Showing posts with label बुलडाना. Show all posts
Showing posts with label बुलडाना. Show all posts
जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपुर्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपुर्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



  • भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या दुष्काळमुक्त मोहिमेचा थाटात शुभारंभ
  • जलसंधारणाचे पीपीपीपी मॉडेल राज्य दुष्काळमुक्त करणार
  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत भुसूधार ते विपणनची साखळी
  • दुष्काळमुक्त मोहिमेमुळे जिल्ह्याची सामाजिक-आर्थिक प्रगती होणार
  • स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देवून काम देणार

बुलडाणा,दि.3 :  शासनात आल्यानंतर अवघ्या एक महिन्यात जलयुक्त शिवारसारखे लोकसहभाग असणारे महत्वांकांक्षी अभियान राज्यात आणले. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राज्यात झाली. ही योजना केवळ शासनाची नसून ती जनतेची आहे, हे लोकसहभागावरून दिसून येते. यासोबतच राज्यात जलसंधारणाच्या कामांमध्ये खाजगी कंपन्या, संस्था यांचा सहभाग वाढत असून ही जलसंधारणाची लोकचळवळ देशात अभूतपुर्व अशी आहे. अशा कामांमुळे जलसंधारणात राज्य देशात निश्चितच अग्रेसर राहणार  आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज व्यक्त केला.
   भारतीय जैन संघटनाद्वारे  दुष्काळमुक्त  महाराष्ट्र अभियानातंर्गत बुलडाणा जिल्हा सुजलाम सुफलाम मोहिमेचा शुभारंभीय कार्यक्रम मलकापूर रस्त्यावरील एआरडी मॉल समोरील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, राहूल बोंद्रे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. संजय कुटे, शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, भारतीये जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, सुरेशदादा जैन, जेसीबी कंपनीचे कार्यकारी संचालक विपीन सौंढी, टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे,  वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरूण जैन आदी उपस्थित होते.
    राज्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या वषी काही हजार गावांमध्ये दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,या दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे कालांतराने शेतमाल उत्पादन कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर दूरगामी प्रतिकूल परिणाम होतो.  भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतीलाल मुथा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे मोठे काम करीत आहे. खऱ्या समाजसेवी कामाचे दर्शन शांतीलाल मुथा यांच्या कामातून होते. राज्यभरात अशा कामांचा बुलडाणा पॅटर्न राबविण्यात यावा. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त्‍ जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. त्यासाठी शासन जैन संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करेल. बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील जिगांवसह 8 लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. ही अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाचा भर असणार आहे.
     ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना राज्यात अंमलात आणण्यात येत आहे. या योजनेमुळे जलाशयांमधील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात येत आहे. परिणामी शेती सुपिक होत आहे. या कामांमध्ये स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देवून रोजगर मिळवून देण्यात येणार आहे.
    जलसंधारणाच्या कामांचे पीपीपीपी (पब्लीक प्राईव्हेट पीपल पार्टनरशीप) मॉडेल राज्यात विकसित झाले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्टयातील गावांमध्ये शेतीचा विकास करण्यात  येत आहे. यामध्ये भूसुधारपासून विपणनापर्यंतची साखळी विकसित करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
  याप्रसंगी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचा हा संकल्प स्पृहणीय आहे. अभियानात 134 जेसीबी मशीनच्या माध्यमातून जिल्हाभर गाळ काढण्याचे काम होणार आहे. यामुळे प्रकल्पांची जलसंचय क्षमता वाढून भूजल पातळीत  वाढ होणार आहे. जिल्ह्यात रस्त्यांचा विकास जोमाने होत असून अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी मिळाला आहे.
  यावेळी प्रास्ताविक शांतीलाल मुथा यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, जेसीबीमधील डिझेल खर्चाच्या 27 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता आहे. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्यावतीने या मोहिमेत मदत करणार आहे. याप्रसंगी टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरूण जैन यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये करार करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी श्री. पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाचे छायाचित्र मुख्यमंत्री यांना भेट दिले. कार्यक्रमाचे संचलन राजेश देशलहरा यांनी तर आभार श्री. बांठीया यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, जैन समाज बांधव, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
 दुष्काळमुक्त अभियानामुळे जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडे     नितीन गडकरी

