Showing posts with label नागपूर. Show all posts
Showing posts with label नागपूर. Show all posts
BJP को झटका! जिला परिषद चुनाव में कांग्रेस ने दी शिकस्त; गडकरी के गांव में भी हारी पार्टी

BJP को झटका! जिला परिषद चुनाव में कांग्रेस ने दी शिकस्त; गडकरी के गांव में भी हारी पार्टी



नागपुर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के गृह गांव धापेवाड़ा में भी बीजेपी को हार का मुंह देखना पड़ा है। यहां से कांग्रेस उम्मीदवार को जीत मिली है। 31 सीटों के साथ कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है।

महाराष्ट्र के नागपुर जिला परिषद के चुनाव में बीजेपी को तगड़ा झटका लगा है। यहां 58 में से 31 सीटों पर जीत हासिल कर कांग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी बनकर उभरी है। दिलचस्प बात यह है कि बीजेपी को नागपुर में भी हार का सामना करना पड़ा है, जहां बीजेपी आमतौर मजबूत मानी जाती है। यही नहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के गांव में भी पार्टी को हार का मुंह देखना पड़ा है।

जिला परिषद चुनाव में कांग्रेस आगे बता दें कि बीजेपी से अलग होने के बाद शिवसेना ने कांग्रेस और एनसीपी संग सरकार बनाई है। ऐसे में अभी बीजेपी इस झटके से उबर भी नहीं पाई थी कि अब पार्टी को आरएसएस के गढ़ नागपुर में जिला परिषद चुनाव में हार का सामना करना पड़ा है। यहां कांग्रेस 31 सीटों के साथ सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है। गौरतलब है कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस दोनों ही नागपुर इलाके से आते हैं। ऐसे में यहां मिली हार से बीजेपी का विपक्ष के निशाने पर आना तय है।

जिला परिषद चुनाव: बताया जा रहा है कि अब तक के नतीजों के मुताबिक, 58 में से 31 सीटों पर कांग्रेस ने जीत हासिल की है। जबकि बीजेपी के पास सिर्फ 14 सीटें आईं हैं। एनसीपी को 10, शिवसेना को 1 और अन्य को 2 सीटों पर जीत मिली है।

गडकरी के गांव में भी हारी बीजेपी: गौरतलब है कि जिला परिषद चुनाव में गडकरी के गांव धपेवाड़ा में कांग्रेस उम्मीदवार महेंद्र डोंगरे को जीत मिली है। जहां महेंद्र डोंगरे को 9,444 वोट मिले, तो वहीं बीजेपी प्रत्याशी को महज 5,501 वोट ही हासिल हुए। बता दें कि धापेवाड़ा सीट तीन बार से बीजेपी के ही कब्जे में थी। लेकिन इस बार कांग्रेस ने यह सीट कब्ज़ा ली है।
नागरिकता संशोधन बिल का अबू आसिम आजमी ने किया विरोध

नागरिकता संशोधन बिल का अबू आसिम आजमी ने किया विरोध


नागपुर  :- विधानसभा के गेट पर आजमी और रईश शेख ने  दिया धरना नागपुर,नागरिकता संशोधन बिल का विरोध करते हुए समाजवादी पार्टी के विधायक अबू आसिम आजमी और विधायक रईश शेख ने यहां शीतकालीन अधिवेशन के पहले दिन सोमवार को विधानसभा के गेट पर धरना दिया ।आजमी ने बिल के विरोध में बैनर लेकर धरना दिया और केंद्र सरकार से मांग कि नागरिकता संशोधन बिल को तत्काल रदद् किया जाए।आजमी ने कहा कि केंद्र की भाजपा सरकार ने अल्पसंख्यक समुदाय को निशाना बनाने के लिए नागरिकता संशोधन बिल लाई है ।इसे हम रदद् करने की मांग करते हैं ।आजमी ने बताया कि 19 दिसम्बर को समाजवादी पार्टी की तरफ से विशाल मोर्चा निकालकर बिल का निषेध करेंगे ।इससे पहले समाजवादी पार्टी की तरफ से अबू आसिम आजमी के नेतृत्व में शनिवार को मुम्बई के आजाद मैदान में धरना आंदोलन किया गया था ।इस दौरान हजारों की संख्या में नागरिक और पार्टी कार्यकर्ता शामिल हुए ।इस आंदोलन में पूर्व आईएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन ,छात्र नेता उमर खालिद फ़हद अहमद ,विधायक रईश शेख सहित पार्टी के कई अन्य नेता शामिल हुए थे ।
मतदान केंद्रनिहाय इव्हीएम व व्हीव्ही पॅटचे प्रशिक्षण २६ डिसेंबरपासुन

मतदान केंद्रनिहाय इव्हीएम व व्हीव्ही पॅटचे प्रशिक्षण २६ डिसेंबरपासुन


उमरखेड (ताहिर मिर्ज़ा) :-  अगामी लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीत व्हीव्ही पॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे . या मशिनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दुर करण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत नगर परिषद मॅरेज हॉल येथे ईव्हीएम , व्हीव्ही पॅट जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या प्रशिक्षणाला तालुक्यातील सरपंच , पोलीस पाटील , ग्रामसेवक , कृषिसेवक , अंगवाडी सेवीका , तलाठी व सर्व मंडळ अधिकारी उपास्थित होते . सदर प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मच्या ऱ्यांमार्फत २६ डिसेंबरपासून तालुक्यातील संपुर्ण मतदान केंद्रनिहाय प्रात्याक्षिक करून नागरीकांच्या मनातील शंका दुर करण्यात येतील . यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस , तहसिलदार भगवान कांबळे , नायब तहसीलदार आर .के. कुऱ्हाडे , मार्गदर्शक एस .एम. वाघमारे आदि उपस्थित होते . मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी म्हणाले , ईव्हीएम आणी व्हीव्ही पॅटबाबत उपस्थित सर्वांनी घेतलेले प्रशिक्षण प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत जावून द्यायचे आहे . त्यासाठी गावात दवंडी पिटून नागरीकांना प्रशिक्षणाबाबत अवगत करावे .
उमरखेड येथे पैगंबर जयंती उत्साहात साजरी

