माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी प्रा डॉ जे बी अंजने

ऐनपूर महाविद्यालयात सर्जिकल स्राईक डे साजरा

रावेर :- सोशल मीडियाच्या आणि व्यसनाच्या जाळ्यात अडकलेल्या आजच्या युवकांनी माजी सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राइक डे राष्ट्रीय सेवा निमित्त आयोजित कार्यक्रम मधील आत्मकथनातुन प्रेरणा घेऊन देशभक्ती अंगिकारावी असे आवाहन ऐनपूर महाविद्यालयात अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ अंजने यांनी केले.

येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात सर्जिकल डे निमित्त राष्ट्रीय सेवा योजना दल यांच्या कडून माजी सैनिकांच्या यशोगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून रावेर तालुका तायक्वांडो असोसिएशन अध्यक्ष दीपक नगरे, दिलीप सोनवणे हे उपस्थित होते.

सरदार पटेल यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली यात निंभोरा येथील रहिवाशी आणि 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील जखमी असलेले माजी सैनिक सुधाकर गंजी सोनवणे यांनी त्या काळातील युद्धाच्या थरारक आणि रोमांचक अनुभव कथन करतांना त्यांचे डोळे पाणावले.

शत्रूच्या गोळ्या लागून देखील कर्तव्य बाजावतांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेऊन वाचविले असल्याचे अभिमानाने सांगून त्यांनी माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांनी प्रत्येक जखमी सैनिकांची भेट घेऊन केलेली विचारपूस त्यांनी भावुक शब्दात सांगितले.

कठीण प्रशिक्षण दरम्यान खुद को बाचाकर, दुष्मन को खतम करो, या शिकवणीचा उहापोह देखील त्यांनी केला. शेजारील देश आजही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला वठणीवर आणण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राइक सारखे कठोर पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे म्हटले.
दीपक नगरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की आजचा सुखासीन झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या सीमावर्ती भागात जाऊन सैनिकांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्या जीवनात त्यांची शिस्त आणि संयम अंगीकारावेत.

 स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक यांचा आदर करून त्यांच्या उपयोगी आपण यावे. त्यांच्या सारखे आपण लढू शकत नसलो तरी देश हिताचे कोणतेही कार्य जसे सफाई दूत, बेटी बचाव, वृक्ष संवर्धन आदी हिताच्या मिहिमेत सहभागी होऊन देशभक्त बना असेही आवाहन केले.

 शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ जे बी अंजने यांनी नुकताच प्रदर्शित झालेला परमाणु तसेच सैनिक जीवनावर आधारित चित्रपट बघण्याचे आवाहन करून अमेरिका आणि त्यांचे परमाणु धोरण या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश वैष्णव यांनी केले तर आभार जयंत नेहते यांनी मानले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post