Showing posts with label उस्मानाबाद. Show all posts
Showing posts with label उस्मानाबाद. Show all posts
विद्यार्थ्यांनी जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन कष्ट करण्याची तयारी ठेवावी — डॉ. दापके देशमुख दिग्गज

विद्यार्थ्यांनी जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन कष्ट करण्याची तयारी ठेवावी — डॉ. दापके देशमुख दिग्गज


इकबाल मुल्ला
लोहरा :- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर जीवना विषयी सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून जिद्द चिकाटी व आत्मविश्वास बाळगुन  कष्ट करण्याची तयारी केली तर, समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल, असे प्रतिपादन सह्याद्री फाउंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ. दापके देशमुख दिग्गज यांनी केले.
लोहारा हायस्कुल शाळेत डायरेक्टर
चाईल्डलाईन व सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद यांच्यावतीने दि.30 जानेवारी 2019 रोजी गुणवंत शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार व 1098 टोल फ्रि नं.ची जनजागृती कार्यक्रम व तसेच दहाविच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी ते प्रमुख म्हणुन बोलत होते.
यावेळी प्रथम राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ होते तर प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाऊंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज, बाल कल्याण समिती अध्यक्ष ए.डी.कदम, सह्याद्रि समन्वयक गजानन पाटील, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते मजहर पठाण, महादेव धारुळे, अदि उपस्थित होते. यावेळी शिक्षक व गुणवंत विदयार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करण्यात आले. चाईल्डलाईन,  उस्मानाबाद यांच्या '1098' या टोल फ्री नंबर ची जनजागृती करण्यात आली. यानंतर या शाळेतील दहावितील मुला, मलींनी विविध गितावर उत्कृष्ट नृत्य सादर करुन मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डी.एम.पोतदार व गजानन पाटील व सुत्रसंचालन सतिश जट्टे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ यांनी मानले. या कार्यक्रमास सांस्कृतीक विभाग प्रमुख विजय नागणे, विठ्ठल वचने पाटील, वसंत राठोड, छाया शिंदे, बाळासाहेब लांडगे, संजय घोडके, माधव हाणमशेट्टी, जी.एस.पायाळ, सारीका चिकटे, स्वाती माशाळकर, शिल्पा साबणे, निर्मळा कोळी, विद्या मक्तेदार, पी.यु.देवकर, शिवराज शिदोरे, सदाशिव बचाटे, वैजिनाथ होळकुंदे, दिलीप शिंदे, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते हराळी गाव लोकराज्यग्राम ने सन्मानित

पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते हराळी गाव लोकराज्यग्राम ने सन्मानित


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- जिल्हा माहिती कार्यालय व ज्ञान प्रबोधिनीचे मार्गदर्शन याचबरोबर गावातील युवकांचा चांगल्या गोष्टी करण्याचा ध्यास यामुळे हराळी गावास आज प्रजासत्ताक दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कोलते, पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्या उपस्थितीत लोकराज्यग्राम म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच बलभीम सूर्यवंशी, किसन सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, सुनील रणखांब व सचिन सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला  .

    महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक घरोघरी पोहोचवून त्याचा गावातील युवकांकरिता उपयोग करून आपले गाव लोकराज्यमय करण्याकरिता गावातील युवकांनी मोठया प्रमाणात पुढाकार घेतला.त्यात महेश राजे,रवींद्र सोनवणे,अनिल रणखांब, कल्याण औटे,संतोष मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रदीप बिराजदार,रघुनाथ बिराजदार, अतुल बिराजदार,मल्लिकार्जून गौरकर,संतोष कंटेकर व गावातील जेष्ठ नागरिक सुभाष बिराजदार, विकास सूर्यवंशी व सुरेश पाटील यांचा सहभाग होता.
सरपंच बलभीम सूर्यवंशी यांनी जिल्हा माहिती कार्यालय व ज्ञान प्रबोधिनीच्या मार्गदर्शनामुळेच लोकराज्य या मासिकाविषयी  गावातील युवकांमध्ये जागृती आली आहे व याचा उपयोग भविष्यात नक्कीच खूप चांगला होईल,अशी प्रतिक्रिया दिली तर होतकरू युवक सचिन सूर्यवंशी यांनी ज्ञान प्रबोधिनी व जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप साहेबांच्या मार्गदर्शनानुसार गावातील युवकांमध्ये लोकराज्य मासिकाविषयी आवड निर्माण झाली, या मासिकाचे महत्व पटले आणि म्हणूनच आम्ही आमचे गाव लोकराज्यग्राम करण्याचा निश्चय केला,अशी प्रतिक्रिया नोंदविली.

     गावातील युवकांच्या आणि गावाच्या उज्वल भविष्यासाठी आम्हाला लोकराज्य मासिक नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास या गावातील युवकांनी व जेष्ठांनीही व्यक्त केला आहे.
*आज याच सोहळ्यात एका शाळेला लोेकराज्यशाळा, एका कृषी विकास कंपनीला लोकराज्य कृषी विकास कंपनी तर दोघांना लोकराज्यदूत म्हणूनही गोैरविण्यात आले.*
यामध्ये लोकराज्यदूत म्हणून श्री.उमेश सोनवणे व विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंखे, लोकराज्यग्राम म्हणून  हराळी ग्रामपंचायत, लोकराज्यशाळा म्हणून लोकसेवा  शिक्षण प्रसारक मंडळ, भूम यांचे श्री. गुरुदेवदत्त हायस्कूल, लोकराज्य कृषी कंपनी म्हणून भैरवनाथ किसान कृषी प्रोडयूसर कंपनी, गौर ता. कळंब यांना विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
cm चषक जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