कुठल्याही कामामागे प्रेरणा महत्वाची असते. या दुष्काळमुक्त अभियानाच्या कामांमागेही शांतीलाल मुथा यांची प्रेरणा महत्वाची आहे. सामाजिक संवदेनशीलता असल्यामुळे अशाप्रकारचे काम होत आहे. या कामांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील संरक्षित सिंचनात भर पडणार आहे. परिणामी जिल्ह्याची सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

  परंपरागत पिक पद्धती सोडून शेतकऱ्यांनी नवनवीन पीक पद्धती अवलंबण्याचे आवाहन करीत केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्यात पाण्याची कमी नाही. मात्र पाण्याचे नियोजन नसल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो. आंतरराज्यीय करार  झाल्यामुळे अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहे. केंद्र पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पांतून विदर्भातील 78, मराठवाड्यातील 26 व प. महाराष्ट्रामधील 4 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 5000 कोटी रूपयांच्या रस्त्याची कामे सुरू असून 674 किलोमीटर लांबीचे रस्ते पुर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या सुरू असलेल्या कामांमुळे सभोवतालची जलाशये गाळमुक्त करण्यात येत आहे. या जलाशयांमधील गाळ रस्ता कामासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.

 ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मिती होणाऱ्या पिकांची लागवड करावी. मक्याच्या कणीसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते. तसेच तांदूळ पिकाच्या काड्यांपासूनही बायो इंधनाची निर्मिती होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक पद्धत बदलवून नवीन पिकांची लागवड करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पातंर्गत जिगांवसह 8 लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे निश्चितच जिल्ह्याचे सिंचन वाढणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांची गद्रे वाचनालयास सदिच्छा भेट

        बुलडाणा, दि.3: येथील ग्रद्रे सार्वजनीक वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जलसंसाधान मंत्री नितीन गडकरी यांनी आज सदिच्छा भेट दिली.
        यावेळी कृषि मंत्री तथा पालकमंत्री पाडुंरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार सर्वस्वी संजय कुटे, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, बुलडाणा नगर पालिकेच्या  नगराध्यक्षा नजमुन्नीसा सय्यद, अध्यक्ष केशवराव एकबोटे, सचिव उदय देशपांडे, ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते, संचालक गोकूल शर्मा  यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुपृष्ठ वाहतूक व जहाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गद्रे वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयास शुभेच्छा दिल्या.  प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस आणि भुपृष्ठ वाहतूक व जहाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येथील श्रीमती मंगलाताई तारे अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संचालक, वाचक उपस्थित होते.

--
लोहारा शहरातील प्नभाग क्रं.10 मधील मातंग समाजाच्या समाजमंदिराची दुरुस्ती करावी

लोहारा शहरातील प्नभाग क्रं.10 मधील मातंग समाजाच्या समाजमंदिराची दुरुस्ती करावी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील प्नभाग क्रं.10 मधील मातंग समाजाच्या समाजमंदिराची दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन शहरातील लहुजी शक्ती सेना यांच्यावतीने गरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे कि,या समाजमंदिराची डागडिजी करण्यात यावी अशी मागणी फेब्रुवारी 2017 मध्ये केली होती.मागणी करुनही या एक वर्षाच्या कालावधीत प्रशासनाने हे काम केले नाही.तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवुन समाजमंदिराची दुरुस्ती लवकरात लवकर करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी या समाजमंदिराची दुरुस्ती लवकर करुन घेवु असे  आश्वासन मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी दिले.
यावेळी लहुजी शक्ती सेना शहरध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे,शाम रोडगे ,बालाजी कसबे,अक्षय सगट,विष्णू मिसाळ,अभिजित सगट,सचिन रोडगे,रवि पवार, लक्ष्मण सगट,अदि उपस्थित होते.
1 मार्च रोजी फकीरा अर्पण दिन साजरा करण्यात आला

