ताहिर मिर्ज़ा.
उमरखेड़ :- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,शाखा-उमरखेड तर्फे आज दि.३/०१/२०१९ रोज गुरुवारला सावित्रीबाई फुले जयंती मारिया इंग्लिश स्कूल ताजपुरा येथे साजरी करण्यात आली, यावेळी दोन बालिका यांनी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची वेशभूषा धारण केली होती. तर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषण केलीत व तसेच यावेळी प्रमोद वाळूककर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बालीकादिन निमित्ताने विद्यार्थांना वही-पेन्सिलचे वाटप करण्यात आली. यावेळी सिद्दीकी राज,शहबोद्दीन कुरेशी,मैलांना याकूबखान,सगीर तंन्हा ,टिपू सिराजुल हक,महाराष्ट्र पूर्व विभाग अध्यक्ष दीपक ठाकरे, तालुकाध्यक्ष विलास चौधरी, उपाध्यक्ष जमीर खतीब, सचिव प्रभाकर दिघेवार, उपसचिव फराहात मिर्झा, प्रमोद वाळूककर, इब्राहिम सौदागर, माधव चौधरी, शेख शफीभाई,आकाश राऊत आदी उपस्थित होते.