लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका विद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन होळी येथील ग्रामस्थ, रिपब्लिकन पार्टी आठवले गट (रोजगार आघाडी), महिला राजसत्ता आंदोलन यांच्यावतीने तहसीलदार लोहारा यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर येथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला आहे. या घचनेचा जाहीर निषेध करुन या आरोपींना फाशीची, शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर रिपाई आठवडे गट रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, पँथर नेते दत्ता गायकवाड, बालाजी माटे, दगडु कांबळे, मंगलताई कांबळे, शांताबाई भालेराव, रमाबाई भालेराव,
अंजनाबाई भालेराव, लक्ष्मन रोडगे, ग्रामसृष्टी जिल्हा समन्वयक मारुती बनसोडे, महिला राजसत्ता आंदोलन बालिका मोरे, शैला मोरे, अनिता साठे, मुकेश सोनकांबळे, संगीता कांबळे, प्रविण बोंदाडे, जयश्री बिराजदार, सरपंच व्यंकट माळी (होळी), संजय बिराजदार, किरण अंहकारे, केशव सरवदे, लिंबराज कदम, धनराज जाधव, जनार्धन जाधव, बालाजी जाधव, किशोर कोकाटे, सदाशिव जमादार, यांच्यासह महिला व नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात सह्या आहेत.