- आलूर येथील 1992 च्या वर्गमित्र-मैत्रिणींचा अनोखा उपक्रम-वर्गमित्राला दिला मानसिक व आर्थिक आधार.
उमरगा तालुका प्रतिनिधी मा.श्री.चेतन दादा पवार
उमरगा तालुक्यातील आलूर येथील जि.प.प्रशालेच्या 1992 च्या वर्गमित्र-मैत्रीण व गुरुजन यांचा एक गट असून गेल्या वर्षी या गटाकडून सर्व शिक्षकवृंदांचा गौरव करण्यात आले होते. या वर्षी त्यांच्याच गटातील आर्थिक बाजू हालाक्याची असणाऱ्या दगडू कांबळे या मित्राला पॅरालायसीस(अर्धअंगवायू)चा अटॅक येऊन अर्धे शरीर वेदनाहीन झाले. परंतू आर्थिक बाजू कमकुवत असल्याने, फक्त गावठी औषधोपचार करणाऱ्या या मित्राला त्यांच्या 1992 चे वर्गमित्र-मैत्रीण व शिक्षकवृंदानी पुढील उपचारासाठी 11000 रुपयांची मदत केली.
1992 च्या वर्गमित्र-मैत्रिणींचा प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव या उपक्रमाद्वारे लोकांच्या समोर आले आहे. मित्र असावे तर असे जे सुख-दुःखात सदैव आपल्या पाठीशी उभे असतात. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने आलूर परिसरात 1992 च्या वर्गमित्र-मैत्रिणींचा व शिक्षकवृंदाचा कौतुक केले जात आहे.
यासाठी बाळकृष्ण नेहरकर, नवाज सैय्यद, विजयकुमार वाकडे, सदानंद बिराजदार, ज्योतिबा अंगुले, सारिका मंथळकर, लक्ष्मी मिरजे, संजय कासार, आनंद पतंगे, कलावंत गुरुजी आदींनी मदत केले. हे मदत घेताना दगडू कांबळे यांना आनंद आश्रू आवरले नाहीत. त्यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार मानले.
दगडू कांबळे यांना रोख रक्कम देताना चंद्रकांत शंके व युनूस हुच्चे