इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हा क्षेत्रातील क्रिडा स्पर्धां राज्यभर सहभागाने होत असलेल्या cm चषक क्रिडा स्पर्धांच्या उस्मानाबाद जिल्हा क्षेत्रातील खेळांचा त्रिस्तरीय असलेल्या या स्पर्धेच्या जिल्हा स्तरीय स्पर्धा दि.17 व 18 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रिडा संकुलात सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, लोकसभा संयोजक नितिन काळे, अँड मिलिंद पाटील, विधानसभा पालक अँड अनिल काळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, जिल्हा संयोजक प्रदीप शिंदे, अँड खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अँड व्यंकटराव गुंड, अदि उपस्थितीत राहणार आहेत. या स्पर्धाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कब्बडी,खो-खो,धावणे,क्रिकेट,कुस्ती,रांगोळी,नृत्य अशा विविध क्रीड़ाप्रकारांसह कलागुणांना प्रोत्साहित करने असा या स्पर्धांचा उद्देश आहे. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, इंद्रजित देवकते, गणेश मोरे, विजय शिंगाडे, प्रशांत मोहिते, बालाजी चव्हाण, प्रदीप सांगवे, गणेश देशमुख, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, सरचिटणीस नाना घाटगे यांनी केले आहे.