उमरखेड येथे पैगंबर जयंती उत्साहात साजरी


उमरखेड : - प्रेषित हजरत मुहम्मद यांची जयंती.ईद ए मिलादुन्नबी  इस्लाम तिथीप्रमाणे २१ नोहेंबर रोजी उमरखेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली .
  सकाळी ८ वाजताचे सुमारास जुलूस  तातर शहा दर्गा येथून निघून रोहिलीपुरा, शिवाजी वार्ड ,ताजपुरा वार्ड,मैलांली चौक, नागचौक,गायत्री चौक, गांधी चौक,खडकपूर,स्वामींच्या मठा समोरून,तीन देऊळ ,अबरार चौक ते परत दर्गा येथे फतेहा खाणी करण्यात आली जुलूस मध्ये विविध सामाजिक संघटना,औदुंबर वृक्ष समिती,आटो युनियन, प्लम्बर संघटना,रजा एकॅडमी, एकता परिषद अश्या अनेक संघटना सहभागी होऊन  जुलूस चे स्वागत केले कोणी फुल देऊन स्वागत केले तर कोणी बिस्कीट,खिचडी,शरबत, पाणी बॉटल देऊन स्वागत केले.


या वेळेस काँग्रेस,राष्ट्रवादी , एमआयएम , भाजपा सह अनेक पक्षांचे नेते व कार्यकर्ते  उपस्थित होते .
 जुलूस पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावा गावातून नागरिक उपस्थीत होते . या दरम्यान पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ईद ए मिलादुन्नबी कमिटी १७ -१८चे अध्यक्ष अब्दुल समद अब्दुल सलाम यांनी आपल्या कार्यकर्त्या संघ सर्व सामाजिक संघटना ,सर्व पक्षीय नेते,पोलीस प्रशासन व नागरिक यांचे आभार मानले विशेष करून पोलीस प्रशासन चे आभार मानले
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने महिला व मुलींन आत्म रक्षक बन्न्यासाठी निशुल्क कराटे क्लास सेंटर चा उद्घाटन सोहळा सम्पन्न

सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने महिला व मुलींन आत्म रक्षक बन्न्यासाठी निशुल्क कराटे क्लास सेंटर चा उद्घाटन सोहळा सम्पन्न


उमरखेड:-(ता. प्र.)महिलांवर वाढत असलेले अत्याचार महिलांना निर्बल समजनारी विचारधारा अश्या दैनंदिन होत असलेल्या घटनाना विराम लाउन महिलांना व मुलींना स्वतःची रक्षा स्वतः करता यवि या उद्देशाने महिलांना सक्षम बंविन्याच्या संकल्पनाने उमरखेड़ शहरात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या वतीने कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले या वर्गात महिलांना व मुलींना स्वताहा प्रबल व जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणी कसे दूर करावे कुटुंबाला त्याचा आधार कसे मिळावे आपल्या परिवारा साठी महिला ही घराची लक्ष्मी असुन वेळ पडल्यास रजिया सुल्ताना व झांसीची राणी ही बनु शकते असे उदहारण समोर करुण महिलांना कराटे शिकविन्याचा कार्य हाती घेत अध्यक्षा शबाना खान यांनी योगेश्वरी कराटे क्लासेस नावाची वर्ग रवि शिरडकर यांच्या वाड्यात सुरु केले या प्रशिक्षण वर्गाचे शाखा प्रबंधक ब्लैक बेल्ट धारक सौ राखी मीरा मगरे यांनी कार्यभार संभाळला उद्धाटन सोहळा चे उद्घाटक श्री विलासराव देवसरकर,डॉ सारिका देशमुख  कायक्रमाच्या अध्यक्षा स्थानी सौ प्रतिभाताई विजयराव खडसे प्रमुख अतिथि अनीस खान पठान सर,सुहास कायटे, बट्टेवार सर,वीरेंद्र खंदारे,दीपक ठाकरे,तालिब अहेमद,कु मनीषा भारती,सौ मायाताई रावते,प्रवीण सूर्यवंशी,मज़हरुल्लाह चाचा तसेच प्रमुख उपस्थिति भारतीय महिला काँग्रेस तर्फे सौ सविता भागवत,सौ तबस्सुम स्य्यदा, रेहाना शेख,सौ अरुणा राठौड़,सौ पुष्पा चव्हाण,कंज़्यूमर प्रोटेक्शन तर्फे मोहन मगरे,सौ रेहाना सिद्दी,कु अर्चना बोराडे,कु रुपाली शिंदे,सौ सीमा, मानव अधिकार तर्फे डॉ वन्दना कदम पाटिल मरसुलकर, आतिफ पठान,आवेज़ मुजावर,अक्षय धुळे, शैलेश धाड़ें भाजपा महिला आघाडी तर्फे सौ ज्योति डुकरे, सौ राधा रावते,सौ सपना रासेकर, सौ सीमा खंदारे ,सौ मंगला येलेकर, शिवसेना तर्फे बसवेश्वर क्षीरसागर व टीम,अखिल भारतीय काँग्रेस तर्फे तहसीन शेख,सय्यद ख्वाजा,समरान पठान,आफाक तनवीर,कुणाल जाधव,अंकुश राठौड़,राहुल वानखेड़े,महिला सुरक्षा दल तर्फे इरफ़ान पठान,ताहेर शाह,सुशिल पारीक,करन सिंघ, अंसार काज़ी,असदुल्लाह खान,मो.ज़ाकिर,सय्यद वसीम, समाजवादी तर्फे मुजीब लाला,मुस्लिम एसोसिएशन तर्फे रहेमत जागीरदार,नदीम खान,सत्यनिर्मिति युवाहिनी तर्फे सौ मुश्बीरा काज़ी,कु सोनू,सिमा रत्नपारखी,कु शीतल करवे, सौ संगीता राठौड़,शमीम इस्माइल,सौ हिना काज़ी,कु नगमा शेख,कु कोमल सोनटक्के,औदुम्बर व्रक्षसनवर्धन समिति तर्फे गोविन्द सोमाणी व टीम,पत्रकार संघटने तर्फे ताहेर मिर्ज़ा,दामोदर इंगोले, निसार भाई,सतीश कोल्हे,डॉ अयूब खान,फिरोज लाला, राजेश खंदारे,ताहज़ीर भाई,कपडा बैंक सदस्य पद अधिकारी,ठेकेदार संघटना पदाधिकारी व सदस्य,तनिष्का मंडळ,वरिष्ठ नागरिक संघटना पदाधिकारी व सदस्य,भजन मंडळी समिति,आदर्श संस्थे तर्फे सौ नंदा शेवन्तराव गायकवाड़ व समिति,तसेच शेकडो महिला नागरिक व गावकरी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचलन युवा प्रवक्ता कु साहनवी खंदारे यांनी केले.
गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर.  जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते  पुरस्कार वितरण

गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते पुरस्कार वितरण


ताहिर मिर्ज़ा.
उमरखेड़ :- नितीनभाऊ भुतडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करून त्यांना बक्षीस वितरनाचा कार्यक्रम आज 7 ऑक्टोबर रोजी येथील राजस्थाणी भवन मध्ये पार पडला असून सदर कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार उपस्थित होते

विविध सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे नितीन  भुतडा यांच्या नावाने चालणार्या सामाजिक संघटनेने नितीनभाऊ भुतडा मित्र मंडळाच्या वतींने यावर्षी प्रथमच आपल्या सर्वांच्या घरी स्थापन होणाऱ्या महालक्ष्मी व घरगुती गणपती आणि सार्वजनिक नोंदणीकृत गणेश मंडळाच्या सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्ध्रेत बेटी बचाओ बेटी पाढाओ स्वच्छता वृक्षारोपण प्लास्टिक बंदी पर्यावरण रक्षण अश्या अनेक विषयांवर स्पर्धकांनी आकर्षक सजावट केली होती याच स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना व सहभाग धारकांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येथील राजस्थाणी भवन येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता

या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार  उमरखेड नगराध्यक्ष नामदेव ससाणे माजी आमदार विजय खडसे प्रकाश पाटील देवसरकर नगर परिषद मुख्याधिकारी गणेश चव्हाण उपाध्यक्ष अरविंद भोयर नगरसेवक प्रकाश दुधेवार  मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमास शहरातील सर्व सामाजिक ,राजकीय संघटनेचे पदाधिकारी पत्रकार मित्र तसेच सर्व स्पर्धकांनी उपस्थित होते  यावेळी महागौरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शीलाताई लासीनकर द्वितीय दिलीप शहाणे तर तृतीय सीमा ठाकरे यांनी पटकाविला असून घरगुती गणेश स्पर्धेमध्ये प्रथम अभिनव कोमलवार द्वितीय साई दुर्केवार तर तृतीय युवराज अग्रवाल यांनी मिळविला तसेच सार्वजनिक नोंदणीकृत गनेश मंडळामध्ये प्रथम क्रमांक राजस्थाणी युवा गणेश मंडळ द्वितीय सिद्धेश्वर गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळांनी पटकाविला सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसह सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसाने मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करन्यात आले यावेळी सर्व उपस्थितांचे नितीनभाऊ भुतडा मित्र मंडळाने आभार व्यक्त केले
12 साल के चौधरी मोहम्मद मोईझ युसूफ ने 100 मीटर बॅक स्ट्रोक स्वीमिंग कॉम्पिटीशन में गोल्ड मेडल हांसिल करके पहले के सारे  रेकॉर्ड तोड दिये। यह तैराकी क्षेत्र में नया, उभरता हुआ राज्य स्तरीय  सीतारा हैं

12 साल के चौधरी मोहम्मद मोईझ युसूफ ने 100 मीटर बॅक स्ट्रोक स्वीमिंग कॉम्पिटीशन में गोल्ड मेडल हांसिल करके पहले के सारे रेकॉर्ड तोड दिये। यह तैराकी क्षेत्र में नया, उभरता हुआ राज्य स्तरीय सीतारा हैं


नागपूर :-  एन.आय.टी इंटरनॅशनल स्विमिंग पुल में 1 से 3 ऑक्टोबर तक सम्पन्न हुयी राज्य स्तरीय स्वीमिंग कॉम्पिटीशन में 12 साल के चौधरी मोहम्मद मोईझ युसूफ ने पहले दिन 50 मीटर बॅक स्ट्रोक स्वीमिंग कॉम्पिटीशन में सिल्वर मेडल लिया और 2 ऑक्टोबर को 100 मीटर बॅक स्ट्रोक स्वीमिंग कॉम्पिटीशन में गोल्ड मेडल हांसिल   करके नया रेकॉर्ड स्थापित किया और 3 ऑक्टोबर को 200 मीटर बॅक स्ट्रोक स्वीमिंग कॉम्पिटीशन में सिल्वर मेडल हांसिल किया। 


