इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा पं.स.च्या उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या हेमलता रणखांब यांची बिनविरोध निवड झाली
आहे.
लोहारा पं.स.च्या सभागृहात दि.7 जानेवारी रोजी प.स.सदस्यांची पिठासीन अधिकारी तहसीलदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक अधिकारी म्हणुन गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी काम पाहीले. या बैठकीत सर्वानुमते उपसभापती हेमलता रणखांब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड झाल्यानंतर उपसभापती यांचा पं.स.च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पं.स. सभापती अश्विनीताई पाटील, माजी सभापती ज्योतीताई पत्रिके, कॉग्रेस तालुका अध्यक्ष अमोल पाटील, नितीन पाटील, अँड. विश्वनाथ पत्रिके, प्रा.दिनकर बिराजदार, ब्रह्मानंद पाटील, बाबासाहेब चव्हाण, शिवाजी दुणगे, सुग्रीव रणखांब, प.स.सदस्य वामन डावरे, पं.स.सदस्य व्यंकट कोरे, शंकर गुरव, तानाजी माटे, तानाजी पाटील, यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.