रावेर दि (प्रतिनिधी) रावेर बस आगारात उपलब्ध झालेल्या शिवशाही बसचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाया प्रसंगी बसचे पूजन सपोनि प्रकाश पाटोळे, आगार प्रमुख एस टी. बंदरे, वाहतूक नियंत्रक श्री भालेराव, माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ. संदीप पाटील,
रामदेव बाबा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे, तुषार मानकर आदी मान्यवरांचे हस्ते पूजन करून प्रवाश्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर बस दररोज सकाळी 5 वाजेला औरंगाबाद जाईल
तरी आपण सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास श्री चोपडे, एस एफ तडवी, जे एफ भालेराव, पी डी चौधरी, सलीम तडवी, डी एस साळुंके, एम पी कोळी, आर, आर कोळी, व्ही एम माहेश्वरी, स्वप्नील महाजन, श्याम भामरे, वाहक आय टी तडवी, चालक भोला सोनवणे यांच्यासह इंटक, सेना, कामगार, आणि कॉस्ट्राईब संघटना पदाधिकारी उपस्थित होते