 चौधरी मोहम्मद मोईझ युसूफ दक्षिण मुंबई के सेंट पीटर स्कुल, मजगांव का 7 वी कक्षा का छात्र हैं। अब तक उसने अपने स्विमिंग करिअर में 16 गोल्ड, 8 सिल्वर, और 8 ब्राऊन्झ मेडल और एक चॅम्पियनशिप ट्रॉफी हांसिल किया हैं।  बॉम्बे वाय.एम.सी. से श्री.मनोज बालेकर, श्री.नितीन हेगिष्टे के मार्गदर्शन में चौधरी मोहम्मद मोईझ युसूफ ने स्विमिंग की ट्रेनिंग ली हैं।

यह तैराकी क्षेत्र में नया, उभरता हुआ राज्य स्तरीय  सीतारा हैं, जो भविष्य में देश का नाम रोशन कर सकता हैं, जरूरत हैं सरकार की तरफ से हरसंभव सपोर्ट की।
उमरखेड तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम

उमरखेड तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम


 उमरखेड : -  तालुक्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये दिनांक 24 सप्टेंबर 2018 ते  9 ऑक्टोबर 2018 या कालावधीत माननीय प्रधानमंत्री प्रगती योजना अंतर्गत कृष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे . सदर मोहिमेत  मध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एक दिवसाची कृष्ठरोग विषयक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे असुन त्यांचे मार्फत घरोघरी भेटी व कृष्ठरोग बाबतची माहिती देऊन प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे . या अभियानामध्ये आढळलेल्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व कुटिर रुग्णालयात केली जाणार असून वेळीच औषधोपचार केले जाणार आहे .  तालुक्यात मागील पाच वर्षांमध्ये बहुविध औषधोपचारामुळे 191 रुग्ण कृष्ठरोग मुक्त झाले आहे. करीता  तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व जनतेने अभियान कालावधीत घरी येणाऱ्या चमुस  सहकार्य करून तपासणी करून घ्यावी व कृष्ठरोग निर्मुलन कार्यास योगदान द्यावे. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ढगे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मांडण यांनी केले आहे.
छावा गणेश मंडळ राबवित आहे  सामाजिक उपक्रम

छावा गणेश मंडळ राबवित आहे सामाजिक उपक्रम


उमरखेड :- शहरातील शिवाजी वार्डातील छावा गणेश मंडळाच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमास शहरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे .

   शहरातील शिवाजी वार्डातील युवकांच्या पुढाकारातून   सन २००० साली स्थापन करण्यात आलेल्या छावा गणेश मंडळाने आपल्या नाविन्यपूर्ण विविध सामाजिक उपक्रमामुळे शहरात लौकीक मिळविला असून यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाच्या वतीने श्रीच्या आगमना पासून ते निरोप समारंभ पर्यन्त दररोज स्वच्छता मोहिम, रांगोळी स्पर्धा ,

गीत गायन व नृत्य स्पर्धा , किर्तन , प्रबोधनात्मक व्याख्यानमाला , तसेच भारतिय सैनिकांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे . नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांच्या उपस्थितीत या मंडळाचे अध्यक्ष गणेश गव्हाणे, उपाध्यक्ष अतुल भालेराव , सचिव सुनिल शहाणे , कोषाध्यक्ष अक्षय सुरोशे , कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे , अशोक बोलजवार , सुनिल शहाणे , मारोती दुधेवार .आदिंनी सहभागी होऊन  शनिवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली होती .
अखिल भारतीय काँग्रेस संगठन महाराष्ट्रा राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी उमरखेड़ चे शाहदत अहेमद नूर खान यांची नियुक्ति

अखिल भारतीय काँग्रेस संगठन महाराष्ट्रा राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी उमरखेड़ चे शाहदत अहेमद नूर खान यांची नियुक्ति


उमरखेड़ :- देशात वाढती महगाई,भ्र्ष्टाचार,घोटाले,महिला अत्याचार,सामाजिक अन्याय विरुद्ध सरकारला वेळोवेळी विरोध करणारी राष्ट्रिय काँग्रेस पक्षाच्या ऑल इंडियन काँग्रेस संगठन राष्ट्रिय अध्यक्ष फिरोज़जी बाबी,महाराष्ट्रा राज्य अध्यक्ष चौकसीजी,व माइनॉरिटी प्रदेश अध्यक्ष साजिद अली यांनी व वरिष्ठ पद अधिकाऱ्यांनी यवतमाळ ज़िल्हा व उमरखेड़ चे निष्ठावन्त काँग्रेस कार्यकर्ता,तसेच माजी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता श्री शाहदत अहेमद नुर खान यांची महाराष्ट्रा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली

 व काँग्रेस संगठन अधिक बळकट करण्यास पुढील वाटचलिस शुभेच्छ्या देण्यात आले युवा कार्यकर्ते शाहदत खान यांनी भविष्यात पक्षाच्या निर्देश व सर्व सामान्यच काँग्रेस वरील विश्वास कायम राहन्यास प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली या वेळी प्रदेश उपाध्यक्ष शाहदत खान यांनी नवीन ज़िल्हा कार्यकारिणी गठित करुण यवतमाळ ज़िल्हा कमेटित यवतमाळ चे असलम शेख,नेर चे फहीम पटेल,दारव्हाचे खलील सय्यद, दिग्रस चे इक्रमोद्दीन काज़ी,पुसदचे अज़हर शेख,पंढरकेवडचे कौसर शाह,उमरखेड़ चे आफाक तनवीर,व अनेक कार्यक्रत्या सोबत पक्षात प्रवेश घेतला.
संविधान जाळणाऱ्या समाजकंटकाविरूध कठोर कार्यवाही करा

संविधान जाळणाऱ्या समाजकंटकाविरूध कठोर कार्यवाही करा



  • सकल मातंग समाजाचे एसडीओंना निवेदन

उमरखेड :-  दिल्ली येथे  भारतिय संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन सकल मातंग समाज उमरखेड यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे .
         दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी समाजकंटकांनी भारतिय संविधानाच्या प्रती जाळून भारतरत्न डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह घोषणा दिल्या .
     भारतिय    लोकशाहीचा आत्मा असणाऱ्या संविधानाच्या प्रती जाळून महामानवाचा अवमान करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाणे , व्ही .एच . हनवते, डी. एस . ससाणे , दत्तात्रय काळे , राजू गायकवाड , गोविंद इंगोले , शेवंतराव गायकवाड , सारनाथ रोकडे , रामदास काळे , दामोदर इंगोले , देवानंद इंगोले , संतोष जळके , प्रशांत ससाणे , अतुल खंदारे , जय बनसोड , गजानन काचेवाड , युवराज बंडगर , गजानन लामटिळे, सतिष लामटिळे आदिंनी उमरखेड  उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले .
उमरखेड मध्ये तहसिल समोर सकल मराठा समाज बांधवांचे निरंतर धरणे !

उमरखेड मध्ये तहसिल समोर सकल मराठा समाज बांधवांचे निरंतर धरणे !


उमरखेड :- सकल मराठा समाज बांधवांनी विविध मागण्यासाठी उमरखेड तहसिल कार्यालया समोर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत निरतंर आंदोलनाला सुरुवात केली आहे
      सकाळ पासुन निरतंर आंदोलन स्थळी प्रख्यात गोंधळी कार अंबादास कदम ( गोंधळी ) यांच्या संचाने गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला या आंदोलनात मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागु करावे , विद्यार्थासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे , मोर्चा दरम्याण युवकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे , अॅक्ट्रोसिटी कायदयाचा दुरुपयोग होणार नाही या करिता दुरुस्ती करण्यात यावी , अरबी समुद्रातील शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे , स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्यात याव्यात या सह विविध मागण्या समोर केल्या आहेत
      तसेच स्वातंत्र्य दिनी मुंडण आंदोलन करून मुडंण केलेले केस मुख्यमंत्र्यांना पाठविन्यात येणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे आंदोलनात न प उपाध्यक्ष अरविंद  भोयर , गुणवंत सुर्यवंशी , शिवाजी माने , भिमराव चंद्रवंशी , शंकर कदम ,  आशा देवसरकर , सचिन घाडगे , गजानन कदम , अॅड बळीराम मुटकुळे , अॅड युवराज देवसरकर,
सरोज देशमुख , सविता कदम , दत्तराव कदम , डॉ प्रमोद दुथडे , बंडु पाटिल ( कदम ) , चक्रधर देवसरकर, प्रविण सुर्यवंशी, प्र भा काळे , अरविंद धबडगे , बालाजी देशमुख , संदीप घाडगे , राजेश वानखेडे यांच्या सह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते .

खरुस ( बु ) येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा ध्वज काढला ; उमरखेड पोलीसांविरुद्ध समाजामध्ये संताप पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

खरुस ( बु ) येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा ध्वज काढला ; उमरखेड पोलीसांविरुद्ध समाजामध्ये संताप पोलीस अधिक्षकांकडे तक्रार


उमरखेड :- तालुक्यातील खरुस( बु ) येथील एका अज्ञात व्यक्तीच्या आलेल्या फोनची कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तेथील मातंग समाजाचे श्रद्धास्थान असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा परंपरागत ध्वज उमरखेड पोलीसांनी कापून काढला . त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध कठोर कार्यवाही करावी , अशी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे खरूस ( बु ) येथील संतप्त मातंग समाज बांधवांनी केली आहे .
         याबाबत सविस्तर वृत्त असे की , काल दि . ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास उमरखेड पोलीस स्टेशनचे पो . उपनिरिक्षक पांडूरंग शिंदे हे पोलीस वाहनाने ताफ्यासह खरूसगावात दाखल झाले .व त्यांनी लहुजी साळवे चौकातील 3५ते ३० वर्षापासून परंपरागत असलेला मातंग बांधवांचे श्रद्धास्थान असलेला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ध्वज पोलीसांनी कापून काढला असल्याचे पोलीस अधिक्षकांकडे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
      पोलीसांकडून अनाहुतपणे झालेल्या या कृत्यामुळे गावातील समाज बांधव एकत्रित आले व त्यांनी थेट उमरखेड पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार हनुमंत गायकवाड यांना जाब विचारला असता अज्ञात व्यक्तीने केलेल्या फोनची दखल घेऊन मीच पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग शिंदे यांना तेथे ताफ्यासह पाचारण करून ही कार्यवाही करण्याचे सांगीतले असल्याची स्पष्टोक्ती दिली . गावातील सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित नांदत असतांना गावात जातीय तेढ निर्माण करण्याच्या कुटील हेतूने प्रेरित होउन अज्ञात उपटसुंभ समाजकंटकाने फोन केल्यानंतर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता ध्वज कापून महापुरुषाचा अवमान केला त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सर्व संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी व गरीब मातंग समाज बांधवांना संरक्षण द्यावे ,अशी मागणी दयानंद सुरोशे, बालाजी काळे , देविदास काळे , अमोल सुर्यवंशी आदिंनी राज्याचे मुख्यमंत्री , सामाजिक न्याय मंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे 
पालिकेच्या यशस्वि वाटचालीत कर्मच्यार्याचे मोलाचे योगदान- नगराध्यक्ष नामदेव ससाणे