1 मार्च रोजी फकीरा अर्पण दिन साजरा करण्यात आला


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:-  लोहारा लहुजी शक्ती सेना यांच्यावतीने शहरातील शिवाजी चौकात दि.1 मार्च रोजी फकीरा अर्पण दिन साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे व फकिरा कादंबरीचे  पुजन भागवत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पत्रकार निळकंठ  कांबळे, श्रीकांत कांबळे,डिगंबर कांबळे,उमाकांत सगट,बाळू सातपुते,कार्तिक कांबळे,रवी पवार, पत्रकार बालाजी  बिराजदार,रोडगे दीपक,पत्रकार इक्बाल मुल्ला, प्रा,राजपाल वाघमारे, अतुल कांबळे, अमोल माटे, लक्ष्मण सगट,अभिजित सगट,शाम रोडगे,अक्षय सगट,सचिन रोडगे,बालाजी कसबे, अजय कसबे,बाळू रोडगे,विष्णू मिसाळ,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये विज्ञान दिवस साजरा.

देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये विज्ञान दिवस साजरा.


इकबाल मुल्ला
लोहारा :-  शहरातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये विज्ञान दिवस साजरी करण्यात आला.
यावेळी चंद्रशेखर वेंकट रमण यांचे प्रतिमे चे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकॅडमी चे प्राचार्य विवेकानंद जे.पाटिल होते.यावेळी विध्यार्थ्यांनी विज्ञान दिवस या विषयां वर भाषण केले.या नंतर अमित बोराळे सर आणि शकुंतला बिराजदार यांनी विज्ञान दिवस वर विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात अकॅडमीतील शिक्षक अमित बोराळे, जयेश पुकाळे,भाग्यश्री सुरवसे,जहेरा बागवान, अनुराधा कोळी,वनिता विरुदे,शकुंतला बिराजदार यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री सुरवसे यांनी केले तर जहेराबी बागवान यांनी  आभार मानले.या कार्यक्रमास शिक्षक वर्ग,शिक्षकेत्तर  कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा प्रि इंग्लीश स्कूलच्या वार्षिक स्नेहसमेलना

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा प्रि इंग्लीश स्कूलच्या वार्षिक स्नेहसमेलना


इकबाल मुल्ला
लोहारा प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा प्रि इंग्लीश स्कूलच्या वार्षिक स्नेहसमेलनात बाल कलाकारांनी विविध गीतावर बहारदार नृत्य विष्कार सादर करुन उपस्थितीतांची मने जिंकली. या स्नेहसमेलनाचे उदघाटन उस्मानाबाद येथील अन्न व औषधी विभागाचे औषध निरीक्षक सुनिल गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुमनाबाद येथील एच.के.डी.इ.टी. फॅर्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज कामशेट्टी होते.
तर यावेळी प्रमुख म्हणुन बिदर येथील फॅर्मसी महाविद्यालयाचे प्रा.सुनिल देशमुख,आर.पी फॅर्मसी महाविद्यालयाचे प्रा.तुषार वाघमारे,नळदुर्ग येथील एस.एस.व्ही इग्लिंश स्कूलचे अध्यक्ष संजय बताले, जिल्हा परिषदेचे सदस्या शोभाताई राजु तोरकडे, जेवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे,सरपंच मोहन पणुरे,उपसरपंच मल्लीनाथ डिग्गे,गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीमंत कारभारी, शारदा प्रि इंग्लीश स्कूलचे अध्यक्ष बाबूराव ढोबळे,डॅा. संतोष ढोबळे,अदि उपस्थित होते.यावेळी चिमुकल्यानी भरतनृत्य कोळीगीत,गोधळीगीत,शेतकरीगीत,बालगीत,देशभक्तीगीत,लावणी,रिमीक्स,अशा विविध चित्रपट गीतावर एकाहुन एक सरस नृत्य सादर करुण उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
 4 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर,

