इकबाल मुल्ला
लोहारा/उमरगा प्रतिनिधी :- उमरगा येथील जमीयत उलमा ए हिंद शाखेच्या वतीने केरळ पुरग्रस्तासाठी ५३ हजाराचा निधी पाठविण्यात आला.शाखेचे अध्यक्ष मोलाना गुलामनबी मलंगसाब बलसूरी,उपाध्यक्ष फेरोज अ.रज्जाक शेख सचिव हाफिज युसुफ मोहियोद्दीन शेख,हाफिज रहमानसाब, तय्यब साब,ताजोद्दीन नजीर मुल्ला,शकील बाबू डांगे, सलाउद्दीन
पीरजादे,अब्दुल रऊफसाब सौदागर,ताहेर कादरी,हाजी जाफर फखरुद्दीन तांबोली, हाजी मुहम्मदसाब तांबोली,मोहम्मद शौकत साब, खालीद भाई पेशमाम,बाबा जाफरी,पाशा काजी,निसारभाई, अब्दुल अजीज बागवान,अज्जम काजी,बबलू काझी, भैय्या शेख,साजीद लदाफ,फय्याज भाई,वजीर शेख, निजाम व्हंताळे आदींनी पुढाकार घेऊन केरळग्रस्ताच्या मदतीसाठी निधी संकलित केले. उमरगा तालुक्यातील आलुर,तुरोरी,बलसुर,चिंचोली,
मुरूम,तलमोड,दाळींब,खजुरी लोहारा तालुक्यातील अचलेर,येथील मुस्लीम बांधवांनी निधीसाठी सहकार्य केले.दरम्यान शनीवारी ५३ हजार ६९२ रुपयाचा निधी धनाकर्षाद्वारे मदतीनिधीसाठी पाठविण्यात आला. यापूर्वी येथील मुस्लीम पंच कमेटीने केरळच्या पूरग्रस्तासाठी ७० हजाराचा निधी दिला होता.मुस्लीम बांधवांचे दातृत्व या निमित्ताने अधिक प्रमाणात दिसून आले.