पालिकेच्या यशस्वि वाटचालीत कर्मच्यार्याचे मोलाचे योगदान- नगराध्यक्ष नामदेव ससाणे



उमरखेड प्रतिनिधी :- नगर परिषदेची सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासाकडे वाटचाल सुरू आहे शासन ज्या तत्परतेने आपणास निधी देत आहे तेवढ्याच तत्परतेने कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात कामे करीत आहेत पालिकेचा डोलारा कर्मचार्यानी आपल्या खांद्यावर यशस्वी रित्या सांभाळला आहे त्यामुळे पालिकेची विकासाकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांनी केले येथील विविध विभागातील कर्मचार्याणी आपला सेवेचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले त्यांच्या निरोपाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष नामदेव ससाणे होते तर मुख्याधिकारी गणेश चव्हाण उपाध्यक्ष अरविंद भोयर पाणी पुरवठा सभापती दिलीप सुरते बांधकाम सभापती बाळासाहेब नाईक  स्थायी समिती सदस्य नितीन भुतडा राजुभैय्या जयस्वाल मुजीब भाई नगरसेवक सैय्यद अफसर  आदी मंचावर उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त झालेले सत्कारमूर्ती बांधकाम विभागातील प्रकाश कस्तुरे,बगीचा प्रमुख इसराईल खान,पाणी पुरवठा विभागाचे अकबर खान नगर परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अताउर रहेमान आदीना सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तर सत्कारास उत्तर देताना कस्तुरे म्हणाले की माझ्या कारकीर्दीमध्ये पालिकेतील अनेक विभागात काम करण्यास मिळाले अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या सोबत काम केले असून सर्वानीच सहकार्य केले मुख्याध्यापक अताउर रहेमान म्हणाले की शाळेत पहिला विद्यार्थी येण्याच्या आधी शाळेत पोहचून शेवटचा विद्यार्थी घरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंतची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडल्याचे समाधान आहे सध्या कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्याणी देखील कामात सातत्य ठेवून काम करावे असा सल्ला देत सर्वांचे आभार मानले यावेळी नगर परिषद अधिनस्थ असलेल्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आवर्जून उपस्थित होते
निवडणुकीतील ई व्ही एम मशिन बंद करा ; समाजवादी पार्टी चे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन !

निवडणुकीतील ई व्ही एम मशिन बंद करा ; समाजवादी पार्टी चे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन !


उमरखेड :- विधान सभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरिल तसेच विधान सभा व लोकसभेची निवडणुक ई व्ही एम मशिन व्दारे न घेता बॅलेट पेपर च व्दारे घेण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कापड निस यांचे मार्फत मुख्य निवडणुक आयोग नवी दिल्ली यांना ३१जुलै रोजी  देण्यात आले
         राज्यात व देशात गेल्या निवडणुकीत ई व्ही एम मशिन व्दारे घेण्यात आलेल्या निवडणुकीत या मशिन मध्ये गडबड झाल्याचे प्रकरण निदर्शनास आले . या पुर्वी बॅलेट पेपर व्दारे मतदान होत होते तेंव्हा कुठल्याही प्रकारची गडबड दिसुन येत नव्हती त्यामुळे निवडणुक पारदर्शक पध्दतीने होत होत्या त्यामुळे समाजवादी पार्टी ने देशात व राज्यात ई व्ही एम मशिन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अशी मागणी केली आहे यांचा प्रत्यय म्हणुनच उमरखेड येथे या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले या वेळी पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य चुन्नुमीयाँ काझी , शहर अध्यक्ष शे निसार ,डॉ आंबेजोगाईकर , शायद इकबाल, साहेब खाँ , महमद आरिफ खाँन ,ईलीयास राज , शे जमीर आणि दत्ता सिं नगाने , सतिष हिंगडे , सतिष कोल्हे हे उपस्थित होते

गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलांचीच फसवणूक

गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलांचीच फसवणूक


 नागपूर :- अपत्य प्राप्तीपासून वंचित कुटुंबांना घरात पाळणा हलण्याचे सुख देण्याचे आमिष दाखवून दारिद्र्याने पछाडलेल्या काही महिलांची गर्भाशय भाड्याने देण्यासाठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसुतीनंतर त्याच्या मोबदल्यात ठरल्याप्रमाणे पैसेच अदा न झाल्याने फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात एका दलालाला अटकही झाली. त्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात शहरातील चार प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे घेतल्याने त्यांच्यावर नंदनवन पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.



डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. दर्शना पवार, डॉ. वर्षा ढवळे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. मनीष सुरजरतन मुंदडा (वय ३२) आणि हर्षा मनीष मुंदडा असे अटक झालेल्या इतर दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक संपन्न ज्या दाम्पत्यांना मुलबाळ होत नाही, त्यांना 'सरोगसी मदर्स' पद्धतीने बाळ होवू शकते. याचा गैरफायदा घेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना गर्भाशय भाड्याने देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यासाठी डॉक्टरांच्या साक्षीने वंधत्व कुटुंब आणि गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलांमध्ये नियमानुसार करार होतो. मनीष मुंदडा आणि त्यांच्या पत्नीने पैसे कमाविण्यासाठी या मार्गाचा गैरवापर करीत रुग्णालयांना 'सरोगसी'साठी महिला उपलब्ध करण्याचा व्यवसाय सुरू केला.



