अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसुलचा 100 टक्के निकाल



पाटसुल- स्थानिक अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसुलचा इयत्ता 10 वीचा सलग दुसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल लागला आहे.
शाळेतून सतिश तायडे  84.40% घेऊन प्रथम तर द्वितीय अनिकेत तायडे 77.60 % तर तृतीय शुभम धांडे 75.40 % व आनंद जवंजाळ याने 74.60 गुण प्राप्त केले आहेत.शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी चांगले सुयश मिळविले आहे.
     या सर्व विद्यार्थ्यांचे तथा शिक्षकांचे  समाज कल्याण अकोला चे सहा.आयुक्त श्री. अमोल यावलीकर यांनी अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री नागसेन वाकोडे,शिक्षक श्री.शिवपाल गिर्हेपुंजे,सागर कोवळे,रवि लोणकर, मंगेश कडू, श्री.ए.व्ही.पजई, कु. सुवर्णा धर्मे, कु. शुभांगी राऊत श्री.राठोड ,श्री.बाळापुरे,  श्री.मिसार, श्री. इंगळे,  यांनी विध्यार्थ्याचे अभिनंदन केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post