रावेर :- निंभोरा बु ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी स्वयंसिद्धा अभियानाला ज्युडो कराटे शिबीराला सुरूवात झाली
आहे मुलींना शिक्षणासाठी ,नोकरी,व्यवसायाकरिता घराबाहेर पडावे लागते त्यांना स्वत:चे संरक्षण करता यावे या उद्देशाने सदर प्रशिक्षण दिले जात आहे राजेन्द्र सुरवाडे ब्लॅक बेल्ट, गणेश चौधरी ब्लॅक बेल्ट ,
वसीम तडवी विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत आहेत युवती सभा सचिव डॉ निता वाणी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा साईनाथ उमरीवाड ,डॉ रेखा पाटील यांनी प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्धा शिबीराचे आयोजन केले आहे .