गर्भाशय भाड्याने घेण्यासाइी हे दांपत्य घटस्फोटीत किंवा कुटुंबापासून विभक्त महिलांना हेरत होते. महिलेचे बाळंतपण होताच बाळ गरजू कुटुंबाला सोपविले गेले. नंदनवन परिसरातील सुमारे १३ महिलांना यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र त्यापोटी १४ लाख रुपये अदा न झाल्याने महिलांनी नंदनवन पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत मुंदडा दांम्पत्याला अटक केली. रविवारी न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावल्याने इतरही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

याप्रकरणात नावे गुंतलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी पैशाच्या बाबतीत आमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. रुग्णाकडून उपचारापोटी जी रक्कम आम्ही घेतली तेवढाच काय तो आमचा व्यवहाराशी संबंध आहे. तोही व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे दलालाने काय केले याचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचे डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी प्रतिक्रियेत नमूद केले. डॉ. वर्षा ढवळे म्हणाल्या की, आपले 'सरोगसी सेंटर'च नाही.

 डॉ. दर्शना पवार यांनी त्यांच्या सेंटरमध्ये नियमानुसार 'सरोगसी'ची प्रक्रिया करून रुग्ण पाठवल्यावर प्रसुती प्रक्रिया केली. रुग्णाची गरज पाहता आपण फक्त बाळंतपण केले. त्यामुळे या आर्थिक व्यवहाराशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. इतरांनीही कायद्याानुसारच प्रक्रिया केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करतानाही आपली बाजू जाणून घेतली नाही. त्यामुळे आपण न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

अण्णाभाऊ साठे जयंती ऊत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतुल खंदारे तर सचिवपदी शेवंतराव गायकवाड

अण्णाभाऊ साठे जयंती ऊत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतुल खंदारे तर सचिवपदी शेवंतराव गायकवाड


उमरखेड़ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या  जयंती उत्सवाचे अध्यक्षपदी अतुल खंदारे तर सचिवपदी शेवंतराव गायकवाड यांची सर्वानुमते निवडकरण्यात आली शासकीय विश्रामगृहा मध्ये आयोजीत समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीचे अध्यक्ष नगराध्यक्ष  नामदेव ससाणे हे होते.


 उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी संतोष जळके व कृष्णा काळे, कोषाध्यक्ष गजानन लांबटिळे,  सहसचिव कैलाश इंगोले,प्रसिध्दिप्रमुख जय बनसोडे,दामोधर इंगोले,देवानंद इंगोले,सदस्य रामदास काळे,राम जोगदंड,प्रविण गादेकर, समाधान भालेराव,सतीशजोगदंड,संभाजी गालफाडे,नितीन लांबटिळे,शामराव ससाणे, दयानंद सुर्यवंशी,पंजाब काळे,जनार्धन पडोळे,दिलीप काळे,राजु पांधरे,आदिची निवड करण्यात आली. तालुका प्रमुख म्हणुन दयानंद सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
यावेळी पञकार राजु गायकवाड ,दतराव काळे ,गोविंद इंगोले, यांनी मार्गदर्शन केले. सभेला डि.एस. ससाणे,उत्तम काळे शामराव ससाणे आदी सामाजबांधव  उपस्थित होते.सदर जयंती ही तालुकास्तरिय करण्याचे ठरले.
मतदानाद्वारे निवडणार उमरखेड तालूका पक्षी

