रावेर :- येथील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते माऊली हॉस्पिटल दरम्यान बेशिस्त प्रवाशी वाहनांच्या वाहतुकी मुळे पुन्हा एखाद्याच्या जीव जाईल असे चित्र बघावयास मिळत आहे
या बाबत अधिक वृत्त असे की, रावेर शहरातील मुख्य वाहतुकीचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा भाग असून याच भागात प्रवाशी वाहतूक करणारे ऍपे रिक्षा आणि इतर वाहने यांची कायम वर्दळ असते याच भागात या पूर्वी तिघांचा बळी गेलेला असून तत्कालीन पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी कठोर पावले उचलून रिक्षा चालकांना कायद्याचा वचक दाखवून दिला होता
अत्यंत शिस्तीत असणारे रिक्षाचालक मात्र काही काळाने निर्ढावले असून पुन्हा सर्व नियम धाब्यावर बसवून वाट्टेल तिथे आपली वाहने उभी करीत असतात यामुळे पुन्हा लहान सहान अपघात होत असून याकडे पोलिसांनी लक्ष न दिल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी देखील याभागात आपली आदरयुक्त भीती निर्माण करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे