ऐनपूर महाविद्यालयात रासेयो तर्फे राष्ट्रीय रक्तदान दिन साजरा


रावेर :-  येथून जवळच ऐनपूर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे राष्ट्रीय रक्तदान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने होते  प्रमुख वक्ते   डॉ सतिश पाटील यांनी रक्तदान हा समाजपयोगी उपक्रम आहे तसेच गरजू रुग्णांना दान केलेल्या रक्ताचं उपयोग होतो तसेच रक्तदात्या ला सुद्दा उपयोगाचे आहे त्याच बरोबर रक्तदानाचे महत्त्व  सांगितल सदर कार्यक्रमासाठी प्रा नितीन बारी व्यवस्थापन परिषद सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव उपस्थित होते  अध्यक्षीय समारोपात  प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी रक्तदाना विषयीं बोलत असताना अवयवदानाचे सुद्धा महत्व विशद केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सतीश वैष्णव यांनी केले आभार प्रा डॉ जयंत नेहेते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात 114  विद्यार्थी- विद्यार्थीनी हजर होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post