स व प महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी


रावेर प्रतिनिधी :- रावेर येथून जवळच ऐनपूर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे महात्मा गांधी  जयंती साजरी करण्यात आली

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला गांधीजींच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले  प्रमुख वक्ते   डॉ जी आर ढेमरे, श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर यांनी गांधीजी नि सांगितलेले सत्य, अहिंसा, स्वावलंबन या जीवन मूल्यचे महत्त्व  सांगितले, गांधीजींच्या स्वप्नातील भारत उभारणीसाठी रासेयो स्वयंसेवकांनी पुढे यावे असे सांगितले  सदर कार्यक्रमासाठी श्री महेंद्र भोई उपस्थित होते

त्यानी दे दि हमे आझादी हे गीत गायिले श्वेता महाजन या विद्यार्थ्यिांनिने गांधीजींचे विचार सांगितले संजय कोळी ने रघुपती राघव गीत सादर केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सतीश वैष्णव यांनी  केले आभार प्रा डॉ जयंत नेहेते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात 96  विद्यार्थी- विद्यार्थीनी हजर होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post