवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अब्दुल बारीला पोलिसांनी अटक केली असून बारी हा गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणात आरोपी होता. व त्याला सीबीआयने अटक केली होती. तसेच त्याची कोर्टाने मुक्तता केली होती. 
लंकेश हत्या: पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण शेतात

लंकेश हत्या: पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण शेतात


बेंगळुरू :- पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील डॉक्टरसह जवळपास सहा जणांनी लंकेश यांची हत्या करण्यासाठी बेळगावातील जांबोटी गावामधील एका शेतात पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.

लंकेश हत्या प्रकरणी गेल्या आठवड्यात एसआयटीनं अटक केलेला आरोपी भारत कुर्णे याच्या मालकीच्या शेतात मारेकऱ्यांना पिस्तुल आणि इतर शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यांच्याकडून राजेश बांगेरा हा सराव करून घेत होता, असं चौकशीतून उघड झालं आहे. गेल्या महिन्यात मदिकेरी येथून त्याला अटक केली होती. एका स्थानिक राजकीय व्यक्तीचा तो स्वीय सहायक आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये झाली होती. त्याच्या दोन-तीन महिन्यांआधी म्हणजेच एप्रिल-मे २०१३मध्ये मारेकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. लंकेश यांच्या डोक्यात गोळी घाला, असं मारेकऱ्यांना सरावादरम्यान सांगण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं.

  • मारेकरी एकमेकांना टोपण नावाने संबोधत होते 

मारेकरी एकमेकांना मूळ नावानं संबोधत नसत. छोटा मियाँ, बडा भाई, भाई साहब, काका, मामा, दादा, बंधू अशा टोपण नावांनी ते एकमेकांना संबोधत असत. अन्य एका आरोपीला पुण्यातील डॉक्टरचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी लगेच ओळखलं. डॉक्टरनेच प्रशिक्षण दिल्याचं आरोपीनं चौकशीवेळी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

  • आरोपींचा कलबुर्गींच्या हत्येशी संबंध

ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचीही सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा कलबुर्गी हत्येशी संबंध आहे का, हे तपासून पाहण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे संकेत सीआयडीनं दिले आहेत. कलबुर्गी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अमोल काळे याला ओळखले आहे. त्यानेच कलबुर्गींच्या घराचा दरवाजा ठोठावला होता, असं त्यांनी सांगितलं. काळेसह चौघे जण कलबुर्गी यांच्या घरी गेले होते. त्यातील दोघे कारमध्ये थांबले होते. दोघे जण बाईकवरून आले होते. त्यात अमोल काळेही होता, अशी माहिती एसआयटीतील सूत्रांनी दिली.
बिहारमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी; १५ भाविक जखमी

बिहारमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी; १५ भाविक जखमी


मुजफ्फरपूर :- बिहारमधील मुजफ्फरपूर येथील गरीबनाथ मंदिरात सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १५ भाविक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रावणातील सोमवारी गरीबनाथ मंदिरात भगवान शंकराच्या पुजेसाठी आणि जलाभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. प्रचंड गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १५ भाविक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंदिरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
Kashmir: चकमकीत १ जवान शहीद; ३ जखमी

Kashmir: चकमकीत १ जवान शहीद; ३ जखमी


श्रीनगर :- श्रीनगर जवळील बटमालू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे तर पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. शहीद जवान लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये(एसओजी) कार्यरत असल्याची माहिती मिळते आहे.

डीजीपी एसपी वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार बाटमालू परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानुसार आज पहाटेच या परिसराला घेरण्यात आलं. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. यामध्येच एक जवान शहीद झाला तर तिघं जखमी झाले. दरम्यान कोणताही दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले की नाही हे मात्र अजून समजू शकलेलं नाही.दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच असून हे मिशन यशस्वी होईल असा विश्वासही वैद्य यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी बारामुल्लामध्येही अशाच सर्च ऑपरेशनद्वारे ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
'सनातन'च्या साधकाच्या घरी ATSचा छापा; ८ बॉम्ब जप्त

'सनातन'च्या साधकाच्या घरी ATSचा छापा; ८ बॉम्ब जप्त


पालघर :- नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथील एका घरातून दहशतवादविरोधी पथकानं मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा व आठ गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. या प्रकरणी वैभव राऊत याला अटक करण्यात आली असून तो सनातन संस्थेचा साधक असल्याचा संशय आहे. 'सनातन'नं मात्र वैभव हा आमचा साधक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी तात्काळ त्याची चौकशी सुरू केली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून एटीएसचं पथक वैभवच्या मागावर होतं. पुरेशी माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात वैभवच्या घरातून व दुकानातून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये गन पावडर, डिटोनेटरचा समावेश आहे. हे सगळं साहित्य बॉम्ब बनविण्यासाठी वापरलं जातं. किमान दोन डझन बॉम्ब बनवता येतील इतकी सामुग्री वैभवच्या घरातून मिळाल्याचं सूत्रांकडून समजतं.

ही स्फोटकं वैभवनं घरात का ठेवली होती?, ती कुठून आणली होती? त्याचा कसा वापर केला जाणार होता?, या सगळ्याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. त्याला आज भोईवाडा न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं.

राज्यात आज बंद की ठिय्या?; संभ्रम कायम

राज्यात आज बंद की ठिय्या?; संभ्रम कायम



मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज, गुरुवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याच्या मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी संभ्रमाची स्थिती आहे. सकल मराठा समाजामध्ये आंदोलनाच्या स्वरूपावरून मतभेद झाल्याचे स्पष्ट झाले असून मराठा क्रांती महामोर्चाने ठोक मोर्चाचा पुरस्कार करत आज मुंबईसह महाराष्ट्रात बंद करण्याचे जाहीर केले, तर मराठा क्रांती मोर्चाने मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची हाक दिली आहे.

मराठा क्रांती महामोर्चाचे मुंबईतील समन्वयक अमोल जाधवराव यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह महाराष्ट्रात शांततेने बंद करण्यात येईल, असे सांगितले. राज्यभरात अनेक ठिकाणी स्थानिक समन्वयकांनी बंदचा निर्णय जाहीर केला असेल तर मग मुंबईतही बंद का नको, अशी भूमिका घेत मुंबईतही कार्यकर्ते आपापले विभाग कडकडीत बंद पाळण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी हा बंद शांततेच्या मार्गाने होण्यासाठी आचारसंहिताही दिली असून त्यानुसार सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत पाळल्या जाणाऱ्या या बंददरम्यान कोणत्याही सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान केले जाणार नाही आणि बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या जातील, असे जाधवराव यांनी सांगितले. या संघटनेच्या भूमिकेप्रमाणे मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह अन्य भागांत बंद पाळला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे, मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईतील सन्वयक वीरेंद्र पवार यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. दादरमधील राजर्षी शाहू सभागृहातील बैठकीत मंगळवारी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मराठा बांधव सकाळी ११ वाजता जमून काळ्या फिती लावून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करतील. हे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत राहील, असे त्यांनी सांगितले. ठाणे, पालघर, पुणे, सांगलीसह अनेक भागांमध्येही ठिय्या आंदोलनच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


  • 'मराठा क्रांती दिन करू'

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायचे आहे. तसेच सोशल मीडियावरील बातम्यांची खातरजमा करत अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. तसेच मराठा सेवकांनी शांत राहून आपला अॅक्शन प्लॅन तयार करायचा असून नागरिकांना त्रास होईल, असे काही करू नये, असे आवाहन मराठा क्रांती महामोर्चाने केले आहे. तसेच आत्महत्या करून प्रश्न सुटणार नसल्याने मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये. कोणतेही गालबोट न लावता ९ ऑगस्टचा बंद असा यशस्वी करायचा आहे की पुढच्या वर्षी हा दिवस केवळ क्रांती दिन म्हणून नव्हे तर मराठा क्रांती दिन म्हणूनही ओळखला जावा, असे आवाहनही या संघटेनने केले आहे.