4 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर,


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 4 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान,उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.  
     दि.26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी कार्यक्रमस्थळाची सुरु झालेल्या कामांची पाहणी केली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे,आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ.कुलकर्णी,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रताप शिंदे,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे,उपस्थित होते.   
लोहारा शहरातील ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या वतीने दि.26 फेब्रुवारी रोजी शिव संदेश देण्यासाठी रॅली काढण्यात आली

लोहारा शहरातील ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या वतीने दि.26 फेब्रुवारी रोजी शिव संदेश देण्यासाठी रॅली काढण्यात आली


लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या वतीने दि.26 फेब्रुवारी रोजी शिव संदेश देण्यासाठी रॅली काढण्यात आली.या भव्य रँलीत  महीला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहरातील भारत माता मंदीरापासुन या रॅलीस सुरवात करण्यात आली.हि रँली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालया पर्यत काढण्यात आली.व या रँलीत शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलचे व तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधनीचे विद्यार्थी ही सहभागी झाले होते.यानंतर शिव संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगरध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे,बी.के.राजयोगिनी सोमप्रभा बहनजी,शामचैतन्य महाराज,पो.नि.सर्जेराव भंडारे, रेवनसिध्द भाई,बाबुराव पुजारी,ब्रम्हकुमारी सरीता दीदी,उस्मानाबाद संचालिका ज्योती बहनजी,राणी बहनजी,तुकाराम मस्के,मुरुमचे माजी नगरध्यक्ष  लिमये,रोहीदास भाई,बेडगे भाई,रामपुरे भाई,राजेंद्र कदम,राजयोगी ब्रम्हकुमार राजुभाई,रतनभाई याच्यासह आदीची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरीता दीदी यांनी केले.तर आभार राजु भाई यांनी मानले. यावेळी महीला मोठ्यासंख्येने उपस्थितीत होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त 4 मार्च रोजी उस्मानाबाद मध्ये होणार महाआरोग्य शिबीर महिला व बालकांसाठीचे विशेष शिबीर

जागतिक महिला दिनानिमित्त 4 मार्च रोजी उस्मानाबाद मध्ये होणार महाआरोग्य शिबीर महिला व बालकांसाठीचे विशेष शिबीर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- गरजू रुग्णांचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरीता जागतिक महिला दिनानिमित्त 4 मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हयातील महिला व बालकांसाठी महाआरोग्य शिबीर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत दिली आहे.यावेळी आमदार सुजितसिंह ठाकुर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य,प्राध्यापक,रुग्णालयांचे अधिष्ठाता,प्राध्यापक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.4 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान,उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात सुमारे 1 हजार 400 तज्ञ डॉक्टर त्यामध्ये पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,डॉ.भोजराज, डॉ.रणजित जगताप,डॉ.रमाकांत पांडा,वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ.प्रविण शिनगारे, प्रभारी आयुष संचालक डॉ.गोविंद खटी,अदि डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.शिबिराच्या रचनेत एकूण तीन रुग्ण नोंदणी विभाग, नव्वद बाहयरुग्ण कक्ष,विशेष मोतीबिंदु,ह्दयरोग,
बालशल्यचिकित्सा,महिला कर्मरोग तपासणी, त्वचारोग,हाडांचे विकार,मासिक पाळी संबंधी आजार,आयुर्वेद,होमिओपॅथी,युनानी,योगा इत्यादी, सर्व सोयीसुविधायुक्त दंततपासणी वाहने,मॅमोग्राफी व कर्करोग तपासणी वाहन,दहा ॲम्ब्यूलन्स,दोन कार्डीयाक ॲम्ब्युलन्स,चार अग्नीशमन वाहने उपस्थित राहणार आहेत.त्याचप्रमाणे सर्व गरजु रुग्णांना मोफत चष्मे,दातांची कवळी,औषधी,ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया,एम.आर.आय.,सोनोग्राफी, एक्सरे,रक्त,लघवी तपासणी करावयाची आहे.त्यांना सर्व सुविधा मोफत दिली जाणार आहे.तसेच सर्वांना मोफत भोजन व पाणी आयोजकांमार्फत दिले जाणार आहे.
 मारहाणीचा निषेधार्थ लोहारा पं.स.च्या सर्व कर्मचारी संघटनेनी काळ्या फिती लावुन गेली चार दिवसापासुन लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.

