पाल येथील वैद्यकीय हजर नसल्याने नागरिकांन मधे नाराजी
रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्याच्या पाल येथे जंगलातून घरी परत येतांना नदीतील पाणी पिल्याने पन्नास गुरांना विषबाधा झाली. त्यात चार गाईचा उपचार न मिळाल्याने मृत्यूू झाला.
दि 30 रोजी गफुर अनवर तडवी व मुस्तफा जलदार तडवी नेहमी प्रमाणे गुरे चराई करता गुरांना जंगलात नेले. संध्याकाळी घराकडे परत येताना सुकी नदीत पाणी पिण्याकरिता थांबवले. पाणी पित असताना अचानक गुरांना गुंगी येऊ लागल्याने गुरे जमिनीवर पडू लागली. हे गुराख्याचे लक्षात येताच गुराख्याने पशु वैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधला. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शिपाई निजाम तडवी यास सोबत नेत गाईंवर उपचार केले. उपचार दरम्यान चार गाईचा मृत्यू झाला. विषबाधा कशामुळे झाली हे समजू शकले नाही.
उपचाराअभावी गाईंचा मृत्यू
पाल पशुवैद्यकिय दवाखान्यात दोन तिन वर्षापासुन वैद्यकिय अधिकारी नाही. आहे ते पण प्रभारी. तेही पाल दवाखान्याला कधी साधी भेटही देत नाही. वैद्यकीय अधीकारी नसल्याने विष बाधीत गुरांवर वेळेवर उपचार होऊ न शकल्याने चार गाईचा मृत्यूू झाला.