मतदानाद्वारे निवडणार उमरखेड तालूका पक्षी




  • नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम

उमरखेड :विदर्भातील दुसरी व महाराष्ट्रातील तिसरी ठरणाऱ्या उमरखेड तालूका पक्षी निवडणुकीचा प्रारंभ दि. 30 जुलै 2018 पासून होत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवात विकास, उमरखेड अंतर्गत या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले असून निवडणूक रिंगणात 10 पक्षी उमेदवार आहेत. निवडणूक ऑनलाईन व आॅफलाईन या दोन्ही पध्दतीने घेतली जाणार आहे. उमरखेड तालुक्याचापक्षी निश्चित करण्यासाठी दहा पक्ष्यामधून निवडून आलेल्या पक्ष्याला तालुका पक्षी घोषित केले जाणार आहे. उमरखेड तालुकापक्षी निवडणूक ही महाराष्ट्रातील तिसरी व विदर्भातील दुसरीच निवडणूक ठरणार आहे. उमरखेड तालुक्यातील लोकांना पक्षी जीवनाची ओळख व्हावी तालुक्याची पक्षीप्रेमी व पर्यावरण स्नेही ही ओळख व्हावी या उद्देशाने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निवडणुकीकरिता उमरखेड तालुक्यातील परिसरात आढळणारे पोपट, वेडा राघू, काळा किंकर, बुलबुल, जांभळा सुर्यपक्षी, खंड्या, धनचिडी, सुगरण, तांबट
कोतवाल असे दहा पक्षी उमेदवार म्हणून रिंगणात उभे करण्यात आले आहेत. या दहा पक्ष्यांमधून ऑनलाइन पध्दतीने व बॅलेट पेपरद्वारे तालुकापक्षी निवडायचा आहे. त्यासाठी एक गुगल लिंक उपलब्ध करून दिल्या जाईल. या लिंकवर क्लीक केल्यास दहा पक्षी उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका उपलब्ध होईल. त्यातील दहा पैकी एका पक्ष्याला मतदान करून स्वतः चे नाव व गाव लिहून ही मतपत्रिका पुन्हा सबमिट करावयाची आहे. याशिवाय तालूक्यातील काही ठिकाणी तसेच शाळांमध्ये मतदान केंद्र (बूथ) राहतील तेथे छापील मतपत्रिका द्वारे मतदान करता येईल. तसेच एक फिरत्या मतदान केंद्राचाही वापर या काळात करण्यात येईल. निवडणूक कालावधी दि.30 जुलै 2018  ते 7 ऑगस्ट 2018 राहणार असुन सर्व वयोगटातील तालूकावासीयांना मतदान करता येईल. 15 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
   मतदान जनजागृती तसेच शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी तसेच युवकांपर्यंत पोहचण्याकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास, उमरखेड प्रयत्न करणार आहे.तरी उमरखेड तालूक्यातील सर्व पक्षीप्रेमींनी या नाविण्यपूर्ण उपक्रमात सहभाग नोंदवावा असे अावाहन नैसर्गिक पर्यावरण संवर्धनचे पुर्व विभाग अध्यक्ष दिपक ठाकरे,तालूकाध्यक्ष गजानन चौधरी,उपाध्यक्ष जमिर खतिब,सचिव प्रभाकर दिघेवार,फराहत मिर्झा,माधव चौधरी,प्रमोद वाळूककर,शे.शफी,गजानन हसतबांधे,इब्राहीम सौदागर इत्यादी कार्यकर्त्यांनी केले आहे.
उमरखेड कडकडीत बंद

उमरखेड कडकडीत बंद




  •  सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला उमरखेड चा उत्स्फूर्त प्रतिसाद


ताहिर मिर्ज़ा
 उमरखेड :- सकल मराठा मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.याला उमरखेड वासियांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत उमरखेड 100% कडकडीत बंद पाळला आहे.

यावेळी उमरखेड मध्येही मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले, शिवाजी चौक, गांधी गांधी चौक,स्व.नारायणराव पाटिल मार्केट,ढाणकी रोड,महागाव रोड,खडकपुरा आणि पुसद रोडवरिल सर्व दुकाने सकल मराठा समाजाचे आंदोलक रस्त्याने फिरत असताना " काकासाहेब शिंदे अमर रहे, अमर रहे " अशा घोषणा देत असताना स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्ती ने आपली प्रतिष्ठाने बंद करून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.


संपूर्ण शहरातून मोर्चा काढल्यानंतर येथिल शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. या महाराष्ट्र बंद च्या मोर्चामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक महिला व जेष्ठ सहभागी झाले होते यावेळी उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

25 जुलै रोजी सकल मराठा मोर्चा
सकल मराठा मोर्चाच्या वतीने उद्या दिनांक 25 जुलै रोज बुधवार रोजी उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदाना मधून मराठा आरक्षणाकरिता सकल मराठा मोर्चाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार असून सकल मराठा समाज बांधवांनी मोर्चात हजर राहण्याचे आवाहन सकल मराठा मोर्चा समिती उमरखेड च्या वतीने करण्यात आले आहे.
मोकाट जनावरांमूळे ट्रकचा अपघात

मोकाट जनावरांमूळे ट्रकचा अपघात



तालूका प्रतिनिधी / उमरखेड :- नागपूर - बोरी - तूळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग उमरखेड शहरातून जातो या मार्गावर गेल्या काही महिन्यापासून मोकाट जनावरांचा मूक्त संचार वाढला असून किरकोळ अपघात नित्याचीच बाब बनली आहे . दि . २३ सोमवारी सकाळी येथील पंचायत समिती जवळ  सकाळी ५ : ३० वाजता रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमूळे ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे .
मागील सहा महिन्यात शहरात सर्वत्र मोकाट जनावरे , कुत्रे , वराह  यांचा मूक्त संचार आहे . याबाबत दै . लोकशाही वार्ता ने वेळोवेळी बातम्या सूध्दा प्रकाशित केलेल्या आहेत . पण निगरगठ्ठ झालेल्या प्रशासनाला जाग कधी येणार ? देव जाणे . पण या मोकाट जनावरांमूळे वाहनधारकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे . नगर परिषद प्रशासनाकडून माहीती घेतली असता मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट घेण्यासाठी कोणी समोर येत नाही असे समजले . विशेष म्हणजे मोकाट जनावरे पकडले तर ते ठेवणार कूठे ? असा प्रश्न सध्या पालिकेकडे उभा आहे . कारण एक कोंडवाडा होता तो मच्छी मार्केटला दिल्याने या जनावरांचा प्रश्न एरणीवर आला आहे .
काल झालेल्या अपघातात ट्रक कमांक एम एच २६ बी इ ६७१४ हा नरेश शिराळे यांच्या मालकिचा असून वणी येथून दगडी कोळसा भरून नांदेड येथे जात होता . उमरखेड शहरात पंचायत समिती जवळ सकाळी ५ : ३० च्या दरम्यान रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या जनावरांना वाचविण्याच्या नादात सदर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या लिबाच्या झाडावर आदळून पलटी झाला . सूदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हाणी झाली नाही . पण चालक आणि क्लीनर ला किरकोळ जखम झाली असल्याचे चालक योगेश लवाटे यांनी प्रस्तुत प्रातिनिधी सोबत बोलताना सांगीतले .