ऐनपूर महाविद्यालयात एनमुक्टो चे ठिय्या आंदोलन महाविद्यालयीन कामकाज आटोपल्यावर रोज दिडतास आंदोलन


रावेर प्रतिनिधी .रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात एनमुक्टो संघटणे तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन महाविद्यालयीन कामकाज संपल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. जो पर्यत संघटणेच्यामागण्या पुर्ण होणार नाही तो पर्यंत महाविद्यालयीन कामकाज आटोपल्यावर रोज दिड तास बेमुदत आंदोलन ठरविण्यात आले आहे

यात संघटनेच्या एकुण प्रमुख आठ मागण्या आहेत १)राज्यशासनाने उच्च शिक्षण छेत्रातील सर्व रीक्त पदे त्वरीत भरावीत,  २)७१ दिवसांचे बेकायदेशीर रीत्या थांबविलेले वेतन ताबडतोब अदा करावे, ३) ग्रंथपाल, शारीरीक शिक्षण संचालक आदिंसह सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करून शिक्षकांना देय थकबाकीसाठी केंद्रशासनाने १००% निधी उपलब्ध करून द्यावा. ४) नविन अंशदायी पेंंशन योजना बंद करून सर्व शिक्षकांना जूनी पेंंशन योजना लागुकरावी.

५) विनाअनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांच्या संस्थाचालकांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्ण वेतन द्यावे. ६)मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समानकाम, समानवेतन या तत्वाची अंमलबजावणी करून अर्हताप्राप्त कंत्राटी शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत समावून घ्यावे. ७) मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय तक्रार निवारन समीती त्वरीत स्थापण करण्यात यावी.

८) पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींची दुरूस्ती तात्काळ करावी. या प्रमुख आठ मागण्यांंसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. यात संघटणेचे अध्यक्ष प्रा.डाँ.एस.ए.पाटील यांच्या अध्यक्षते खाली प्रा.डाँ.के.जी.कोल्हे (एम.फुक्टो.कार्यकारणी सदस्य), प्रा.एम.के.सोनवणे, प्रा.डाँ.पी.आर.महाजन(एनमुक्टो जिल्हा कार्यकारणी सदस्य),

 प्रा.डाँ.सौ.रेखा पाटील, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एस.बी.पाटील, प्रा.डाँ.एस.एन.वैष्णव, प्रा.व्ही.एच.पाटील यांनी आदोलनात सक्रीय सहभाग नोदवला या आंदोलनाला तासीक तत्वावरील प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.अर्जून वंजारी, प्रा.कु.रूपाली बऱ्हाटे, प्रा.कु.प्रेरणा बोंडे, प्रा.कु.टिना तळेले, हर्षल पाटील, महेंद्र महाजन, सुनिल पाटील, गोपाल पाटील, गणेश महाजन, नितीन महाजन यांसह विद्यार्थ्यांनी पाठींबा दर्शविला आहे. फोटोत आदोलनात सहभागी झालेले प्राध्यापक.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post