  • 'मुस्लिम संघटनांचा पाठिंबा'

नवी मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या बंदला काही मुस्लिम नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे, असा दावाही मराठा क्रांती महामोर्चाचे अमोल जाधवराव यांनी केला.

मुस्लिम आरक्षणासाठी जमीयत उलेमा ए हिंद, महारष्ट्रच्या वतीने राज्यभर निदर्शने - मौलाना हाफिज नदीम सिदिकी

मुस्लिम आरक्षणासाठी जमीयत उलेमा ए हिंद, महारष्ट्रच्या वतीने राज्यभर निदर्शने - मौलाना हाफिज नदीम सिदिकी




मुंबई :-  पूर्वीच्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या पाच टक्के मुस्लिमांचे आरक्षण मिळण्यासाठी शुक्रवार  दिनांक 10 अगस्त 2018 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत राज्याच्या तहसील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जमियत उलेमा ए हिंद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मौलाना सिद्दिकी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी भारतीय स्वातंत्र्यानंतर 1951 पासून मुस्लिमांना सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण पाहून आरक्षण देण्याची मागणी देशपातळीवर जमिनीचे उलमा हिंद ने केली आहे त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जिल्हा राज्य व देश पातळीवर मुस्लिम आरक्षणासाठी जमियत ने प्रयत्न केले त्याची दखल घेत आंध्रप्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल तेलंगाना मध्ये मागास मुसलमानांना आरक्षण दिले गेले परंतु महाराष्ट्र राज्यात मुस्लिमांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले मागील महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा बरोबर मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणाबाबत वटहुकूम काढला त्यानंतर सदर आरक्षण मुंबई हायकोर्टात अपील केले गेले माननीय न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांचे आरक्षण वैद्य ठरविले त्यानंतर सध्याच्या सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक नागपूर अधिवेशनात मांडून ते मंजूर करून घेतले पण जातीय दृष्टिकोनातून पिढ्यानपिढ्या सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या मुस्लिम बांधवांना आरक्षण मुस्लिमांच्या आरक्षणाचा विधेयक शासनाने अधिवेशनात मांडला नाही राज्य शासनाची सदर कृती घटनाबाह्य असून समतेच्या समानतेच्या अधिकाऱ्यांना तिलांजली देणारी आहे 4 फेब्रुवारी 2015 रोजी जमियत उल् ए महाराष्ट्रचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आरक्षणाबाबत व्यापक चर्चा करण्यात आली शासन सकारात्मक असल्याने 18 ऑक्टोबर 2016 रोजी राज्यभर लाखोच्या संख्येने निदर्शने करण्यात आली 20 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे मुस्लिम आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने यशस्वी धरणे आंदोलन करण्यात आले 15 डिसेंबर 2016 ला नागपूर अधिवेशनाच्या वेळेस जमियत उल् ए महाराष्ट्र सेक्रेटरी जनरल  मौलाना सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांच्या मागासलेपणाची मागासलेली परिस्थिती कथन करीत नैसर्गिक न्यायाने मुस्लिमांच्या आरक्षणाची भूमिका विशद केली त्यावेळेस घटनात्मक बाबी तपासून आरक्षण देण्याचे शासनाने आश्वासन दिले मुस्लिम बरोबर मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी यापूर्वी जमियत उल् ए महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आली आहे मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री व सरकारने आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी नैसर्गिक न्यायाने मुस्लिम समाज आरक्षणास पात्र असताना शासन मुस्लिम आरक्षणाबाबत ब्र शब्द काढत नाही ही शोकांतिका आहे शासनाची सदर कृती अत्यंत दुर्दैवी व घटनाविरोधी आहे वास्तविक पाहता न्यायमूर्ती सच्चर कमिटी न्यायमूर्ती रंगनाथन commission तसेच महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले डॉक्टर महमूद रहमान अभ्यास गटाने मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता नमूद केली आहे शासन याद्वारे निवेदन करीत आहोत की मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिमांना आरक्षण देण्याविषयी त्वरित पावले उचलावी राज्यघटना मान्य असणाऱ्या तसेच सर्व क्षेत्रात वंचित असलेल्या मुस्लीम समाजाला घटनात्मक न्याय मिळावा अशी भूमिका असलेल्या मुस्लिमेतर भारतीय समाजाने आंदोलनात सहभागी होऊन एकात्मतेचे प्रदर्शन घडवावे असे आवाहन जमियत उल् ए महाराष्ट्र च्या  वतीने करण्यात आले आहे जमियत उल् ए महाराष्ट्र च्या  कार्यकर्त्यांनी झेंडे व आरक्षणाच्या मागणीचे फलक घेऊन 10 अगस्त 2018 रोजी जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालय येथे निदर्शने कविता निवेदन द्यावे व त्याची प्रत जमियत उल् ए महाराष्ट्राचे कार्यालय जैन इला बदिन बिल्डींग भेंडी बाजार मुंबई येथे पाठवावे संपर्कासाठी 0222 237 123 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर बंदी?

तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर बंदी?



नवी दिल्ली :- आणीबाणीची परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा देशांतर्गत तणाव निर्माण झाल्यास फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. तणावाच्या काळात अफवा रोखता याव्यात आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून सरकार हे पाऊल उचलत असून त्यासाठी केंद्राने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका असेल तेव्हा सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट ब्लॉक करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे दूरसंचार मंत्रालयाने या संदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने या संदर्भात १८ जुलै रोजी टेलिकॉम ऑपरेटर, भारती इंटरनेट सेवा प्राधिकरण, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आदी दूरसंचार कंपन्यांना पत्र पाठवलं असून सोशल मीडियावरील बंदी बाबतची विचारणा केली आहे. या शिवाय माहिती व तंत्रज्ञान विभागाने विधी खात्याचाही सल्ला मागवला आहे.

माहिती व तंत्रज्ञान कायदा ६९ ए अंतर्गत सोशल मीडियावर निर्बंध घालण्याचा सरकारला अधिकार असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह विविध अॅपवरून अफवा पसरत आहेत. त्यामुळे जमावाने लोकांची हत्या केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. भारतात व्हॉट्सअॅप सर्वाधिक वापरलं जात

असून त्यावरूनच सर्वाधिक अफवा पसरविल्या जात असल्याचं आढळून आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रानं हे पाऊल उचललं आहे.

माॅब लिचिंग की रोकथाम के लिए सख्त और प्रभावी कानून बनाया जाए- मौलाना महमूद मदनी

माॅब लिचिंग की रोकथाम के लिए सख्त और प्रभावी कानून बनाया जाए- मौलाना महमूद मदनी



नई दिल्ली :-  जमीअत उलमा-ए- हिंद के महासचिव मौलाना महमूद मदनी ने देश में गौरक्षा और अन्य शीर्षक से जारी माॅब लिचिंग पर गहरी चिंता व्यक्त करते हुए केंद्र और राज्य सरकारों से मांग की है कि इसके रोकथाम के लिए सख्त और प्रभावी कानून बनाया जाए।
मौलाना महमूद मदनी ने शुक्रवार शाम अलवर, राजस्थान में मेवात के अकबर खां की भीड़ द्वारा हत्या पर अफसोस का इज्हार करते हुए कहा कि कानून हाथ में लेने वालों का हौसला इसलिए बढ़ता जा रहा है क्यों कि वह कानून की गिरफ्त से खुद को सुरक्षित समझते हैं। मौलाना महमूद मदनी ने पिछली घटना का जिक्र करते हुए कहा कि पिछले वर्ष भी अलवर में पहलू खान और उमर खान की गौरक्षकों ने पीट-पीटकर हत्या कर दी थी। मगर हैरानी की बात तो यह है पिछले साल पुलिस ने पहलू खान की हत्या में शामिल 7 आरोपियों को क्लीन चिट दे दी। जाहिर है कि ऐसी स्थिति में माॅब लिचिंग को कभी नहीं रोका जा सकता। इसलिए इस बात की जरूरत है कि सुप्रीम कोर्ट के निर्देश के तहत केंद्र सरकार उसके खिलाफ अलग और व्यापक कानून बनाए।