मारहाणीचा निषेधार्थ लोहारा पं.स.च्या सर्व कर्मचारी संघटनेनी काळ्या फिती लावुन गेली चार दिवसापासुन लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- परंडा येथील गटविकास अधिकारी विजयसिंह नेलवाडे व सहाय्यक प्रशासन अधिकारी सि.जे.पाकले यांना प्रहार जनशक्ती च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचा निषेधार्थ लोहारा पं.स.च्या सर्व कर्मचारी संघटनेनी काळ्या फिती लावुन गेली चार दिवसापासुन लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.
 दि.23 फेब्रुवारी पासुन आजतगायत लोहारा प्रशासकीय इमारती समोर पं.स.च्या कर्मचाऱ्यांनी   या मारहाण घटनेचा जाहीर निषेध करुन काळ्या फिती लावुन गेली चार दिवसापासुन सर्व कामकाज बंद केले आहे.या आंदोलनात सहाय्यक प्रशासन अधिकारी पी.एम.चौगुले,सहाय्यक लेखा अधिकारी बि.जे.नलावडे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी.एस.
लिंबाळकर,वरिष्ठ सहाय्यक लिपीक डी.ए.वाघमारे,
विस्तार अधिकारी वी.बी.पवार,विस्तार अधिकारी एस.एस.ढाकणे,एस.एस.बिराजरार,एन.ए.पटेल,एम.आय.चौधरी,व्ही.डी.सुरवसे,बी.जी.बिराजदार,जी.एस.बिराजदार,आर.एस.सुरवसे,बी.बी.कदारे,यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.
उंडरगावाचा वॉटर स्पलाय डिपी जळाला वीस  दिवसापासुन पाण्याअभावी नागरीकांचे  हाल.

उंडरगावाचा वॉटर स्पलाय डिपी जळाला वीस दिवसापासुन पाण्याअभावी नागरीकांचे हाल.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील महावितरण कंपनीचे डि.पी.जळाल्याने नागरीकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहे.तालुक्यातील उंडरगाव येथील पाणीपुरवठा करणारी वॉटर स्पलायची डि.पी.गेली विस ते पंचेविस दिवसापासुन बंद आहे.त्यामुळे नागरीक वैतागले आहेत.या बाबत उंडरगाव ग्रामपंचायतने वारंवार लेखी पत्र देवुन प्रत्यक्षात भेट घेवुन तात्काळ डिपी बसवण्याची मागणी केली आहे.तरीही डी.पी.बसविण्यात आली नाही.त्यामुळे नागरीकांतुन  तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.या गावापासुन एक कि.मी.अंतरावर गावाला पाणीपुरवठा करणारी  जीवन प्राधीकरणाची विहिर व एक बोअर आहे.या वॉटर स्पलाय करण्यासाठी या फाटयावर एक डिपी बसविण्यात आली असुन या डिपीवर  वॉटर स्पलाय करणारे दोन कनेकशन आहेत.त्याच फाटयावर अनेक शेतकऱ्याच्या मोटारी चालतात.परंतु  हा वॉटर स्पलाय करणारा डिपी गेली विस ते पंचेविस  दिवसापासुन जळाला आहे.हि डीपी तात्काळ दुरुसत  करण्याची मागणी असताना संबधीत लोहारा महावितरण कंपणीचे अधिकारी सागतात.शेतकऱ्यासह ग्रामपंचायतीने थकबाकी भरा तेव्हाच डिपी मिळेल अन्यथा मिळणार नाही.असे सांगत आहेत.त्यामुळे पाण्याअभावी नागरीकांचे बेहाल होत आहेत.हा डिपी जळाल्यापासुन येथील नागरीक पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत.उन्हाळेच्या सुरवातीलाच पाण्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.लोहारा महावितरण कंपणीच्या अधिकाऱ्यानी दोन दिवसात डिपी नाही बसविल्यास उंडरगाव ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच मलिनाथ पांचाळ,उपसरपंच मुरलीधर मोरे,ग्रा.पं.सदस्य महेश ढोबळे,रघुनाथ भुसारे, विमलबाई गंगणे,लक्ष्मीबाई शिवकर,ज्योतसना वाघमारे,यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
भानुदासराव चव्हाण महाविद्यालया मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

