चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा


नांदेड : बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकाचे गौरव गीत गाणं राज्याचे महसूल मंत्रीचंद्रकांत पाटील यांना चांगलच भोवलं आहे. 'चंद्रकांत पाटील यांनी बेळगावात जाऊन कन्नडमध्ये गीत गाणं अयोग्य असून पाटील यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टि्वट करून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. 'कर्नाटकात मराठी भाषिकांना वाईट वागणूक मिळते. हे माहीत असतानाही पाटील यांनी बेळगावातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गाणं अयोग्य आहे. त्यांच्या वागण्याचा धिक्कार असून त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा,' अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. 'आपल्या मंत्र्याने परराज्यात जरूर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता पाळावी,' असा टोलाही पवार यांनी हाणला. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post