मौलाना मदनी ने कहा कि इस देश में केवल माॅब लिचिंग नहीं हो रही है बल्कि इस प्रक्रिया को वैध ठहराया जा रहा है और अपराधियों को प्रोत्साहित किया जा रहा है। संसद में प्रधानमंत्री और गृहमंत्री ने इस बर्बर प्रक्रिया की निंदा की और इसे मानवता के खिलाफ बताया, लेकिन इसके साथ ही यह बेहद अफसोस की बात है कि उनके केन्द्रीय मंत्रियों ने अपने कार्यों और बातों से उनका समर्थन किया है। मौलाना मदानी ने कहा कि यह हरगिज बर्दाश्त नहीं किया जा सकता है। कि भीड़तंत्र द्वारा किसी क्रिया की प्रतिक्रिया बताकर उसको सही ठहराया जाये। ऐसे अपराध को अंजाम देने वालों के विरूद्ध सख्त एवं प्रभावी कार्रवाई होनी चाहिए।

मौलाना मदनी ने कल के अलवर में हुई घटना के बाद केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल के बयान को दुर्भाग्यपूर्ण बताया जिसमें उन्होंने इसका बचाव किया। उन्होंने राजस्थान सरकार से मांग की है कि इस पूरे कांड की निष्पक्ष जांच कराई जाए और वास्तविक दोषियों को सख्त से सख्त सजा दी जाए। उन्होंने अकबर खान के परिजनों को उचित मुआवजा दिये जाने की भी मांग की है। मौलाना महमूद मदनी ने उस कहा कि जरूरत पड़़ने पर जमीअत उलमा-ए- हिंद अकबर को न्याय दिलाने के लिए हर संभव संघर्ष करेगी।
असम पर कदम को उठाने से पहले केंद्र और राज्य की सरकारें मानवता के पहलू को नजरअंदाज न करें: मौलाना महमूद मदनी

असम पर कदम को उठाने से पहले केंद्र और राज्य की सरकारें मानवता के पहलू को नजरअंदाज न करें: मौलाना महमूद मदनी




  • जमीअत की सभी इकाइयों को असम में हिदायत दी गई है कि पीड़ितों के लिए कागजात की तैयारी में जुट जाएं और लोगों का सहयोग करें


नई दिल्ली :-  जमीअत उलेमा ए हिंद के महासचिव मौलाना महमूद मदनी ने कहा है कि एन. आर. सी की अंतिम सूची में असम के चालीस लाख से अधिक नागरिकों का नाम शामिल न होना एक बड़ा और गंभीर समस्या है, इस की वजह से देश के सामाजिक और भौगोलिक ताने बाने पर गहरा असर होगा। इसलिए किसी भी कदम को उठाने से पहले केंद्र और राज्य की सरकारें मानवता के पहलू को नजरअंदाज न करें।

मौलाना महमूद मदनी ने कहा कि जमीअत उलेमा ए  हिंद इस समस्या पर काफी चिंतित है और वह असम के लोगों के अधिकार के लिए हर स्तर पर प्रतिबद्ध है और रहेगी, साथ ही इस से संबंधित सुप्रीम कोर्ट में कानूनी लड़ाई जारी रखेगी।