भानुदासराव चव्हाण महाविद्यालया मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थीच्या कलागुणांना वाव मिळावा दि.24 फेब्रुवारी व दि.25 फेब्रुवारी दोन दिवस वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उदघाटन  सुप्रसिद्ध कविवर्य प्रा.ललित आधाने (मराठी विभाग प्रमुख देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद) यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सतिश इंगळे सर होते.यावेळी प्रमुख म्हणुन नगराध्यक्षा सौ.पोर्णिमा जगदिश लांडगे,माजी सरपंच शंकर (अण्णा) जटे,प्रविण पाटील,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,माजी सरपंच नागण्णा वकील,प्रा.जि.जा. शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.बिराजदार,
उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी,अदि उपस्थितीत होते.
या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थीनी वेगवेगळे कलाप्रकार सादर कले.यामध्ये लावणी,मुकअभिनय,गित—गायन,
वैयक्तिक सामुहिक डान्स,अशा वेगवेगळ्या प्रकारे कलागुण सादर मंत्रमुग्ध केले.या स्नेहसंमेलनामध्ये आनंदनगरी सोहळयामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ चे स्टाॅल लावले होते.तसेच प्रश्नमंजुशा व शेलापागोटे या बहारदार कार्यक्रमांनी विद्यार्थीचे मनोरंजन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डी.एस.बिराजदार व सुत्रसंचालन उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी यांनी केले तर आभार प्रा.व्हि.ए.
तुंगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.डी.एस.बिराजदार,रजिस्टार भालचंद्र जाधव,उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी प्रा.प्रविण जगताप,प्रा.देविदास चव्हाण,प्रा.यशवंत चंदनशिवे, प्रा.राजपाल वाघमारे,प्रा.अमर कीर्तने,प्रा.अशोक भोसले,प्रा.स्वाती निकम,प्रा.अनुसया साठे,प्रा.उमा हलकुडे,प्रा.स्नेहलता करदुरे,प्रा.पुनम गरड,प्रा रुपाली कोटनुर,प्रा.रत्नमाला पवार,प्रा.मेघराज टापरे, प्रा.विनोद तुंगे,प्रा.मंगेश चेंडके,प्रा.दादाराव पवार, अजित हजारे,सोमनाथ चव्हाण,संदीप पाटील,गणेश गरड,स्वागत जगताप,श्रीकांत वाडीकर,राजेंद्र गुरव,दादा साठे,विक्रम जगताप,विद्यार्थी प्रतिनिधी रोहित लोळगे,विद्यार्थीनी प्रतिनिधी जयश्री सुरवसे,
अदिंनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास शहरातील नागरीक व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक महिलांदिनाचे औचित्य साधुन महिला व बाल जिल्हा स्तरीय महाआरोग्य शिबीराचे आयोजन

जागतिक महिलांदिनाचे औचित्य साधुन महिला व बाल जिल्हा स्तरीय महाआरोग्य शिबीराचे आयोजन


