
अस्तित्वात असलेले स्टॉॉल अतिक्रमणात धरू नये आदी मागण्यांसाठी मंगळवारी रावेर तालुका वृत्तपत्र संघटनेकडून राज्य संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी वृतपत्र संघटनेचे अध्यक्ष डी.एन.वाणी,विनोद पाटील,अजय पिपलोदकर,अशोक खारे,हितेश चौधरी,निलेश सराफ,पद्माकर चौधरी,महेंद्र सोनवणे,सतीश वाणी,दिलीप वाणी,प्रशांत पासे,व पत्रकार,वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.या नंतर गेल्या ४० वर्षापासून अखंडपणे वृतपत्र विक्री चे काम करत असलेले जेष्ठ विक्रेते पद्माकर चौधरी,मोरगाव व रमेश खडायते,यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.