
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी लोहारा नगरपंचातला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरपंचायतच्यावतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पं.स.सभापती अश्विनी पाटील, नुतन उपसभापती हेमलता रणखांब, माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, जि.प. सदस्य रफिक तांबोळी, पं.स.चे माजी सदस्य चंद्रकांत (तात्या) पाटील, युवा सेना माजी तालुका प्रमुख दिपक मुळे, शिवा स्वामी, माजी
पं.स.सभापती आसीफ मुल्ला, नगरसेविका जयश्री कांबळे, नगरसेवक तथा कॉग्रेस गटनेते आरीप खानापुरे, कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, कॉंग्रेस सरचिटणीस रब्बानी नळेगावे, जयश्री लोहार, यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.