इकबाल मुल्ला
लोहारा:-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजण यांच्या सुचने नुसार उस्मानाबाद येथील कवायत मैदान पोलीसलाईन येथे दि.4 मार्च रोजी जागतिक महिलांदिनाचे औचित्य साधुन महिला व बाल जिल्हा स्तरीय महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या शिबीराचा जास्तीत महिलांनी लाभ घ्यावा,असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संताजी दादा चालुक्य यांनी लोहारा शहरात दि.24 फेब्रुवारी रोजी  आयोजित केलेल्या भाजपच्या बैठकीत केले.
यावेळी पुढे बोलताना चालुक्य म्हणाले कि,आपल्या ग्रामिण भागातील महिलांसाठी या शिबीराच्या माध्यमातुन चांगली संधी निर्माण करुन दिली आहे.
तरी कार्यकर्त्यानी तत्पर राहुन आपल्या भागातील महिलांची आरोग्य तपासाणी करुन घ्यावी.या शिबीरात दिल्ली,मुंबई,पुणे,औरंगाबाद,नाशिक,
राज्यातील सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ नामवंत डॉक्टर्स उपस्थित राहुन आरोग्य तपासणी करणार आहेत.यामध्ये विविध आजाराची तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येऊन औषध देण्यात येणार आहे.यावेळी भाजप जिल्हा चिटणीस सुरेश वाघ, माजी तालुका अध्यक्ष अनिल ओवांडकर,कृ.उ.
बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख,कृ.उ.
बाजार समिती संचालक राजेंद्र पाटिल,शहराध्यक्ष आशोक तिगाडे,माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, नेताजी शिदे,नागनाथ लोहार,विजय महानुर,भोजप्पा कारभारी,भाजप मिडिया सेल तालुका अध्यक्ष  इकबाल मुल्ला,शंकर आप्पा मुळे,प्रशांत काळे, कृ.उ.बाजार समिती संचालक अजय ढोणे,प्रविण चव्हाण,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, बालाजी सोनटक्के,व्यकट चोथरी,यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - सुभाष देशमुख

सहकार विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - सुभाष देशमुख



  •  सहकार विभागाची आढावा बैठक
  •  प्रत्येक महसुली गावात संस्था स्थापन करावी
  •  शेतमाल कर्ज तारण योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे

बुलडाणा. दि.२ : - सहकार आणि पणन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या कार्यवाहीतून शेतकऱ्यांना चांगला शेतमाल दर मिळवून दिल्या जात आहे. त्यामध्ये हमी भावाला शेतमाल खरेदी, शेतमाल तारण योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. त्यामुळे सहकार विभागाच्या प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज शेगाव येथे दिल्या.शेगाव येथील हॉटेल विघ्नहर्ता इन येथे सहकार, पणन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना मंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, विभागीय सह निबंधक आर जे डाबेराव, जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात, जिल्हा विपणन अधिकारी श्री. शिंगणे, विद्याधर महाले आदी उपस्थित होते.सरसकट कर्जमाफीमध्ये कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना सात बारा कोरा करून देण्याच्या सूचना करीत सहकार मंत्री श्री देशमुख म्हणाले, कर्ज माफी मिळालेल्या शेतकऱ्यांचे सात बारे कोरे करून द्यावेत. जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेत बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे. योजनेच्या प्रचारासाठी मेळाव्यांचे आयोजन गाव पातळीवर करावे. शेतमाल तारण योजनेत वार्षिक ६ टक्के दराने कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेकडे वळत आहेत.जिल्हा बँकेचा आढावा घेत असतांना सहकार मंत्री म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेने बिगर शेती कर्जाची वसुली करावी. अशा कर्जदाराविरुद्ध कडक कारवाई करावी. प्रत्येक महसुली गावामध्ये संस्था स्थापन करावी. गावातील खातेदार शेतकऱ्यांना संस्थेकडे वळवावे. त्यांना सभासद करावे. जेणेकरून गावातील वित्तीय जाळे मजबूत होईल. संस्थेने स्वतः चे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. अडचणीत सापडलेल्या संस्थांना बाहेर काढण्यासाठी उपाय योजना कराव्यात.पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी म्हणाले, जिल्ह्यात एका संस्थेला १६ - १६ गावे समाविष्ट आहे. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. संस्थेला संलग्न असलेल्या गावांची संख्या कमी करावी. अवैध सावकारी कर्ज प्रकरणामध्ये कारवाई करावी. बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेत सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना लाभ द्यावा. तसेच लेखा परीक्षण केलेल्या संस्थांमध्ये परीक्षणात आक्षेप आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी.यावेळी उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सादरीकरण केले. बैठकीला सहाय्यक निबंधक, बाजार समित्यांचे सचिव, सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 106 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका जाहीर