मौलाना मदनी ने असम के लोगों से विशेष अपील की है कि वे अपनी हिम्मत न हारें, जो स्थिति भी पैदा हुई है, इस को कानूनी रूप से सही करना हम सभी की जिम्मेदारी है. जिन लोगों का नाम नहीं आया है वे गंभीरता के साथ सभी आवश्यक कदम, बुनियादी जानकारी और दस्तावेज़ात इकट्ठा करें, इसके लिए किसी तरह की कोई सुस्ती और संकोच न करें. उन्हों ने कहा कि जमीअत उलेमा ए हिंद की सभी इकाइयों को असम में हिदायत दी गई है कि पीड़ितों के लिए कागजात की तैयारी में जुट जाएं और लोगों का सहयोग करें। उन्हों ने कहा कि इस संबंध में वकीलों और बौद्धिकों सहित लगभग 1500 लोगों का चयन किया गया है जो हर जिला स्तर पर कागज़ात बनाने में लोगों की मदद करेंगे।

मौलाना मदनी ने यह भी कहा है कि जहां कहीं अधिकारियों द्वारा अवैध रूप से सख्ती की जाए, तो इस की सूचना जमीअत उलेमा की स्थानीय इकाई को दी जाए, वहां का नेतृत्व इस समस्या को सुलझाने की पूरी कोशिश करेगा. ज्ञात रहे कि आज सुबह दस बजे एन आरसी की दूसरी सूची जैसे ही सामने आई, मोलाना महमूद मदनी ने जमीअत उलेमा असम के अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल और सचिव हाफिज बशीर अहमद व अन्य लोगों से बातचीत करके स्थिति को समझने और आगे के क़दम  के बारे में बात चीत की।
आरक्षण: 'उद्या मोठा भडका उडाला तर जबाबदार कोण?'

आरक्षण: 'उद्या मोठा भडका उडाला तर जबाबदार कोण?'


पुणे :- मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागे केवळ राजकारण आहे. इतकी वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित का ठेवला? कुणाचीच हरकत नाही तर इतके दिवस मराठा आरक्षण का लांबलं,' असे प्रश्न उपस्थित करतानाच 'मोर्चे काढू नका म्हणता मग आरक्षण देण्यासाठी मार्ग का काढत नाही. उद्या मोठा भडका उडाला तर त्याला जबाबदार कोण?,' असा सवाल उदयनराजे यांनी राज्यसरकारला केला आहे.

उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी लावून धरली. 'राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. ही आंदोलनं आता हिंसक मार्गावर गेली आहेत. दुसरा पर्याय नसल्यानेच लोकं रस्त्यावर उतरली आहेत. त्यामुळे लोकांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. सरकार नुसतंच दाखवण्यापुरतं कागदी लखोटे घेऊन फिरतंय. उद्या मोठा धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण?,' असा सवाल करतानाच 'आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड होऊ देऊ नका,' असं आवाहनही उदयनराजे यांनी केलं.

'आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी कोणीही प्रवृत्त केलेलं नाही. त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळच आणल्या गेलीय. परिस्थिती अद्यापही हाताबाहेर गेलेली नाही. हे समजून सरकारनं पावलं उचलली पाहिजेत. आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, नाही तर भडका उडेल,' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 'अध्यादेश वगैरे काही कामाचे नाहीत, आरक्षण देणं सरकारच्याच हातात आहे', असंही त्यांनी सांगितलं. 'आरक्षण देता येत नसेल तर पुढील ३० वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करा', असा खोचक टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

'इतर कुणाचंही आरक्षण काढू नका. पण मराठा आणि धनगर समाजालाही न्याय द्या. अॅट्रोसिटीबाबत जी तत्परता सर्व पक्ष दाखवत आहेत. तिच तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखवली जात नाही,' असा सवाल त्यांनी यावेळी सर्वपक्षीयांना केला.