cm चषक जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे बक्षीस वितरण


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उस्मानाबाद cm चषक क्रिडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भाजपा प्रदेश सरचिटणीसय आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते दि.25 जानेवारी 2019 रोजी उस्मानाबाद शहरातील आनंद नगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी राहणार आहेत. तर प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितीन काळे, अँड.मिलिंद पाटील, विधानसभा पालक अँड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, जिल्हा संयोजक प्रदीप शिंदे, अँड खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अँड. व्यंकटराव गुंड, डॉ.प्रतापसिंह पाटील, अदि उपस्थित राहणार आहेत. क्रीडा विश्वात गाजलेल्या cm चषक क्रीडा स्पर्धाना जिल्ह्यात मोठा प्रतिदमि मिळाला आहे. व्हॉलीबॉल, क्रिकेट, रनिंग, कुस्ती, कब्बड्डी, खो-खो, नृत्य, गायन, रांगोळी, कॅरम अशा स्पर्धामध्ये तब्बल पन्नास हजारा पेक्षा अधिक खेळाडुंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धामुळे ग्रामिण भागातील खेळाडुंना, कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी मोठी संधी प्राप्त झाली. या स्पर्धात विजयी झालेल्या खेळाडुंना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, प्रवीण पाठक, धनंजय रणदिवे, इंद्रजित देवकते, गणेश मोरे, विजय शिंगाडे, प्रशांत मोहिते, बालाजी चव्हाण, प्रदीप सांगवे, गणेश देशमुख, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, सरचिटणीस नाना घाटगे यांनी केले आहे.
अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी — विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची मागणी

अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी — विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची मागणी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका विद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन होळी येथील ग्रामस्थ, रिपब्लिकन पार्टी आठवले गट (रोजगार आघाडी), महिला राजसत्ता आंदोलन यांच्यावतीने तहसीलदार लोहारा यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे कि, लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर येथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला आहे. या घचनेचा जाहीर निषेध करुन या आरोपींना फाशीची, शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर रिपाई आठवडे गट रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, पँथर नेते दत्ता गायकवाड, बालाजी माटे, दगडु कांबळे, मंगलताई कांबळे, शांताबाई भालेराव, रमाबाई भालेराव,

अंजनाबाई भालेराव, लक्ष्मन रोडगे, ग्रामसृष्टी जिल्हा समन्वयक मारुती बनसोडे, महिला राजसत्ता आंदोलन बालिका मोरे, शैला मोरे, अनिता साठे, मुकेश सोनकांबळे, संगीता कांबळे, प्रविण बोंदाडे, जयश्री बिराजदार, सरपंच व्यंकट माळी (होळी), संजय बिराजदार, किरण अंहकारे, केशव सरवदे, लिंबराज कदम, धनराज जाधव, जनार्धन जाधव, बालाजी जाधव, किशोर कोकाटे, सदाशिव जमादार, यांच्यासह महिला व नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात सह्या आहेत.
सीएम चषक क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना क्रीडाकौशल्य दाखवन्याची संधी निर्माण झाली— आ.सुजितसिंह ठाकुर

सीएम चषक क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण खेळाडूंना क्रीडाकौशल्य दाखवन्याची संधी निर्माण झाली— आ.सुजितसिंह ठाकुर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सी एम चषक क्रीडा स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखवन्याची संधी उपलब्ध झाली असुन  ग्रामीण खेळाडूंनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ही स्पर्धा प्रचंड यशस्वी केली आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले.
 भाजपाच्यावतीने सीएम चषक जिल्हास्तरीय सामन्यांच्या स्पर्धेचे उदघाटन उस्मानाबाद शहरात दि.18 जानेवारी 2019 रोजी  आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी होते. तर प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितीन काळे,
प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, खंडेराव चौरे, सुधिर पाटील, व्यंकट गुंड, जिल्हा सरचिटनीस संताजीराव चालुक्य पाटील, जालिंधर मोहिते, प्रभाकर मुळे, प्रताप सिंह पाटील,भाजप मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, सोशल मिडियाचे प्रवीण  पाठक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, ओबीसी मोर्चाचे डॉ.गोविंद कोकाटे, जिल्हा
उपाध्यक्ष नितीन भोसले, विजय शिंगाडे
नगरसेवक शिवाजी पंगुडवाले, बालाजी कोरे, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष राहुल काकड़े, शहर अध्यक्ष संदीप कोकाटे, इंद्रजित देवकते, नागेश नाना नाईक, प्रविण कोळगे, दत्ता सोनटक्के, जि.प.सदस्य राजगुरू माऊली, डॉ.अजुर्न साबळे, विनायक कुलकर्णी, जिवन वाठवडे, अविनाश हावळे, श्रीराम मुंबरे, प्रसाद पानपुडे, विपीन शिंदे, किशोर तिवारी, युवा मोर्चा संयोजक गणेश मोरे, अदि उपस्थित होते.
यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर म्हणाले कि, जिल्ह्यात 55 हजार खेळाडूंनी विविध स्पर्धांमधे सहभाग घेतल्याचे सांगुन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या या अभिनव संकल्पनेला राज्यातील 50 लाख स्पर्धकानी नोंदणी करुन प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पांडुरंग पवार यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.