जिल्ह्यातील 106 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका जाहीर


• 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका
• नामनिर्देशन पत्र 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान दाखल होणार
• 25 फेब्रुवारी 2018 रोजी मतदान

बुलडाणा, दि. 24 : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील माहे मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 3 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच तेराही तालुक्यांमधील रिक्त पदांच्या 106 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 50 टक्क्यांपेक्षा कमी ग्रामपंचायतीच्या निवडणूका असल्यामुळे आचारसंहीता संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार नाही. परंतु ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या संपूर्ण तालुक्यात आचार संहीता लागू राहणार आहे. निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीच्या सिमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहीता लागू राहणार आहे. आदर्श आचार संहीता जरी संपूर्ण जिल्हा/तालुका लगतच्या गावामध्ये लागू असेल तरी जेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये नसतील त्याठिकाणी विकासाच्या कामांवर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र याच क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही. ज्यामुळे निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मतदारांवर विपरीत परिणाम पडेल. सदर आचारसंहीता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील.निवडणूकीची अधिसूचना 25 जानेवारी 2018 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडुणीकरीता नामनिर्देशनपत्र 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. या निवडणूकीचे मतदान 25 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 26 फेब्रुवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
लोकराज्यमुळे पोलीसांचे ‘रिअल वर्क’ समाजापर्यंत जाण्यास मदत होईल - शशीकुमार मीना

लोकराज्यमुळे पोलीसांचे ‘रिअल वर्क’ समाजापर्यंत जाण्यास मदत होईल - शशीकुमार मीना


बुलडाणा,दि.19 - पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळत नागरिकांना भयमुक्त जीवन देण्यासाठी प्रयत्न करतात. गुन्हेगारी कमी होवून नागरिकांना गुन्हाच न घडविण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठीसुद्धा पोलीस विभागा कार्य करतो. पोलीसांची प्रतिमा समाजात घडणाऱ्या गुन्हेगारीवर आणि गुन्हा सिद्थतेवर अवलंबून असते. माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाने जानेवारी 2018 चा अंक ‘आपले पोलीस -आपली अस्मिता’ या विषयावर काढून पोलीसांचे ‘रिअल वर्क’ समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा निश्चितच स्पृहणीय आहे, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी आज केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जानेवारी 2018 चा लेाकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशिल ‘आपले पोलीस - आपली अस्मिता’ या विषयावर प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, जिल्हा माहिती सहाय्यक नीलेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन परदेशी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा पोलीस अधिक्षक यावेळी म्हणाले, लोकराज्यच्या या अंकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे, सुरक्षित वाहतुक, दहशतवाद व नक्षलवादाचा बिमोड, या विषयी अतिशय उपयुक्त माहिती आहे. ती सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा उपयोगाची आहे. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना , पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? सायबर गुन्हयाचा पाठलाग, सायबर युगाची आव्हाने, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, या बाबतची माहिती हे या अंकाचे वैशिष्टय आहे.पोलीसांसाठीच नव्हेतर सर्वासामान्य नागरिकांसाठी हा अंक संग्राहय ठेवण्यासारखा आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस सिटिजन पोर्टल बाबत माहिती दिली असून हे  डाऊन लोड करुन आता नागरिकांना घरूनच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येऊ शकते. या ई- तक्रारीवर झालेल्या चौकशीची माहितीसुध्दा एस.एम.एस. व्दारे तक्रारदारास प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी हे  डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकराज्यचा हा अंक सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध आहे.