आसाम: माजी राष्ट्रपतींचं कुटुंब नागरिकत्वाच्या यादीतून गायब

आसाम: माजी राष्ट्रपतींचं कुटुंब नागरिकत्वाच्या यादीतून गायब



नवी दिल्ली :- नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी)ने जाहीर केलेल्या यादीत आसाममधील ४० लाख लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावंच या यादीतून गायब झाल्याचं आढळून आलं आहे. धक्कादायक म्हणजे उल्फा या अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एनआरसीने जाहीर केलेली यादी अंतिम नसली तरी या यादीतील घोळ चव्हाट्यावर आल्याने त्यावरून राजकारण तापले आहे. माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावं या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे बंधू एकरामुद्दीन अहमद यांच्या कुटुंबीयांचंही या यादीत नाव नाही. आसामच्या दक्षिण अभयपुरी मतदारसंघातील भाजपचे आमदार अनंत कुमार यांचंही या यादीत नाव नसल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांची नावं नसलं तरी उल्फा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख परेश बरुआ याचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्याची पत्नी बॉबी भुयान आणि दोन मुलं अरिंदम आणि आकाश यांचं नाव या यादीतून गायब आहे.

दरम्यान, ४० लाख लोकांना बेकायदा ठरवल्यानं आसाममध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आसामलाच लागून असलेल्या बांगलादेशातील अनेक जिल्ह्यातही तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आसाममध्ये १४४ कलम लागू केलं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात २२ हजार जवान तैनात केले आहेत.
यंत्रणेत बदल: रेल्वे आरक्षण केंद्रे उद्या तात्पुरती बंद

यंत्रणेत बदल: रेल्वे आरक्षण केंद्रे उद्या तात्पुरती बंद



 मुंबई :- मुंबईतील प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएसी) आपत्कालीन स्थितीतही उत्तम चालावी यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सतर्फे (क्रिस) पीआरएस यंत्रणेत बदल केले जाणार आहेत. त्यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या चाचणीसाठी गुरुवार, २ ऑगस्ट रोजी मुंबईतील कम्प्युटराइज्ड तिकीट यंत्रणा (पीआरएस) टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य रेल्वेवरील तिकीट आरक्षण केंद्रे काही वेळासाठी बंद राहणार आहेत.


रेल्वे यंत्रणेतील तिकीट आरक्षणाचे मुख्य केंद्र मुंबईसह दिल्ली, चैन्नई, कोलकोता येथे असून एक डेटा केंद्र सिकंदराबाद येथेही आहे. आपत्कालीन स्थितीत तिकीट यंत्रणा कोलमडू नये, समस्या निर्माण होऊ नये यासाठी क्रिस संस्थेतर्फे या यंत्रणेत काही बदल केले जाणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीमुळे २ ऑगस्ट रोजी पीआरएस, इंटरनेट तिकीट यंत्रणा दुपारी २.१५ ते दु. ३.१५पर्यंत तात्पुरती बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वातीन ते रात्री पावणेबारापर्यंत पुन्हा आरक्षण केंद्र व ऑनलाइन यंत्रणा सक्रिय होणार आहे. त्यानंतर पुन्हा रात्री पावणे बारा ते रात्री १.२०पर्यंत ही यंत्रणा बंद राहील. मध्यरात्री १.२०नंतर सेवा पूर्ववत होईल. आपत्कालीन स्थितीत रेल्वे आरक्षण यंत्रणा योग्यपद्धतीने सुरू राहण्यासाठी ही यंत्रणा अद्ययावत केली जात असल्याचे क्रिस संस्थेचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.
‘आधार’क्रमांक जाहीर करू नका

‘आधार’क्रमांक जाहीर करू नका



नवी दिल्ली :- आधारचा १२ आकडी क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नका असे आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने केले आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी त्यांचा क्रमांक ट्विटरवर प्रसिद्ध करून तो हॅक करून दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांचा नंबर हॅक करून त्यांच्या बँक खाते, ईमेलपर्यंत प्रवेश मिळवला होता. त्यावर अशा प्रकारचे कृत्य हे अनावश्यक आहे आणि त्यापासून लांब राहायला हवे. असे कृत्य हे कायद्याला धरून नाही, असेही 'आधार'ने म्हटले आहे.